बराच अवधि गेल्यावर्ती
हर्ष मनी दाटला
हरवलेला माणूस पुन्हा
रस्त्यावरती भेटला
कसलीही ना चाहुल देता
पाठलाग त्याचा केला
थोड़े अंतर राखून तेव्हा
नवा प्रवास झाला
भुकेलेल्या जिवास पाहून
पानी डोळ्यात दाटल
होत न्हवत शिदोरितल
सार त्याने वाटल
हतबल उभ्या रस्त्यालगत
अंधाकड़े पाहता
पळत जाऊन पुसल त्याने
सांग कुठे राहता?
दमून भागून शेवटी बसता
रोजच्या गाडीत जाऊन
वृद्ध दिसले उभे कुणी
उठला जागा देऊन
पाहून सार ओशाळल्याने
मनी विचार आला
कधी काळचा आपल्यातला तो
माणुस कुठे गेला
प्रतिक्रिया
10 Sep 2015 - 6:36 am | चाणक्य
चांगली आहे. शुद्धलेखनाच्या चुका टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.
10 Sep 2015 - 11:43 am | एस.योगी
"सारं त्यानं वाटलं"
मला तरी या एका ओळीतच माणूस सापडला . . . .
अप्रतिम कविवर्य .....
11 Sep 2015 - 6:43 pm | निनाव
छान लिहिले आहे.
मराठी टंकण सोप्पे नव्हे इथे. तेंव्हा काळजी नसावी.
तुम्ही लिहा.
11 Sep 2015 - 9:04 pm | अभ्या..
एक नंबर
अप्रतिम लिहिलेय
11 Oct 2015 - 9:49 pm | माहीराज
खुपच छान ... अप्रतिम