जोवरी हे जग, जोवरी भाषण - १
नमस्कार ..
मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा.
आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...
