परीकथेचे सव्वा वर्ष .. (facebook status)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
19 Jul 2015 - 12:37 pm

साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी मिपावर माझ्या मुलीच्या (परीच्या) जन्माची कहाणी लिहिली होती. तेव्हा येणार्‍या काळात तिच्या छोट्यामोठ्या आठवणी लिहून काढायच्या असे मनाशी ठरवले होते. पण हल्ली आठवणींची साठवण फोटो आणि विडीओमध्येच सोयीस्कर पडत असल्याने अगदी तसेच काही झाले नाही. पण फेसबूक स्टेटसच्या निमित्ताने मात्र काही आठवणी कागदावर उतरल्या. काल सहज त्या पहिल्यापासून वाचतानाही गेल्या वर्षभराच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि म्हणूनच त्या संकलित करून ब्लॉगवर ठेवायचे ठरवले. बस्स त्याच ईथेही अपडेटतोय :)

............................................................

२० मार्च २०१४

आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीच्या बघताक्षणी प्रेमात पडलो......... एका मुलीचा बाप झालो.
काल शिवजयंतीच्या मुहुर्तावर राणी लक्ष्मीबाई घरात आली.
BLESSED WITH BABY GIRL ...नाचो .....

.
.

८ एप्रिल २०१४

परी सारख्या मुलीचे `परी' हेच नाव ..
My Little Angel is named "Pari" :)

.
.

१५ जुलै २०१४

कन्फर्मड्..!!
माझी मुलगी माझ्यावरच गेलीय..
फोटो काढायची अॅक्शन करत, मोबाईल तिच्यासमोर धरायचा अवकाश ..
रडायचे थांबून हसायला सुरुवात :)

.
.

१९ जुलै २०१४

चार दिन की झिंदगी, चार महिने गुजर गये, तेरे बिना.... जिया जाये ना ..
हॅपी बड्डे फोर मन्थस बेबी परी ..
कम सून :)

.
.

२१ जुलै २०१४

लंगोट आणि कानटोपी ..
दोघांतील फरक कसा ओळखायचा याचाही आता क्लास लावावा लागणार ..
कठीण आहे !

.
.

२ ऑगस्ट २०१४

एक चांगली बातमी ! एक वाईट बातमी !!
आधी चांगली बातमी - उद्या परी येणार घरी :)
आता वाईट बातमी - बरोबर बायको सुद्धा येणार :(
Bachelor Life Over :(
पण बालपण सुरू :)

.
.

३ ऑगस्ट २०१४

पाच वर्षांपूर्वी फ्रेंडशिप डे च्या दिवशीच माझी माझ्या बायकोशी ऑर्कुटवर ओळख झाली होती.
आज "फ्रेंडशिप डे" च्या दिवशीच मुलीला पहिल्यांदा घरी नेतोय.
बापलेकीच्या नात्याची सुरुवात करायला यापेक्षा चांगला मुहुर्त असू शकतो का :)
हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ माय फ्रेंडस !!

.
.

४ ऑगस्ट २०१४

पंधरा मिनिटांची खटपट करुन आज लंगोट बांधायला शिकलो...
फक्त दहा मिनिटे टिकला !
मेहनतीवर पाणी पडने म्हणजे काय माहित होते,
आज सुसू पडणे अनुभवले ;)

.
.

८ ऑगस्ट २०१४

हतबल .. हताश .. हात टेकले !
आजवर मी कित्येकांना चिडवून चिडवून छळले,
आज माझी मुलगी मला छळून छळून चिडवतेय .. :(

.
.

१० ऑगस्ट २०१४

चार वर्षांपूर्वी गणपतीच्या मिरवणूकीत शेवटचे नाचलेलो,
ते आज पोरीबरोबर नाचलो.
स्टॅमिना पार गंडलाय राव,
तिच्या आधी मी दमलो.
माकडाचा माणूस व्हायला उत्क्रांतीची हजारो वर्षे जावी लागली.
लेकीने मात्र एका दिवसात माणसाचा माकड केला..
तो देखील चावीवाला :)

.
.

