माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी
आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे.