कोणी राहत नाही...

अर्थहीन's picture
अर्थहीन in जे न देखे रवी...
3 Sep 2015 - 4:04 pm

जाती जन्मतात.
जाती शाळेत जातात.
जाती प्रौढ़ होतात.
जाती जातीशी(च) लग्न करतात.
जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री
आपल्याच जातीवर चढ़तात.
मग अशा रीतीने जाती
..पुन्हा कंटीन्यू होतात.
जाती गावा.बाहेरच्या
'म्हारवाड्याला' असतात.
--- जाती शहरा.बाहेच्या
'झोपड़पट्टीलाही' असतात.
जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात.
जाती
गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात.
जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात.
जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात.
मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात.
नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात.
जाती रक्षणाला असतात,
जाती आरक्षणाला असतात.
जाती निवडणुकीला असतात.
जाती 10विच्या दाखल्याला अन
आताच्या जनगणनेलाही असतात.
जाती ॐ, अर्धचंद्र, क्रॉसला असतात
जाती गीता कुराण बायबललही असतात.
जाती शरीरालाही असतात.
त्याआधी जाती 'मनाला' असतात.
जात आर.एस.एस.ला आहे,
जात MIMला आहे,
जात सेनेला आहे,
जात पुरंदरेला आहे,
पाटीदार पटेलाना आहे,
रेल्वे रुळावर झोपलेल्या गुज्जर ,
खच्चर अन मराठ्यांना आहे.
या धर्मनिरपेक्ष देशाच्या
..रक्ता-रक्तातुन हल्ली,,
......हा अदृश्य जातीभेद
...........अखंड-अखंड वाहत असतो.
.
.
.
.
मग इथं जात कोणाला नाही??
तर ती फ़क्त 'भारताला' नाही.
पण त्यात आता कोणी राहत नाही.

फ्री स्टाइलमुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

3 Sep 2015 - 5:36 pm | वेल्लाभट

जाम आवडली. क्लास.
हार्ड हिटिंग.

सूड's picture

3 Sep 2015 - 7:55 pm | सूड

+१

मितान's picture

3 Sep 2015 - 7:51 pm | मितान

ह्म्म...

नाव आडनाव's picture

3 Sep 2015 - 9:00 pm | नाव आडनाव

असंच आहे आणि असंच राहणार :(

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 9:21 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटी हाणलेला टोला अत्यंत मार्किक सखोल आणि सेक्युलरि दांभिकांचि भंबेरि उडवणारा आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 9:25 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटी हाणलेला टोला अत्यंत मार्किक सखोल आणि सेक्युलरि दांभिकांचि भंबेरि उडवणारा आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 9:26 pm | अत्रुप्त आत्मा

*मार्मिक

नाखु's picture

4 Sep 2015 - 9:32 am | नाखु

पहिले इंग्लीश आणि दुसरे मराठी म्हणून!!!!

द-बाहुबली's picture

3 Sep 2015 - 9:33 pm | द-बाहुबली

एकदम कडक...!

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Sep 2015 - 10:31 pm | माम्लेदारचा पन्खा

वरचा क्लास !!

आस्तिक शिरोमणि's picture

4 Sep 2015 - 12:54 am | आस्तिक शिरोमणि

उत्कृष्ठ

खटपट्या's picture

4 Sep 2015 - 12:01 pm | खटपट्या

सत्य, टाळता न येणारे, हतबलता आणणारे आणि बरेच काही.

आवडली कविता.

एक एकटा एकटाच's picture

4 Sep 2015 - 7:14 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहीलीय

बबन ताम्बे's picture

4 Sep 2015 - 9:02 pm | बबन ताम्बे

.