एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

विद्युत् बालक's picture
विद्युत् बालक in काथ्याकूट
7 Jan 2014 - 11:15 pm
गाभा: 

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

२०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे .

ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील .

आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे .

मोदींचा उदय व दाभोलकर यांची हत्या यांची सांगड घालणाऱ्या ह्या थोर विचारवंतास आमचा साष्टांग नमस्कार .

राजकीय मतभेद कितीही असोत पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय आखाड्यात रुपांतरीत होताना बरे नाही दिसत.

(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Jan 2014 - 11:19 pm | पैसा

धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला. कुमार केतकरांबद्दल आहे ना? त्यांच्याकडून फार वेगळे अपेक्षित नसावे पण तरी...

विद्युत् बालक's picture

7 Jan 2014 - 11:21 pm | विद्युत् बालक

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2014 - 7:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला.

हो ना. मिपाच्या कोणा जेष्ठ संपादकाबद्दल धागा आहे कोणास ठाऊक असं वाटलं.
बाकी, निवांत वाचतो काथ्याकूट.

-दिलीप बिरुटे
(मिपाचा जेष्ठ संपादक) ;)

यशोधरा's picture

8 Jan 2014 - 7:30 am | यशोधरा

खरं तर मला प्रश्न पडला की सद्ध्या संमंमध्ये ज्येष्ठ असं कोणी नाही, तरी असं काय लिहिलंय! :D
मग लक्षात आले की क्षीण प्रयत्न वगैरे असावेत! :P

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2014 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

>>> धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला.

हो ना. मिपाच्या कोणा जेष्ठ संपादकाबद्दल धागा आहे कोणास ठाऊक असं वाटलं.

हो ना ! "कोण तो मिपाचा जेष्ठ संपादक?" आणि "आता त्रिशतकी रणधुमाळी वाचायला वेळ राखून ठेवायला पाहिजे" असे म्हणत धागा उघडला, तर हे !

(निवडणूकांची रणधुमाळी अंगवळणी पडल्याने मिपावरची रणधुमाळी जास्त मनोरंजक वाटणारा) इए :)

दर्यावर्दी's picture

7 Jan 2014 - 11:21 pm | दर्यावर्दी

माथेफीरु नथुराम गोडशेच्या नावाने ठाणे साहित्य संमेलनात पत्रके काढली गेली होती ,तेव्हा आपण कुठे होतात विबा?

मुक्त विहारि's picture

7 Jan 2014 - 11:47 pm | मुक्त विहारि

असो.

?

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 11:03 am | मंदार दिलीप जोशी

नथुराम गोडसे अमर रहे :P

दर्यावर्दी's picture

8 Jan 2014 - 11:08 am | दर्यावर्दी

महात्मा गांधी यांचे विचार चिरायू होवो.

विद्युत् बालक's picture

7 Jan 2014 - 11:31 pm | विद्युत् बालक

तुम्ही गांधी मारला आम्ही तुमचा मोदी मारू असाच सूर दिसतोय तुमचा

जहाज भरकटू देऊ नका म्हणजे झाले !

प्रसाद गोडबोले's picture

7 Jan 2014 - 11:34 pm | प्रसाद गोडबोले

जाऊनद्या हो ...

कुमार केतकर / दिग्विजय सिंग / उमा भारती / जस्टीस काटजु वगैरे लोक जास्त बोलले तरी त्या कडे लक्ष द्यायचे नसते ...

मुक्त विहारि's picture

7 Jan 2014 - 11:47 pm | मुक्त विहारि

केतकरांचे बोलणे कशाला मनावर घेता?

चला मस्त एक-एक कटिंग मारू.

विनोद१८'s picture

8 Jan 2014 - 12:00 am | विनोद१८

मला व्यक्तिशा असे वाटते की त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, अशी सुपारी घेउन केलेली वि़क्रुत मुक्ताफळे परीणामशुन्य असतात, मिपासारख्या दर्जेदार सन्स्थळावर चर्चा करण्याच्या योगतेची तर ती कधीच नसतात, कुणीकडशी लोकान्चे लक्ष आपल्याकडे वेधुन घेणे एवढाच त्याचा हेतु दिसतो ( म्हणजेच चमकोगिरी करणे ) कारण आता दुसरे करण्यासारखे काही काम नसल्यामुळे असे होत असावे, त्याला बोंबलुदे आणि *dash1**dash1**dash1*.

