ज्योतिषशास्त्राचा फायदा

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
28 Feb 2014 - 10:07 pm
गाभा: 

ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.

ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.

थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.

मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.

आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.

यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.

कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल.

माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.

प्रतिक्रिया

सारकॅजम असेल तर ठिक आहे...
गांभिर्याने लिहीले असेल तर शुभेच्छा !

खटपट्या's picture

28 Feb 2014 - 11:26 pm | खटपट्या

+११११

आयुर्हित's picture

28 Feb 2014 - 11:35 pm | आयुर्हित

गांभिर्याने लिहीलेले आहे हो आबा!

मी आपले उगाच समजायचो जो तकदीर मे लिखा होता है वहीच मिलेगा वगैरे वगैरे...

एक माझाच शेर आठवला, अर्ज करतो.

तू क्या बरबाद करेगा मुझे ए जमाने,
तेरी खुद की तकदीर कोई और लिखता है..

लंबूटांग's picture

28 Feb 2014 - 11:41 pm | लंबूटांग

ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.

विदा? किमानपक्षी काही उदाहरणे?

ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.

दिनदर्शिकेचा वापर माझ्या माहितीप्रमाणे तरी शनिवारी कोणती तारीख आहे/ अमुक तारखेला कोणता वार आहे हे बघण्यासाठी आहे. जे अतिशय अ‍चूक असते. आपल्याला असे म्हणायचे आहे का की ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते?

थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.

मी जन्माला आलो तेव्हा भारतात संगणक आलेले नव्हते/ नुकतेच आले असतील काही संशोधन संस्थांमधे वगैरे. आता त्या ज्योतिष्याला तेव्हा कसे माहित असणार की मी ह्यातच नोकरी करेन?

मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.

फुटलो. म्हणजे नोकरीच्या अप्लिकेशन बरोबर कुंडलीपण जोडायची असे काही म्हणायचे आहे का? भारतातले माहिती नाही पण अमेरिकेत तरी तुम्हाला तुमचे वय विचारणे निषिद्ध आहे मुलाखतीच्या वेळी. कुंडली तर दुरचीच गोष्ट.

आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.

परत तेच म्हणतो. ज्योतिष्यामुळे मला अचूक सांगता येईल का की मला वयाच्या ६० व्या वर्षी कॅन्सर होईल? नियमीत वैद्यकीय तपासणी करून बरेच आजार वेळीच निदर्शनास येऊ शकतात.

यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो.

मला कॅन्सर होणार असे समजा कळले ज्योतिष्यामधून तर काय मला उगाचच कीमोथेरपी सुरू करणार का? की हार्ट अ‍टॅक येईल म्हणून आधीच ओपन हार्ट सर्जरी करणार?

कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल.

शेअर मार्केट ८००० वर्षांपूर्वी होते? त्यासाठी कोणाची कुंडली मांडायची नक्की?

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 12:35 am | आयुर्हित

मी मागील २ वर्षापासूनच अभ्यास करतो आहे, त्यामुळे सर्वच उत्तरे अगदी अचूक असतील असे नाही. पण तरी प्रयत्न करतो. जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना भरघोस फायदा होईलच.

१) रामायण, महाभारत, भागवत यात कित्येक उदाहरणे आहेत, कित्येक खगोलीय घटना नमूद केलेल्या आहेत (उदा: महाभारतात जयद्रथाच्या वधाच्या वेळी सुटलेले सूर्य ग्रहण). यावर आता जगभरात खूप संशोधन सुरु आहेत. आजही आपण रामनमवी, कृष्णाष्टमी, दसरा, दिवाळी तिथीप्रमाणे साजरी करतोय, हे ज्योतिषशास्त्रातील कालगणनेचे/वापराचे एक उदाहरण आहे.

२)ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते? : हो येते.

३)मी जन्माला आलो तेव्हा भारतात संगणक आलेले नव्हते/ नुकतेच आले असतील काही संशोधन संस्थांमधे वगैरे. आता त्या ज्योतिष्याला तेव्हा कसे माहित असणार की मी ह्यातच नोकरी करेन?: यात साधारण कल समजतो, कुठले कलागुण/अवगुण आहेत हेही समजते व त्यानुसार तुम्ही SWOT ANALYSIS करून अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात. (जसे उद्या तुमच्या शहरात जोराचा पाऊस असेल असे कळल्यावर आपण त्याप्रमाणे तुमचे वेळापत्रक बनवू/बदलवू शकता)

४)म्हणजे नोकरीच्या अप्लिकेशन बरोबर कुंडलीपण जोडायची असे काही म्हणायचे आहे का? होय, हि काळाची गरज ठरणार आहे.(अर्थात काही खास विशिष्ट IQ/EQ लागेल अशा कंपन्यांना तर MUST). आजच्या काळातही चीन मध्ये लहान मुलांच्या हातावरचे/बोटावरील ठसे/चिन्हे पाहून त्यांचा कल ठरवला जातो व जी मुले देशाला फायदा देतील त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च देश उचलतो.

