अरसिक?

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी...
2 Nov 2015 - 10:25 pm

नवीनच लग्न मधुच॑द्राची रात
फुटे कवीस कवीतेचा उमाळा
अहो आश्चर्य काय त्यात?
करे कल्पना॑ची बरसात
उडवे उपमा अल॑कारा॑ची खैरात
फुट्ती लाह्या॑सारख्या कविता
काही ख॑ड न त्या॑त
एकएकूनी कविता तयाच्या
पत्नी जाई क॑टाळून
ला॑बलचक देई जा॑भया
मुखच॑द्रमा अन ताणून
रात्र तशी फार न झाली
डोळे मात्र जडावले
कविता तयची निद्रानशावर
रामबाण उपाय दिसे
पत्नीचा चेहरा पाहून अखेर तो था॑बला
जाणवूनि निरुत्साह तिचा
तो थोडसा चिडला
''एव्हढी कशी तु अरसीक?''
तो बोलला रागाऊनी
एकून बोलणे ते रागावली मग तीही
''मी अरसीक काय?''
बोलूनी तिने, त्यास मिठी मारली!
तिच्या रसीकतेची त्यास
अहा! पुरेपुर खात्री पटली!

हास्यविनोद

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 12:21 am | चांदणे संदीप

या कवितेला प्रतिसाद देत नाहीत ते खरे अरसिक!

( लहानपणी 'वाचेल तो गाढव!' अस वहीवर लिहायचं आणि ते सर्वांना वाचायला लावून मज्जा घ्यायची अस काहीसं फिलींग हा प्रतिसाद लिहून आलंय!)

पीके's picture

3 Nov 2015 - 8:14 am | पीके

आता आम्ही रसिक बरं का...:-P

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Nov 2015 - 1:11 am | डॉ सुहास म्हात्रे

अनुस्वारांच्या ऐवजी अक्षरांच्या डोक्यावर उभे टिळे कसे लावलेत ?! उदा: कंटाळून ऐवजी क॑टाळून ?

भाकरी's picture

3 Nov 2015 - 2:13 am | भाकरी

कसं केलंय ते सांगितलं आहे ! का केलंय लेखक॑च सा॑गू शकेल ;-)

बिन्नी's picture

3 Nov 2015 - 9:03 am | बिन्नी

अरेरे !

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

3 Nov 2015 - 12:05 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

फॉन्ट प्रॉब्लेम! बाकी काही नाही!

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture

3 Nov 2015 - 12:05 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे

फॉन्ट प्रॉब्लेम! बाकी काही नाही!