बंबईसे आया मेरा दोस्त
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते!
पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”