जात नाहीं जात ती जात
जात नाहीं जात ती जात
विलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि.. असा होता..
तुषार हा एककुलता एक मुलगा,
मुलगा हुषार होता आय>टी ची पदवि घेतली होति व एक चांगल्या कंपनित कामाला होता..
"लग्न करायला हव आता तुषारचे" अश्या गप्पा परिवारात सुरु झाल्या.
मराठा समाजात हि जबाबदारी मामाची असते..
घोरपडे मामा वर हि जबाबदारी आली..
पण नियतिच्या मनात निराळेच होते..तुषार चे मन त्याच्या कंपनित काम करणा-या "नेहा जोशी" त आडकले होते व तिला हि हा उमदा तुषार आवडु लागला.