१० ऑगस्ट २०१४

(हे स्टेट्स परीच्या आईचे)

दरवाजे की घंटी ४-५ बार बजाने वाले,
आज कल दबे पाव आने लगे
ऊंची आवाज मे बातें करनेवाले,
अब ईशारोंमे बतियाने लगे
खुदके काम दुसरोंसे करवाने वाले,
अब चुपचाप अपने काम करने लगे
घोडे बेच के सोने वाले,
अब हलकी आंहट पर जागने लगे
घंटो लॅपटॉप मे डूबे,
आजकल उसकी शकल तक देखना भूल गये
तेरी एक हंसी के लिये,
आज ये क्या क्या करने लगे..
माय डीअर परी,
ये तूने क्या किया???
मेरे Lazybone Husband को,
एक Responsible Father बना दिया..
Love U pari :)
- अस्मिता नाईक

.
.

२६ नोव्हेंबर २०१५

माझी मुलगी माझ्या सिक्स पॅकच्या प्रेमात पडलीय,
हल्ली रोजच माझ्या अंगावर कार्यक्रम उरकते आणि मला बनियान काढायला लावते. :)

.
.

७ डिसेंबर २०१५

असे म्हणतात, देव आपले संकटांपासून रक्षण करतो..
पण हल्ली बिचार्‍या देवांवरच माझ्या पोरीपासून स्वत:चे रक्षण करायची वेळ आलीय..
देव्हारा वरती न्यायची वेळ झालीय :)

.
.

३१ जानेवारी २०१५

"जादूची चटई" आजवर केवळ परीकथांमध्येच वाचले होते.
पण हल्ली परीने माझीच जादूची चटई बनवलीय.
तिला उचलून घ्यायचे.. आणि मग ती जिथे बोट करेल, तिथे मुकाट जायचे :)

.
.

१८ मे २०१५

चुकून नाव परी ठेवले..
शैतान जास्त सूट झाले असते.. :)

.
.

३१ मे २०१५

जगातली सारी खेळणी एकीकडे आणि आईबापाचा ड्रॉवर उपसण्यातील आनंद एकीकडे...
आधी पाकिटाची जागा बदलावी लागली, मग घड्याळ हलवावे लागले, काल पट्टाही तिथे ठेवायची सोय राहिली नाही.. आता ते ड्रॉवर माझे फक्त नावालाच राहिले आहे. अगदी त्यात बसून खेळते..
सव्वा वर्ष पुर्ण व्हायच्या आतच बापाच्या प्रॉपर्टीवर कब्जा करायला सुरुवात.. स्मार्ट जनरेशन :)

.
.

६ जून २०१५

परी मागच्या जन्मात बहुतेक चिमणी असावी.
काऊ आणि कब्बू'चे कमालीचे आकर्षण.

राणीच्या बागेत पिंजर्यातील रंगीबेरंगी पक्षी, पंख फडफडवत बिचारे आमच्या एका नजरेसाठी आस लाऊन राहतात,
पण आम्ही मात्र खुल्या फांदीवरच्या कावळ्यांनाच भाव देतो.

समुद्राच्या लाटा हिंदकाळत राहतात, वारा बेभान बागडत सुटतो, क्षितिजावरचा सूर्य लाल तांबड्या रंगांची नुसती उधळण करत असतो, अगदी काव्यमय संध्याकाळ असते.
पण आम्ही तिथेही आकाशातले कावळेच टिपत असतो.

गेले कित्येक वर्षे डॉकयार्ड रेल्वेस्टेशन वरून प्रवास करतोय. पण आजवर कधी माझ्या नजरेस पडले नव्हते. परीने मात्र आज पहिल्याच फटक्यात छ्तावरच्या लोखंडी सांगाड्याच्या बेचकीत लपलेले काऊकब्बू हुडकून काढले, आणि माझ्याबरोबरच प्लॅटफॉर्मवरच्या ईतरही काही अज्ञानी लोकांच्या ज्ञानात भर टाकली ज्यांची नजर रेल्वे ईंडिकेटरच्या वर कधी गेलीच नव्हती :)

.
.

१३ जुन २०१५

मॉडेल, डान्सर, जिम्नॅस्ट, आणि आता मिमिक्री आर्टिस्ट..
परीच्या करीअरची चिंता नाही, काही ना काहीतरी करेलच पोरगी

.
.

२१ जून २०१५

मुलीला खेळवणारे शेजारीपाजारी, दादा मामा, काका आजोबा, मित्र सवंगडी बरेच असतात..
पण तिने सू सू केल्यावर जो लंगोट बदलतो, तो बाप असतो. :)
HapPy FatheRs Day 2 all :)

.
.

१ जुलै २०१५

आजवर कधी घरी आल्यावर माझ्या बायकोने मला साधे पाणी विचारले नाही, पण परी मात्र आल्या आल्या माझ्या पायातले बूट काढायला धावते. बूटांना हात नको लाऊस म्हटल्यावर शू रॅकचा दरवाजा उघडून मला बूट ठेवायला मदत करते. सेवा ईथेच संपत नाही.
त्यानंतर माझे बोट पकडून माझे कपडे बदलायला मला बेडरूमकडे नेते. तिथून आमचा मोर्चा बाथरूमकडे वळतो. मी बाहेर येईपर्यंत माझी वाट बघत दारातच उभी राहते. मला आत उशीर होतोय असे वाटल्यास बाहेरून दरवाज्यावर थडाथड लाथाबुक्के बसतात. कारण....
कारण त्यानंतर तिला माझ्याबरोबर "चहा बिस्किट" खायचे असते..
तो मॉरल ऑफ द स्टोरी.., पोरगी शेवटी आईवरच गेलीय :)

.
.

७ जुलै २०१५

दोघींचा जन्म जणू काही मला छळायलाच झालाय..
पण आयुष्यात जे काही मनोरंजन आहे ते दोघींमुळेच आहे..
मला लुटणे हा दोघी आपला जन्मसिद्ध हक्क समजतात..
पण सोबत आनंदही अनमोल देऊन जातात..
माझ्याकडून आपले लाड करून घेणे, हट्ट पुरवणे..
कारण नसताना उगाचच चिडणे, उगाचच रडणे..
सरते शेवटी मीच हात जोडून त्यांची समजूत काढणे..
कधी कधी वाटते मला दोन बायका आहेत..
तर कधी वाटते, दोन पोरींना सांभाळतोय..

.
.

१२ जुलै २०१५

शनिवार-रविवारची आंघोळ म्हणजे आमच्यासाठी तासाभराची वनडे पिकनिक असते.
बाथटब म्हणजे स्विमिंग पूल.. शॉवर म्हणजे वॉटरफॉल.. आणि बापाच्या अंगाखांद्यावर बागडणे या झाल्या स्लाईडस..
अगदी पिकनिकला काढतात तसे या सर्वांचे फोटोही घेतले जातात,
फक्त ते ईथे प्रदर्शित करू शकत नाही ईतकेच :)
बरे, पाण्याची आवड तरी किती..
मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तो सुद्धा जेवढा तडफडत नसेल तेवढा दंगा आमची जलपरी घालते.
या आधी सुट्टीच्या दिवशी कुठे कामानिमित्त बाहेर जायचे असेल, तर आणि तरच आंघोळ करणारा मी..
अन्यथा आंघोळीलाही सुट्टी देत बिछान्यातच लोळत पडणारा मी..
आणि स्साला त्यातच सुख सुख म्हणजे आणखी काय असते असे म्हणनारा मी..
पण हल्ली माझी देखील सुखाची व्याख्या बदलू लागलीय..
हल्ली मी देखील सुट्टीच्या आंघोळीची वाट बघू लागलोय.