विनोद१८

हुप्प्या's picture

8 Jan 2014 - 12:09 am | हुप्प्या

हा विषय उपस्थित केल्याबद्दल.

केतकरांची मध्यमवर्गीय मराठी लोकांविषयीची जळजळ जगजाहीर आहे. ह्या संदर्भात तोडलेले तारे
१. परदेशी जायचे, सुखसोयी आणि लठ्ठ पगार भोगायचे आणि गळ्यात पेटी बांधून सागरा प्राण तळमळला म्हणायचे.

ह्यातल्या कुठल्या गोष्टी चुकीच्या वाटतात केतकरांना? काबुलीवालाचा पठाण ऐ मेरे प्यारे वतन असे गातो तेही ह्याच भावनेतून ना? त्याची का नाही खिल्ली उडवत? जातीपातीने बुजबुजलेल्या भारतात संधी कमी झाल्या आणि म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीय (त्यातही केतकरांचा ज्या वर्गावर विशेष लोभ आहे त्या वर्गातील भारतीय) अमेरिका व अन्य परदेशी गेले आणि स्थायिक झाले तर काय बिघडले? बरी घाण गेली म्हणून केतकरांनी टाळ्या पिटाव्यात की.

२. मोदींच्या मागे धावणारे म्हणजे एखाद्या अमली पदार्थाचे व्यसन करणारे गर्दुल्ले, गांजेकस लोकांसारखे डोकेफिरु लोक आहेत. त्यांना मोदीच्या नावाची नशा चढली आहे.
केतकरांची खंत बहुधा ही आहे की ते गांधी घराण्याचे नाव घेत घेत टाईट होतात आणि त्यांच्यासारखे व्यसनबाज त्यांना औषधालाही सापडत नाहीत. (त्यांनी मिपावर शोधले नसावे बहुधा!)

३. गांधी हत्या एका पुणेरी मराठी ब्राह्मणाने केली. दाभोळकरांची हत्या पुण्यात झाली. म्हणून दोन्हींच्या मागे एकच शक्ती आहेत. दाभोळकरांची हत्या मोदींच्या उदयानंतर झाली म्हणून मोदीच त्याला जबाबदार आहेत. बादरायण संबंधाचे याहून उत्कृष्ट उदाहरण पाहिले नाही.
एका अत्यंत पराकोटीच्या द्वेषापोटी ह्या नादान, बिनडोक विचारांचा जन्म होतो. विरोधी विचार सहन न होणारे, विरोधकांचा उत्कर्ष पाहून डोकेफिरु आकांडतांडव करणारे हे तथाकथित विचारवंत हेच खरे फासिस्ट आहेत.

४. महाराणी सोनियाजींचे अफाट कर्तृत्व. इटलीची सून थेट देशाची प्रमुख झाली. शरद पवार वा अन्य नेत्याने इटलीत जाऊन साधा महापौर वा सिनेटर बनवून दाखवायची हिंमत आहे का त्यांच्यात?

आता केतकरांना उलटा प्रश्न, जर ही बाई जर अन्य कुठल्या घराण्यात सून म्हणून आली असती तर नगरसेविका तरी बनली असती का? ही निव्वळ गांधी घराण्याची आणि लाळघोटी काँग्रेसी लोकांची कर्तबगारी आहे. सोनियादेवींचा हिस्सा नावालाच.

असो. आपण आणि आपले विचार आता नि:ष्प्रभ होत आहेत. कुणी वाचक, चाहते फारसे उरले नाहीत हे ओळखून, काही तरी सनसनाटी, खळबळजनक बोलावे आणि काही दिवस प्रसिद्धी मिळवावी अशी ह्या सोनियाभाटाची अटकळ असावी. घटम भिन्द्यात, पटम छिन्द्यात कुर्यात रासभध्वनीम वगैरे.

