<हे वागणं बरं नव्हं>

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
6 Apr 2016 - 4:37 pm

अवं हे जग लई न्यारं, हितं खोट्याचंच वारं ह्याला खरं बोलनं सोसंना
ह्याचा दिखाव्याचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं सत्याची लेखणी पोचंना
हितं हुच्चपणाची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी
अन्‌ डूख धरिती, डंख मारिती, घरात भोळी अन्‌ भायेर कळी रं, रं, रं

अशा गावात तमाशा बरा, खोट्याचा खरा, पिचकारी भरा,
उडू दे रंग, उडू दे ढंग, उडू दे संग
दिखावू पडद्याच्या आत, अवसेची रात, घुबडे ती गात, होवू दे दंग

अगं चटकचांदणी, चतुर दामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन

टोकदार लेखणी मी कोपर्‍यात उभी, जशी म्यानी तलवार छुपी
अवं पंतोबा, चारचौघांत होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं

काटेरी रान हे भवतीनं, चालत आले मी जपून
चकव्यातून या चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं नरसाळ्या, असं काय करतोयस खुळ्या, हे वागणं बरं नव्हं

हिसका दावते जोराचा, तिरपा डोळा चोराचा
परत्येक शब्दाला आडिवतो, अंगावं चिखल उडिवतो
अरं पतंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं

पाहून जनांची खेळीमेळी, जळजळ जीवाची कशी झाली
काड्या घालूनि करतो खुणा, घडीघडीला खोडसाळपणा
अरं मर्दा, अब्रुचा होईल खुर्दा, हे वागणं बरं नव्हं

अकलेचा तोरा मी करते रं, डोस्क्यात ऐवज भरते रं
हात माझा तू धरतोस कसा, अवतीभवतीनं फिरतोस कसा
अरं बत्ताशा, आता रं पळतोस कशा, हे वागणं बरं नव्हं

प्रेरणा: हे गाव लई न्यारं (पिंजरा)

अनर्थशास्त्रइशाराविडंबन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Apr 2016 - 4:50 pm | यशोधरा

ते वागनं असं हाय, णं नाय! ;)

मीटर गंडलंय, बाकी चान चान!!

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 4:59 pm | टवाळ कार्टा

=))

विजय पुरोहित's picture

6 Apr 2016 - 5:00 pm | विजय पुरोहित

अबबबबबब नीमो.... दिवसेंदिवस विडंबन साम्राज्ञी पदाकडे वाटचाल

विजय पुरोहित's picture

6 Apr 2016 - 5:01 pm | विजय पुरोहित

बाकी भन्नाट आहे हे नमूद करतो.

श्रीरंग_जोशी's picture

6 Apr 2016 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो.

तरी पूर्वीच्या विडंबनांपुढे हे जरा सौम्य वाटले ;-) .

नूतन सावंत's picture

6 Apr 2016 - 7:33 pm | नूतन सावंत

Prayatn aawdala.

नीलमोहर's picture

6 Apr 2016 - 8:44 pm | नीलमोहर

प्रेरणा: हे गाव लई न्यारं (पिंजरा)
कंस मामा ही राहिले टाकायचे.

रातराणी's picture

6 Apr 2016 - 10:21 pm | रातराणी

_/\_

एस's picture

6 Apr 2016 - 10:28 pm | एस

ह्ये वागनं बरं नव्हं.

जव्हेरगंज's picture

6 Apr 2016 - 10:35 pm | जव्हेरगंज

वाइच जरा तर्री टाकायची हुती थुडीशी..!
आज कालवण सपाक लागतय..!

तर्राट जोकर's picture

6 Apr 2016 - 11:38 pm | तर्राट जोकर

घुसमट घुसमट म्हणतात ती हीच.
नीलमोहर ह्यांचं पहिलं (शेवटंच ठरो) फसलेलं विडंबन.

नाखु's picture

7 Apr 2016 - 8:13 am | नाखु

आणि आमचा उल्लेख आवडला....

तेंडुलकरकडून नेहमीच शतकाची अपेक्षा धरू नै.धुमशान ४०-५० धावाही पुरेश्या होतात... सामना फिरवायला

स्पा's picture

7 Apr 2016 - 8:18 am | स्पा

नेहमीप्रमाणेच टुकार

जेपी's picture

7 Apr 2016 - 8:31 am | जेपी

गुर्जी मोड-
अरे या पांडुSSSला धरा रे !!!=))
-
मोड ऑफ