.
.

१४ जुलै २०१५

Quiz Time -
पहिल्याच चेंडूवर विकेट काढणारी भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण?
....
ऊत्तर - परी अ नाईक.
विकेट - आपल्याच बापाची.
अनपेक्षित वेगाने येणार्‍या पहिल्याच चेंडूवर अंदाज पार फसला आणि मी क्लीन बोल्ड!
सारे स्टेडियम तिच्या आईच्या शिट्ट्या आणि टाळ्यांनी दणाणून उठले :)

.
.

१५ जुलै २०१५

लोकांची एबीसीडी शिकण्याची सुरुवात " A for Apple " पासून होते.
आमची " i for ice cream " पासून झाली. :)

.
.

१६ जुलै २०१५

आम्ही लहान आहोत म्हणून आमचे सर्वांकडून लाड होतात, की आमचा हावरटपणा आमच्या चेहर्यावर दिसून येतो, काही कल्पना नाही.
पण आम्ही मिठाईवाल्याकडे गेलो की न मागता आम्हाला एक पेढा मिळतो.
आम्ही तो संपवतो आणि आणखी एक मागतो. आम्हाला आणखी एक मिळतो.
मेडीकलवाल्याकडे गेलो की चॉकलेट मिळते, मॅकडोनाल्डवाला आईसक्रीम देतो.
हारवाला देखील काही नाही तर एक फूल हातात चिपकवतो.
आम्ही ते देखील तोंडात घालतो.
परवा नाक्यावर सहजच उभे असताना जवळच्या अंडेवाल्याने उकडलेले अंडे ऑफर केले.. आणि मला हसावे की रडावे समजेनासे झाले .. :)

.
.

१७ जुलै २०१५

जंगलचा राजा सिंह असेल, पण आमच्यासाठी मात्र तो वाघ आहे.
कारण आमची लायनपरी फक्त तोंडातल्या तोंडात गुरगुरते,
आणि टायगरपरी मात्र सिंघम स्टाईलमध्ये पंजा दाखवत, तोंडाचा आ करून डरकाळी फोडते.

.
.

१८ जुलै २०१५

डेलीसोप मालिका कितीही रटाळ का असेनात, जोपर्यंत त्यांचे टायटल सॉंग हिट आहेत आणि परी त्यावर नाचतेय तोपर्यंत आमच्याघरी त्यांचे स्वागतच आहे.
सध्याची टॉप 3 लिस्ट आहे -
१. दिल दोस्ती दुनियादारी
२. जय मल्हार
३. होणार सून मी या घरची :)

...........................
- तुमचा अभिषेक

बालकथालेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2015 - 1:02 pm | टवाळ कार्टा

मस्तयं :)

खेडूत's picture

19 Jul 2015 - 1:14 pm | खेडूत

:)

परीला खूप शुभेच्छा !

एस's picture

19 Jul 2015 - 1:18 pm | एस

:-)

नाव आडनाव's picture

19 Jul 2015 - 1:36 pm | नाव आडनाव

भारी :)

उगा काहितरीच's picture

19 Jul 2015 - 2:28 pm | उगा काहितरीच

वा क्या बात है . मिपावर सध्याच्या जड जड लेखामधे हवच होत एखादं हलकफुलक काहीतरी !

पद्मावति's picture

19 Jul 2015 - 2:38 pm | पद्मावति

मस्तं वाटलं वाचून, एकदम फ्रेश.

मधुरा देशपांडे's picture

19 Jul 2015 - 2:47 pm | मधुरा देशपांडे

:)

कवितानागेश's picture

19 Jul 2015 - 3:19 pm | कवितानागेश

किती गोड!
बाकी सेम पिंच फॉर कावळे.... आमच्याकडे पण काउ सगळ्यात लाडका आहे.

