तेव्हा तू कुठं होता?
लंचटाईमला कळलं मला
डब्यात लाडू होता दिला
तिरीमिरीने झटक्यात उचलून
खिडकीबाहेर फेकून दिला
आठवड्यापूर्वी तरसलो होतो जेव्हा
भुकेने कासावीस झालो होतो जेव्हा
ए रासभग्रासा
तेव्हा तू कुठं होता?
घरी येता संध्याकाळला
टॉमी कुत्रा फार आनंदला
घातली कमरेत लाथ त्याच्या
शेपूट हलवत जेव्हा आला
लहान होतो मी जेव्हा
दोन कुत्री चावली जेव्हा
ए दगाबाज कुत्र्या
तेव्हा तू कुठं होता?