जेव्हा माणूस आणि जगातले सर्वात मोठे विमान बरोबरीने उडतात...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
6 Nov 2015 - 3:30 pm

ही काल्पनिक शस्त्रिय कथा नाही... बॅटमन, सुपरमॅन किंवा क्रिशची कथाही नाही...

वेस रॉस्सी (Yves Rossy) व व्हिन्सेंट रेफे (Vincent Reffet) या दोन अफाट माणसांनी जेटमॅन विंग्ज (Jetman wings) नावाचे उपकरण वापरून एमिरेट्स कंपनीच्या A380 या जगातील सर्वात मोठ्या अजस्त्र दुमजली व्यापारी विमानाच्या बाजूने, जमिनीपासून ४००० फुटांवरून उड्डाण करून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.

हे जगावेगळे अचाट साहस यशस्वीपणे करण्यामागे अनेक तंत्रज्ञांनी अत्यंत मेहनतीने केलेले किचकट व्यवस्थापन होते हे सांगायला नकोच.

या साहसाबद्दल एमेरिट्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍याने काढलेले उद्गार रोचक आहेत...

"This display between man and machine celebrates the magic and beauty of flight, a feat which just over a hundred years ago would have seemed an impossible dream. It also showcases how far human vision and ambition has, and can continue to push aviation's boundaries,"
: Adel Al Redha, executive vice-president and chief operations officer

या साहसाचे चलत्चित्र...

.

तंत्रविज्ञानक्रीडामौजमजाबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

भुमन्यु's picture

6 Nov 2015 - 3:36 pm | भुमन्यु

रोमांचक... बघुन शहारे आले!! दाद त्यांच्या कामगिरिला

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2015 - 4:32 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ अगदी असेच म्हणतो

अरुण मनोहर's picture

6 Nov 2015 - 3:41 pm | अरुण मनोहर

अविश्वसनीय !

मला ही एक भानगड समजली नाही.

एखाद्या वेगाने एका दिशेने जाणार्‍या वस्तूच्या जवळ त्यापेक्षा कमी वस्तुमानाची वस्तू गेली की कमी वस्तुमानाची वस्तू त्याच दिशेला ओढली जाते. (याला बहुतेक स्लिपस्ट्रीम म्हणतात.) मोदकने आपल्या सायकलच्या लेखात याचा उल्लेख केला होता.

असं इथे का झालं नाही?

असाच प्रश्न मलाही पडलाय.

संदीप डांगे's picture

6 Nov 2015 - 4:24 pm | संदीप डांगे

सेम हीअर...

बोका-ए-आझम's picture

6 Nov 2015 - 6:04 pm | बोका-ए-आझम

पण कदाचित हे दोघं जण त्या विमानाच्या वेगापेक्षा जरा जास्त वेगाने गेले असतील म्हणून असं झालं नसेल.

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2015 - 2:28 pm | शब्दबम्बाळ

स्लिपस्ट्रीम, यालाच Draafting असेही म्हणतात.
हे खर तर गुरुत्वाकर्षण जसे काम करते तसे करत नाही. म्हणजे वस्तूला ओढून घेणे वगैरे.
जेव्हा एखादी वस्तू पाणी किंवा हवा अशा माध्यमातून प्रवास करत असते तेव्हा ती या माध्यमाला बाजूला सारून पुढे जात असते.
होडी पाण्यातून जाताना आपण बाजूला होणारा पाण्याचा प्रवाह पाहू शकतो.

आता तेवढा वस्तूचा आकार मोठा तेवढ जास्त पाणी किंवा हवा बाजूला सरली जाणार. यामुळे एक प्रवाह तयार होऊन त्या वस्तूच्या मागच्या भागात हवेचा विरोध खूप कमी होतो. म्हणजेच त्या वस्तूच्या पाठीमागे एखादी दुसरी वस्तू जात असेल तर तिला खूप कमी अवरोध होतो आणि ती वस्तू कमी बल जाउन जास्त गती प्राप्त करू शकते.

म्हणजे जर ट्रक सारखे मोठे वाहन चालले असेल आणि एखादी सायकल हि त्याच्या जवळपास असेल तर जेव्हा ती सायकल ट्रक ने निर्माण केलेल्या कमी अवरोधाच्या क्षेत्रात येते तेव्हा पूर्वी इतकेच बल लावूनही अचानक गती मध्ये मोठी वाढ होते. यामुळे "ओढल्यासारखी" अवस्था निर्माण होते.

पण शक्यतो जास्त वेगाने जाणार्या वाहनांना एरो डायनामिक पद्धतीने बनवले जाते कि जेणे करून त्यांना हवेचा अवरोध कमी व्हावा. याचमुळे या वाहनामुळे होणारा स्लिपस्ट्रीम कमी असतो.

