मुक्त कविता

बहर

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
30 Jul 2015 - 12:01 pm

पाऊस
गारवा
संध्याकाळ
निवांतपणा
गुलजार-बिलजार
सगळं आहे
.
.
.
.
कागद मात्र....कधीचा कोरा
काही शब्द
एखाद् दुसरी ओळ फार तर फार....बास्स
तडफड
थोडीशी भिती
जमणार आहे की नाही?
पेन टेकवायचं कागदाला नुसतंच...अनेकवेळा
छ्या...
तुला नाही तर त्या पारिजातकाला,
विचारलंच पाहीजे एकदा
कसं जमतं रोज बहरून येणं?

मुक्त कविताकविता

स्वतंत्र

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
27 Jul 2015 - 7:16 pm

अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत
मुंगीपासून-देव माश्यापर्यंत
सगळेच बद्ध -
कुणी भौतिक
तर कुणी
निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या
आपापल्या कक्षेत.
एकटा माणूसच
या सगळ्याला अपवाद -
आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून
ऊन-सावल्यांतून
भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या
नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा
हेच आहे त्याचं ओझं
हीच आहे त्याची व्यथा
हाच आहे त्याचा गौरव
हीच आहे त्याची महत्ता

मुक्त कविताकविता

बदसुरत न बना हकीकत

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
16 Jul 2015 - 6:27 am

कविता, लेख, कथा कितीही उत्कृष्ट असोत, जीवनाला हुबेहूब कोणीच रेखाटू शकत नाही. अगदी सिद्धहस्त लेखक देखील.

बुरबुराते शरारती झरनों की मासुमियत
या खिलखीलाती हरीयाली की तबस्सुम
समिंदर तरन्नुम गाता, फिरभी गुमसुम
बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे |

झुर्रीयोमें दबी सुष्क आंखें, खोजती शबाब
शगाफोंसे लदा चरगाह, ताकते फ़व्वार--------------------*शगाफे-cracks *चरगाह-field
दर्यामे आवाराह कश्ती, तलाश साहिल की
बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे |

मुक्त कविताकविता

तो पाहिला ना अत्ता..,बाप वेडा मी ....

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Jul 2015 - 2:40 pm

तो पाहिला ना अत्ता..बाप वेडा मी
हसता हसता अवचित रडू लागला
भरुन आलेला होता आतून .. हसतानाच!
हे मात्र तो रडल्यावरच कळलं

शब्द बंद झाले..भावना अबोल झालि
कारण आता मुलीला सोडून बापच जाणार होता
लग्न मंडपातून त्याच्या आपल्या घरी..

एक न तुटणारि फिल्म काही क्षणात सलग दिसून गेली त्याला
आणि त्या पुढला मुलीच्या आयुष्यातला सुखाचा भाग त्याला दिसणार नाही याची खंत ..उरलेल्या उपस्थितांना

आणि मग काही क्षणातच , आदल्या दिवशीचं कार्यालयातलं स्वागत कमानिचं दार..
परतीच्या गाड्यांनि भरुन येऊ लागलं
आणि याचीही पावलं जड होऊ लागली मग
!

मुक्त कविताशांतरससंस्कृतीमुक्तकसमाज