"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 5:46 pm

आपल्या पुर्वेचा देश मयन्मारमधून बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर तिथे लोकशाही सरकारची स्थापना झाल्याची बातमी आली. त्या सरकारमध्ये अजूनही मयन्मारी लष्कराचा (भारताच्या दृष्टीने, चीनला अप्रत्यक्षपणे भारता विरुद्धा काड्या चालू ठेवण्याची सोयीचा) सहभाग असणार आहे. मयन्मारमध्ये लोकशाही आली म्हणजे लगेच भारताचे मयन्मार सोबतचे संबंध सुधारतील का उर्वरीत आशियान देशांशी दळणवळण व्यापार सुलभ होण्यास काही मदत होईल का हे काळच सांगेल. पण तो आपल्या या धागा लेखाचा विषय नाही. धागा लेखाचा विषय आहे "थिबॉ मीन" या मयन्मारच्या (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट. याचा इतिहास का बरे उकलून पहावा ?

सम्राट थिबॉ इ.स.१८८० छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
thibaw

ब्रिटीशांनी भारतीय उपमहाद्वीप आणि ब्रह्मदेशात त्यांचा साम्राज्य विस्तार केला तेव्हा त्यापुर्वी भारतात पश्चिम आणि उत्तरेकडून येणार्‍या आक्रमकांच्या आणि ब्रिटीशांच्या राजनितीत जे काही फरक जाणवतात त्यात एक म्हणजे बर्‍याचदा युद्धे जिंकूनही विवीध बादशहा ते पेशवे यांना तातडीने मारणे अथवा नुसतेच देशोधडीस लावण्यापेक्षा त्यांना त्यांच्या नेहमीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर नेऊन ठेवणे त्यांना त्यांच्या हयातीत उत्तम तनखा बडदास्त ठेवणे. -हाच कित्ता तापदायक ठरणार्‍या कंटकांना तडीपारीत आजही अल्पसा वापरला जातो- म्हणजे जसे की पुण्याच्या पेशव्यांना उत्तर प्रदेशात रहाणे भाग पाडले, अवधच्या सुलतानाला कलकत्यात नेऊन ठेवले, दिल्लीच्या बादशहाला ब्रह्मदेशात नेउन ठेवले तर ब्रह्मदेशच्या शेवटच्या सम्राटाला चक्क महाराष्ट्रातील रत्नागिरीत आणून ठेवले. ब्रह्मदेशचा शेवटचा सम्राट आमच्याच रत्नागिरित चक्क १९ डिसेंबर १९१६ पर्यंत होता आणि त्याची आम्हाला किती माहिती असते ? एका सम्राटाचे अखेरचे आयुष्य रत्नागिरीत गेले म्हणून त्यात अभ्यासण्यासारखे काही नाही. पण काहीही झाले तरीही एक सम्राट, त्याचे कुटूंब तुमच्या आमच्यात राहून गेले कदाचित त्याचे रक्ताचे नातेवाईक आजही कोकणात कुठेशीक भेटून जातील आणि तुम्हाला कळणारपण नाही.

सम्राट थिबॉसाठी ब्रिटीशांनी रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधून दिलेला राजमहाल
thibaw ratnagiri palace

मग ब्रह्मदेशच्या शेवटच्या राजघराण्याचा शेवट का वाचावा ? दुसर्‍या बाजीराव पेशव्याचे अथवा दिल्लीच्या शेवटच्या बादशहाचा शेवटचा विजनवासातला काळ कसा गेला हे किती डॉक्युमेंट होऊ शकले ते माहित नाही पण सरते शेवटी एखाद्या सत्ताधिशाचे आयुष्य कसे जाऊ शकते याचा वेधक आढावा आपल्याला सुधा शहा यांच्या THE KING IN EXILE मधे मिळतो. त्याही पेक्षा मह्त्वाचे जागा आणि काळ बदलला तसे बदलण्यातले अपयश. 'थि बॉ' पदच्युत झालातरी एक सम्राट आहे, ब्रिटीशांनी हात आखडता घेतला तरीही त्यांच्या कडून मिळणार्‍या पैक्या अडक्यातून थोडा-फार पैसा रत्नागिरीतल्या गरजुंमध्ये वाटतोही आहे तरीही रत्नागिरीतल्या लोकांना तो कितपत स्मरणीय ठरू शकला ? तो स्मरणिय का ठरू शकला नाही याचे उत्तर, सुधा शहा यांच्या पुस्तकात मिळते ते म्हणजे तो स्थानिक जनतेत कधीच मनमोकळेपणाने मिसळलेला आढळत नाही कधी मनमोकळेपणाने ब्रिटीशांनी दिलेल्या महालाबाहेर तो अथवा त्याचे कुटूंब बाहेर पडलेले आढळत नाही. किंवा बौद्धधर्मीय आहे म्हणून भारतातील बौद्धधर्मीयांमध्ये मिसळतो आहे बौद्धधर्मीय स्थळांची यात्राकरून येतो आहे असेही किमान सुधा शहांच्या पुस्तकावरून तसेही दिसत नाही.