चिरोटा's picture

8 Jan 2014 - 1:06 pm | चिरोटा

त्यांचे ९७-२००१ सालातले मटातले अग्रलेख आठवलेत तर गंमत वाटेल्.अजूनही लक्षात राहिलेली काही वाक्ये-
१)'चंगळवादी' मराठी मध्यमवर्गाला प्युजो(PAL-प्युजो तेव्हा जोरात होती) घ्यायला हव्यात पण गाडी बिघडली तर ते स्वतः दुरुस्त करण्याऐवजी मेकॅनिकला देतात.मात्र अमेरिकन्/युरोपियन तरूण तसा नाही.ते स्वतःची गाडी स्वतःच दुरुस्त करतात.
२)मुंबईची वाट्/र्‍हास मराठी माणसामुळेच झाला.
३)राजीव गांधींच्या हत्येमागे आंतर्राष्ट्रीय कट होता.

खटपट्या's picture

8 Jan 2014 - 12:12 am | खटपट्या

वड्याचे तेल वांग्यावर

हे लोक कोणतयातरी पक्षात का जात नाहित ?
मग ठोका जाहिर सभा आणि ऐकवा आपली मते .

दर्यावर्दी's picture

8 Jan 2014 - 10:37 am | दर्यावर्दी

छान ,केतकर परखड लिहितात त्यामुळे ते भ्रमवृदांस सहन होत नसावेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jan 2014 - 10:38 am | बिपिन कार्यकर्ते

बरं झालं मी संपादक नाहीये! ;)

आबा's picture

8 Jan 2014 - 10:42 am | आबा

केतकर वाइड बॉल टाकतात अधून मधून पण त्यांची सगळीच मते टाकाऊ वाटत नाहीत

सौंदाळा's picture

8 Jan 2014 - 10:44 am | सौंदाळा

हा माणुस साहित्य संमेलनात व्यासपीठावर आलाच कसा?
पत्रकार साहित्यिक कधीपासुन झाले?
यानेच काही वर्षांपुर्वी सचिन तेंडुलकर्विरुद्धही असेच गरळ ओकले होते.

मदनबाण's picture

8 Jan 2014 - 10:48 am | मदनबाण

इतके दिवस आणि इतक्या वेळा मिपावर सुमार केतकर का शब्द वाचला होता आणि हा शब्द प्रयोग अजिबात चुकीचा नाही याची संपूर्ण खात्री आता पटली आहे.
मोदी विरोधाची कावीळ यांना झालेली दिसली... आणि त्यावर त्यांना कुठलेही औषध लागु पडणार नाही.
यावर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया योग्यच वाटली...

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 10:55 am | मंदार दिलीप जोशी

पुतळ्यांच्या संदर्भातः
ज्या माणसाला सरदार पटेल आणि मायावती यांच्यात फरक समजत नाही त्या माणसाबद्दल बोलण्यात फार वेळ घालवणे म्हणजे आपल्या बुद्ध्यांकाचा अपमान आहे :D

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 11:29 am | मंदार दिलीप जोशी

Gandhi: Naked Ambition हे पुस्तक वाचा. फार उद्बोधक आहे.
http://www.flipkart.com/gandhi-naked-ambition/p/itmdyyq5ctvcakwy?q=Gandh...

दर्यावर्दी's picture

8 Jan 2014 - 1:17 pm | दर्यावर्दी

अहो तो अर्धनग्न होता ,देशातले लोक अर्धनग्न आहेत म्हणून तो सहसंवेदनेपोटी तसे करायचा ,एक वेळच जेवायचा...

केतकर सरां सारखा विचारवंत जेव्हा असले काही बोलतो तेव्हा त्यात निश्चितच काहीतरी तथ्य असणार. अभय बंग ह्यांची आयबीएन लोकमत वर नुकतीच मुलाखत झालेली आहे त्यातली त्यांचीही मते योग्य वाटली.

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 10:57 am | मंदार दिलीप जोशी

केतकर आणि विचारवंत :D

का आपल्या विरुद्ध विचारांचा व्यक्ती विचारवंत असू शकत नाही?