५)ज्योतिष्यामुळे मला अचूक सांगता येईल का की मला वयाच्या ६० व्या वर्षी कॅन्सर होईल? कोणत्या अवयवाला,कोणता त्रास, कोणत्या ग्रहाच्या महादशेत/अंतर्दशेत (period) होईल हे अचूक सांगता येईल, त्यावर किती दिवस उपचार चालेल व तो उपयोगी/निरुपयोगी ठरेल हेही सांगता येते

६)मला कॅन्सर होणार असे समजा कळले ज्योतिष्यामधून तर काय मला उगाचच कीमोथेरपी सुरू करणार का? की हार्ट अ‍टॅक येईल म्हणून आधीच ओपन हार्ट सर्जरी करणार?:
Preventive actions/Alternative Medicine/आहार, विहारात जाणीवपूर्वक बदल व योग,प्राणायाम,पथ्य हे उपचार आहेतच कि आजही. त्यांची माहिती मिळेलच कि.

७)जसे जसे नवे शोध लागतात त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्रात योग्य ते बदल घडत जातात. उदा: इंधनासाठी/ प्रदुषणासाठी युरो४ हे मानक दिल्लीत वापरले जाते ते पुढे जाऊन युरो ५ किंवा युरो १५ देखील होईलच कि कधीतरी.

शेअर मार्केट साठी आपली स्वतःची(व कदाचित देशाचीही) कुंडली जरुरी आहे.

लंबूटांग's picture

1 Mar 2014 - 12:59 am | लंबूटांग

त्या तिथी वगैरेंना खगोलीय कारणमिमांसा आहे जी आपल्या पूर्वजांना माहित असेल. त्याचा कोणाच्या भविष्याशी काय संबंध?

२)ज्योतिष्यामुळे मला अमुक दिवशी किमानपक्षी वर्षी तरी नोकरी मिळेल/ प्रमोशन मिळेल असे काहीतरी ठामपणे आणि अचूक वर्तवता येते? : हो येते.

तर मग पडताळा घेण्यासाठी मागील घटना अचूक वर्तवता आल्या पाहिजेत. जर मी तुम्हाला माझी जन्मवेळ कळवली तर मला कधी प्रमोशन मिळाले हे अचूकपणे सांगता येईल?

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 1:17 am | आयुर्हित

आपली अचूक जन्मवेळ, जन्मगाव, जन्म दिनांक व्य नी कराळ का? मी नक्कीच प्रयत्न करेन.

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Mar 2014 - 2:53 pm | लॉरी टांगटूंगकर

यात साधारण कल समजतो, कुठले कलागुण/अवगुण आहेत हेही समजते व त्यानुसार तुम्ही SWOT ANALYSIS करून अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात. (जसे उद्या तुमच्या शहरात जोराचा पाऊस असेल असे कळल्यावर आपण त्याप्रमाणे तुमचे वेळापत्रक बनवू/बदलवू शकता)

जर का हे खरं म्हणलं तर तुम्ही काय अ‍ॅक्शन्स घेणार हे पण पत्रिकेत लिहून ठेवलेलं असणार. ते वेळापत्रक बनवणे अथवा न बनवणे लिहीलेलंय. काही केसेसमध्ये बनवलेलं फेल जाणार हे पण लिहीलय. म्हणजे जर का सगळ आधीच ठरलेलं आहे तर त्यात कर्त्याचं काम काय??

कोणत्या अवयवाला,कोणता त्रास, कोणत्या ग्रहाच्या महादशेत/अंतर्दशेत (period) होईल हे अचूक सांगता येईल. आणि Preventive actions/Alternative Medicine/आहार, विहारात जाणीवपूर्वक बदल व योग,प्राणायाम,पथ्य हे उपचार आहेतच कि आजही. त्यांची माहिती मिळेलच.

मग यात ज्योतिषाचा काय रोल? भीती वाढवायला??

जर का चांगले आहे तर लेट इट बी सरप्राइज, आणि वाईट असणार तर अत्ता पासून त्याचा डोक्याला का त्रास घ्या? कारण या थेअरी नुसार कर्त्याच्या हातात काहीच नाहीये.

योग्य inputs कर्त्याला योग्य निर्णयापर्यंत घेवून जातात.

उदा: शिवाजी महाराज हेर खात्याचा पुरेपूर वापर करूनच योग्य ती कृती करत होते.
मग तो अफजलखानाचा वध असो, मढेघाटाची लढाई असो कि सुरतेवरचा छापा असो!

त्याचप्रमाणे आपल्याला, आयुष्यातील निर्णय योग्यप्रकारे घ्यायचे असतील तर योग्य inputs हवेत ना!
योग्य वेळी inputs मिळाल्यामुळे कर्त्याला अजून जास्त वेळ मिळतो स्वत:ला Prepare करण्यासाठी.

जर कर्त्याच्या हातात काहीच नाहीये असे गुहीत धरले तर आपण
१)चांगल्या शाळेत/कॉलेज ला का जातो?
२)परीक्षेसाठी अभ्यास का करतो?
३)चांगल्या लोकांच्या संपर्कात का रहातो?
४)चांगल्या डॉक्टरकडेच का जातो?
५)रेल्वेचे, विमानाचे आरक्षण का करतो?
६)इंटरव्ह्यू द्यायला का जातो?
तर थोडक्यात काय तर आपण सर्वजण अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठी (तमसो मा ज्योतिर्गमय) साठी प्रयत्न करतो
(good to better, better to best life).
आणि हे करण्यासाठीच सर्व योग्य Inputs मिळवून, विचार करून, योग्य तो निर्णय घेत असतो.

माझे म्हणणे हेच आहे की, उद्या जर आपल्याला ५लाख रुपये मिळणार असतील तर त्याचे योग्य नियोजन करून, मिळणारी रक्कम पूर्ण सत्कारणी लावून आयुष्यात चांगला बदल घडवू शकतो.