याला कदाचित एक कारण आहे थिबॉ स्वतःला उच्च रक्ताचा समजतो, -बौद्धधर्मीय आहे उच्चनीचता असावयास नको पण मयन्मारी राजघराणे ती तशी कडवे पणाने पाळत असावे याचा सर्व दोष बौद्ध धर्माकडे जाईल का हे सांगणे कठीण कारण या बर्मी सम्राटांच्या राज-अभिषेकासाठी ब्राह्मण पुरोहीत राजाश्रयास असत, पण एंड ऑफ द डे बौद्ध धर्माचे कडवे अनुसरण सुद्धा आहे- स्वतःला एवढा उच्च रक्ताचा समजतो की त्याला त्याच्या मुलींसाठी सुयोग्य मयन्मारी वरच उपलब्ध होत नाहीत !- राजकन्यांचा विवाह करावा की करू नये म्हणून भारतातले आणि ब्रह्मदेशातले ब्रिटीश अधिकारी टेंशन मध्ये आहेत कारण राजकन्या आणि तिच्या नवर्‍याचे राजकीय वजन निर्माण झाले तर त्यांच्या सत्तेला नको ते आव्हान, स्वतः सम्राटाला मात्र राजकन्यांच्या विवाहाची चिंता नाही कारण शुद्ध रक्ताबाहेर - सुयोग्य मयन्मारी वर का उपलब्ध होत नाही ? कारण त्यांचे राजघराणेच फक्त शुद्ध रक्ताचे आहे (स्वतः सम्राटानेही बहीणींशीच विवाह केले आहेत) बर मग मयन्मार मधून राजघराण्यातील 'वर' आणणे शक्य आहे का ? तर तेही त्याला शक्य नाही का बरे तर राजघराण्यातील उर्वरीत राजकुमारांचा आधीच वंश विच्छेद झाला आहे . आता हा वंश विच्छेद कुणी केला ब्रिटीशांनी केला का ? ब्रिटीशांनी नाही केलेला ;थि बॉ' सम्राट याने स्वतःच आपल्या राजबांधवांचा वंश विच्छेद करवला अथवा त्याच्या सासूने आपलीच मुलगी सम्राज्ञी रहावी म्हणून वंश विच्छेद करवला. बौद्धधर्मीय राजघराणे अत्यंत धार्मिक सम्राट 'थि बॉ' आणि सत्तेसाठी स्व कुटूंबीयांचाच वंश विच्छेद ? हा विरोधाभास कोणत्या तत्वज्ञानात बसला ते देव जाणे. पण आपण आपल्या मनावर लादलेली मिथके रि-व्हि़जीट करण्यासाठी सुधा शहांचे गूगल बुक्सवर उपलब्ध पुस्तक जरूर वाचावे.

अलिकडे मिपावर स्त्री जिवनाच्या काही कंगोर्‍यांविषयी चर्चा चालू होती. स्वतःच्या मॉडेस्टीसाठी स्वतःचे अवयव कपड्यांखूअ अधिक लेयर्स मध्ये करकचून आवळून घेणारी राणी, राजकन्यांना बागेत खेळण्यास मनाई करत अत्यंत कडक शिक्षा करणारी राणी आणि स्वतःच्याच मोठ्या बहिणींवर पहारा देणारी लहान बहीण. एवढ्या सगळ्या पहार्‍यातून इतर कुणी उपलब्ध न झाल्यामुळे राजमहालाच्या गेटकिपरशीच संंबंध ठेवणारी राजकन्या आणि तीला होणारी संततीप्राप्ती म्हणजे शुद्ध रक्तासाठी एकीकडे इतर बर्मी मुलेपण चालत नाहीत तर इथे आपल्याच गेटकिपर करवी राजकन्येस झालेली संतती सांभाळण्याची वेळ येणारी सम्राज्ञी संतती साभाळायची पण त्या संततीला आणि जावयाला तो जसा काही आहे तोही स्विकारायचे नाही कारण आपण शुद्ध रक्ताचे. (या संतती पासून वाढलेला वंश तुम्हाला कोकणात अजूनही भेटू शकतो अलिकडे मयन्मारी वरीष्ठांच्या भेटीत त्यांनी या वंशजांची भेट घेतली अशी बातमी होती अर्थात त्या सम्राटाला ते वंशज नको होते आणि ते वंशजांनी सर्व अर्थाने सर्वसामान्य कोकणातले सर्वसामान्यांचे जिवन स्विकारले आहे.