कुजकट थयथयाट
माथेफिरू भाषण
तीब चाटुगिरी "ऊग्रलेखांचा"
डलेला (की) सोडलेला दृष्टीकोण प्रतिसाद
चिवडणारे (बाष्कळ)धागे
को तिथे नाक खूपसून चमचागिरी /चमकोगिरीचा कळस

सचीन's picture

8 Jan 2014 - 11:28 am | सचीन

नाद खुला विचारांचा प्रतिवाद विचाराने केला जावू शकतो. तुम्ही शिव्या देण्या पेक्षा केतकरांचे मत कसे चुकीचे आहे हे सांगितले तर ते योग्य ठरेल. तुम्ही नाक्यावर उभे राहून प्रतिवाद करत नाही आहात मिपा सारख्या संस्थळावर प्रतिसाद देत आहात.

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2014 - 2:20 pm | टवाळ कार्टा

हेच कु.के. मोदींबद्दल पण करु शकतात की

ऋषिकेश's picture

8 Jan 2014 - 11:33 am | ऋषिकेश

केतकरी चरफडाट(च) तो.. कानामागून येऊन त्या भारतकुमारांना(ही) खासदारकी मिळते आणि आपल्याला नाही!!
हा शेवटचा निकराचा प्रयत्न समवजावा ;)

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 11:35 am | मंदार दिलीप जोशी

सचीन, तुम्ही सुद्धा नळावरचे भांडण करत नसून मिपावर आहात हे लक्षात ठेवा.
केतकर कसे चुकीचे हे तुम्हाला आम्ही (मराठीत) सांगायला हवे असल्यास वरचे सगळे प्रतिसाद नीट वाचा.
विशेषतः हुप्या यांचा हुप्प्या - Wed, 08/01/2014 - 00:09 हा प्रतिसाद वाचा.

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 11:44 am | मंदार दिलीप जोशी

नाद खुळा :D

अगदी, अगदी

लोटीया_पठाण's picture

8 Jan 2014 - 11:44 am | लोटीया_पठाण

केतकरांचा पुतळा मुद्दा पटला. मला तरी सद्यपरिस्थितीत देशात असे मोठमोठाले पुतळा प्रकल्प उभारणे योग्य वाटत नाही.

पण, पंडित नेहरू अन त्यावेळची काँग्रेस अन आताची काँग्रेस अन पिलावळ यात दर्जात्मक काही फरक असेल असा केतकरांना वाटत नाही असा दिसतंय.

अन मोदि, विद्वेष , फाळणी इत्यादी बद्दल कारणमीमांसा करण्याची गरज केतकरांना वाटत नाही, वाट्टेल ते अंदाज बांधून मोकळे. काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत राहूनहि देशात secularism काही बोकाळला नाही तसाच मोडी आले म्हणून हिंदुत्ववादहि वाढणार नाही.

चिरोटा's picture

8 Jan 2014 - 11:52 am | चिरोटा

लोकसभा निवडणूका पार पडेपर्यंत असल्या 'कुमार विचारांचा' रतीब टी.व्ही/पेपरांतून पडेल.उद्या गुजरातमध्ये बस/ट्रेनला अपघात झाला तरी कु.के. मोदींनाच जबाबदार धरतील.
कु.के.चे लेख्/भाषणे विनोदी नजरेतून वाचावीत ही विनंती.

अर्धवटराव's picture

8 Jan 2014 - 11:54 am | अर्धवटराव

एक गरीब परिस्थितीतुन वर आलेला कर्तुत्ववान ओबीस माणुस प्रधानमंत्री पदापर्यंत झेप घ्यायला बघतो आहे तर त्याला साथ द्यायचे सोडु इतर ओबीसी विद्वान त्याचे पाय ओढायला बघतात... कोणासाठी ? तर आपण उच्चवर्णीय असल्याचा अहंकार झालेल्या पिढीजात श्रीमंतेचा गर्व असणार्‍या एका युवराजासाठी. यांनी पवार साहेबांना त्रास दिला...आता मोदिंच्या मागे लागले आहेत

