औषध

मोक्षदा's picture
मोक्षदा in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 4:39 pm

हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्‍हेने उहापोह केलेला आहे.

-------------------------------

औषधांच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होत चालले असताना औषधांच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवणारे भयानक परीणाम सुद्धा वाढीस लागले हि बाब सामाजिक स्वस्थ्याकरिता अत्यंत हानिकारक आहे. जागतिक आरोग्य संघटना, जगातील बहुतेक राष्ट्रे याबाबतीत अतिशय सतर्क असून औषधांचा वापर योग्य पद्धतीने व्हावा व त्याचा कोणताही अनिष्ट परिणाम रुग्णावर होऊ नये म्हणून त्याप्रमाणे त्याची तरतूद विस्तृतपणे कायद्यात करून त्याची अमलबजावणी केली जाते. औषध विक्री हि त्यामुळे अन्य इतर व्यावसायासारखी न ठेवता ती निष्णात तज्ञाच्या ( pharmasist ) देखरेखीखाली व्हावी याबाबतची तरतूद आणि प्रणाली सर्व देशामध्ये आहे. त्यचि अमलबजावणी झाली नाही तर रुग्णास औषधाचा फायदा होण्याऐवजी अनेक वेळेस विविध व्याधी, ऑर्गन फ़ेल्युअर व प्रसंगी मृत्यू तसेच drug resistance इत्यादी सारख्या समस्यांचे या आणि पुढील पिढ्यांसमोर आव्हान उभे राहू शकते.

आपल्या देशातसुद्धा जन्स्वस्थ्याकरिता वरील बाबींचा विचार करून देशामध्ये संसदेने औषधे व सौंदर्या प्रसाधने कायद्यात वरील गोष्टींच्या अनुषंगे विशेष तरतूद करून रुग्णांच्या जीविताची खात्री दिलेली आहे. संसदेने केलेल्या या रुग्ण हित तरतुदींची अमलबजावणी झाली नाही तर वर नमूद केल्याप्रमाणे रुग्ण हितास मोठ्या प्रमाणात बाधा येउन अत्यंत अनमोल मानवी जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये केवळ रुग्ण हितास्तव संसदेने केलेल्या याकारीतांच्या नियमांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. नवीन औषध विक्री परवाना घेण्यापूर्वी registered pharmacist ची नियुक्ती असल्याशिवाय परवाना मिळू शकत नाही. याचाच अर्थ परवान्यां अंतर्गत किरकोळ औषध विक्री व्यवसाय करताना registered pharmacist ची उपस्थिती असणे हे रुग्नाहीतासाठी आवश्यक असून pharmasist जर अश्या औषध दुकानामध्ये उपलब्ध नसेल तर तो औषध परवाना अस्तित्वात असूच शकत नाही. pharmacist कडे असलेल्या या औषध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा हा रुग्णाला डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवरील औषध योग्य मात्रेमध्ये, योग्य combination मध्ये, योग्य वेळी अश्या अनेक महत्वाच्या बाबतीत सल्ला देऊन विक्री करणे आवश्यक आहे . तसेच चुकीचे औषध विक्री होऊन रुग्णाच्या जीवितास धोका पोहचू नये हेही आहे.

pharmacist हजर नसेल तर रुग्णांना या सल्ल्यापासून वंचित राहावे लागते किंवा चुकीच्या औषधाची विक्री होऊन रुग्णांना प्रसंगी भयानक परिस्थितीतून जावे लागते व रुग्ण याबाबतीत अनभिज्ञ असतो. त्यामुळे फक्त परवाना घेताना pharmacist व नंतर परवाना चालवताना pharmasist उपस्थित नसणे हे रुग्णांच्या जीविताशी खेळण्यासारखे आहे. बाजारात बनावट औषधांची विक्री होऊ नये तसेच गरज पडल्यास अप्रमाणित औषधांचे recall करावयाची गरज पडल्यास रुग्णांचा पत्ता असणे तसेच DPCO अंतर्गत अल्प दराने विक्री करावयाची औषधांची विक्री हि अल्प दरानेच होते किंवा नाही इत्यादी महत्वाच्या बाबींकरिता औषधांची विक्री हि बिलावरच करण्याची कायद्यात तरतूद आहे. इतर कोणत्याही वस्तूप्रमाणे औषधांची विक्रीदेखील बिलावर करण्यात कोणतीही अडचण नाही.

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वता औषध घेणे हे मनुष्याच्या स्वास्थ्या करिता अतिशय वाईट असून या मुळे उत्पन्न होणाऱ्या drug resistance मुळे जनतेचे स्वास्थ्य आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे स्वास्थ्य याकरिता अतिशय गंभीर बाब आहे. multi resistance व असे अन्य प्रकार मोठया प्रमाणात वाढीस लागले आहेत व याबाबत जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे pharmacist ची उपस्थिती, औषधांची बिलावर विक्री, prescription वर विक्री या सर्व बाबी मानवी हित विचारात घेऊन संसदेने कायद्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. देशाच्या संसदेने विचारपूर्वक केलेल्या नियमातील तरतुदींचा जर सर्वसामान्यांना फायदा झाला नाही तर हि बाब रुग्णांचे आरोग्य किंवा त्यांच्या जीवितास बाधा येऊ शकते व हि बाब समान हिताच्या दृष्टीने मोठे अपयश ठरु शकते. अन्न व औषध प्रशासन या रुग्नाहीताच्या बाबीचे काटेकोरपणे पालन करीत आहे. परवानाधारक म्हणून जेंव्हा परवाना घेतला जातो त्यावेळेस फक्त व्यवसाय म्हणून नाही तर रुग्णांचे हित म्हणून आपण वरील गोष्टींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तथापी या नियमांची पायमल्ली केल्यास कायद्या अंतर्गत कारवाई घेऊन रुग्ण हितास प्राधान्य देणे हीसुद्धा अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे. परवाना घेतल्यानंतर रुग्णांना अव्याहतपणे औषध पुरवठा होईल याची जबाबदारी आपणावर आहे. औषध हे जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत असलेली वस्तु असून केवळ काही व्यक्तींच्या दडपणाखाली ही विक्री अचानकपणे थांबविणे हे बेकायदेशीर ठरते.

