'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला,
पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला,
गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या
दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा
कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं
डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!
प्रतिक्रिया
4 Aug 2016 - 4:26 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुमचा जोडीदार असलेला रातपाळीचा वॉचमन तुमच्या संगट बोलत नाही का?
त्याच्या नादाला नका लागू त्या पेक्षा तुम्ही रेडिओ मिर्ची वर लव गुरु ऐकत जावा लै मस्त टाइमपास होतो.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 4:30 pm | किसन शिंदे
खिक्क! थेट बॉलरच्या डोक्यावरूनच षटकार =)) =))
5 Aug 2016 - 4:49 pm | अभ्या..
पैजारबुवांनाच खरोखर लवगुरु म्हणून एफेमला बसवायला पैजे.
हाय कुणाची टाप प्रश्न इचारायची? रेडीओसिटीवाले थोड्या दिवसात नाव बदलतील शो चे. "मैने प्यार क्यु किया"
5 Aug 2016 - 4:43 pm | Bhagyashri sati...
मग काय आम्ही कविता लिहायचं सोडून द्यायच का, त्यापेक्षा तुमीच असल्या कमेंट देण्या ऐवजी, रेडिओ ऐकेल बरं:(
5 Aug 2016 - 4:45 pm | कुणाल धस
कडक
6 Aug 2016 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
असल्या कॉमेंट आल्या म्हणुन तुम्ही कविता लिहिणे सोडू नका. त्या ऐवजी अशी कॉमेंट का आली या बद्दल विचार करा आणि जे सुचेल जसे सुचेल तसे लिहीतच रहा..... लिहिणे थांबवू नका.
पण ते प्रसिध्द करण्या पूर्वी परत एकदा त्रयस्थ पणे वाचत जा. हळूहळू तुमच्या लिखाणात सुधारणा होत जाईल आणि मग असलया कॉमेंट येणे आपोआप बंद होईल.
आणि अजून एका कारणासाठी कविता लिहीणे थांबवू नका. तुम्ही कविता लिहिल्या नाही तर आमच्या सारख्या विदूषकांना कच्चा माल कोण पुरवणार?
पैजारबुवा,
5 Aug 2016 - 5:07 pm | नीलमोहर
कवींचं दु:ख कुण्णी कुण्णी समजून घेत नाहीत इथे हेच खरं,
ते पैजारबुवा स्वतः मोठे लेखक, कवी आहेत, इतरांना किस झाड की पत्ती समजतात आणि असा हिरमोड करतात.
करावं तरी काय नवकवींनी, एवढं मोठं आभाळभर दु:ख घेऊन जावं तरी कुठे ?
तुम्ही लिहा हो, लक्ष देऊ नका, तसे बरेत सगळे.
6 Aug 2016 - 12:34 pm | नाखु
एका विदीर्ण करणार्या वाक्याबद्दल मूळ कवयत्रीचे,प्रोत्साहकांचे (पैजाबुवा) आणि सांत्वनकार नीमोतैंचे शतशः धन्य्वाद...
तरी मी विचार करीत होतो गेले आठ दिवस पाऊस का बदबदा कोसळतोय महाराष्ट्रात !!!!
त्याचं कनेक्शन इथं आहे तर....
पुभाप्र,पुलेशु,पुभालटा
वाचकांचीच पत्रे नाखु
5 Aug 2016 - 7:30 pm | जव्हेरगंज
ऐ लै भारी!
आवडलं आपल्याला!
पुकप्र.
5 Aug 2016 - 11:11 pm | रातराणी
चांगला प्रयत्न.
6 Aug 2016 - 6:27 pm | Bhagyashri sati...
धन्यवाद....ज्यांना माझी कविता आवडली.