भुमन्यु's picture

8 Jan 2014 - 12:21 pm | भुमन्यु

आता यात जात आणि वर्ण कुठुन आले? उलट त्यांनी विनाकरण गांधी हत्या आणि दाभोळ्कर हत्या एकत्र करुन उच्च वर्णियांना विनाकारण टारगेट केलंय

अर्धवटराव's picture

8 Jan 2014 - 1:05 pm | अर्धवटराव

ते कधि नव्हतं? कुमार केतकर आणि त्यांचा कैवार घेणारे मिपाकर सगळे सारखेच दुटप्पी आहेत. हे सगळं ओबीसींच्या हक्कावर डल्ला मारण्याचं षडयंत्र आहे. अन्यथा संजय सोनवणींना कधिच कसं बोलवत नाहि व्यासपिठावर? हे कुमार केतकर ताबडतोब पोचतात. उच्चवर्णीमांना टार्गेट केलं नाहि केतकरांनी. तर "गांधी" नाव वापरुन इंडायरेक्टली त्यांनी इंदीरा, राजीव वगैरेंचं सो कॉल्ड हौतात्म्य ग्लोरीफाय केलय, आणि राहुलला पण तसाच धोका आहे अशी सहानुभुती मिळवायचा प्रयत्न करताहेत ते. आणि त्यांचे मिपासमर्थक त्यांना साथ देतात. ओबीसींना कुणी वालीच उरला नाहि हेच खरं.

यशोधरा's picture

8 Jan 2014 - 4:00 pm | यशोधरा

कर्तुत्ववान ओबीस माणुस >> ओबीस? ;)

नाखु's picture

8 Jan 2014 - 12:06 pm | नाखु

कु.के. ना आघाडीचे स्विकृत सदस्य नगरसेवक करेपर्यंत खर्‍या कु.के. यांनी लढा चालू ठेवावा.
मि.पा.च्या कु.के.चे लेख्/प्रतिसाद विनोदी नजरेतून वाचावेत ही जाहीर विनंती.

इस्पिक राजा's picture

8 Jan 2014 - 12:10 pm | इस्पिक राजा

१. एका पुणेकराने गांधीजींची केलेली हत्या आणि पुण्यात झालेली एक हत्या यांचा बादरायण संबंध जोडुन समस्त पुण्याच्याच र्‍हास झाला आहे असा टाहो फोडलेला बघुन सदगदित झालो. पुणे मुरादाबाद किंवा मुझफ्फरनगर किंवा युपी बिहार मधल्या ९९% शहरांपेक्षा बकाल झाले आहे याबद्दल खात्री पटली.

२. सु. श्री मायावतींजींनी केलेल्या उत्तुंग कार्याची महती येणर्‍या पिढ्यांना कळावी या थोर उद्देशाने त्यांनी स्वतःचे पुतळे उभारले. मात्र भाजपाचे नालायक नेते त्यावर जनतेचा पैसा वाया गेला म्हणुन अश्रु ढाळत आहेत हे बघुन त्यांची कीव आली. हेच पुर्वीच्या हिंदु राजांनी शिलालेख बन्वुन ठवले आहेत याचे या हरामखोरांना काय अप्रुप. मायावतीजींनी त्याच उच्च उद्देशाने स्वतःचे पुतळे उभारले तर मात्र यांचे रक्त आटते. फॅसिस्ट, जातीयवादी आहेत झाले.

३. पटेल हा माणुस धार्मांध होता. त्याने ३ गाड्या भरुन मुसलमान मारुन पाकिस्तानात पाठवले आहे हे तर सर्वज्ञात आहे. अश्या पापी माणसाचे पुतळे उभारुन मोदींनी स्वत:च्या धर्मांधतेचे जाहिर प्रदर्शनही केले आहे. मायावतीजींसारख्या आदर्श राजकारण्याचे पुतळे उभारायाला विरोध करणार्‍या जातीय धर्मांध भाजपाने पटेलांचा पुतळा उभारायचे ठरवुन स्वतःचे पितळ उघडे पाडले आहे.

