शांतरस

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
15 Apr 2016 - 7:30 pm

तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!

रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा?
जा निघून हलक्या पायाने....

तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू.....

-शिवकन्या

अदभूतकविता माझीभावकवितासांत्वनाकरुणशांतरसवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोलदेशांतर

एकरूप

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
14 Apr 2016 - 11:51 am

घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे
पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे
साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले
निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले

घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला
ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला
किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग
भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग

घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा
गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा
उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात
ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात

शांतरसकविता

कुंजविहारी हसे का मनी -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
27 Mar 2016 - 12:25 am

कुंजविहारी हसे का मनी -
निद्राधीन ती राधा बघुनी

नयनी उतरे शाममुरारी
हळूच नकळत स्वप्न होऊनी

स्वप्नामधली राधा बावरी
गेली सगळे सत्य समजुनी

हसे खुदुखुदू झोपेमधुनी
खट्याळ कृष्णाची मोहिनी

देशी रे किती त्रास तू मजला
वदते राधा जात मोहुनी

मोरपीस मग अलगद गाली
कान्हा हसतो लबाड फिरवुनी

खोड्या वाढता म्हणते राधा
जा तू आता निघून येथुनी

स्वर राधेला गोड ऐकवी
मुरलीधर हळु पावा काढुनी

नयने उघडी राधा अपुली
मधुर सूर ते पडता कानी

आत्ता होता कुठे कन्हैया
शोधत हसते घरभर फिरुनी

शांतरसकविता

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
21 Mar 2016 - 7:47 am

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू

वाटही पाहून झाली काळ तो सरला किती
ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू

झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी
का कधी शंका न आली मारली मज थाप तू

प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही
जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू

जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे
मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू ..
.

प्रेम कविताभावकवितामराठी गझलमुक्त कविताशांतरसकविताप्रेमकाव्यमुक्तकगझल

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
21 Mar 2016 - 7:45 am

पहिल्या प्रेमी
गुंतत गेलो
सुटणे गुंता
विसरत गेलो

होती काळी
शेजारी ती
पण गोरा मी
मिरवत गेलो

येता जाता
हसतच होती
सुचता थापा
मारत गेलो

जुळले सूतहि
प्रेमहि जमले
प्रेमी तिचिया
डुंबत गेलो

गडबडलो मी
प्रेमात तरी
आनंदाला
उधळत गेलो ..

.

प्रेम कवितामुक्त कविताशांतरसकविता

नजरानजर अचानक

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
18 Mar 2016 - 7:58 pm

समजावले मनाला
माझ्या कितीतरी मी
हे पाहणे तुजकडे
नाही बरे रे नेहमी..

का ऐकते न मन हे
सांगीतले जरी मी
वळुनी पुन्हापुन्हा का
बघते तुलाच नेहमी..

गर्दी बघून तिकडे
रुसतो मनी इथे मी
एकांत पाहुनीया
हसतो खुषीत नेहमी..

नजरानजर अचानक
होतोच बावरा मी
त्रेधा उडे कशी मग
अवघड स्थितीत नेहमी..
.

शांतरसकविता

< अश्शी सासू असती तर >

अन्नू's picture
अन्नू in जे न देखे रवी...
9 Mar 2016 - 3:36 pm

अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात बायकोला,
असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अश्शी सासू असती तर

आळी सगळी गाजवली असती,
मिजास मोठी केली असती,
राजा बनून हिंडलो असतो
मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर
अश्शी सासू असती तर

घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो
आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो
मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर
अश्शी सासू असती तर

अभय-लेखनअविश्वसनीयइशारागणेश पावलेगरम पाण्याचे कुंडजिलबीभयानकहास्यशांतरसमुक्तकविडंबनप्रतिशब्दव्युत्पत्तीविनोदमौजमजास्थिरचित्र

फुलदाणी

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
9 Mar 2016 - 11:17 am

निशा आर्त ओली
रात गंधात रमली
चढे मोगर्‍याची वेली
चाफे खेळूनी आली
फुले पान्हवली
सांडे पारिजात अवेली
पहाट खुलली
फुलदाणी भरली

चित्रकारः लुडवीग नॉस ,चित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
flower basket

शांतरसमुक्तक

सुख

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
4 Mar 2016 - 3:00 pm

हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
     कळाले सापडल्यानंतर!

तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
     कळाले सापडल्यानंतर!

भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
     कळाले सापडल्यानंतर!

शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
     कळाले सापडल्यानंतर!

- संदीप चांदणे

कविता माझीमुक्त कविताशांतरसकलाकवितामुक्तकसाहित्यिक

आम्हाला इंग्लिश येतंय

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
23 Feb 2016 - 12:59 pm

ब्लॉग दुवा हा

मराठी, इंग्रजी, भाषेबद्दलचं प्रेम, इंग्रजीत वाटणारा उच्चभ्रूपणा, मराठी बोलण्यातला न्यूनगंड, हे आणि संबंधित सगळे विषय काही नवीन नव्हेत. पण कधी जुने होणारेही नव्हेत. मराठी भाषा सप्ताह सुरू आहे. २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस आहे; या निमित्ताने आज बहुतेक लोकांची मराठी बद्दलची भावना, आणि त्याबद्दल माझी भावना, काहीशी अशी आहे...

आम्हाला इंग्लिश येतंय

कशाला थयथय करतोस मित्रा
लक्ष कोण देतंय?
अरे आमचं भविष्य उज्ज्वल आहे
आम्हाला इंग्लिश येतंय

फ्री स्टाइलशांतरसकविताभाषा