पण ज्याला विचार करायलाही वेळ मिळत नाही, तो अचानक हातात आलेले ५ कोटी घालवूनहि, होते त्यापेक्षाही वाईट परिस्थितीला पोचतात.

जी लोक आपल्यासारखीच विचार करतात त्याच्यासाठी एक उदाहरण देतो:

आपल्याकडे एक वर्ग आहे जो अशिक्षित आहे, कमीत कमी ५ मुलांना जन्म देतो, म्हणतो ये तो खुदा की देन है!
पुढे काय होते, हि मुले लहानपणापासूनच मिळेल ती कामे करतात, अगदी पाव विकण्यापासून हमाली पर्यंत.
ज्यांना अशीही कामे मिळू शकत नाही किंवा इतर कारणांमुळे अगदी १०००/- रुपयांसाठी खुन करणे हे त्यांच्या साठी अगदी सहज असते.

आपल्याकडे दुसरा वर्ग आहे जो सुशिक्षित आहे, कमीत कमी मुलांना जन्म देतो, म्हणतो ये तो खुद की ही देन है!
एकाला/दोघांना सांभाळता सांभाळताच नाकी नऊ येतात. त्यांच्या अभ्यासावर, आरोग्यावर योग्य तो पैसा खर्चून व छंद जोपासण्यापासून पूर्ण लक्ष पुरवितात कि दुसऱ्या/तिसऱ्या मुलाला जन्म देण्याचा विचारही करत नाही.

आता विचार करा ह्या दुसऱ्या वर्गाने पहिल्या वर्गाप्रमाणे वागून चालणार आहे का?
शक्यच नाही कारण शिक्षणामुळे त्यांना योग्य ती inputs मुलाला जन्मघालण्या आधीच मिळालेली/माहित असतात.

मग यात ज्योतिषाचा काय रोल? भीती वाढवायला??
भीती म्हणजे काय? पुरेशी माहिती नसणे म्हणजेच भीती वाटणे.
मला आगीची भीती वाटते पण जर मला firesuit बद्दल माहिती झाली तर तो मिळवून मी स्वत:च आगीत उडी मारेल कि नाही?

अशीच भीती शेअरमार्केट बद्दल लोकांना वाटत असेत, त्यामुळे त्यापासून ते दूर राहतात व होणाऱ्या फायद्याला मुकतात.

असेच बरेच फायदे असतात जीवनात!
आणि जाणकार कर्त्याच्या हातातच सर्व काही असते!
तेव्हा पुरेपूर फायदा घ्या आपल्या जीवनाचा व compromise विसरा.

तिमा's picture

1 Mar 2014 - 7:18 pm | तिमा

आजही आपण रामनमवी,

लेखाबद्दल काही मत व्यक्त करण्याचा मला अधिकार नाही, पण 'रामनमवी' हा एक मनोरंजक शब्द तुमच्यामुळे डोक्यांत फिट्ट बसला, त्याबद्दल धन्यवाद. त्या सगळ्या, राममंदिराच्या नांवावर रामाला आणि देशाला ओलिस ठेवणार्‍या भक्तांना हे नांव शोभून दिसेल.

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 7:24 pm | आयुर्हित

यावरून तीन गोष्टी समजल्या
१) आपल्याला मिळालेली तीक्ष्ण दृष्टी
२) मिपावर मराठीत Spellcheck facility नसणे
३) हे कुठले स्पेक्ट्रम डीसऑर्डरचे लक्षण तर नाही ना?

पंतश्री's picture

24 Mar 2015 - 11:07 am | पंतश्री

तुम्हि म्हणता ते बरोबर हि असेल, पन अम्हाला तर एकच उपयोग माहित आहे तो म्हणजे लग्न जुळवणे.

मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे.

ह्यासथि अधि सर्वसामान्य लोकाना ज्योतिषशास्त्र कळले पाहिजे ना. इथे सर्वसामान्य लोकाचा लोचा आहे तर ते HR मॅनेजर पर्यन्त कधी पोहोचायचे....

काळा पहाड's picture

1 Mar 2014 - 1:17 am | काळा पहाड

अरे देवा! घुसलात तुम्ही पुन्हा शास्त्र विभागात!!

रामपुरी's picture

1 Mar 2014 - 2:00 am | रामपुरी

अप्रतिम (विनोदी) लेख...
एक शंका: समजा मला उदा. टॉन्सिल्सचा त्रास होणार असं भविष्य आहे आणि मी लगेच टॉन्सिल्स काढून घेतले तर भविष्य खोटं ठरलं की खरं?

बाकी ज्योतिष(शास्त्रात???) आजारांची माहीती कळते हे वाचून धन्य झालो. ज्योतिषांना डॉक्टरकडे जावंच लागत नसेल नाही? पण तुम्हाला असं वाटत नाही का कि कमीत कमी एकातरी ज्योतिषाच्या मरणाच्या एक दिवस अगोदर वर्तमानपत्रात बातमी यायला हवी होती की बुवा 'माझा या दिवशी या वेळी पत्रिकेत लिहिल्या प्रमाणे नैसर्गिक मॄत्यू होणार आहे. तेव्हां माझा रामराम घ्यावा.'
असो... आमच्या शुभेच्छा... लवकर बरे व्हा... गेट वेल सून...

इथे भविष्य खरे किंवा खोटे ठरविणे हा मुद्दा नाही!

हे एक शास्त्र आहे, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास मात्र हवा.

सर्व साधारण लोकांना आपल्या मरणाआधीच कळते कि मरण येणार आहे, त्यासाठी ज्योतिषाकडे जायचीही गरज नाही. अगदी साधी सर्दी सुद्धा होतांना २ दिवस आधीच notice देते.फक्त आपले लक्ष्य हवे ना शरीर काय म्हणते त्याकडे!

माझ्या आजोबांना(ते ज्योतिषी नसतांना देखील)हे आधीच कळले होते त्यांनी "आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा" हे बोलूनही दाखविले होते.

असो... आमच्याही शुभेच्छा... लवकर बरे व्हा... गेट वेल सून...

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 5:35 pm | आयुर्हित

फक्त टॉन्सिल्स बद्दल बोलायचे झाल्यास, माझ्या लहानपणापासून अगदी आत्ता पर्यंत(म्हणजे अजूनही)डॉक्टर टॉन्सिल्स काढायला सांगतात.

एक लक्षात घ्या एकदा दोनदा अगदी सातदा(एका वर्षातून)त्रास झाला तरी टॉन्सिल्स काढू नका!
अधिक माहितीसाठी वाचा Tonsillectomy's long-term risks may outweigh pluses

छान विनोदी लेख. कसं सुचतं बॉ असं काही लिहायला!!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2014 - 4:18 am | अत्रुप्त आत्मा

@कसं सुचतं बॉ असं काही लिहायला!!>>> एष धर्म: टन्ना टन्न: | ;)

बॅटमॅन's picture

1 Mar 2014 - 11:58 am | बॅटमॅन

टना टनः =)) जबरीच हो आत्मूस.

साती's picture

4 Mar 2014 - 10:07 am | साती

एका धर्ममार्तंडाचे असे लिखाण पाहून मन सुन्नं आपलं टुन्नं झालंय.
बॅटयासारखे संस्कृत पंडितही दात काढतायत.
काय होणार या टन्नाटन्न धर्माचे भविष्यात?
पत्रिका पाहिली पाहिजे.
;)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2014 - 10:09 am | प्रकाश घाटपांडे

:)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2014 - 9:59 am | अत्रुप्त आत्मा

@एका धर्ममार्तंडाचे असे लिखाण पाहून मन सुन्नं आपलं टुन्नं झालंय.>>> =)) आंम्म्ही धर्माचा मार बसलेले तंड नाही. =))
त्यातला जो जो भाग वाइट तो काढलाच पाहिजे या मताचे आहोत..मग आख्खी धर्मव्यवस्था बदलायला लागली तरी बेहत्तर!

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2014 - 2:14 pm | प्रकाश घाटपांडे

:) अशा लेखांनी मानसिक तणाव दूर होतात.

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 2:34 am | आयुर्हित

असाध्य ते साध्य| करिता सायास| कारण अभ्यास| तुका म्हणे||

नावातकायआहे's picture

1 Mar 2014 - 1:41 pm | नावातकायआहे

_/\_..... :-)

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 2:16 pm | आयुर्हित

कधिच कुठल्याच दलाशी संबंध आला नाही.

पण ज्योतिषाचा काहीएक फायदा नक्कीच होतो एवढं खर्रंच आहेच्च्च्च.

तसा तो होत नसता तर इतक्या ज्योतिषांची पोटं भरलीच नसती.

तस्मात इतक्या लोकांच्या पोटापाण्याची सोय करणारे हे शास्त्र फायदेशीर आहे हे नक्कीच. मग बाकी कोणी काही म्हणो.

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 5:52 pm | आयुर्हित

पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.

आर्युहित यांच्या चिकाटीला सलाम . त्यांच्या ज्योतिष अथवा आर्युवेद यावरील लेखाचा कुणाला फायदा होवो अथवा न होवो पण त्यांना त्याचा फायदा मिळो हि सदिच्छा .

धन्यवाद

मारकुटे's picture

1 Mar 2014 - 6:23 pm | मारकुटे

उत्तम लेख

टवाळ कार्टा's picture

2 Mar 2014 - 12:08 am | टवाळ कार्टा

पुढच्या कट्ट्याला किती आणि कोण कोण "नक्की" येणार तितके जरी "अचुक" भविष्य सांगितले तरी मी ज्योतीष हे शास्त्र आहे असे मान्य करीन :)

आयुर्हित's picture

2 Mar 2014 - 12:29 am | आयुर्हित

अगदी सोपे आहे हे तर!
आमचे मुवि तर कोणाचीही कुंडली न बघता सांगू शकतील !

मी येणार की नाही याचे भविष्य वर्तवा ते जर खरे ठरले तर मग मानु अन्यथा....

मृगजळाचे बांधकाम's picture

3 Mar 2014 - 9:08 am | मृगजळाचे बांधकाम

आमच्या धंद्याचे मोफत मार्केटिंग केल्याबद्दल वैश्विक पोपट वाले आणि कुडमुडे ज्योतिष मंडलाकडून झाहीर आबार!!!

८००० वर्षे!!! कोणी लिहिलंय बॉ इतक्या आधी फलज्योतिषाबद्दल?

आणि ज्योतिषशास्त्र की फलज्योतिषात तुम्ही घोळ घालताय.

आर्यभट्टांपासून अनेकांनी ज्योतिषशास्त्र अर्थात आकाशातील ज्योतींच्या शास्त्राचा अभ्यास केलाय. फलज्योतिष ही नंतर चिकटवलेली परकीय कीड आहे असे म्हणतात!

