निशाण
तू मला हसायला शिकवलंस
कधी धड रडलोही नव्हतो त्या आधी मी
तू मला उभं राहायला शिकवलंस
कधी धड पडलोही नव्हतो त्या आधी मी
आठवांचा पूर येतो कधी
या एव्हढ्याशा दोन डोळ्यात माझ्या
कधी वाटते लोटली युगे आता
कधी वाटतात त्याच आठवणी ताज्या
तुझा हात सुटला तो क्षण
कोरला आहे मनावर लेण्यातील शिलालेखासारखा
त्याचीही पडझड होईल कधीतरी
याच आशेवर जगतोय आता मी चातकासारखा
मिटून जातील मग निशाण सारे
तू तर नाहीसच आता इथे, मी ही नसेन तेव्हा
काय होईल याची आता क्षिती कशाला
काळ आपल्या फटकार्याने सारे मिटेन हे जेव्हा