जात नाहीं जात ती जात
विलासराव भोसले व त्यांचा परिवार सुस्थितला होता..विलासराव महसुल खात्यात उच्च पदावर होते..परिवार फार पुरोगामी नाहि फार रुढिवादी नाहि.. असा होता..
तुषार हा एककुलता एक मुलगा,
मुलगा हुषार होता आय>टी ची पदवि घेतली होति व एक चांगल्या कंपनित कामाला होता..
"लग्न करायला हव आता तुषारचे" अश्या गप्पा परिवारात सुरु झाल्या.
मराठा समाजात हि जबाबदारी मामाची असते..
घोरपडे मामा वर हि जबाबदारी आली..
पण नियतिच्या मनात निराळेच होते..तुषार चे मन त्याच्या कंपनित काम करणा-या "नेहा जोशी" त आडकले होते व तिला हि हा उमदा तुषार आवडु लागला.
व एकदा नेहाला त्याने आपल्या घरी आणले
नेहा दिसायला सुंदर स्वभावने लाघवी उच्च शिक्षित व नोकरी करणारी होति..
तुषार जरी बोलला नाहि तरी अनुभवी आई बाबानी ओळखले कि पाणी मुरत आहे..
काहि दिवसातच तुषारने तिच्याशीच लग्न करण्याचा मनोदय घरात सांगितला.
तुषारच्या आई बाबाना नेहा पसंत होतिच..
जोशी /भोसले परिवराचि मिटिंग झाली..
मराठा समाजत प्रत्येक परिवारात एखादा वयस्कर आपासाहेब आण्णा साहेब असतो त्याने नात्यावर शिक्का मोर्तब केले कि कार्य पुढे सरकते..
त्या प्रमाणे भोसले म्हणाले कि गावाकडे आमचे काका आण्णा साहेब आहेत त्यांच्या कानावर घालतो ते हो म्हणाले कि पुढे जाऊ.बाकि आम्हाला हा रिश्ता मंजुर आहे.
मात्र घोरपडे मामाचा या लग्नाला विरोध होता.."आपल्या समाजात काय देखण्या व शिकलेल्या मुली नाहित का? मिश्र विवाह यशस्वि होत नाहित अशी त्याने उदाहरणे दिली"
मात्र तुषार "लग्न करिन तर नेहाशि च ह्यावर ठाम होता..
झाले २-४ दिवसात गावावरुन "आण्णा साहेब "आले. मिटिंग सुरु झाली
तुषार व परिवाराने अपली बाजु मांडली
घोरपडे मामा नि आपल्या शंका बोलुन दाखवल्या..
अण्णानी दोनहि बाजु ऐकल्या व म्हणाले.."मुलाने मुलगी पसंत केली आहे काय बोलणार? त्याच्या मनाचा विचार करायलाच हवा..्व मामा कडे वळत म्हणाले "राहिला जातिचा प्रष्ण नशिब समज ब्राह्मणाची घरातआणत आहे...मxहा xची आणली असति तर तोंड दाखवायला जागा राहिलि असति का? चला रिश्ता पक्का कामाला लागा...
"आण्णा हो म्हणाले ..विषय संपला"
विवाह संपन्न झाला
शुभ मंगल झाले
प्रतिक्रिया
7 Mar 2020 - 6:34 pm | चौकस२१२
यावरून "अग्निपंख " हे नाटक आठवले... आठवते ते असे
- गांधी हत्ये नंतर चा महाराष्ट्रतील काळ..
- सांगली चे पटवर्धन किंवा भोर चे संस्थानिक अश्यांवर साधारण बेतलेले असावे.. संस्थानिक ब्राहमण.. काळाच्या मानाने उदारमतवादी,, त्यांचा मित्र स्थानिक पुढारी ( बहुतेक उच्च कुळी मराठा ) .. त्याकाळात जे काही गावात चालू झाले त्यात हा पुढारी पुढे.. पण आपल्याच मित्रा वर कसा हल्ला करायचाच हा मनी प्रश्न... तेव्हाच त्याचा मुलगा एका दलित मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्या लग्नाला हा संस्थानिक पाठिंबा देतो..आणि निभावून नेतो ... शेवट मात्र संस्थनिक आणि त्याची बायको जळणाऱ्या वाड्यात उभे .. वाडा पेटलाय चहुबाजूने आणि हे गायत्री मंत्र म्हणत प्रसंगाला सामोरे जात आहेत ( श्रीराम लागू आणि सुहास जोशी )
थोडक्यात काय जातीभेद करण्याची चूक फक्त एका जातीकडून केली जातीय असे नाहीये..( सकळ सारखी माध्यमे आणि त्यांचे धनी सतत जी गरळ ओकत असतात/ काड्या घालत असतात त्यावरून वाटेल) . सर्व जातीतच असे नव्हे तर हिंदूइतर धर्मात पण हे होत आहे..
असे नसते तर २०२० साली सुद्धा ,मुसलमानांच्यात जाती नसत्या, कुरेशी आणि बागवान यांना रोटी बेटी वयवहार करायला प्रश्न पडला नसता, ख्रिस्ती ब्राह्माण किंवा मराठा ख्रिस्ती वर / वधु अश्या जाहिराती आल्या नसत्या .. इस्राएल मध्ये काळे जु आणि गोरे जु यांच्यात भांडण नसती !
असो नाजूक विषय आहे ...हे होणे चांगले नाही आणि ते लोप पहिलेच पाहिजे .. ते लोप पावे पर्यंत सर्वांनी समतोल राखावा हीच इच्छा
23 Jan 2021 - 8:25 pm | सनईचौघडा
चला ज्याचे शेवट गोड ते सर्व गोड!