(कातरवेळी)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
2 Jan 2008 - 4:43 pm

आमची प्रेरणा मृण्मयीताईंची सुरेख कविता कातरवेळी

येती स्वप्नी तव बाबा कधीतरी कातरवेळी
जुन्या आठवांनी उठती कळा उरी कातरवेळी

नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी
घरीच जाऊ नसे माझा पतीघरी कातरवेळी

नकोस तू पव्वा काढू माझ्यापुढे सायंकाळी
थरारते देहामधली नशाचरी कातरवेळी

कधी कटीशी लोंबे ती, कधी दिसे छातीपाशी
तुमान ही असते परी खुंटीवरी कातरवेळी

असे उंबऱ्याचे कुंपण, करात या हिरव्या बेड्या
तरी बोंबलत ही दिसते वेशिवरी कातरवेळी

कळे तुझ्या नसण्यामधली अवीट मज गोडी तेव्हा
छळे तुझे असणे जेव्हा परोपरी कातरवेळी

सभोवताल हे गंधाळे, तुझ्या नुसत्या येण्याने
(पडो जरा "केश्या" पाणी देहावरी कातरवेळी...)

विडंबन

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

2 Jan 2008 - 5:08 pm | धोंडोपंत

हा हा हा हा हा ,

वा वा केशवसुमार,

लई मजा आली. झकास विडंबन.

नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी
घरीच जाऊ नसे माझा पतीघरी कातरवेळी

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा . सही. लाजवाब.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

2 Jan 2008 - 5:43 pm | इनोबा म्हणे

सही ...काय विडंबन आहे...वाह! :)

विसोबा खेचर's picture

2 Jan 2008 - 6:32 pm | विसोबा खेचर

मस्त रे केशवा...

आपला,
(केशवसुमाराचा फ्यॅन) तात्या.