मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही,
कदाचित तुझ्या कल्पनांची प्रेरणा बनून तुझ्या कॅनव्हास वर उतरेन
की तुझ्या कॅनव्हास वरचीच एक रहस्यमयी रेखा बनून तुला शांतपणे तुला निरखत राहीन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही.
सूर्याचा एक किरण बनून तुझ्या रंगांमधे मिसळून राहीन
की तुझ्या रंगामधे बसून तुझ्या कॅनव्हासभर पसरत जाइन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही.
धबधब्यातून मुक्त उडणाऱ्या तुषारांप्रमाणे तुला भेटेन
आणि एक थंड अनुभुती बनून तुझ्या गळ्यात पडेन
मी तुला पुन्हा भेटेन तुला कुठे कसं माहित नाही.