राहील कुठे आता ही चिमणी?
वारा वादळ हे जोराचे
शाखा तुटल्या झंजावाते
उडले घरटे फुटली अंडी
सांगेल कुणाला व्यथा मनिची
राहील कुठे आता ही चिमणी?
उघडून जरी मी कपाट माझे
बोलावत आहे तिजला
नुसती चिव-चिव करते आहे
नकळे मजला आणिक तिजला
घरात परि ती कशी रहावी
घरी वृक्ष तो आणू कैसा
घरटे मग ती कोठे बांधिल
आणेल कुठून ती पिले बिचारी
सांगेल कुणाला व्यथा आपली
राहील कुठे आता ही चिमणी?
(महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित)
२८/०१/२०१६