भाते's picture

19 Jul 2015 - 3:39 pm | भाते

एखाद्या चित्रपटाचे कथानक हळुवारपणे उलगडत जावे तसं काहीसं वाचताना वाटलं.

सविता००१'s picture

19 Jul 2015 - 4:06 pm | सविता००१

मस्त. फेबु. वर पहातच असते. इथे तिचे काही फोटो टाक की. मस्त आहेत

तुमचा अभिषेक's picture

19 Jul 2015 - 9:01 pm | तुमचा अभिषेक

हा हा, हो फोटो तर तिचे मस्तच असतात, पण ईथे टाकायची परवानगी तिची आई देणे कठीण आहे. आधीच फेसबूकवर मी तिचे भरमसाठ फोटो टाकतो अशी ओरड आहे. :)

सविता००१'s picture

20 Jul 2015 - 7:51 am | सविता००१

आधीच फेसबूकवर मी तिचे भरमसाठ फोटो टाकतो अशी ओरड आहे. :)
हे खरय. :)

अजया's picture

19 Jul 2015 - 4:48 pm | अजया

मस्त आहे परीकथा!

सानिकास्वप्निल's picture

19 Jul 2015 - 4:48 pm | सानिकास्वप्निल

खूप गोड लिहिले आहे :)
छान वाटलं वाचून.

सुबक ठेंगणी's picture

19 Jul 2015 - 5:05 pm | सुबक ठेंगणी

खूप गोड आहे...परीचं जादूई जग आणि तिच्या बाबाचं त्या जगात गुरफटून जाणं दोन्ही :)

खटपट्या's picture

19 Jul 2015 - 5:09 pm | खटपट्या

चांगलंय !!

सुधांशुनूलकर's picture

19 Jul 2015 - 6:24 pm | सुधांशुनूलकर

मस्तच लिहिलंय.
आमच्या लेकीच्या लहानपणीच्या आठवणी अगदी सहज जाग्या झाल्या. मुलीचा बाप होणं खूपच छान असतं.. स्वानुभव.

फेसबुक स्टेटस अपडेट्सच्या फॉर्ममध्ये लिहायची कल्पनाही मस्तच.

पैसा's picture

19 Jul 2015 - 6:42 pm | पैसा

तुम्हाला तिघांनाही खूप शुभेच्छा! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!!

राही's picture

19 Jul 2015 - 7:53 pm | राही

हा तर नुसता ट्रेलर.
पण मस्त. हळुवार आणि निरागसपणे टिपलाय सगळा निरागसपणा.
परीबरोबर 'पेरे'न्ट्सचीही वाढ होतेय म्हणायची.
आपल्या नकळत वाढणे ही मज्जा असते. सुखच सुख.

कानडाऊ योगेशु's picture

19 Jul 2015 - 8:25 pm | कानडाऊ योगेशु

कल्पना व त्याची अंमलबजावणी दोन्हीही सुरेखच!
अभिनंदन आणि शुभेच्छा!

तुमचा अभिषेक's picture

19 Jul 2015 - 8:57 pm | तुमचा अभिषेक

सर्व प्रतिसाद :)

विवेकपटाईत's picture

19 Jul 2015 - 9:30 pm | विवेकपटाईत

वाचता वाचता २७ वर्ष मागे गेलो, आमच्या परीने ही असाच आनंद आम्हाला पण दिला होता. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. वेळ हातात येत नाही, उडून जाते.

श्रीरंग_जोशी's picture

19 Jul 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी

नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहिलेले हे प्रकटन आवडले. फारच गोड आहे तुमची परी.

मलाही लहान मुलांचा खूप लळा असतो. गेल्या दीड वर्षांपासून माझ्य दीड वर्षांच्या भाचीबरोबर (इरा तिचे नाव) थोडेबहुत असेच अनुभव आहेत. ती दोन तीन आठवड्यांची असतानापासून बेबी बलुगा हे गाणे मी गाऊन दाखवत असे अन फोनवरून त्या गाण्याचा व्हिडिओ दाखवत असे. अजुनही गातो पण आत ती एका ठिकाणी थांबत नाही. तिला नेहमी घराबाहेर अंगणात खेळायचे असते.

