जीवनमान
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
शिक्षणाच्या नावानं चांगभलं !
( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?)
चर्चा नको? वाद हवा??
ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते.
मिसिंग यु, सद्दाम !
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!
उर्जा घड्याळ
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू.
काही नवे करावे म्हणून.-भाग ५
ओशाळून म्हणाला.” घरी चाललोय.राजापूरला.”मी काहीच बोलले नाही.पण सुरेखाचे यजमान कसले गप्प बसतात?,”आणि उद्यारे?” “नाय त्याच कामासाठी चाललोय .येणार ना उद्या !पण मॅडम, तेवढी केस मागे घ्याल ना?”ते बघू पुडे पुढे ते प्रकरण आणि हे प्रकरण वेगवेगळे आहे तेव्हा आताच काही सांगू शकत नाही.”मी आजच्या दिवसातली सिक्सर ठोकली.(क्रमश:)
वकिल
एम.आय.डी.सी ला असताना एक चपळगावकर नावाचा मित्र होता ..
पेशाने वकिल पण वकिली चालली नाहि म्हणुन जोब भादरायच काम करायचा एका लहानश्या शेड मधे......
.
गप्पात एकदा त्याने सांगीतले...आपल्या कडे आपला कायदा नाहि.सायबाचा कायदा आपण उधार घेतला व त्याला " ईंडियन पिनल कोड" असे नाव देत तो आपण वापरत आहोत..
सायबान कायदा लिहिताना भारतिय माणुस मुळात चोर मनोवृत्तिचा आहे असे गृहित धरुन कायदा लिहिला आहे....
.
कश्या वरुन? असे विचारतात त्याने उदाहरण दिले.....
.
भाव तेथे देव (असं म्हणतात खरं!!)
मनुष्यास्वभावाला औषध नाही हे सर्वविदीत आहे. जगाकडे पहाण्याचा दॄष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तसेच आयुष्याकडून कुणाला काय अपेक्षा असतील हे सांगणे कठीण आहे. कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, वर नमूद केलेल्या बाबतीत फरक हा आढळणारच. कुणाच्या खांद्यावर काय ओझे असेल याचा अंदाज येत नाही. वरवर सामान्य वाटणारे हे स्वभावविशेष किती टोकाचा परिणाम घडवून आणू शकतात, हे दाखवून देणारा हा एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला अप्रिय प्रसंग आहे.
वेगळ्याचं वेगळं नशीब
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग?