विडंबन

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 1:00 pm

पेर्णा
"याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.
नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता?
‘हॅलो…’
आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.

मांडणीइतिहासबालकथाविडंबनउखाणेप्रतिशब्दशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारसमाहितीप्रतिभाविरंगुळा

काहीच्या काही - मधु आणि मधुमाशी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 4:29 pm

मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते. कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.

विडंबनविरंगुळा

!!फ्लश!!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
5 Oct 2016 - 4:22 pm

पेर्ना..! =))

प्रत्येकाला सकाळी जायची घाई असते,
घुसायचीही मधे भलतीच तयारी असते,
जो मधे घुसला, तो धन्य होतो,
जो तसाच्च राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!

पण घुसणाय्राच्या मनी कुठलाही खेद नाही,
आज, उद्या, पर्वा, नेहमीच!, असा भेद नाही,
पोटात कळ आणि गच्चीत नळ असेल तर,
तिकडे पहाटे बसणेही अशक्य नाही !!

vidambanअनर्थशास्त्रआगोबाआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीरोमांचकारी.हास्यविडंबनमौजमजा

(हूं)

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 11:44 pm

आमची प्रेरणा

आशा मनात तुझी धुसर धुसर,
मागताना आवाज कातर कातर,
स्मरता जुन्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!

क्लायंट कायम करतो काशी,
म्हणतो पगार कसा छापाल छापाल
मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला
शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!!

डिजाइन टीमची असते बोंब
रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर,
क्यूएची आहे नसती कटकट मागे ,
बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!!

इशाराकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीभूछत्रीरतीबाच्या कविताहिरवाईहास्यविडंबन

[[पण होत नाही ना!]]

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
18 Sep 2016 - 10:21 pm

प्रेरणा

पण होत नाही ना!

आपण जावं,
अंगणात जरा सुखानं पाणी भरुन घ्यावं
फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकत,
मऊशार गवतावर बसून राहावं,
डोळे मिटून.

पण होत नाही ना!

आधी कसं,
जमिनीतच सगळं अदृश्य व्हायचं
कुठेतरी एखाद्या कोंब यायचा
पण तोवर माजलेलं तण
आपणच नकळत काढून टाकावं

तरीही होत नाही ना!

आपण नुसतं बसावं,
करण्यासारखं आहे काय?
शिंपडू थोडा ओलावा
तेवढीच मनाला शांतता

च्यामारी आज होत का नाही?

विडंबन

एक रात्र मिठीतली.

आनन्दा's picture
आनन्दा in जे न देखे रवी...
14 Sep 2016 - 11:28 pm

खरेतर अश्या रोमँटिक कवितेचे विडंबन करावयास कीबोर्ड कचरत होता, पण शेवटी धीर करून टंकलो.. निनाव सर क्षमा करा.. प्रेर्णास्थान

आलो आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझिया आज पहा रे
आवरे वेग मज न अधिक आता
एकदाचा मज पडू दे ना रे...

निजले जग, निजले तारे
अंतर असे हे मिटले सारे
मिठीत तुझिया मी अवतरता
सागरासही उधाण आले

किती बरसलो मला कळेना
तरी मिठीतुन बांध फुटेना
मी तर सारा बरसून गेलो
तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे

विडंबन

मणाचा एकान्त

सुरवंट's picture
सुरवंट in जे न देखे रवी...
13 Sep 2016 - 9:08 pm

censor ने बंदी घातलेला
तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला
निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला
कुठलातरी तमीळ चित्रपट
पाहतोचकी आपण
एकही 'सीन' नसलेला
कधी pause, play, fast forward
तर कधी zoom, backward, resume करत

दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?

सांत्वनाविडंबन

हे बुद्धिच्या ईशा

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
6 Sep 2016 - 6:00 pm

कानही बधीर आणि सहवेदनाही
नवसाचा बोगस क्लेम
मोदकांच अपचन
मंत्रजागराची तीनपत्ती
आणि मिरवणूकीत सैराटच्या गाण्यांवर
बेधुंद नाचणारा समाज पाहून
विकट हसलो तुझ्या दैवत्वावर
की माझ्या या बांधवांच्या उन्मादावर
समजेनासे झालंय हल्ली सार
हे बुद्धीच्या ईशा ,तुझ्या असण्यात
तरीही हवहवस वाटत काही
उत्सवातली शांतता असेल
उज्वल भविष्याची नांदी
हे उमजेल तो दीन उगवू दे

विडंबन

प्रेमकविता...विडंबन.

चिनार's picture
चिनार in जे न देखे रवी...
6 Sep 2016 - 5:35 pm

एका मित्राचे नुकतेच लग्न ठरले आहे. सध्या प्रेमरसात न्हाऊन निघत असल्यामुळे ट ला ट जुळवून रोज तो एक प्रेमकविता करतो. मला कवितेतलं खूप काही कळतं असा त्याचा समाज असल्यामुळे तो आधी मला पाठवतो मग तिला..आज सकाळी त्याने पाठवलेल्या कवितेचे विडंबन करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही..

मित्राची कविता..

भिडत होती नजर मोहक ती...
माझ्या नजरेस जेंव्हा जेंव्हा...
उमटत होते प्रतिबिंब तूझे ते...
या ह्रुदया मधे तेंव्हा तेंव्हा...

विडंबन