अनुप ढेरे's picture

4 Mar 2014 - 9:59 am | अनुप ढेरे

परकीय कीड

हे कोणी आणलं? ग्री़क?

कीड नेहमी परकीय / परप्रांतीय का असते ?

साती's picture

4 Mar 2014 - 10:09 am | साती

आपली ती गोजिरवाणी अळी , परकीयांची ती कीड!

ऋषिकेश's picture

4 Mar 2014 - 11:36 am | ऋषिकेश

हा हा हा! नेमके! :D

बाकी @अनुपः होय ग्रीक/रोमन प्रथा.

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2014 - 2:58 pm | प्रसाद गोडबोले

आपली ती गोजिरवाणी अळी , परकीयांची ती कीड!

ळॉळ

आयुर्हित's picture

4 Mar 2014 - 11:37 am | आयुर्हित

ऋषिकेशजी,
माझे वाक्य "आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहे"
मी संपूर्ण ज्योतिष शास्त्राबद्दल लिहितोय, ज्यात सुरवात होते निरीक्षणापासूनच होते.

जेव्हा आपण "वसुधैव कुटुंबकम" ही संकल्पना मांडली आहे, तेव्हा "परकीय" हा शब्द चुकीचा ठरतो.
मी परत परत तेच सांगतोय भेदाभेद-भ्रम अमंगळ॥

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥

ज्ञानाच्या कक्षा मोठ्या करायच्या असतील तर आधी सर्व प्रकारचे भेद व भ्रम नाहीसे केले पाहिजेत.
तेव्हा ऋषिकेशजी, मोठे व्हा!

चिगो's picture

4 Mar 2014 - 5:12 pm | चिगो

आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो.

अरेरे !! माझ्या कुंडलीत लिहीले होते की "ये बच्चा गणित का महापंडीत होगा.." च्यामारी, बारावीत गणितात नापास झालो मी..

मी वयाच्या बत्तिसाव्या वर्षी "राजपत्रित अधिकारी" होणार, असंही लिहीलंय कुंडलीत.. मला सव्विसाव्या वर्षीच सरकारी नोकरी मिळाली की हो..

आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत.

माझी हृद्यरेखा लै स्ट्राँग आहे, असं म्हणतात हात पाहणारे.. हे जर स्वभावाच्या बाबतीत असेल तर मी अत्यंत दगड माणूस आहे, असं बरेच जण म्हणतात. हे जर तब्येतीच्या बाबतीत असेल, तर मग माझी कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढलेली आहे, हे पण सांगू इच्छीतो..

आता बोला.. माणसानं करावं तरी काय?

सुबोध खरे's picture

4 Mar 2014 - 7:04 pm | सुबोध खरे

चीगो साहेब
राजपत्रात नाव आले का? ते बहुधा सरकारी खाक्याप्रमाणे ३२ व्या वर्षी येईल म्हणजे तुम्ही ३२ व्या वर्षी राजपत्रित अधिकारी होणार. (दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे.)
ज्योतिष्यांचे भविष्य कसे खोटे ठरेल?

चिगो's picture

5 Mar 2014 - 1:21 pm | चिगो

नोकरी कन्फर्म केली सरकारनी.. हे ढिंक चिका ढिंक चिका धत्तड तत्त्ड धत्तड तत्तड.. ;-) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2014 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुष्काळ हा जोवर फ्यामिन आक्ट पास होत नाही तोवर असू शकत नाही मग तो भले पुढच्या पावसाळी सत्रात पास का होईना तसेच हे. सर्कारी इनोद !

एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.

चिगो's picture

5 Mar 2014 - 1:30 pm | चिगो

एम पी एस सी परिक्षा पास होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राजपत्रित जागेवर (त्या रिकाम्या असलेल्या जागेचेच काम करत असताना) नेमणूक होत नाही म्हणून वैतागून राजिनामा देऊन बाहेर पडलो होतो त्याची आठवण झाली.

एवढ्यापायीच (आणि एम पी एस्सीचा लांबलचक फॉर्म पाहून) एम पी एस्सीची परीक्षा द्यायची कधी हिंमत झाली नाही. कॉलेजात आणखी एक किस्सा ऐकला होता. एका पोराला एमपीएस्सीतून नोकरी लागली. घरच्यांनी मग नोकरीनंतर छोकरी म्हणत पोरी पहायला सुरुवात केली. लग्न जुळलं. तारीख जवळ आली आणि सर्कारी आदेश सुटला. "परीक्षा प्रक्रीयेत झालेल्या काही तांत्रिक चुकांमुळे ह्यावर्षीच्या सगळ्या नियुक्त्या रद्द करण्यात येत आहे.." :-( बोंबला!!

आधी एमपीएस्सीच्या परीक्षा फॉर्म निघणे ते नियुक्ती होणे, एवढ्या वेळेत MBBS चा कोर्स पुर्ण व्हायचा म्हणे.. ;-) आता परीस्थिती बरीच सुधारली आहे, असे ऐकीवात आहे.. :-)

आयुर्हित's picture

18 Mar 2014 - 1:13 pm | आयुर्हित

MH370 - फ्लाईट डीलेड..या धाग्यावरचा प्रश्न :
अधिराज - Mon, 17/03/2014 - 16:54
हे विमान शोधण्यासाठी ज्योतिषतज्ञ किंवा एखादे सिद्धीप्राप्त बाबा / महाराज ह्यांची मदत होऊ शकते का?