औषधोपचारप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Jan 2014 - 5:12 pm | पैसा

असेच आणखी माहितीपूर्ण लेख येऊ द्या!

तिमा's picture

24 Jan 2014 - 6:50 pm | तिमा

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वता औषध घेणे हे मनुष्याच्या स्वास्थ्या करिता अतिशय वाईट असून या मुळे उत्पन्न होणाऱ्या drug resistance मुळे जनतेचे स्वास्थ्य आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे स्वास्थ्य याकरिता अतिशय गंभीर बाब आहे.

तुम्ही मांडलेला मुद्दा योग्यच आहे. पण त्याही पलिकडे जाऊन मी म्हणेन की, हल्लीचे डॉक्टर्स नवीन औषधाबरोबरचे जे 'लिटरेचर' असते ते काळजीपूर्वक वाचत नाहीत. तसेच साध्या औषधांनी बर्‍या होऊ शकणार्‍या आजाराला अतिशय स्ट्राँग अ‍ॅंटिबायोटिक्सचा सर्रास वापर करतात. यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रग रेझिस्टन्स झाला आहे.
मी बघितलेल्या एका केसमधे रुग्णाला बारीक ताप येत होता, बाकी कुठलेच सिंप्टम्स नव्हते. सगळ्या टेस्टस नॉर्मल आल्या. त्यावर त्या डॉक्टरने टी.बी.वरील ट्रीटमेंट सुरु केली. नंतर तो कॅन्सर निघाला. टी.बी. वरच्या जहाल औषधांनी तो रुग्ण अतिशय अशक्त झाला आणि जेंव्हा केमो द्यायची वेळ आली तेंव्हा त्याच्यात काही ताकदच उरली नव्हती.

सुबोध खरे's picture

25 Jan 2014 - 10:11 am | सुबोध खरे

तिमा साहेब,
रोग्याला कोणतीही लक्षणे नसताना ताप येत असता त्यावर जर सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील तर शेवटी एक थेराप्युटिक ट्रायल म्हणून भारतात टि बी(क्षय रोग) वर औषधे दिली जातात आणी दहात आठ वेळेस त्याचा उपयोग होतो. मलेरिया ची रक्त तपासनी फक्त पन्नास टक्के वेळेत मलेरियाचेजंतु दाखविते म्हणजे उरलेल्या पन्नास टक्के लोकांवर डॉक्टरना केवळ त्यांच्या लक्षणावरूनच उपचार करावे लागतात.टिबी ची परिस्थिती याहूनही वाईट आहे कारण क्षयरोगाचे जंतु प्रत्यक्ष दहा टक्के रोग्यांमध्येच सापडतात. त्यामुळे अशा रुग्णाच्या बाबतीत क्षयाची औषधे देणे हे सर्वस्वी चुकीचे आहे असे वाटत नाही. पण कर्करोगाचे नक्की निदान झाल्याशिवाय त्यावर केमोथेरेपी दिली जात नाही त्यामुळे अशा रोग्याच्या बाबतीत जोवर नक्की कर्करोगाचे निदान होत नाही तोवर केमो सुरू करता येत नाही.
"टी.बी. वरच्या जहाल औषधांनी तो रुग्ण अतिशय अशक्त झाला आणि जेंव्हा केमो द्यायची वेळ आली तेंव्हा त्याच्यात काही ताकदच उरली नव्हती." हे विधान अडण्यांजनक आहे.
क्षयरोगावरील औषधे जहाल नसतात.ती सुरू केल्यावर जर रुग्णाला खरोखरच क्षय रोग असेल तर त्याचे जंतु औषधाने मरून ते विष शरीरात पसरते. सुरुवातीचा एक महिना त्या रोग्याला अशक्त पणा येतो आणी त्यानंतर जेंव्हा त्या जंतूंच्या विषाचा निचरा होतो त्यानंतर त्या रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारू लागते. जर तो रुग्ण कर्करोगाचा असेल तर त्याच्या शरीरात क्षयरोगाचे जंतु मरण्याची शक्यता नाही त्यामुळे औषधे जहाल पडलीआणी रुग्ण अशक्त झाला अशी शक्यता कमीच आहे आर्थात या रुग्णाला जर कर्करोगाबरोबर क्षयरोग सुद्धा असेल तर ( ही शक्यता बरीच असते). कर्करोगाने मुळात प्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्याला क्षय होण्याची शक्यता खूप असते).
अर्थात हे सर्व पूर्ण ऐकीव माहितीवर आधारित असल्याने त्यात संपूर्ण सत्य असेलच अशी खात्री देता येत नाही परंतु भारतात क्षयरोगाचा प्रादुर्भाव इतका जास्त आहे आणि तपासण्यांची मर्यादा बरीच असल्याने एखाद्या डॉक्टरने क्षयरोगाची औषधे दिली तर त्यात त्याचे पूर्ण चुकले असे मानता येणार नाही.वैद्यकीय शिक्षणात एक गोष्ट जगभर शिकवली जाते. Uncommon symptoms of common disease are far more common than common symptoms of uncommon disaese. असो

शैलेन्द्र's picture

26 Jan 2014 - 11:00 am | शैलेन्द्र

+१११

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2014 - 12:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

आंतरजालावर वाचून केलेला औषधोपचार जितका चुकीचा तेवढीच तज्ञातर्फे पेशंटच्या सर्व जुन्या वैद्यकीय कागदपत्रांची छाननी केल्याशिवाय आणि केवळ ऐकीव समजांवर (खरं तर बहुतेक वेळा गैरसमजांवर) विसंबून केलेली टीकाटिप्पणीही चूक असते.

वैद्यकीयशास्त्र वरवरच्या अंदाजांइतके इतके सोपे असते तर एमबीबीएस ची ४.५ वर्षे + इंटर्नशीपचे १ वर्ष + पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३ वर्षे (+ पुढे सुपरस्पेशियालिटी केल्यास अजून कमीत कमी २ वर्षे) म्हणजे ८.५ ते १०.५ वर्षे (यात अभ्यासक्रमानंतरचा अनुभवाचा काळ धरलेला नाही) येवढा मोठा वेळ उगाचच खर्च केला जातो असे समजावे काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2014 - 11:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

आतिवास's picture

25 Jan 2014 - 7:48 am | आतिवास

लेख आवडला.
प्रत्यक्षात यातल्या अनेक बाबींकडे दुर्लक्ष होतं; कारण आपल्याकडे वैद्यकीय पदवी न घेता डॉक्टर बनण्याची (आणि सल्ले देत बसण्याची) लोकांना असलेली सवय एकीकडे तर दुसरीकडे डॉक्टरांना अनेकदा आजाराचे निदान होत नाही, वेळेत होत नाही ही बाब. वैद्यकीय क्षेत्र सेवेपेक्षा आता व्यवसाय म्हणून स्थिरावू लागल्यामुळे लोकांचा अपेक्षाही पैसा फेकून सेवा मिळवण्याकडे झाला आहे - त्यातून मनाने औषधं ग्यायची- थांबवायची -बदलायची असे प्रकार होतात.

इन्दुसुता's picture

26 Jan 2014 - 12:38 am | इन्दुसुता

लेख आवडला.
आज प्रथमच खरेंशी सहमत.

अजया's picture

26 Jan 2014 - 11:21 am | अजया

आमच्या दैनंदिन डेंटल प्रॅक्टीसमधे येणारा नेहेमीचा अनुभव म्हणजे स्वतःच्या मनाने औषधे घेउन, दुखणे बळावून येणारे रुग्ण! फार्मासिस्ट बर्याचदा अशा प्रकाराला कारणीभूत असतात हेही एक निरिक्षण . ते स्वतःच डॉक्टर असल्यासारखे दुख्ण्याच्या,सर्दीच्या गोळ्या बिनधास्त डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत असतात. त्यात लोकांनाही इन्स्टंट आराम हवा असतो. भले ते दात अनेक दिवसापासुन किडवून ,वाट लावुन,अगदी त्यात गळू होइपर्यंत थांबले असतील तरी! त्यामुळे अती तीव्र वेदनशामकांची मागणी होत असते! प्रतिजैविके दिल्यावर मात्र त्याचा ठराविक डोस सांगताना सांगताना डॉक्टरचा काही हेतू असेल हे लक्षात न घेताच ते फार स्ट्राँग आहे असा समज करुन घेउन दोनदा सांगितले आहे तिथे एकदाच घेणे,मनानेच गोळ्या घेण्याचे थांबवणे इ. प्रकार तर नेहेमीचे आहेत. या सर्वच गोष्टी ड्रग रेसिस्टन्सला कारणीभूत असतात.
त्याचप्रमाणे रुग्णाला लिहुन दिलेले औषध का,कसे,किती घ्यावे याचे मार्गदर्शन करणे ही फक्त फार्मासिस्टच नाही तर डॉक्टरचीही तितकीच जवाबदारी आहे!

सुधांशुनूलकर's picture

26 Jan 2014 - 7:10 pm | सुधांशुनूलकर

खूप छान लेख.
या संदर्भात प्रा. मंजिरी घरत लिखित 'औषधभान' या पुस्तकात सांगोपांग ऊहापोह केला आहे.

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

मुक्त विहारि's picture

27 Jan 2014 - 6:08 pm | मुक्त विहारि

आणि

सुबोध खरे, इ.ए. आणि अजया, यांचे माहितीपुर्ण प्रतिसाद.

प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नियम पाळणे बंधनकारक आहे व यासाठी मेडिकल कौन्सिल आग्रही आहेच.यावरील एक ताजी बातमी: स्वस्त औषधी सुचवा अन्यथा परवाना रद्द!

मोक्षदा's picture

3 Feb 2014 - 2:05 pm | मोक्षदा

मुळ लेख माझा नसून
आपल्या महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त
यांनी लिहिलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी

आतिवास's picture

3 Feb 2014 - 5:37 pm | आतिवास

हा लेख तुमचा नाही?
हे तुम्ही आधीच सांगायला हवं होतं :-(
हा लेख इथं छापायला तुम्ही त्यांची परवानगी घेतली असेल असं गृहित धरतेय.
बरं - निदान हा खुलासा (जमल्यास मूळ लेखका /लेखिकेच्या) नावासह लेखाच्या सुरुवातीस द्या. संपादक मंडळाला तशी विनंती करा. लोक खुलासे वाचत नाहीत हा भाग वेगळा. पण तरीही...

हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्‍हेने उहापोह केलेला आहे.

