मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
4 Sep 2015 - 4:31 pm

मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही,

कदाचित तुझ्या कल्पनांची प्रेरणा बनून तुझ्या कॅनव्हास वर उतरेन
की तुझ्या कॅनव्हास वरचीच एक रहस्यमयी रेखा बनून तुला शांतपणे तुला निरखत राहीन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही.

सूर्याचा एक किरण बनून तुझ्या रंगांमधे मिसळून राहीन
की तुझ्या रंगामधे बसून तुझ्या कॅनव्हासभर पसरत जाइन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही.

धबधब्यातून मुक्त उडणाऱ्या तुषारांप्रमाणे तुला भेटेन
आणि एक थंड अनुभुती बनून तुझ्या गळ्यात पडेन
मी तुला पुन्हा भेटेन तुला कुठे कसं माहित नाही.

मला इतकं नक्की ठावुक आहे
जो पर्यंत हा जन्म आहे, तोवर मी तुझ्यासोबत आहे.
एकदा का हे शरीर संपल की सगळ संपेल
पण आठवणींचे धागे हे आयुष्यात असणाऱ्या क्षणांप्रमाणे असतात
मी तेच धागे वीणेन, मी ते क्षण निवडेन
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कस माहित नाही.

मी तुला पुन्हा भेटेन !!!!!!
=======================================================

मुळ कविता

मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
शायद तेरे कल्पनाओं
की प्रेरणा बन
तेरे केनवास पर उतरुँगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
ख़ामोश तुझे देखती रहूँगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं

या सूरज की लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूँगी
या रंगो की बाँहों में बैठ कर
तेरे केनवास पर बिछ जाऊँगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे ज़रुर मिलूँगी

या फिर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूँगी
और एक शीतल अहसास बन कर
तेरे सीने से लगूँगी

मैं और तो कुछ नहीं जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म ख़त्म होता है
तो सब कुछ ख़त्म हो जाता है

पर यादों के धागे
कायनात के लम्हें की तरह होते हैं
मैं उन लम्हों को चुनूँगी
उन धागों को समेट लूंगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं

मैं तुझे फिर मिलूँगी!!

- अमृता प्रीतम

======================================================
अमृता प्रीतम तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात इमरोज साठी लिहिलेली ही कविता. यातला शब्दंशब्द प्रेमाच प्रतिक आहे. तिच्या शेवटच्या काळात इमरोज कायम तिच्यासोबत असायचे, ते जास्त बोलत नसले तरी कवितेच्या माध्यमातून बोलते असायचे. तेव्हा अमृता इमरोजसाठी अशी व्यक्त झाली होती.

जिप्सी

फ्री स्टाइलमुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

4 Sep 2015 - 4:45 pm | बहुगुणी

हे रसग्रहणही आवडेल तुम्हाला.

प्यारे१'s picture

4 Sep 2015 - 5:26 pm | प्यारे१

+१
अगदी हेच म्हणणार होतो.
लेखक राजजैन चा मित्र असंही म्हणवत नाहीये खरं आता. :( असो.

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 1:27 am | उगा काहितरीच

मूळ कविता मनापासून आवडते .

रातराणी's picture

5 Sep 2015 - 1:18 pm | रातराणी

सुरेख! मूळ पंजाबी वर्शन पण कसलं गोड आहे!