यावर त्यांना व्यक्तिगत संदेश पाठवण्यात आला आहे.
नक्कीच शोधता येईल....
त्यासाठी प्रवाशांपैकी एकाची तरी खरी अचूक कुंडली घेवून, त्याप्रमाणे सध्या त्याच्यावर काय प्रसंग येणार आहे? आणि जर मरण निश्चित असेल तर जळून,पाण्यात(उथळ कि खोल)पडून किंवा वाळवंटी किंवा शस्त्राने किंवा आगीमुळे होणार आहे नक्कीच हा अंदाज आला असता.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2014 - 1:53 pm | प्रकाश घाटपांडे

चांगली आयडिया आहे. याला ज्योतिषी तयार होतील काय? आन खरी अचूक कुंडली कुठून आणायची?
विमान अपघातात अथवा भुकंप वा तत्सम आपत्तीत जेव्हा अनेक माणसे जातात त्यावेळी सगळ्यांच्या कुंडलीत त्या वेळी मृत्यु योग असतो काय? हा प्रश्न ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधे घेतला आहेच.
http://mr.upakram.org/node/811 इथे वाचा.

माहितगार's picture

18 Mar 2014 - 2:49 pm | माहितगार

मलेशिया, चीन, मलेशिया एअरलाइन्स, आणि भारतीय प्रवाशांच्या काही कुंडल्या मिळण्यास हरकत नाही संशोधना करता हव्यात म्हटल तर नक्की साहाय्य मिळू शकेल. इतर काही प्रवाशांच्या जन्म वेळा आणि जन्म स्थळे मिळाली तरी त्या सर्व कुंडल्यात बनवून त्या सर्व कुंडल्यात असा काही ना काही समान धागा दाखवावा लागेल जो त्या विमानात न बसलेल्या जगातल्या इतर कुणाच्याही कुंडलीत असू नये. अडचणीतल्या विमान प्रवाशांच्या संबंधाने टेस्ट अवघड असली तरी अधिक विश्वासार्ह अभ्यास होऊ शकेल.

या टेस्ट साठी अडचणीतल्या विमानांचीच आवश्यकता आहे असे नाही. मिपातल्या काही मंडळींनी सोबतीने विमान प्रवास केला आणि आपापल्या कुंडल्या उपलब्ध केल्यातरी त्यात कुंडलीत प्रवास होता हे दाखवता आले पाहीजे आणि त्या गोष्टी इतर कुणाच्याही कुंडलीत असू नयेत.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2014 - 3:34 pm | प्रकाश घाटपांडे

कोणे एके काळी माझ्या अशाच भाबड्या समजुती होत्या. असो...

माहितगार's picture

18 Mar 2014 - 5:39 pm | माहितगार

:)

आयुर्हित's picture

19 Mar 2014 - 12:17 pm | आयुर्हित

आपल्या काही भाबड्या समजुती असतील तर त्या येथे मांडाव्यात. मला खात्री आहे, मी आपल्या प्रत्येक शंकेचे शास्त्रीय (scientific)निरसन करू शकेन.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Mar 2014 - 12:30 pm | प्रकाश घाटपांडे

होत्या म्हटल मी. उदा. कुंडली बरोबर असेल तर स्त्री का पुरुष? जिवंत कि मृत?, विवाहित की अविवाहित? या गोष्टी ज्योतिषाला सांगता येतात

आपल्या काही भाबड्या समजुती असतील तर त्या येथे मांडाव्यात. मला खात्री आहे, मी आपल्या प्रत्येक शंकेचे शास्त्रीय (scientific)निरसन करू शकेन.

या भाबड्या समजुतीचे निरसन करणारा कुणीतरी पाहिजे बॉ.

या भाबड्या समजुतीचे निरसन करणारा कुणीतरी पाहिजे बॉ.

शुचि's picture

9 Apr 2014 - 12:04 am | शुचि

=)) =))

प्रवाशांपैकी एकाची तरी खरी अचूक कुंडली

खरी अचूक कुंडली हिच मुळात मोठी पळवाट आहे तथाकथित ज्योतिषांसाठी!

स्वप्नांची राणी's picture

18 Mar 2014 - 1:51 pm | स्वप्नांची राणी

हाहाहा...सरजी, कोणाच्याही कुंडलीशिवाय विमानाचीच कुंडली आणि मलेशियाचीच कुंडली मांडून केलेले तर्कवितर्क आधिच जालावर आलेत.
http://astrology.astrosage.com/2014/03/what-happened-with-flight-mh-370....
(विमानावर जोक करुन हसत नाहिये मी...ऊद्वेगातुन आलय ते..)

पोटे's picture

18 Mar 2014 - 2:02 pm | पोटे

ज्योतिष इतके तीक्ष्ण आहे, तर बाबर इंग्रज चालून येत आहेत हे इथल्या राजांना आधी का नाही समजले?

आयुर्हित

चांगला विषय....चर्चा तर होणारच।

ज्या व्यक्तींना एखद्याचा शरीरचा "ऑरा" समाजतो, ते रोगचे निदान पुष्कल आधि करू शकतात..
हे विदन्यानाने देखिल सिद्ध झाले आहे, आपल्यकडे मात्र ही पद्धत फार जुनि आहे.
लेखानतील चुकांबदल क्षमा करा

स्वप्नांची राणी's picture

18 Mar 2014 - 4:44 pm | स्वप्नांची राणी

दगडालाही ऑरा असतो असं कुठेसं वाचलय बाई...!