लेखाच्या सुरवातीलाच सांगितले होते , आयुक्तांचे नाव देणे आवश्यक वाटले नाही , त्यांची नक्कीच परवानगी घेतली होती , त्या बद्दल निश्चित असावे

-------------------------------

आतिवास's picture

19 Feb 2014 - 10:15 am | आतिवास

तुमचा प्रतिसाद वाचून असं वाटतं की मी लेख नीट न वाचताच घाईघाईने मत प्रदर्शन केलं आहे. ;-)
लेखाच्या सुरुवातीला तुम्ही दिलेली जोड आधी नव्हती हे नक्की.
त्या तीनचार ओळी आता आहेत हे उत्तम.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Feb 2014 - 3:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी डॉक्टर नाही आणि त्या क्षेत्रातले मला काहि कळत नाही. किंवा वरिल मतांना माझा विरोधही नाही. पण विषय माझ्या आरोग्याशी निगडीत असल्या मुळे काहि शंकांचे समाधान होणे गरजेचे वाटले म्हणुन ही प्रतिक्रीया.

आपल्या कडे आजीबाईचा बटवा नावाची संकल्पना आहे. लहानसहान किरकोळ आजारांवर घरगुती उपायांची माहिती सगळ्यांनाच असते. प्रत्येक घरात अनुभवानुसार केलेल्या औषधांचा साठा असतोच. माझ्या घरी खालील औषधे सतत उपलब्ध असतात

आयोडेक्स, व्हिक्स, सोफ्रामायसीन, क्रोसीन, क्रोसीन लिक्वीड, कॉम्बीफ्लान, जेल्युसील लिक्वीड, बेनाड्रील इत्यादी. या शिवाय

महामंजिष्ठादी काढा, कुमारी आसाव, द्राक्षासव, कुटजारीष्ट, विडंगारिष्ट, अशोकारीष्ट, त्रिभुवन किर्ती, सितोफलादि चुर्ण, त्रिफळाचुर्ण, लवंग तेल ही आयुर्वेदिक औषधे.

या शिवाय चंदन, रक्तचंदन, सांबर शिंग, आवळा पावडर, वेखंड, मध,अंबे हळद, ओवा अर्क, इत्यादी.

अजुन आठवली की यादित भर टाकेन.

या सर्व औषधांचा वापर आम्ही नेहमी बिनदिक्कत करत असतो. शिवाय ओवा, लवंग, हळद, खायचा सोडा,याचाही वेळोवेळी औषध म्हणुन वापर करतो. (मि.पा. वर सतत असल्या मुळे सारखे इनो पण घ्यावे लागते *sad* ) त्यामुळे सहा आठ महिन्यातुन कधितरी डॉक्टरांकडे जावे लागते. जातोच असे नाही.

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वता औषध घेणे हे मनुष्याच्या स्वास्थ्या करिता अतिशय वाईट असून या मुळे उत्पन्न होणाऱ्या drug resistance मुळे जनतेचे स्वास्थ्य आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे स्वास्थ्य याकरिता अतिशय गंभीर बाब आहे.

वरिल लेख विशेषतः वरिल वाक्य वाचता आम्ही घरी करतो ते अजुनच डेंजरस आहे. कारण फार्मसिस्टला थोडेफार तरी वैद्यकिय ज्ञान असते. आम्ही तर त्या बाबतित अडाणीच आहोत.

तरी या विषयातील तज्ञांनी माझ्या शंकेला उत्तर द्यावे हि विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2014 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. कायद्याने ऑन-द-काऊंटर (भारतात फार्मसीमध्ये सहज मिळतात ती सर्व औषधे या प्रकारची असतीलच असे नाही) असलेली औषधे नीट माहिती करून घेऊन (विशेषतः त्याच्याबरोबर येणारी माहितीपत्रके समजावून घेऊन) योग्य प्रकारे वापरली तर फारशी धोकादायक नसतात.

२. ज्यांचा अन्नपदार्थ म्हणूनही उपयोग होतो अशी अणि तुम्ही लिहिलेली नेहमीच्या वापरातली बरीचशी वनस्पतीजन्य औषधे अतिरेक न करता वापरली तर सर्वसाधारणपणे धोकादायक नसावी. पण माहितगार नसलेल्या माणसांना त्यांचा उपयोग "खरोखरच आपल्याला हवा तो आहे" की "केवळ ऐकीव आहे" यात फरक करणे कठीण असते.

३. कोणतेही औषध पूर्ण माहितीशिवाय वापरणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे एकदा तरी तज्ञाकरवी खात्री केल्याशिवाय ते केवळ ऐकीव माहितीवर अथवा अंदाजाबरहुकूम वापरणे धोक्याचे ठरू शकते.

४. याबाबतचा निर्णय आपण किती धोका पत्करायला तयार आहोत यावर प्रत्येकाना आपापला घ्यावा.

आयुर्हित's picture

3 Feb 2014 - 5:10 pm | आयुर्हित

मी डॉक्टर नाही आणि त्या क्षेत्रातले मला काहि कळत नाही.

हे मान्य केल्याने आपला ह्या क्षेत्रातील अनुभव नाही, हेच आपण स्पष्ट करत आहात.

माझ्या मते,
१)half knowledge is always dangerous ह्या न्यायाने, स्वतः जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२)औषध कोणतेही असो alopathy चे किंवा आजीच्या बटव्यातील,त्याचा कार्य कारण भाव समजावून घेतले पाहिजे.

३)क्रोसीन, क्रोसीन लिक्वीड, कॉम्बीफ्लान हे औषध जरी OTC मिळत असतील, तरी ते खूप घातक आहेत. ही व अशी OTC औषधे फक्त immergency म्हणून रात्री गरज पडल्यास, सकाळ होईपर्यंतच प्रथमोपचार म्हणून फक्त एकदाच वापरावी व सकाळ झाल्यावर सरळ डॉक्टरांकडे जावे.