४. कुमार केतकर सर एका महान कार्याने प्रेरित झाले आहेत. त्यांनी ज्या अलवारपणे दाभोळकर हत्येचे गूढ उलगडले आहे ते बघता गोध्रा हत्याकांडातला मोदींचा सहभागही ते लवकरच जनतेसमोर प्रकट करतील अशी आशा आहे. मोदींचा गांधी हत्याकांड आणि त्यानंतरचे जळीत यामधला सहभागही त्यांनी लवकर जनतेसमोर आणावा अशी विनंती. तसेच नेताजींच्या गूढ मृत्युमागचा त्यांचा सहभाग आणि लाला लजपतराय खून प्रकरणात त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांनी केलेली मदत यामागचे सत्यही केतकर लवकरच जनतेसमोर आणतील असा मला विश्वास आहे. त्याशिवाय १८५७ च्या उठावाच्या वेळेस झाशीच्या राणीला जो वर्मी घाव लागला होता तो प्रत्यक्ष मोदींनी मारला होता आणि तात्या टोपे तर त्यांच्याच गद्दारीमुळे पकडले गेले (आणि भाउसाहेबांना स्वामी बनवण्याचा छुपा डावही त्यांचाच होता) हे पण आता जनतेला लवकरच कळेल.

५. मोदींच्या फॅसिस्ट विचारांनी प्रभावित होउन हिटलर आणि मुसोलिनी यांच्यामधला राक्षस जागा झाला आणि दुसर्‍या महायुद्धाची बीजे पेरली गेले हे जेव्हा जगाला कळेल तोच खरा सुदिन

येडगावकर's picture

8 Jan 2014 - 1:04 pm | येडगावकर

ते तेवढं 'सर कुमार केतकर' करा बुआ... लै ब्येष्ट वाटल....

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 12:27 pm | बॅटमॅन

सोडा हो, भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है हे अजरामर सत्य मिपाकर वाचकांस परिचित असेलच. तस्मात जास्ती टेण्षण णै लेणेका.

केतकरांच्या ओशट चेहर्‍यावरून कॉंग्रेसने त्यांना तेलातुपाची आंघोळ घातली आहे हे नेहेमीच जाणवते.
पेड न्यूज असतात तसेच पेड पत्रकार असतात..
नाह्यल्या तुपाला जागताहेत ते..
त्यांचा दोष नाही, मजबुरी आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jan 2014 - 1:05 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्या मते कुमार केतकर काही अयोग्य बोलले नाहीत. भाषणातील ओघात त्याचा अर्थ पहा. त्यांचा रोख फॅसिस्ट वृत्तीवर आहे.

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 1:09 pm | बॅटमॅन

काका बाकीचं ठीके ओ पण आम्रिकेला जाणार्‍यांवर यांचा इनाकारण दात का??? हे कोण टिकोजीराव लागून गेले?

सुनील's picture

8 Jan 2014 - 1:21 pm | सुनील

माझ्या मते कुमार केतकर काही अयोग्य बोलले नाहीत. भाषणातील ओघात त्याचा अर्थ पहा. त्यांचा रोख फॅसिस्ट वृत्तीवर आहे.

मग इथे जे चालले आहे त्याला विच-हंटींग म्हणावे काय? ;)

(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )

नक्की थण्डगार पाणीच की दुसरे काही?

इकडची मारामारी बघून आता मलाही मद्यमन्दिरात प्रवेश करावासा वाटू लागला आहे !

;)

