घोरणारा आत्मा.........
घोरणारा आत्मा.........
घोरणारा आत्मा.........
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.
सर्वांन्न दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या मुहुर्तावर आमचा पहिलावहीला लेख.कृपया चुकलं माकलं सांगा.
एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच! ;-)
बाला
मध्यान्न समयी
तळपत्या उन्हात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!
काय कारण
त्यागूनी सदन
खिजवूनी भास्करा
चालली तोऱ्यात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!
एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.
उदाहरणार्थ दातांच्या.
जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं.
तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.
बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता .
“ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला.
“तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले. “एखादा पोपट असावा , बाहेर येण्यासाठी पिंजरा खरवडत असेल."
मध्यमध्वनीलहरी ४२० कि.ह.
आम्ही मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत.
सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि तीन सेकंद झालेत.
आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा...
सकाळच्या सभेत सुरुवातीला ऐकू या ‘भक्तीवंदना’!
यात ज्याच्यात्याच्या मनाचे श्लोक सादर होतील!
त्यानंतर ‘मनाची शेती’ कार्यक्रमात,
‘मनातल्या गाजर गवताला आळा कसा घालावा?’
याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
दिवसभराच्या जगण्याच्या झेंगटाचा आढावा घेतला जाईल,
‘हवामनाचा अंदाज’ मध्ये!
विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणाऱ्या
ही काल्पनिक शस्त्रिय कथा नाही... बॅटमन, सुपरमॅन किंवा क्रिशची कथाही नाही...
वेस रॉस्सी (Yves Rossy) व व्हिन्सेंट रेफे (Vincent Reffet) या दोन अफाट माणसांनी जेटमॅन विंग्ज (Jetman wings) नावाचे उपकरण वापरून एमिरेट्स कंपनीच्या A380 या जगातील सर्वात मोठ्या अजस्त्र दुमजली व्यापारी विमानाच्या बाजूने, जमिनीपासून ४००० फुटांवरून उड्डाण करून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हे जगावेगळे अचाट साहस यशस्वीपणे करण्यामागे अनेक तंत्रज्ञांनी अत्यंत मेहनतीने केलेले किचकट व्यवस्थापन होते हे सांगायला नकोच.
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे.
दिपवाळीच्या सुट्ट्या लागल्या.
सकाळधरनं लय खेळलो .
किल्ला कराय अजून टाईम हाय .
दिप्या म्हनला लपाछपी खेळायची .
कसं म्हाईत नाय , पन दर खेपेला माज्यावच पैलं राज्य येतंय.
चला, धा - इस -तीस - चाळीस - पन्नास- साट- सत्तर --- रेडी का?
कोनच बोलंना !
लागलो हुडकाय … पार नाना सुताराच्या वखारीपस्नं परीट आळीपत्तर -कोनच घावंना !
गोठ्यात -गंजीत घुसून बगितलं. नानाची म्हातारी लई कावली.
आता मला भुका लागल्या.
लपा म्हनलं लेकांनो, म्या जातो जेवायलाच .
घरला जाऊन जेवलो, बचाकभर शेंगा घिउन निगलो .
काल दुपारी मी जेव्हा झाडाखाली बसलो होतो
एक शेंबड पोर गाढवाच्या शेपटाला डबडं बांधुन खेळत होतं
बिचारं गाढव कान हलवत नुसतचं ऊभं होतं
शेंबड पोर चड्डी वर खेचत डबड्याला काठीनं बडवत होतं
मी गाढवाकड बघत होतो, गाढव खाली बघत होतं
आणि ते शेबडं पोर डबड्याकड बघत होतं
कंटाळुन शेंबड्यानं डबड्यात पाणी वतलं
काठीच्या दोन धपक्यात डबडं एकाकी तुटलं
मग ते शेंबड पोर शेपटालाच बडवत बसलं
गाढव पण हळुहळु पुढे सरकत चाललं
जेव्हा एक फटका गाढवाच्या जिव्हारी बसला
तसा त्याचा एक पाय शेंबड्याच्या कपाळी गेला
शेंबड्याला दोन टाके पडले म्हणे...