४)आजार कोणता आहे, त्याचे लक्षण काय आहेत, त्यावर उपचार काय आहेत, त्याची मूळ कारणे काय आहेत, आजार मुळातून घालवण्यासाठी काय केले पाहिजे, किती दिवसात आजार मुळातून बरा होईल याची इत्यंभूत माहिती डॉक्टरांना/वैद्यांना/तज्ञांना विचारावे व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.

५)डॉक्टरांनी/वैद्यांनी/तज्ञांनी दिलेला course पूर्ण करावा, मध्येच बंद करू नये.

६)लक्षणे बरे करण्या ऐवजी मुळातून आजार बरा होईल, अशीच उपाययोजना होईल याची खात्री करावी.

७)मूळ आजार बरा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेमुळे दुसरा कोठलाच आजार होणार नाही ना याचीही खात्री करावी.

८)एकच आजार सारखा सारखा उद्भवत असेल तर तज्ञांची जरूर मदत घ्यावी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Feb 2014 - 5:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझी मुलगी लहान होती त्या वेळचा अनुभव. ती आजारी पडली की घरात सगळे जण पॅनिक व्हायचे. सर्दी झाली म्हणुन डॉक्टरांकडे नेल्यावर त्यांनी सांगीतले होते की असल्या किरकोळ कारणांसाठी तीला माझ्या कडे आणु नका. मुल आजारी पडतातच. त्या शिवाय त्यांची प्रतिकार शक्ती कशी वाढणार? फार रडते असे वाटले तर चमचाभर क्रोसीन लिक्वीड पाजत जा किंवा फार खोकायला लागली तर अढुळसा द्या. जर अगदीच अवाक्या बाहेर जात आहे असे वाटले तरच माझ्या कडे आणायचे.

नक्की खरे काय?

मुल आजारी पडतातच. त्या शिवाय त्यांची प्रतिकार शक्ती कशी वाढणार?

हे असले कसले डॉक्टर?

ह्यांनी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काही उपाय सांगितले कि नाही?

स्पंदना's picture

19 Feb 2014 - 4:11 am | स्पंदना

आयुर्हित, लहान मुले आजारे पडल्यावर त्यांना थोडावेळ, जर दुखणे गंभिर नसेल तर स्वतःच्या स्वतः बरा होण्यासाठी द्यावा. शरीर या इन्फेकशनशी स्वतः हुन प्रतिकार करायला शिकत अन पुढ्च्यावेळी सर्दी लवकर बरी होते. उगा सारखी औषधे पाजल्याने शरीराला स्वतः प्रतिकार करायला मिळत नाही. साधी सर्दी, खोकला, एखाद दुसरा डहाळ्,उलट्या. होत असतील होउ द्यावं. अर्थात या प्रकरणी घरातले आईवडिल जाणकार असतात. नवे पालक गोंधळुन जातात. अगदी ताप सुद्धा जास्त नसेल तर थोड थांबाव.

सुबोध खरे's picture

3 Feb 2014 - 7:02 pm | सुबोध खरे

साहेब,
"आयोडेक्स, व्हिक्स, सोफ्रामायसीन, क्रोसीन, क्रोसीन लिक्वीड, कॉम्बीफ्लान, जेल्युसील लिक्वीड, बेनाड्रील इत्यादी"
आपण लिहिलेली बहुसंख्य औषधे अतिरेक न केल्यास नक्कीच सुरक्षित आहेत.दिवसभराच्या श्रमाने डोके दुखत असेल तर एक क्रोसिन घेतली किंवा मूल खेळताना खरचटले तर तेथे सोफरामायसीन लावले किंवा हळद लावली(मसाल्याच्या डब्यातील हळद लावू नये कारण त्यात अनवधानाने तिखट मिसळले जाण्याची शक्यता असते.) नाक चोंदले असता व्हीक्स लावले तर त्यात अजिबात चूक नाही. इतक्या क्षुल्लक कारणासाठी डॉक्टर कडे मुळीच जाउ नये. दोन दिवस सर्दी किंवा खोकला असेल तर घरगुती उपाय जरूर करावेत. ताप शंभर पर्यंत असेल तरी एक दोन दिवस थांबायला मुळीच हरकत नाही.जोरात मुका मार लागला तर एक कॉम्बीफ्लाम " घेतली तर काही होत नाही.
कुतजरिष्ट सोडून बाकी आयुरवेदिक औषधांचा मला अनुभव नाही त्यामुळे ती किती सुरक्षित आहेत ते मी सांगू शकत नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचान्नव टक्के आजार हे शरीराच्या प्रतिकार शक्तीमुळेच बरे होतात.फक्त आपल्याकडे तेवढा धीर पाहिजे. ताप आला तर तो दोन तासात उतरलाच पाहिजे (विशेषतः मुलांच्या बाबतीत आई बाप फार हळवे असतात) या हट्टापायी बरेच लोक डॉक्टरकडे आग्रह धरतात आणि मग डॉक्टर काय करणार?( आजकाल दोन आईबाप आणि चार आजी आजोबा एका मुलाची काळजी वाहत असतात मग ते मूल जरा पडले तर धावा डॉक्टर कडे ) आजही खेड्यात राहणारी बहुसंख्य माणसे ही वैद्यकीय सेवेपासून वंचितच आहेत मग त्यांच्या लहान लहान आजाराचे उपचार अशाच घरगुती उपायानी होतातच की. आपला हात कापला तर कोणत्याही औषधाविना बरा होतोच की.