विटेकर's picture

8 Jan 2014 - 2:45 pm | विटेकर

United States of India
तुमच्या सहीला माझा आक्षेप आहे .. भारत हा United States of India नाही ! ते एक संपूर्ण एकसंध राष्ट्र आहे !! आणि अनादी अनंत कालापासून जेव्हा " राज्य" ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती, भारत हे एक "राष्ट्र" म्हणूनच जगाला परिचित आहे. संघराज्य असायला हे काही अमेरिकेसारखे अनेक राज्याचे, अनेक देशातून स्थलांतरीत झालेल्या लोकांचे आणि विविध संस्कृती आणि उपासना पंथ असणार्या लोकांचे 'कडबोळे' नाही की जे मुद्दामहून "युनायटेड" करावे. ते मूलत: समान श्रद्धामूल्ये असणार्या आणि एकच जीवनपध्द्ती असणार्या एकसंघ समाजाचे सनातन भौगोलिक स्थान आहे. काही संकल्पना मूळातूनच तपासण्याची आवश्यकता आहे. आमची अवस्था बदकात सापडलेल्या राजहंसासारखी आहे , आमची ओरिजनॅलिटी आम्हाला माहीतच नाही !आणि मग आमचे तारु ही उधार पाश्चिमात्य संकल्पनावर भरकटते !आणि बदकांच्या गर्दीत राजहंस "कुरुप-वेडे" ठरतात !
मला या संधीसाधु पण त्यामानाने तात्कालिक प्रिणाम करणार्या राज कारणापेक्षा स्वत्व हरवलेल्या भारतीय समाजाची चिंता वाट्ते .. हे असली आतविसमृती सार्वकालीक विनाशाकडे नेणारी आहे. राजकारणाने केलेला विनाश कालौघात भरुन निघेल , निघतो ही ! मोदी आत्ता सत्तेवर आले नाहीत म्हणून फारसे बिघड्णार नाही.. पुन्हा एखादा मोदी सत्तेवर आज नाही तर उद्या जन्माला येईलच ! राज कारणाने फारसे बिघडत नाही .. पण समाजकारणाचा कणा मोडला तर येणारी १०० वर्षे केवळ विनाशाकडे नेतील.. ही शोकांतिका समजून घ्यायला हवी. राजकारणाचे काय हो , पापी औरंग्या , शक , हूण आणि धूर्त इंग्रज ही शासन करुन गेले पण समाजाचा कणा इतक्या आक्रमणापुढे देखील अभेद्य राहीला. पण सध्या मात्र जे सांस्कृतिक आक्रमण होते आहे त्यापुढे आपण अक्षरशः गुडघे टेकले आहेत !!! असो लेखनाच्या भरात खूपच लिहिले गेले.

धाग्याचा हा विषय नव्हे तेव्हा भरकट्ल्याबद्दल क्षमस्व ! काही गोष्टी जागीच दुरुस्त केलेल्या बर्या म्हणून हा प्रपंच ! जमल्यास सुयोग्य बदल करावा ही विनंती !

प्रसाद गोडबोले's picture

8 Jan 2014 - 1:23 pm | प्रसाद गोडबोले

खरंतर काथ्याकुटायचा नाही हे ठरवलं होतं पण आत्ताच तो व्हिडीयो पाहिला त्यातले एक वाक्य ऐकले अन डोक्यात तिडीकच गेली ...

"देश कॉंग्रेस मुक्त करायचा म्हणजे स्वातंत्र्य चळवल बंद करायला लागेल कारण स्वातंत्र्य चळवळ काँग्रेसने लढलेली आहे "

हे म्हणजे "उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया " ह्या थाटात झाले ... स्वातंत्र्याचे श्रेय एकट्या काँग्रेस आणि गांधींचे .... बाकीचे काय तर इतिहासाच्या पुस्तकातील एका पॅराग्राफचे धनी

असं काही वाचलं की आझाद , भगत सिंग ,सुखदेव , राजगुरु , नेताजी ,चाफेकर बंधु , अनंत कान्हेरे , तात्याराव , जीना , पाशा खान , अरविंद घोष , बाबु गेनु वगैरे लोकांची फार कीव वाटते ...

तुमचं बलिदान पाण्यात गेलं महाराजा :(

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2014 - 2:51 pm | टवाळ कार्टा

आणखी १०-२० वर्षांनी शाळेतुनच हे शिकवले जाणे बंद होउ शकते :(

इरसाल's picture

8 Jan 2014 - 1:30 pm | इरसाल

वर्षा़त ह्यांना भारतरत्न, पद्मविभुषण, पद्मभुषण वगैरे जाहीर झाले तर आश्चर्य नको वाटायला.(**काँग्रेसची सत्ता राहिली तर)

काहीही असो केतकर सरांचे लेखन त्यांचे विचार हे रोखठोक आहेत. असे अभ्यासू व्यक्तिमत्वे, त्यांचे विचार हे समाजासाठी आदर्शच ठरतात.

