(गुलझार यांच्या एका मुक्ताकावरून भारावून काहीबाही सुचलेले..)
शाळेतून येताना चिंचोक्या सोबत लपवला होता आकाशाचा एक तुकडा..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
लाल हिरव्या तांबड्या लोलंकात हरावयाचा तो कधी.. कधी चोरकप्यात लपून बसायचा..
अंधारात चांदण्याचा प्रकाश शोधून देत असे मला.. माझा आकाशाचा तुकडा..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
सोबत जगत आलो आम्ही दोघे.. लोलकांच्या प्रकाशात ...
सोबत स्वप्नं बघत आलो आम्ही... परीची.. तार्याची.. आकाशाची..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
भरून यायचा आभाळ.. भिजायची पुस्तके माझी.. भिजायचं आकाश.. आणि लोलक ही..
तो तुकडा मात्र मी. वडाच्या सावलीत घेऊन जायचो.. सदरयाने पुसायचो.. जपायचो..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
दप्तरात जेव्हा पक्षी टाहो फोडायचे.. पटकन जाऊन मी वर्गाबाहेर त्यांना सोडून यायचो..
न जाणो शिक्षक कधी रागावतील.. आणि घेऊन टाकतील माझे ते स्वछ निळे आकाश...
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
पुस्तके वाढत राहिली.. आणि वजन गेले वाढत.. दप्तर माझा लहान होऊ लागले..
जुने झाले.. फाटले.. आणि खजिना माझा मावेनासा झाला..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
न जाने कधी कुठे पडला माझा तुकडा निळा शुभ्र आकाशाचा.. जपला त्याला इतके दिवस..
आता पावलांना बोचतात.. तुकडे चांदण्यांचे... माझा तुकडा आकाशाचा ज्याचे तुकडे दिवसा..
न कळत बोचतात मनाला..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
आज गर्दीमध्ये ह्या शहराच्या ... जिथे मान वर करून बघणं जमत नाही...
जमा करतो आहे.. बोचलेले तुकडे.. जोडतो आहे आकाश माझे..
ज्यात स्वप्नांना वाट दिली होती.. ज्यात विझलेली आहे ज्योत माझ्या जगण्याची..
जोडतो आहे.. निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
जोडताना एक एक क्षण... उरला आहे रंग.. त्या पावसात भिजेल्या आकाशाचा..
निळा शुभ्र तुकडा एक.. ज्यात स्वप्नं लपवली होती माझी...
प्रतिक्रिया
12 Oct 2015 - 3:23 pm | मांत्रिक
मस्तच आहे राजे!
अगदी अप्रतिम! अगदी हृदयाला स्पर्श केला!
प्रत्येकानं असं एक छोटंसं आभाळ दडवलेलं असतं मनात, ते त्याच्या त्याच्यापुरतं असतं! त्यात त्याची स्वप्नं दडवलेली असतात! जसजसं मोठं होत जातो तसतसा हा आनंदाचा ठेवा कुठे गायब होतो कोण जाणे.
कधी आपणच परिस्थितीमुळे त्या ठेव्यापासून दूर जातो किंवा कधी व्यवहारी, स्वार्थी जग त्या स्वप्नांना तोडून फोडून टाकतं.
12 Oct 2015 - 7:23 pm | जव्हेरगंज
भन्न्न्नाट !!!!
जब्ब्ब्बरदस्त !!!!
लयच आवडलं हे प्रकरण!!!
12 Oct 2015 - 8:11 pm | प्यारे१
खास....
____/\____
गुलजार सुरुच होतात एका आभाळाएवढ्या उंचीवर. त्यांच्या कल्पनांच्या पंखांवर बसून केलेली सफर देखील तितकीच ताकदीची असणार. आवडलंच्च!
12 Oct 2015 - 10:39 pm | एस
हे छान आहेच, पण ऊर्दूचं मराठीकरण केल्यासारखं वाटलं. हाच बाज कायम ठेऊनही अस्सल अजून काही लिहिता येईल तुम्हांला असा विश्वास वाटतो.
पुलेशु.
12 Oct 2015 - 11:08 pm | जव्हेरगंज
पण ऊर्दूचं मराठीकरण केल्यासारखं वाटल????
हो का?
मुळ काव्य कसे आहे?
12 Oct 2015 - 10:59 pm | मांत्रिक
राजे!!! वा.खु.साठवलीय!!! अप्रतिम लिहिता!!!