<हे वागणं बरं नव्हं>
अवं हे जग लई न्यारं, हितं खोट्याचंच वारं ह्याला खरं बोलनं सोसंना
ह्याचा दिखाव्याचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं सत्याची लेखणी पोचंना
हितं हुच्चपणाची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय् अळीमिळी
अन् डूख धरिती, डंख मारिती, घरात भोळी अन् भायेर कळी रं, रं, रं
अशा गावात तमाशा बरा, खोट्याचा खरा, पिचकारी भरा,
उडू दे रंग, उडू दे ढंग, उडू दे संग
दिखावू पडद्याच्या आत, अवसेची रात, घुबडे ती गात, होवू दे दंग
अगं चटकचांदणी, चतुर दामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन