पोपट
अथांग विश्वात चमचमणाऱ्या चांदण्या तशा असंख्य आहेत. निर्वात पोकळीत एक गोल गोळा भिंगत असेल. गडद ढगांतुन आत शिरल्यावर निळेशार पाणी आणि हिरवीगार झाडं दिसतील. वेगवेगळे देश, दगडधोंडे आणि डोंगररांगा ईकडेतिकडे पसरलेले असतील. नीट निरखुन बघितल्यास आमचं कुरसुंडी हे गाव पण दिसंल. याच गावात आमचं घर आहे. आतल्या खाटेवर मी बसलेला असेन. पण तुम्ही माझ्याकडं बघू नका. हाताकडं बघा. तिथं एक मच्छर बसलेला असेल. फट्याक..!! मारला मी त्याला. बघा आहे की नाय गंमत!