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2014 - 6:37 pm | श्रीगुरुजी

माणूस आशेवर जगतो. माणसाची आशा जागृत ठेवणे हा ज्योतिषाचा सर्वात महत्त्वाचा फायदा समजता येईल. बहुतेक ज्योतिषी समोरच्या व्यक्तीला अमुक तमुक ग्रहदशा बदलली वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतील असा दिलासा देतात. काहीतरी आशादायक ऐकावे या हेतूने आलेल्या व्यक्तीला ग्रहतार्‍यांच्या कृपेने भविष्यात आपल्याला नक्कीच चांगले दिवस येतील असा दिलासा मिळतो.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Mar 2014 - 7:07 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत आहेच. पं महादेवशास्त्री जोशी आपल्या आत्मपुराण मधे हेच म्हणतात.

आत्मपुराण लै जबरी पुस्तक ओ. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!!!!

संतोषएकांडे's picture

19 Mar 2014 - 10:56 am | संतोषएकांडे

हे ज्योतीष शास्त्र पण भारी दुर्गम शास्त्र आहे ब्वा...
ग्रहांवर जाणारे अवकाशयान सुध्धां ग्रहमान, कुंडली आणी मूहूर्त बघुन सोडले जातात म्हणे...
एका लेबॉरेटरीचं उदघाटन सुध्धां चक्क तिथी,मिती,आणी मूहूर्त बघून ठरवल जातं...
धन्य हो..

'ज्योतिष हे शास्त्र नसल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आतापर्यंत अनेकदा केली आहे. मात्र, सातत्याने आव्हान देणाऱ्या 'अंनिस'ने फलज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करून दाखविल्यास २१ लाख रुपये देण्याची तयारी आहे,' असे आव्हान बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी दिले.
साभार:ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2014 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा

बातमितले जकातदारांचे म्हणने(विवेचन) हे ढोबळ आहे. शास्त्र म्हटल्यानंतर त्यांसंमंधिचे मुद्दे (सर्व सामान्य लोकांसमोर/बातमीमधे) उजेडात आणायला हवे. मुद्दा एकही नाही. सगळी भाषा संदिग्धरित्या वापरलेली आहे.

जकातदारांनी अं.नि.स.चं आव्हान लिखित स्वरूपात जिंकलेलं आहे काय? (वाद/विवादात त्यांनी काय जिंकलय ते पाहिलय.असो!)
अता अंनि.स म्हणते,ज्योतिष हे शास्त्र आहे.. हे सिद्ध करा.जकातदार म्हणतात,ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा... म्हणजे,जे नाहीच..ते सिद्ध करून दाखवा असा त्यांच्या म्हणण्याचा वेडगळ अर्थ आहे. हे बरं आहे बाकी...जकातदारांच्या दाव्याचा अर्थ असा की गाय अंडे का देत नाही? हे सिद्ध करा... अता गाय जर का वासराला(म्हणजे डायरेक्ट पिल्लाला) जन्म देते,हे सत्य आहे..तर गाय अंड का देत नाही??? हे सिद्ध कसं करणार.

आयुर्हित's picture

4 Apr 2014 - 2:55 pm | आयुर्हित

हे सिद्ध कसं करणार:-

हा प्रश्न तुमचा आहे, जो सोडवल्यावर आपल्याला २१ लक्ष रुपये मिळवून देईल!
its your call, which may fetch you 21 lakhs!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2014 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्या म्हणण्यातून आपल्याला जे कळलय ते पहाता असोsssssssssss!

इतकेच म्हणतो!

झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही :)

"फलज्योतिष" हा धंदा आहे. त्यामुळे गंदा हैं पर धंदा हैं या न्यायने आपल्या व्यवसायाची पाठराखण करायलाच हवी.

आयुर्हित's picture

6 Apr 2014 - 10:16 pm | आयुर्हित

अज्ञानात सुख असते म्हणतात!
सुखी रहा असेक मी म्हणेन.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2014 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा

@सुखी रहा असेक मी म्हणेन.>>> चला..सुखी आहात म्हणजे तुंम्ही! :p उत्तम! =))

मोदी पंतप्रधान होणार नाहीत.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2014 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

मोदी होवो वा न होवो जकातदार तर प्रसिद्धीच्या झोतात आले.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2014 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा

@मोदी पंतप्रधान होणार नाहीत.>>> अशीच प्रेडीक्शन करणार ते... या फांदिवरचा कावळा उडेल,त्या फांदिवरचा उडणार नाही. म्हणजे कोणताही उडाला तरी फांदी संदिग्ध ठेवल्यामुळे ती हवी तेंव्हा बदलता येते!

आत्मशून्य's picture

5 Apr 2014 - 2:28 pm | आत्मशून्य

त्यांनी निसंधीग्धपणे मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजप सत्ता बनवणार नाही व खान्ग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होइल जे ३ ते ३.५ वर्षे चालेल व पुन्हा निवडणुक घ्यावी लागेल असे म्हटले आहे. आपचा यात साधा उल्लेखही नाही हे बघता या पक्षाला भवीष्य नाही असेही बहुदा गृहीत धरावे वाटते. हे सर्व त्यांनी विवीध पक्षांच्या स्थपनेच्या दिवसावरुन व उभे केलेल्या जागावरील उमेदवारांची ग्रहस्थीती वगैरे वगैरे बघुन प्रेडीक्शन केले आहे.