या सिद्धांताचा वापर भविष्यातील ट्रक्स मध्ये केला जाऊ शकेल जे स्वयंचलित असतील. ते एकमेकांच्या जवळून प्रवास करू शकतील आणि हवेचा कमी अवरोध होऊन जवळपास ४०% पर्यंत इंधन बचत करू शकतील!! :)

सुमीत भातखंडे's picture

6 Nov 2015 - 3:49 pm | सुमीत भातखंडे

भारी

शिव कन्या's picture

6 Nov 2015 - 3:57 pm | शिव कन्या

वाह! रोमांचक!!

संदीप डांगे's picture

6 Nov 2015 - 4:23 pm | संदीप डांगे

दुबै २०२० ची याड.

मित्रहो's picture

6 Nov 2015 - 4:32 pm | मित्रहो

साहस आहे

उदय's picture

6 Nov 2015 - 7:02 pm | उदय

वेस रॉस्सी (Yves Rossy) हा जेटमॅन नावाने ओळखला जातो. हा आधी स्विस एअरलाईनमध्ये A320 चा पायलट होता. हवेत उडण्यासाठी त्याने बरीच वर्षे प्रयत्न केले. सुरुवात ग्लायडिंगपासून केली, मग स्वतःच पंख तयार केले आणि ते हळूहळू सुधारत नेले. सध्या तो कार्बन फायबरचे पंख आणि त्याला लावलेली ४ जेट इंजिन यांच्या सहाय्याने हवेत पक्षासारखा उडतो. पंख साधारणपणे दोन मीटर (~६.५ फूट) पसरलेले आहेत आणि जेट फ्युएलसकट वजन साधरणतः ५५ किलो (~१२० पौंड) होते. इतके वजन असल्याने हेलिकॉप्टरने वर जावे लागते आणि मग उड्डाण करता येते. जमिनीवर येताना पॅरॅशुट वापरावे लागते.

सध्यातरी ही अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचा प्रकार दिसतोय (म्हणजे फक्त एक्स्पर्टलाच शक्य आहे, सामान्य व्यक्तीला नाही) पण पुढेमागे या प्रकारात अधिक प्रगती नक्कीच होऊ शकेल, कदाचित प्रत्येकालाच असे उडता येईल.

अजून माहितीसाठी हा व्हिडिओ बघा.

आयला हे तर जंक्षानच काम झालं की वो. अता आयर्न मॅनसारखे उडणे एकदम शक्यतेच्या कोटीत आले.

आदूबाळ's picture

6 Nov 2015 - 7:28 pm | आदूबाळ

आणि क्विडिच खेळणं पण!

इंडीड! अता याचप्रमाणे एखादे नाझगुल बनवा राव कोणीतरी...लय मज्या येईल.

पियुशा's picture

6 Nov 2015 - 7:22 pm | पियुशा

माय गॉड!!!! साहसी शब्द कमी पड़तोय कौतुक कारायला

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 8:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो व्हिडीओ काल बघताना ते दोघं आता इंजिनात खेचले जातात का काय अशी भिती वाटत होती.

कविता१९७८'s picture

6 Nov 2015 - 10:40 pm | कविता१९७८

रोमांचक धाडस

पैसा's picture

7 Nov 2015 - 1:08 pm | पैसा

थरारक प्रयोग!

रातराणी's picture

7 Nov 2015 - 1:28 pm | रातराणी

सही!

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2015 - 2:22 pm | स्वाती दिनेश

एकदम थरारक प्रकार!
स्वाती

नाखु's picture

7 Nov 2015 - 2:41 pm | नाखु

थरारक चित्रफीत.

जाहीर स्वगत :जहाल हवाई प्रेमींना पुण्यातील वाहतूक समस्येवर उपाय सापडला !

अमेरिकन त्रिशंकू's picture

7 Nov 2015 - 5:53 pm | अमेरिकन त्रिशंकू

Yves = ईव्ह

एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 7:30 pm | एक एकटा एकटाच

अफाट आहे हे

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2015 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार

थरारक प्रकार असला तरी अत्यंत धोकादायक.

असे उडते प्रवासी रडारवर पकडले जाऊ शकतात का?

नाहितर कसाब जसा समुद्रातुन आला, तसा एखादा कसाब उडत उडत यायचा, आणि कदाचित परतही जाऊ शकेल

पैजारबुवा,

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 3:36 pm | संदीप डांगे

आतंकवादी प्रोसेस ओरीयंटेड नसून रीझल्ट ओरियंटेड असतात. त्यामुळे 'उडून येणे-परत जाणे' ह्या उद्देशासाठी एवढी रिस्क घेणार नाहीत. इतर सोपे मार्ग हजारो आहेत भारतात.