सम्राट थि बॉच्या राण्या (सावत्र बहिणी)
queens

मी सुधा शहांचे हे पुस्तक वाचून बरेच दिवस झाले आहेत प्रत्येक पानावरचे संदर्भ नमुद करत लेखन करण्यास वेळ झाला असता तर बरे झाले असते पण ते जमले नाही. शिवाय किमान अजून एखादे पुस्तक दुजोर्‍यांसाठी वाचलेले असावयास हवे होते पण तेही शक्य झाले नाही त्यामुळे तथ्यांच्या अचुकतेचा कोणताही दावा करत नाही काही दुसरी माझी माहिती बदलणारे संदर्भ आले तर मी मनमोकळेपणाने स्विकारेन. थि बॉ चे राजघराणे आणि पुस्तक जिज्ञासुंसाठी एकटाकी वाचनाच्यादृष्टीने अभ्यासण्याच्या दृष्टीने उत्तम आहे. हे नक्की.

*** ***
* रत्नागिरी थिबा पॅलेसची अलिकडील स्थिती बद्द्ल दिनेश ५७ यांचा लेख

धर्ममत

प्रतिक्रिया

मोगा's picture

11 Feb 2016 - 10:23 pm | मोगा

छान

पैसा's picture

11 Feb 2016 - 11:00 pm | पैसा

ऊर्मिला पवार यांचे आत्मचरित्र आयदान अतिशय वाचनीय पुस्तक. त्यांचे लहानपण रत्नागिरीत गेले. टुटु सावंतची मुलगी त्यांची मैत्रीण. त्या सबंध कुटुंबाबद्दल आयदान मधे विस्ताराने लिहिले आहे.

लेख, त्यातील विश्लेषण अतिशय आवडले.

माहितगार's picture

11 Feb 2016 - 11:54 pm | माहितगार

रोचक, आयदान मधल्या उल्लेखाबद्द्ल माहित नव्हते. बूकगंगा डॉटकॉमवर शोधले. टूटूच्या मुलांबद्दल माहिती दिसते आहे.

यशोधरा's picture

12 Feb 2016 - 1:57 am | यशोधरा

लेख आवडला. पुस्तक मिळवून वाचेन, धन्यवाद!

हा असला मागासपणा संपायलाच हवा होता... जगात कुठेही का असेना...
पण हि शुद्ध रक्ताची हौस त्याकाळी स्वाभावीक म्हणावी अशी होती. वाईट याचं वाटतं कि या बंदीस्त चौकटी अनेक चांगल्या गोष्टी देखील काळाच्या उदरात गडप करतात.

हि शुद्ध रक्ताची हौस त्याकाळी स्वाभावीक म्हणावी अशी होती

अहो पारशी लोकांमधे अजुन पण ही हौस आहे असे म्हणतात

बाजीराव 2 यांच्या विषयी कुठे माहीती मिळेल.

जव्हेरगंज's picture

12 Feb 2016 - 1:08 pm | जव्हेरगंज

मस्त माहिती!!

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2019 - 6:11 pm | चौथा कोनाडा

लेख वाचायला सुरुवात केली आहे, खुप रोचक आहे.

कंजूस's picture

24 Sep 2019 - 6:03 am | कंजूस

आपल्याकडे आवडत्या आणि रुचणाऱ्या इतिहासावरच लिहिण्या बोलण्याची चाल आता आहेच ना? मग त्या काळातल्या अशा वागणाऱ्या लोकांचाच द्वेष का होतो? इजिप्तमध्ये काय झाले साडेतीन चार हजार वर्षांपूर्वी?

माहितगार's picture

24 Sep 2019 - 2:00 pm | माहितगार

अद्याप प्रतिसादाचा काँटेक्स्ट समजला नाही -खासकरून कोणत्या नेमक्या द्वेषाची चर्चा प्रतिसादात आहे ते दुसरे इजिप्त बद्दलही विस्कटून सांगितल्यास समजून घेण्यास आवडेल.

परवा असेच नेपाळच्या राजघरण्याच्या हत्याकांडावर आधारित पुस्तक वाचले होते.

माझा जन्म लोकशाहीत झाला आणी लोकशाहीचा मी समर्थकही आहे तरीही एखाद्या राजघरण्याच्या दुर्दैवाविषयी शेवटा विषयी वाचताना मनाला फार वाईटच वाटते.

माहितगार's picture

24 Sep 2019 - 1:56 pm | माहितगार

सहमत आहे

उपेक्षित's picture

24 Sep 2019 - 9:10 pm | उपेक्षित

अरर हा लेख कसा काय मिसला काय माहित. बरीच नवीन माहिती कळली तुमच्यामुळे.