जोडी

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
8 Jan 2016 - 12:03 pm

सांगू का ?
मी कसा अन तू कशी ?

तुटता निद्राबंधन
करिता मुखमंजन
ब्रश मी अन पेस्ट तू शुभ्रशी-

सका-सकाळी
चहाच्या वेळी
कप मी अन तू बशी !-

करावया ईशचिंतन
धूप मी, तू निरंजन
तैसेचि टाळ मी, घंटी तू मधूरशी!-

नळाभोवती
भाजन जमती तिथे
हंडा मी अन तू कळशी !-

भोजन पंगती
आपण संगती
वाटी तू या ताटापाशी !-

होता उदरभरती
चढली सुस्ती
तक्क्या तिथे मी अन तू उशी !-

उद्यानी त्या सायंकाळी
रमणीय स्थळी
भ्रमर मी, तू कळी इवलीशी !

येई निशा सभोवार
दाटुनी येता तिमीर
बल्ब मी दारी, ट्यूब तू घराशी !

बा वाग्विलासा !!
काही लिहावे हि जिज्ञासा
तिथे कवी मी, तू कविता प्रियाशी !

दिसभर ना उसंत कि
अखेरीस या मंचकी
मदन मी अन तू रती उर्वशी !

सर्वत्र आपुली जोडी
नाते प्रीतीचे जोडी
मी असा अन तू तशी !!

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

8 Jan 2016 - 1:42 pm | कविता१९७८

फोटो सुरेख आहे

मनीषा's picture

8 Jan 2016 - 3:57 pm | मनीषा

ब्रश मी अन पेस्ट तू शुभ्रशी-

वा !
क्या बात है !

आणि " सका- सकाळी " हा एक नविनच शब्दं प्रयोग .. मस्तच .

धन्यवाद कविता ११८७, मनीषा ताई

सुमेध रानडे's picture

9 Jan 2016 - 8:05 pm | सुमेध रानडे

उत्तम!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2016 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, अशा टाईपची कविता वाट्सपवर वाचल्यासारखी वगैरे वाटली.

-दिलीप बिरुटे

मयुरMK's picture

10 Jan 2016 - 12:18 pm | मयुरMK

प्रस्तुत कविता माझ्या व अन्य दोन लेखकाच्या ''वाटेवरच्या कविता'' या पुस्तकामधील माझी कविता आहे

धन्यवाद

gsjendra's picture

14 Jan 2016 - 6:26 pm | gsjendra

मस्त