पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती जगत होती.
कावळा तिला शिवत होता
चार दिवसाची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.
स्त्री आज स्वतंत्र आहे
घरा बाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे
धंधा हि पाहत आहे.
मुलांना शिकवत आहे
स्वैपाक हि करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.
कावळा आज शिवत नाही
हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.
प्रतिक्रिया
4 Feb 2016 - 8:25 pm | एस
एक पुरुष म्हणून कुणी आपल्या परीने काय केले पाहिजे मग?
4 Feb 2016 - 8:40 pm | विवेकपटाईत
स्वैपाक करताना माझा फोटो बघा, उत्तर सापडेल. ...
5 Feb 2016 - 9:11 am | एक एकटा एकटाच
कविता पटली
5 Feb 2016 - 9:14 am | सुनील
बरं झालं! एकटेपणा संपला!!
5 Feb 2016 - 1:43 pm | अजया
=)))
5 Feb 2016 - 12:04 pm | पद्मावति
छान आहे कविता. आवडली.
5 Feb 2016 - 1:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
साला कावळा पण डेम्बिस असतो पुरुषांना कधीच शिवत नाही आणि त्या बद्दल कुठल्या मिपा बाईने (किंवा गेलाबाजार मिपा पुरुषाने) कविता पाडल्याचे आठवत नाही. जळो असले उपेक्षीत जीवन.
रच्याकने:- पुण्यात तरी शनिवार रविवार हाटेलांमधे पाउल टाकायला जागा नसते ते कशाचे द्योतक असावे बरे? भिकाराताल भिकार हाटेलहि या दोन दिवसात आठवड्याभराचा धंदा करुन घेतं.
त्या दिवशी केव्हाही हाटेलात गेलं तरी एका टेबला मागे कमीत कमी १२ ते १५ जणं / जणी / जणे टेबलावर बसलेल्या चार जणांकडे "किती खातो / खाते / खातं ? आता उठ" अशा नजरेने पहात बसलेले दिसतात.
मी केवळा एक निरीक्षण नोंदवले आहे ह्याची कृपया वाचकांनॆ नोंद घ्यावी.
बाकी फोटोच म्हणाल तर मी देखिल मंगळावर जाउन आलो होतो.
हा घ्या पुरावा....
हे चित्र आम्ही अंजा वरुन साभार उचललेले आहे.
पैजारबुवा,
5 Feb 2016 - 2:33 pm | सूड
तर काय!!
शाळेतल्या मुलामुलींच्या ग्रुपवर एका कन्यकेने एअरटेलच्या अॅडची खिल्ली उडवणारा 'ये दुनिया गोल नही, मा**** है' अशी इमेज टाकली होती. आणि बाकीच्या पोरी 'अय्या कित्ती छान!!' टाईप कमेंट्स देत होत्या. आम्ही काही बोललो नाही. पण हेच एखाद्या मुलाने टाकलं असतं तर? 'आईवरुन शिव्या देतो? काय हे!!', 'चारचौघात शिव्या देतो?' असे मेसेजेस आले असते.
6 Feb 2016 - 2:52 pm | माहितगार
पैजारबुवा, तुमी घाऊकपणे कावळ्यांना 'डेम्बिस' हा अपशब्द वापरल्यामुळे या धाग्यावर आपणास दंडाची नोटीस आलेली आहे ती आवर्जून वाचावी !
5 Feb 2016 - 2:08 pm | नंदन
एक काल्पनिक संवाद -
जेलरः काय, कसा काय नवीन जॉब?
अनेक वर्षांपूर्वी शिक्षा पूर्ण करून सुटलेला कैदी: बरा आहे. फक्त दिवसभर क्युबिकलच्या खुराड्यात कॉम्प्युटरसमोर बसून असतो; त्याचा कधीतरी कंटाळा येतो.
जेलरः बघितलं!! इथे असताना दिवसातून निदान अर्धा तास तरी पटांगणात, मोकळ्या आकाशाखाली श्वास घ्यायची फुरसत होती. आता भोगा आपल्या कर्माची फळं.
(* शीर्षक - मराठी, हिंदी/पंजाबी किंवा नाम/विशेषण; ज्या अर्थाने घ्याल ते!)
5 Feb 2016 - 7:02 pm | यशोधरा
=))
6 Feb 2016 - 1:05 pm | पैसा
काही मैत्रिणींच्या आई आजीला त्या चार दिवसात गडीनोकरांसारखी कठीण कामे करावी लागत असे ऐकले आहे. सुटी कसली!
7 Feb 2016 - 4:34 am | यशोधरा
हो, ऐकले आहे मी हे आज्जीकडूनच. धुणी धुवायचे आणि भांडी घासायचे काम येत असे अंगावर आणि मग कोणीतरी ते वरुन आणि पाणी घालून घेणार शुद्ध करायला!! :|