तिच्या भोवताली मी असलो की ती मी सोडून इतर कुणाकडेच जात नाही कारण तिला कधीही न रागावणारा एकच माणूस आहे तो म्हणजे मी :-) .

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2015 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे

धमाल आहे ! :)

जुइ's picture

20 Jul 2015 - 5:28 am | जुइ

आवडले!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jul 2015 - 7:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

:) मस्तं!!

नाखु's picture

20 Jul 2015 - 9:26 am | नाखु

जग आहे त्यापेक्षा सुंदर आणि निरागस आहे याचा साक्षात्कार कन्या-आगमनानंतर झाला
लेकीच बापुस
नाखु

शब्दवेडी's picture

20 Jul 2015 - 10:37 am | शब्दवेडी

तुमची परीकथा वाचून आता मी पण माझ्या Superman बाबांबद्दल लिहावं असं वाटतंय :)

तुमचा अभिषेक's picture

21 Jul 2015 - 2:12 am | तुमचा अभिषेक

ज्या क्षणाला वाटेल त्याच क्षणाला लिहून काढा.. तो गेला तर तेवढीच उत्कटता लिखाणात उतरेल याची शाश्वती नसते..

वेल्लाभट's picture

20 Jul 2015 - 10:57 am | वेल्लाभट

काही काही खूपच गोड आहेत !
हा अनुभव शब्दात मांडता येणारा नसूनही इतक्या सुरेख प्रकारे तुम्ही तो व्यक्त करताय त्याबद्दल तुमचं कौतुक !
क्या बात है....

रिलेट करू शकलो. अप्रतिम.

आता संकलन करा आणि एखाद्या साजेशा फॉर्मॅट मधे जपा. कधीतरी भेट म्हणून देता येईल परी ला

मित्रहो's picture

20 Jul 2015 - 11:13 am | मित्रहो

व्वा क्या बात है

मस्त

अब तू डायपर बदलना सिख गया.
.....

बाकी फेसबुकच्या स्टेट्स माध्यमातून ही भावना अशी सुरेख व्यक्त करता येते हे आज तुमच्यामुळे कळले.
खूप सुंदर

तुषार काळभोर's picture

20 Jul 2015 - 11:14 am | तुषार काळभोर

माझं आयुष्य पण तुमच्याशी समांतर चाललंय भौतेक. याच टाईमलैनवर असंच सगळं अनुभवतोय.
(आमचं पोरगं दर मिनिटाला पिलीयन रायडरतैंच्या लेखाची आठवण करून देतं.)

-(गुंड पोराचा अभिमानी बाप) पैलवान

अद्द्या's picture

20 Jul 2015 - 11:14 am | अद्द्या

हि हि हि

फेसबुक वर बघत असतोच .

भारी गोड आहे पोर :)

ब़जरबट्टू's picture

20 Jul 2015 - 11:28 am | ब़जरबट्टू

मस्त...

भिंगरी's picture

20 Jul 2015 - 11:28 am | भिंगरी

मस्तच लिहिलय!
बाकी काऊ आणि कबू आमच्या पालवीचेही लाडके सवंगडी आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2015 - 12:18 pm | विशाल कुलकर्णी

झकास्स रे ...

बन्डु's picture

21 Jul 2015 - 1:24 am | बन्डु

"कधी कधी वाटते मला दोन बायका आहेत..
तर कधी वाटते, दोन पोरींना सांभाळतोय.."

प्यारे१'s picture

21 Jul 2015 - 1:59 am | प्यारे१

ख़ास लिहिलंय! जपून ठेव लिखाण. पुढंमागं मराठी वाचेल आणि कवतुक करेल कधीतरी बापाचं.... खरंच छान.

तुमचा अभिषेक's picture

21 Jul 2015 - 2:08 am | तुमचा अभिषेक

हा माझ्या अगदी मनातला प्रतिसाद ..
माझ्या मुलीने हे तितक्याच आवडीने आणि कौतुकाने हे वाचावे जितक्या मी लिहिलेय अशीच एक ईच्छा. नाहीतर एक खंत कायमच राहील.

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2015 - 9:52 am | टवाळ कार्टा

अग्दी अग्दी

मोहनराव's picture

21 Jul 2015 - 1:54 pm | मोहनराव

सध्या हे सगळं स्वतः अनुभवतोय... मजा आली वाचताना... सगळं सेम टु सेम माझ्या मुलीसोबत रिलेट होतंय...

प्रसाद गोडबोले's picture

21 Jul 2015 - 2:06 pm | प्रसाद गोडबोले

आमच्याकडे विक्रम वेताळ कथेचे दीड वर्ष चालु आहे =))

बोबो's picture

21 Jul 2015 - 10:20 pm | बोबो

:) :)

बॅटमॅन's picture

21 Jul 2015 - 3:08 pm | बॅटमॅन

क्या बात है. मस्तं!

नरेंद्र गोळे's picture

21 Jul 2015 - 10:06 pm | नरेंद्र गोळे

अभिषेक तुमच्या परीकरता ही सुरेख लोरी ....

http://anuvad-ranjan.blogspot.in/2015/05/blog-post_16.html#links

तुमचा अभिषेक's picture

21 Jul 2015 - 10:46 pm | तुमचा अभिषेक

:) धन्यवाद ..
परी नावाच्या बरेच फायद्यांपैकी हा एक.. परी हे नाव असलेली बरीच गाणी कविता रेडीमेड मिळतात :)

रातराणी's picture

21 Jul 2015 - 11:24 pm | रातराणी

गोड आहे : )

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2015 - 3:43 pm | बोका-ए-आझम

मुलीचा बाप होऊन सर्व मुलांच्या बापांना जळवल्याचा तीव्र णिशेध!

बाळ सप्रे's picture

22 Jul 2015 - 3:57 pm | बाळ सप्रे

मस्त ! इंटरेस्टींग आहे टाईमलाइन !!
४ ऑगस्टचा स्टेटस मस्तच :-)

आदिजोशी's picture

22 Jul 2015 - 3:58 pm | आदिजोशी

मस्त प्रवास उलगडलायस. असंच लिहित रहा पुढेही.

माधुरी विनायक's picture

22 Jul 2015 - 4:02 pm | माधुरी विनायक

अजिबात काल्पनिक नसलेली खरीखुरी परीकथा खूपच आवडली...

सुधीर's picture

22 Jul 2015 - 4:14 pm | सुधीर

मस्तच रे! व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉगची लिंक पाठविलीस तेव्हा वाचलं होतं.

शब्दबम्बाळ's picture

22 Jul 2015 - 7:38 pm | शब्दबम्बाळ

अरे वा! खूपच छान!! :))

खूपच गोड , सुंदर आणि निरागस आहे परीकथा . वाचताना हुबेहूब समोर येत सगळ वर्णन .सुंदर लिहलं.

खूपच गोड , सुंदर आणि निरागस आहे परीकथा . वाचताना हुबेहूब समोर येत सगळ वर्णन .सुंदर लिहलं.

मी-सौरभ's picture

23 Jul 2015 - 7:28 pm | मी-सौरभ

हलका फुलका, चेहर्‍यावर कळत नकळत हसू आणणारा सुरेख संग्रह आहे हा आठवणींचा.
परीला खुप खुप आशिर्वाद..

भटकंती अनलिमिटेड's picture

29 Oct 2015 - 2:33 pm | भटकंती अनलिमिटेड

पेपर आणून देऊन बाबा ‘नाच’.
खेळण्यांकडे हात करुन बाबा ‘नागोबा’... "व" उच्चारता येत नाही ना.