चारोळी
तुझ्या सहवासात मी
देहभान सारे हरपतो
तरीही माझ्या पत्नीचा
अचूक वेध मी घेतो
_______________________________________________________
तुझ्या गहि-या डोळ्यांत
माझी नजर गुंतावी
तुझ्या ओठांची लाली
माझ्या ओठानी पुसटावी
तुझ्या सहवासात मी
देहभान सारे हरपतो
तरीही माझ्या पत्नीचा
अचूक वेध मी घेतो
_______________________________________________________
तुझ्या गहि-या डोळ्यांत
माझी नजर गुंतावी
तुझ्या ओठांची लाली
माझ्या ओठानी पुसटावी
नवीनच लग्न मधुच॑द्राची रात
फुटे कवीस कवीतेचा उमाळा
अहो आश्चर्य काय त्यात?
करे कल्पना॑ची बरसात
उडवे उपमा अल॑कारा॑ची खैरात
फुट्ती लाह्या॑सारख्या कविता
काही ख॑ड न त्या॑त
एकएकूनी कविता तयाच्या
पत्नी जाई क॑टाळून
ला॑बलचक देई जा॑भया
मुखच॑द्रमा अन ताणून
रात्र तशी फार न झाली
डोळे मात्र जडावले
कविता तयची निद्रानशावर
रामबाण उपाय दिसे
पत्नीचा चेहरा पाहून अखेर तो था॑बला
जाणवूनि निरुत्साह तिचा
तो थोडसा चिडला
''एव्हढी कशी तु अरसीक?''
तो बोलला रागाऊनी
एकून बोलणे ते रागावली मग तीही
पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना
गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव
रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड
"हाय"कू
"हाय"कू
हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.
जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे
जुळे १:
सासं नसूनही तबला तू
सकल मिपाचा झमेला तू
धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र
अन्... सुप्त बोक्याची जागा तू
मोकळाढाकळा रांगडा तू रे
सुमडीत सोपान डोम ही तू
ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू
कधी फसलेली चारोळी तू
मिपात असूनही.. एकटाच तू रे
तुझ्या लाट्णीचा आधार तू
जुळे २:
छान छान यावे धागे
छान छान वंदावी थेट
टीआर्पी जसा चॅनेलला
येऊन मिळतो थेट थेट
मग येतो नवा धागा
जुना जातो अंधारात
टीच्भर प्रतीसाद मागून
तोही मिटतो अंधारात
आमची प्रेरणा अर्थातच जगदिश खेबुडकरांचं हे जिवंत गाणं
ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
जो दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा
पाच वर्षाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
नाव कुणाचे, नाकामंदी कुनी बांदली दोरी
जागा होऊन बोलल त्याला, हाय कमांडचा हादरा
यु आयडीचा शिनीमा बगा, बगा सोडुनी काम
आधार झाला निराधार ना इथे राहीला राम
कितीक योजना आशा लावूनी उगा दावतीया नखरा
हलले "दु"कान
गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी !
राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!!
सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर !
मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा!
दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी !
जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका !
द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण !
संपुर्ण मिसळपावात निरव शांतता होती,मात्र डू(आईडी) हातात पाटी घेऊन तिच्या शोधात निघाला होता, कोण होती ती! ती एक संपादकीय शक्ती होती ,की दुसरी कुणी जीने संपुर्ण मिसळपावाला शतशब्दग्रस्त करुन सोडले होते.अचानक डू ला समोरुन एक शत(शब्द) पावली जातांना दिसली तो हळुच तिचा पाठलाग करु लागला अचानक ती पावली गुल झाली आणि पुढच्याच क्षणी डू च्या अंगावर कुणी तरी पाठीमागुन हात टाकला ... .. कोण असेल डू च्या पाठीमागे ?