काळ आला होता पण वेळ नाही...
रवींद्र दत्तात्रय तेलंग
रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली...
ती सीमेंट फॅक्ट्री होती... मी स्टीम इंजीनमधे फायरमेन होतो...आमचे इंजीन ड्रायव्हर रेल्वे मधून सेवानिवृत्त झालेले ड्रायव्हर होते...
फॅक्ट्री ते एक्सचेंज यार्ड...तेरा किलोमीटरचं सेक्शन होतं....