दसरा - एक छोटीशी कथा
कर्णपुर्याची यात्रा तशी छान वाटली. आज दसर्याच्या दिवशी गर्दीला ऊत आला होता. चार मित्रांसोबत यात्रेत फिरन्याची मजा काही ओरच. लाल निळ्या पिवळ्या ट्युबच्या उजेडाने तो परिसर जनु इंदधनुष्याचा प्रकाश पडावा असे वाटत होते. पारदर्शक मोरपिसतुन पडनार्या प्रकाशा प्रामने यात्रा वाटली, भरपुर गोश्टींचा आनंद लुटला. मंदिरात देवीचं दर्शन घेतल आणि बाहेर पडण्यसाठी मार्ग शोधला. तिथेच एक आजी आजच सोनं विकत होत्या. पाहुन नवल वाटलं. औरंगाबाद सारख्या शहरातही आजकाल आपट्याची पानं विकली जावित याचच काय ते नवल!! आता औरंगाबादही ईतर शहरांसोबत मोजलं जानार याचं दुख:ही झालं.