आता अतिरेक म्हणजे काय? आपल्या मुलीला खोकला आला तर एक चमचा बेनाड्रील दिले तर ठीक आहे पण खोकला कमी होत नाही म्हणून दर एक तासाने बेनाड्रील दिले तर काय होईल. मुलीला अनिवार झोप येते (पाच वेळा असे सिरप दिल्याने अशी २४ तास झोपलेली मुलगी मी पाहिलेली आहे).
बाकी सर्व लोक सुजाण आहेतच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Feb 2014 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

सविस्तर खुलास्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद,

तसेच एक्का काका आणि आयुर्हित यांचेही आभार.

तुमच्या सगळ्यांच्या सविस्तर प्रतिसादा मुळे मनातल्या शंका दुर झाल्या.

आत्मशून्य's picture

19 Feb 2014 - 6:13 am | आत्मशून्य

आता अतिरेक म्हणजे काय? आपल्या मुलीला खोकला आला तर एक चमचा बेनाड्रील दिले तर ठीक आहे पण खोकला कमी होत नाही म्हणून दर एक तासाने बेनाड्रील दिले तर काय होईल. मुलीला अनिवार झोप येते (पाच वेळा असे सिरप दिल्याने अशी २४ तास झोपलेली मुलगी मी पाहिलेली आहे).
बाकी सर्व लोक सुजाण आहेतच.

मला सर्दी, ताप, खोकला, थंडी वगैरे काही झाले कितीही भंयंकर अवस्था असो अम्रुतच्या अडुळसा कंम्पाउंड कफ सिरपने हमखास दिवसाच्या आत बरे झाले असा गेल्या १० वर्षांचा अनुभव आहे. म्ला त्याची चवच फार आवडायची म्हणून दर एक तासाने एक घोट या प्रमाणात ते पितो व एक ते दिड दिवसात बाटली(३५ रुपये वाली) मी बरा झालेलो असुनही संपते :) . कुठलाही साइड एफेक्ट नाही महत्वाचे म्हणजे या औषधाची कसलीही गुंगी नाही.

एकदा चुकुन अड्ळसा न्हवते म्हणून दुसरे काहीतरी रात्रि पुरते दे म्हटल्यावर मेडिकल वाल्याने बिंधास्त को*क्स दिले व सकाळी डॉक्टरकडे अवश्य जा बजावले. अरे बापरे, काय माहित को*क्स किस चिडीया का नाम है... घेत गेलो तासातासाने एक पेग, आपलं ते हे... एकएक घोट या मापाने. दोन दिवस माझ्या भोवती सगळ गोल गोल फिरतय वाटत होते. भिक नको कुत्रा आवर, रोगापेक्षा उपाय जालीम म्हणजे काय ते तेंव्हा कळाले. डॉक्टरकडे गेलो तर ते म्हटले को*क्सचा परिणाम आहे. बाकी सगळ उत्तम आहे :)

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 Feb 2014 - 8:19 pm | भ ट क्या खे ड वा ला

लेख ,प्रतिसाद दोन्ही उपयुक्त ,
शेवटी सारासार बुद्धी गहाण न ठेवणे आवश्यक
डॉक्टर खरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे तासा तासाने बेना ड्रील देण्याचा मूर्ख पणा मी देखील पाहिला आणि थांबविला आहे. एक मुल आजारी आणि १ आई १ बाप आणि २ आज्या २ आजोबा हैराण असे चित्र बरेच वेळा दिसते.

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 12:12 pm | पिवळा डांबिस

तथापी या नियमांची पायमल्ली केल्यास कायद्या अंतर्गत कारवाई घेऊन रुग्ण हितास प्राधान्य देणे हीसुद्धा अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे.

आणि ही जबाबदारी भारतीय अन्न आणि औषध प्रशासनालय कितपत पार पाडतं आहे?
:(

मोक्षदा's picture

17 Feb 2014 - 7:18 pm | मोक्षदा

अन्न आणि औषध प्रशासनालय

सर्वात जास्त काळजी सध्याचे आयुक्तच घेत आहे म्हणूनच
आत्ता पर्यंत अनेक कायद्यांची अंमलबजावणी झाली आहे , उद. डॉक्टरांच्या चीठीही शिवाय औषधे मिळणार नाही , बिल मागून घेणे , दुधातील भेसळ, गुटखा तंबाखू वरील बंदी , इ.

अनन्न्या's picture

18 Feb 2014 - 7:36 pm | अनन्न्या

आजकाल दोन आईबाप आणि चार आजी आजोबा एका मुलाची काळजी वाहत असतात ... हे मात्र १००%

आयुर्हित's picture

26 Feb 2014 - 12:22 am | आयुर्हित

औषधांवरील खर्च का वाढतो आहे?
पद्मभूषण प्रोफेसर बी एम हेगडे MD, PhD, FRCP (London, Edinburgh, Glasgow & Dublin), FACC and FAMS आणि दी न्यूयोर्क टाईम्स चा गौप्यस्प्फोट येथे वाचा Why are healthcare costs shooting up?

सुबोध खरे's picture

26 Feb 2014 - 10:38 am | सुबोध खरे

याच्या दुसर्या भागाचा दुवा मिळेल काय? गुगलून पाहिले पण मिळाला नाही

अन्न व औषध प्रशासनाने फार्मासिस्ट,डॉक्टर आणि फार्मसी संस्था-संघटनांच्या सहकार्याने तयार केलेली डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे: डॉक्टरांना औषधांची जेनेरिक नावेही लिहावी लागणार

> डॉक्टरांनी लेटरहेडवर त्यांची पूर्ण मूळ पदवी लिहावी. (एमबीबीएस, बीएएमएस, वगैरे.)

> लेटरहेडवर डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक व कोणत्या कौन्सिलकडे नोंदणी आहे, ते लिहावे.

> औषधांची नावे कॅपिटलमध्ये लिहावीत.

> शक्यतो औषधांची जेनेरिक नावे लिहावीत.

> रुग्णांच्या समस्यांचा उल्लेख करावा.

> सरकारमान्य डोसेसच्या प्रमाणानुसार त्यात उल्लेख असावा.

याकामी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन, फार्मसी कौन्सिल, एमसीआयए, व्हेटर्नरी कौन्सिल, डेन्टल कौन्सिल या संस्थांनी एकत्र काम केले.

आयुर्हित's picture

19 Mar 2014 - 10:15 am | आयुर्हित

A 2012 report by India’s parliament alleged collusion between pharmaceutical firms and officials at the Central Drugs Standard Control Organization (CDSCO), the country’s drugs regulator, and described an agency that was both understaffed and underqualified.

US doctors uneasy about Indian drugs

आयुर्हित's picture

3 Apr 2014 - 3:29 pm | आयुर्हित

राष्ट्रीय औषध दरनियंत्रण प्राधिकरण (एनपीपीए) ही यंत्रणा १९९७ पासून अस्तित्वात आली. तेव्हापासून हजारांवर प्रकरणे उघड झाली असून त्यात औषध कंपन्यांनी पेशंटच्या खिशाला लावलेला खार ३११६ कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी आजपर्यंत जेमतेम ५०० कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. (ही आकडेवारी नोव्हेंबर २०१३ पर्यंतची आहे.)
सविस्तर माहिती :पेशंटच्या खिशाला ३,११६ कोटी रुपयांचा खार

कोणीतरी सांगेल का महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांना?

साधा मुलगा's picture

5 Apr 2014 - 8:04 pm | साधा मुलगा

लेख आवडला
तरी पण काही बाबींकडे लक्ष वेधावे असे वाटते. फार्मसी हे प्रोफेशन म्हणून अजूनही बघितले जात नाही. FDA च्या बडग्यामुळे आता मेडिकल मध्ये फार्मासिसट ठेवला जात आहे. तरी पण त्याचा उपयोग रुग्णाच्या हितासाठी किती होतो हाही एक प्रश्नच आहे. जे pharmacists मेडिकल मध्ये काम करतात ते फार फार तर D.Pharm. (diploma) असतात त्यामुळे त्यांना pharmacology बद्दल काही माहिती नाही . बर कोणी B.Pharmacy जरी असला तरी तो कितपत त्याचे ज्ञान वापरू शकतो हेही देवालाच ठाऊक . कारण तसे practical knowledge देण्यास सध्याचा पदवी अभ्यासक्रम अपुरा आहे.
FDA चा निर्णय स्वागतार्हच आहे परंतु त्याची अंमलबजावणी रुग्णाच्या हितासाठी होते आहे का? हे हि पाहावे लागेल.

आयुर्हित's picture

10 Apr 2014 - 10:02 am | आयुर्हित

जेनेरिक औषधे म्हणजे काय? एखाद्या आजारावर औषध शोधण्यासाठी कंपन्यांकडून अनेक वर्षे संशोधन केले जाते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधल्या गेलेल्या फॉम्र्युलानुसार औषध तयार केले जाते. प्रत्यक्ष औषधाचे उत्पादन करण्याचा खर्च कमी असला तरी संशोधनावर केलेला खर्च भरून काढणे कंपनीला आवश्यक असते. यासाठी या औषधाची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांसाठी फक्त त्या कंपनीलाच देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावाने (ब्रॅण्ड नेम) बाजारात येतात. या कालावधीत संशोधनाचा खर्च वसूल झाल्यावर इतर औषध कंपन्याही ही औषधे तयार करू शकतात. या औषधात वापरलेल्या रासायनिक संयुगावरून ती औषधे ओळखली जातात.

जेनेरिक औषधे स्वस्त का? जेनेरिक औषधांवरील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीने आधीच वसूल केलेला असतो. त्यामुळे केवळ औषधनिर्मितीच्या उत्पादन खर्चानुसार त्यांची किंमत ठरवली जाते. अर्थातच ही किंमत मूळ ब्रॅण्डेड औषधांपेक्षा खूप कमी होते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डेड औषधांची किंमत त्यांच्या जेनेरिक उत्पादनांपेक्षा सर्वसाधारणपणे पाच ते दहा पट महाग असल्याचे दिसते.

अमेरिकेतील चित्र अमेरिकेतील औषधांच्या एकूण बाजारपेठेत ८० टक्के वाटा जेनेरिक औषधांचा आहे. जेनेरिक औषधे वापरल्याने दरवर्षी अमेरिकेने शेकडो अब्ज रुपये वाचवले आहेत. २०१३ मध्ये जेनेरिक औषधांमुळे अमेरिकेचे तब्बल २१७ अब्ज डॉलर वाचले . यातील औषधे अमेरिकेत आयात केली जातात व त्यातही भारतात उत्पादन होत असलेल्या औषधांचा वाटा महत्त्वाचा आहे.

भारतातील परिस्थिती भारतातील कंपन्या ५० हजार कोटी रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात करतात. देशात मात्र ब्रॅण्डेड नावाने अधिक किमतीत ही औषधे विकली जातात. भारतात एकीकडे गरिबांसाठी सरकारी मोफत आरोग्यव्यवस्था असली तरी ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित व दीर्घकालीन औषधे आवश्यक असतात. या आजारांच्या रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल. सरकारी रुग्णालयातही जेनेरिक औषधेच दिली जातात. जेनेरिक औषधांचे प्रमाण वाढवण्यासाठी गेल्या दशकभरापासून आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. मात्र आजही काही अपवाद वगळता जेनेरिक औषधांची उपलब्धता वाढलेली नाही.

