< दोन पक्षी (एकाच वेळी) >
मिपावर मी सात वर्ष ११ महिन्यांपुर्वीच आलो आहे. तसे मिपाचे चिंतन आणि मनन खूप दिवसांपासून करत आहे. नव्या अवतारातील पुनरागमनात बरेचदा (पुन्हा) शाब्दिक चकमक झाली जिच्यामुळे हा लेख लिहिणे महत्वाचे वाटले.
प्रथम, मिपा काध्याकुट लिखाण याविषयीचा माझा समज म्हणजे निरर्थक ताणून धरलेले आणि आणि थापलेले किंवा अध्यात्म्,काव्य्,मनोरंजन्,साहित्य अनुभुती,इतीहास सारख्या जुनाट (कालबाह्य) संकल्पनांना मराठीतल्या तत्वज्ञान (जो माझाच प्रांत आहे) मिसळून नवरसात लेखन करणारे मिपाकवी आणि तत्सम मिपालेखक यांचा लेखन प्रपंच.