अनिरुद्ध प's picture

8 Jan 2014 - 5:39 pm | अनिरुद्ध प

किती त्रास या दर्यावर्दी आणि मंडळीना सर्व मराठी सन्केतस्थळावर्च्या मतिमंदानी केलेली घाण साफ करण्याचे कन्त्राटच मिळाले आहे यांना.

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 5:39 pm | मंदार दिलीप जोशी

बॅटमॅन, हे दोघे इतक्या खालच्या आणि वैय्यक्तिक पातळीवर उतरल्यावर सुद्धा तुम्हाला यांच्याशी वाद घालण्याची हौस आहे? मुद्द्याला प्रतिवाद करता आला नाही ही असला उकिरडा करणारी जनावरे ही. आपण का यांच्यासारख्या फालतू लोकांकडून अपेक्षा ठवा?

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 5:43 pm | बॅटमॅन

सहमत आहे, गटार-दगड-चिखल न्यायाने गप्प बसावयाचे ठरवले आहे.

दर्यावर्दी's picture

8 Jan 2014 - 5:46 pm | दर्यावर्दी

बॅटजी वैयक्तीक शेर्यांबद्दल क्षमस्व.

अनिरुद्ध प's picture

8 Jan 2014 - 5:54 pm | अनिरुद्ध प

नन्तरची पष्चात बुद्धी? आणि परत तेच सं मं आता व्यक्तिगत रोख असलेले प्रतिसाद चालतात का?

मंदार दिलीप जोशी's picture

8 Jan 2014 - 5:51 pm | मंदार दिलीप जोशी

दर्यावर्दी, तुम्हाला उद्देशून हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद.
तुमचे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर कळवता का? तुमचे ज्ञानामृतमय शब्द ऐकून तुम्हाला भेटण्याची फार म्हणजे फार इच्छा लागून र्‍हायली आहे. एकदा कडकडून गळाभेट घेतली की मग माझ्या मनाला शांतता लाभेल. काय म्हणता भेटता का?

आणि नसेल भेटायची हिंमत, तर सांगा बुवा तसे. मग अंगात नाही बळ, अन् चिमटी घेऊन पळ असा आयडी घ्या :P

कहर म्हणजे आयबीएन लोकमत वर आजचा सवाल मध्ये कुमार केतकरांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटले त्याचा 'पत्रकारांवर वाढता हल्ला' असा बागुलबुवा करण्यात आला!! त्यात जरी 'केतकरांबाबतची घटना हे केवळ एक निमित्त' असं म्हटलं गेलं तरी चर्चेत उपस्थित एकूण सगळ्याच पत्रकारांचा रोख देवेंद्र फडणवीस हे आपली पातळी सोडून बोलले असाच होता. खरं तर त्यांनी 'प्राण्याला वेड लागलं की आपण त्याला मारून टाकतो; पण संपादकाला वेड लागलं की त्याच्या बोलण्याकडे फक्त दुर्लक्ष करावं' इतकंच म्हटलं होतं. यात काय चुकीचं म्हटलंय??? तरी सगळ्यांचा सूर त्यांनी याबद्दल माफी मागावी असाच दिसला. म्हणजे पत्रकारांनी लोकांबद्दल कुठेही (म्हणजे एकवेळ न्यूजचॅनल वर, किंवा पेपरात केलं असतं, तर एक वेळ त्यात वादासाठी काहीतरी मुद्दा राहिला असता. इथे प्रसंग काय, सुमार काय बोलतायत??) काहीही गरळ ओकावी, खुशाल भेदभाव पसरवणारी भाषा करावी, आणि त्याबद्दल त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, असं म्हणणा-याने मात्र 'पातळी सोडली'??? अर्थातच त्या आजचा सवाल वर प्रत्येक ब्रेक नंतर 'पत्रकारांवर हल्ले वाढतायत का?' अशा काहीशा सवालाला आलेला लोकांचा जवाब (तो सवाल सुद्धा कसा विचारतात रे.... रे रे रे... असो) 'नाही' असाच दिसत होता. पूर्णवेळ हसत होतो.