आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र
आरोग्यशास्त्रात सतत नवे शोध लागत असतात आणि त्यामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणार्या अनेक व्याधींवर नवनवीन उपाय निघाले आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. पण हे सर्व कसे होते याबद्दल त्या क्षेत्रातले काही शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ सोडले तर इतर लोक अनभिज्ञ असतात. हे बरेचसे संशोधन रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये (अंडर लॅबोरेटरी कंडीशन्स) रुक्ष काटेकोर नियम पाळून केले जाते. मात्र हे सर्व करण्याअगोदर, करताना आणि ते करून मिळालेल्या निष्कर्षांचा अन्वयार्थ लावताना शात्रज्ञ आणि तंत्रज्ञ किती कल्पकता वापरतात याचा इतिहासही मनोरंजक असतो.
