"स्व"....
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ ....
कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ....
व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच.....
जगात काय तो एकटा शहाणा मीच !
एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान.....
आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !?
आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ?
का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ?
जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार.....
स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..!
सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे
माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे