"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?
आपल्या पुर्वेचा देश मयन्मारमधून बर्याच मोठ्या कालखंडानंतर तिथे लोकशाही सरकारची स्थापना झाल्याची बातमी आली. त्या सरकारमध्ये अजूनही मयन्मारी लष्कराचा (भारताच्या दृष्टीने, चीनला अप्रत्यक्षपणे भारता विरुद्धा काड्या चालू ठेवण्याची सोयीचा) सहभाग असणार आहे. मयन्मारमध्ये लोकशाही आली म्हणजे लगेच भारताचे मयन्मार सोबतचे संबंध सुधारतील का उर्वरीत आशियान देशांशी दळणवळण व्यापार सुलभ होण्यास काही मदत होईल का हे काळच सांगेल. पण तो आपल्या या धागा लेखाचा विषय नाही. धागा लेखाचा विषय आहे "थिबॉ मीन" या मयन्मारच्या (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट. याचा इतिहास का बरे उकलून पहावा ?