केजीरवाल औट घटकेचे मुख्यमंत्री का झाले होते, राहुल का पंतप्रधान होणार नाही हे सुधा त्यांच्या कूंडल्यावाचुन सांगीतले. अर्थात... आपल्या डोक्याबाहेरील ग्रहतार्‍यांची मिमांसा त्यामागे दिलेली असल्याने जास्त खोलात शिरता आले नाही.

@प्रकाश घाटपांडे काका,
सहमत आहे. जकातदार तर प्रसिद्धीच्या झोतात आले हे नक्किच पण सध्याचे वारे बघता प्रवाहाविरोधी प्रसिध्दीचा उघड झोत आंगवर घेण्यास अंगात गट्स लागतात हे माझे वैयक्तीक मत आहे, अगदी अनेक मिपाकरही या प्रकाराला घाबरतात हे तर आपण रोजच बघतो. त्यामुळे त्यांचे भवीष्यकथन खरेच योग्य ठरते की अयोग्य हे पहाणे रोचक ठरते.

Anvita's picture

5 Apr 2014 - 12:45 pm | Anvita

चांगला लेख.

नावात्_काय्_आहे's picture

5 Apr 2014 - 4:23 pm | नावात्_काय्_आहे

जन्मतारिख :- २ जुले १९८५
जन्म वेळ :- ८.५५ सकाळी
जन्म ठिकाण :- नाशिक

नावात्_काय्_आहे's picture

5 Apr 2014 - 4:26 pm | नावात्_काय्_आहे

प्लुटो ग्रहाचा प्रभाव कसा काढायचा . :द किंवा
मंगळवारच्या माणूसाला पुथ्वी असते का > ;-)

नावात्_काय्_आहे's picture

5 Apr 2014 - 4:29 pm | नावात्_काय्_आहे

कुंडलीतले दोष काढायला अमुक वारला उपास करा , तमुक वाराला देव दर्शन करा
हे वजन करण्यासाठी , का गर्दी वाढवण्यासाठी

आत्मशून्य's picture

5 Apr 2014 - 4:33 pm | आत्मशून्य

आपण टुबी ऑर नॉट टुबी मानसिकतेमधुन बाहेर यायला विशेष संघर्ष केला आहे काय ?

नावात्_काय्_आहे's picture

5 Apr 2014 - 4:40 pm | नावात्_काय्_आहे

विशेष असा नाही . :प फक्त समोरच नेमका कोणत्या गटातला हे ओळखायला मदत होते .
तुमचं जवळ जर प्रश्नांची उत्तर असेल तर ती दिली तरी चालतील .
फक्त प्रश्नाला प्रश्न नको

नाही तर आंका ठरलो नसतो काय ?

पण... या क्षणी समजा तुमच्या समोर जिलबी, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम, आणी खिर ठेवली/मेनु असेल तर त्यातुन आपण कोणता निवडाल याचे ठोकताळे बांधु शकतो.

नावात्_काय्_आहे's picture

5 Apr 2014 - 4:59 pm | नावात्_काय्_आहे

बांधा कि राव. ठोकताळे चुकानार नाही याची दक्षता घ्यावी .
अजून मूळ प्रश्न तिथेच राहून विषय फक्त बहरकातु नका देऊ

आत्मशून्य's picture

5 Apr 2014 - 5:04 pm | आत्मशून्य

आनी अस्थानीच राहील याची खात्री हाये.

स्वप्नांची राणी's picture

5 Apr 2014 - 4:50 pm | स्वप्नांची राणी

एखादे त्रुणधान्य, (फळभाजी, पालेभाजी, प्राणिज भाजी, मत्स्यभाजी) ह्यापैकी एक किंवा जास्त खाण्याचे योग आहेत. जलपानाचे योग आहेत. परदेशस्थ खाणे उदा. चायनिज ई.ई. खाण्याचेही जोरदार योग दिसतायेत. पण पोटाची काळजी घ्यावी. यापैकीच एक बाधण्याचे क्षिण संकेत दिसतायेत.

उपास हा प्रकार वगळून त्याचा उपहास केला आहे .

सुबोध खरे's picture

24 Mar 2015 - 10:28 am | सुबोध खरे

त्यांनी निसंधीग्धपणे मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजप सत्ता बनवणार नाही व खान्ग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होइल जे ३ ते ३.५ वर्षे चालेल व पुन्हा निवडणुक घ्यावी लागेल असे म्हटले आहे.
जकातदार कुठे आहेत सध्या ?
त्यांची ओटी भरावी म्हणतो, खणानारळाने.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2015 - 11:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता लोकं आपल्या मागे हात धुवुन लागतील हे ज्योतिषपॉवरने समजल्याने त्यांनी अंदमानच्या जंगलात पळ काढला असावा असं वाटत आहे =))

टवाळ कार्टा's picture

24 Mar 2015 - 11:26 am | टवाळ कार्टा

त्यांनी कोणत्या वर्षीचे भविष्य सांगितलेले?...

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2015 - 12:39 pm | अत्रुप्त आत्मा

@ जकातदार कुठे आहेत सध्या ?
त्यांची ओटी भरावी
म्हणतो, खणानारळाने.>> आता पाय लावून पळुन जाणार ते! :-D
रच्याकने:- जकातदार हा एक अत्यंत बालबुद्धिचा माणुस आहे. भांडावं कोणत्या मुद्द्यांवर? याची बेसिक अक्कल देखिल नाही त्याला!