प्रतिभा

मरण!

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 6:45 pm

"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताप्रकटनविचारप्रतिभा

मैथिली

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 Apr 2016 - 12:23 am

हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं.
हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं.

" हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच.
"कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय?

संस्कृतीनृत्यकथामौजमजाप्रकटनप्रतिभाविरंगुळा

ढेकळे

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
17 Apr 2016 - 8:34 pm

गुलछबू रातीचा गाभारा भादवातल्या कुत्र्यासारखा लवलवत होता. गोठ्याच्या शेजारी थोडी जागा करुन गजड्या त्यावर झोपला होता. वारा कितीही थंडगार वाहत असला तरी तो आतुन धुसमुसत होता. पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा तो तडफडत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होता. आजची रात त्याला बोडक्या बाईच्या अंधाऱ्या खोलीसारखी भकास वाटत होती. जिच्या नैराश्याचे भाले त्याच्या शरीरात भळ्ळकन घुसले होते. वर्षानुवर्षे उभा असलेला एखादा वटवृक्ष एखाद्या जोरदार वादळात उन्मळून पडावा तसा तो अशक्त होऊन अंधरुणावर पडला होता. डोक्यात ना ना विचांरांची शकले चौफेर उधळली गेली आणि तो उठून बसला.

कथाप्रतिभा

सांधीकोपरं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
14 Apr 2016 - 11:47 pm

बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं.

सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी.

जीवनमानप्रकटनप्रतिभा

सूक्ष्मकथा : जंगल

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 8:33 pm

वाघाने डरकाळी फोडली. माकड झाडावर चढले.
शेंड्यावर लपून अद्भुत हसले. अन तिथूनच घेतली उडी. खालच्या फांदीवर.

वाघ झाडाखाली आला. जिभल्या चाटत पाणी पिला.
अन घेतला एक सूर. पाणवठ्यात.

ऊन तापले. पाणवठ्याच्या अवतीभवती गिधाडे.
सूक्ष्मजंतूंचा नायनाट.अन पाण्यातला वाघ गारगार.

कुठून आलं एक हरिण. बिथरुन बसलं काठावर.
अन सुसाट पळालं माघारी. सैरावैरा.

वाघाने जलक्रिडा केली. मग आला काठावर.
अन झाडून अंग फोडली एक डरकाळी. भयचकीत.

माकड पुन्हा शेंड्यावर. गिधाडे उडाली आकाशी.
अन जंगलातली हरणे हिरव्या कुरणावर. सुसाट पळाली.

कथामौजमजाआस्वादप्रतिभाविरंगुळा

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 12:56 pm

काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :(

हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले!

शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :(

बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना!

कलाकथाविनोदसाहित्यिकमौजमजालेखअनुभवसल्लामदतप्रतिभाविरंगुळा

सूक्ष्मकथा : गणपती

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
6 Apr 2016 - 11:03 pm

हालगीच्या तडतडीत, ढोल ताश्यांच्या रणधुमाळीत, माणसांच्या गर्दीत, धुळीत, चेंगराचेंगरीत गडबडून गेलेला अगडबंब गणपती माझ्याकडे बघून वैतागत म्हणाला,

"अरे आवाच वाढव डिजे तुझ्या आयची.... तुला आयची शपत हाय.."

अन मोदक कुरतडताना एक घास माझ्या घशातच अडकला.

कथाप्रतिभा

चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
6 Apr 2016 - 11:32 am

परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला.

"Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली!
वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात?

आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं!

कलाकथाविनोदसाहित्यिकkathaaमौजमजाप्रतिभाविरंगुळा

कोलाज...

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 11:26 pm

तर त्या दिवशी संध्याकाळी, जिथे आहेत उंच डोंगर, हिरवी झाडी, अन एक नदी.

तिथे मी शोधत गेलो, एक गाव ओळखीचं, दुध दुभत्या गाईचं, पाणी भरलेल्या माठाचं, अन एक झाड बाभळीचं.

फुलाफुलांच्या ताटव्यात, निसरड्या ओलेत्या गवतात, रिमझिमत्या पावसात मी शोधत गेलो एक चेहरा उदास.

ज्याच्या कपाळी होते वैभवाचे विशाल तुरुंग, हरवलेल्या पायवाटा अन एक पराभव उत्तुंग.

मी शोधत गेलो त्या डोळ्यांतले युगायुगांचे दु:ख. त्यात दडलेला बंडखोर अन एक शून्य.

त्या डोळ्यांत मला दिसल्या भिजून गेलेल्या अश्रूंच्या कडा, भिजून गेलेली एक संध्याकाळ अन भिजून गेलेला एक सवाल रोकडा.

इतिहासकथाप्रकटनप्रतिभा

पेट्रोल

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
26 Mar 2016 - 8:29 pm

"सत्तू भिजवे, आपलं नाव, का इचारलं? काय काम हाय?" मी त्या हवालदाराच्या डोळ्यात राग ओततच बोललो. तो शुंभासारखा माझ्याकडे बघतच राहिला. मग जरा जवळ येऊन त्यानं तोंडाचा वास घेतला.
"ये चल रे, येडं दिसतय कोणतर" किक मारत फटफटीवरचा खाकीतला दुसरा माणूस म्हणाला.
"मुस्काड फोडीन, कुठं गेलता येवढ्या रात्रीचं?" आता मात्र यानं हातंच उगारला होता. मी छाताड उघडं टाकून त्याच्यापुढं ताठ उभा होतो.
" पिच्चर बघायला गेलतो " यावेळी मी ठरलेलं उत्तर दिलं, तेही खालच्या आवाजात. या धटींगण हवालदाराशी जास्त हुज्जत घालणं परवडणारं नव्हतं.

कथाप्रतिभा