एफडीएची भूमिका डॉक्टरांनी रुग्णांना औषधांची जेनेरिक नावे लिहून द्यायला हवीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भूमिका अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे.

साभार:जेनेरिक औषधे : भारताची गरज

सुबोध खरे's picture

10 Apr 2014 - 11:56 am | सुबोध खरे

जेनेरिक औषधे द्यावीत हा मुद्दा जितका वाटत तितका सरळ नाही. माझ्या सौ च्या दवाखान्यात अशाच उदात्त हेतूने आम्ही जेनेरिक औषधे विकत घेऊन ठेवली होती रोक्सिड (अलेम्बिक फार्मा ) हे ७३ रुपयाला दहा गोळ्या होत्या. त्याच कंपनीचे जेनेरिक रोक्सिथ्रोमायसीन ४० रुपयाला दहा गोळ्या विकत घेऊन रुग्णांना न नफा न तोटा तत्वावर द्यायचे आम्ही ठरविले होते आणि रुग्णांना तसे स्पष्ट विचारत होतो. परंतु यात डॉक्टरांचा "काहीतरी फायदा" असावा असे बर्याच रुग्णांना वाटत होते. रुग्णांना ७३ रुपयाचे रोक्सिड(त्याच कंपनीचे) घेणे पसंत होते. त्यामुळे आम्ही हे सर्व प्रयत्न बंद केले.
जेनेरीक औषधांच्या दर्जाबाबत एफ डी ए तुम्हाला कोणतीही खात्री देऊ शकत नाही. तुम्ही जेनेरिक नाव लिहून दिलेत तर केमिस्ट त्याला जी कंपनी सर्वात जास्त नफा देईल त्याच कंपनीचे औषध देईल हे उघड सत्य आहे. डॉक्टर कडून किंवा फार्म कंपनी कडून पैसे घेणे हे एफ डी ए ला कठीण आहे पण केमिस्ट कडून एकदम सोपे आहे त्यामुळे एफ डी ए अशी एकांगी सूचन काढेल यात काही नवल नाही.
सरकारी नोकरीत असताना मी तेवीस वर्षे जेनेरीक औषधे वापरत आलो आहे आणि त्यात कोणती चांगली आणि कोणती वाईट हे अनुभवाने समजू शकत होते. परंतु त्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणे हे तितके सोपे नाही आणि आपल्या सच्छिद्र व्यवस्थेत तर अजिबात नाही. उद्या मी सुबोध फार्मा कंपनी काढून केमिस्ट ला भरघोस हिस्सा देऊन माझी औषध कंपनी एकदम जोरात चालवणे सहज शक्य आहे. मग मला डॉक्टरचे पाय धरायची सुद्धा गरज नाही. भारतातील ९९ % केमिस्ट नफ्यासाठी निर्बंधित औषधे विकतात. (हा आकडा अजून जास्त असण्याची शक्यता आहे). आपण कोणत्याही केमिस्ट कडे जाऊन बेनाड्रील मागून पहा सहज मिळते कि नाही.केमिस्ट कडून औषध घेतले पण बरे झालो नाही हि तक्रार घेऊन रोज एखादा तरी रुग्ण आमच्याकडे येतो."" या प्रत्येक रुग्णाच्या मागे तीन रुग्ण (साध्या सर्दी खोकल्याचे) बरे झालेले असतात हि पण वस्तुस्थिती आहे हे मान्य करूनही हे चारहि रुग्ण थोडे पैसे वाचवण्यासाठी हा धोका स्वीकारतात हे कटू सत्य आहे.""
जर अटोर्व्हास्टाटीन हे औषध जे एफ डी सी ( इलेक्ट्राल बनवणारी) कंपनी चे घेतले तर २४ रुपये आणि रैनबैक्सी चे घेतले तर १८० रुपये पडतात (स्वानुभव). याचा अर्थ काय? औषध कंपन्यांची अतिरिक्त नफेखोरी आहे म्हणजे जर सरकारने सर्वच "जीवनावश्यक" औषधे DPCO( DRUG PRICE CONTROL ORDER)औषध किंमत नियंत्रण आज्ञावली खाली आणली तर औषधे स्वस्त करणे सहज शक्य आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या( आणी आता भारतीय कंपन्या सुद्धा) उत्तम दर्जा आणी गुणवत्ता याच्या नावाखाली अफाट नफेखोरी करतात हे उघड सत्य आहे. त्यांना नियंत्रणात आणणे कोणतेहि सरकार करू इच्छित नाही. ( करणे सुस्पष्ट आहेत). मग एक मलमपट्टी म्हणून जेनेरिक औषधेच लिहा हि डॉक्टरवर सक्ती करणे सर्वात सोपे आहे. ते सरकारने केले. (यात परत कोणती जीवनावश्यक आणी कोणती नाही हा वादाचा मुद्दा उरतोच)
डॉक्टर कायद्याच्या कचाट्यातून सुटले (कारण मी औषध लिहिले पण ते बनावट निघाले/ केमिस्टने दुय्यम दर्जाचे दिले तर मी काय करणार? खरोखरच डॉक्टर काही करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे) पण रुग्ण दगावला / बरा झाला नाही या सामजिक बांधिलकी आणी (जनाची आणी) मनाची लाज यातून कशी सुटका होणार?
जाता जाता नकली / बनावटी औषधाच्या बाजाराबद्दल एक विदा पहा. जुनी असली तरी मुद्दा लक्षात घेण्यासाठी उपयुक्त आहे
http://www.hindu.com/seta/2003/07/31/stories/2003073100190200.htm
हे गटार आहे जितके उपसाल तितकी घाणच बाहेर येईल
पण लक्षात कोण घेतो?