कोकणातली फुलं.
“फूलं माणसाचं व्यक्तित्व उत्साहित करतात,शिवाय जीवनात आनंद आणतात.म्हणूच मला फुलांविषयी विशेष वाटतं.”---अरूण
अरूणला फुलांविषयी विशेष वाटतं हे मला माहित होतं.त्यादिवशी असाच फुलांवरून विषय निघाला. त्याला मी म्हणालो तुला फुलं आणि फुलांचे प्रकार पहायचे असतील तर ह्या वेळी तू माझ्या बरोबर कोकणात ये.अरूणने कोकण कधीच पाहिलं नव्हतं.मुंबईला जन्माला आला आणि मोठा झाला.
“आमची -सिकेपी लोकांची-वसाहत फारफारतर ठाण्यापर्यंत पसरली आहे.एकवीरा आमची देवी. माणिकप्रभू आमचे गुरू.कोकणातून येणारे आंबे आणि फळफळावळ जी मुंबईत येते त्यावरून आमचा कोकणाशी संबंध येतो.”
अरूण मला म्हणाला.