---------------द्वं--द्व---------------
संध्याकाळी ऑफिसवरुन सिटीत मित्रांकडे बाईक वरुन जात असेन. यूनिवरसिटी चौकातल्या जगातल्या सर्वात मोठ्या सिग्नलला गाडी बंद करून उगाच हिकडं तिकडं बघत असेन. तेवढयात एक काळं-शेंबडं पोरगं कडेवर घेतलेली -त्या पोरापेक्षा थोड़िशीच मोठी पोरगी , स्वत् अन कडेवरच्या त्या पोराला कशीबशी सावरत 'कितीही कललं तरी ते बारकं पडणार नाही' या कॉंफीडन्सनं समोर चालत येईल. क्षणार्धात डोळ्यात अतिशय करूण अन हतबल भाव आणून , मारून-मारून शिकवलंय तितकं बारकं तोंड करून खाडकन 'आशेने' आपला तळहात पुढे करेल.