गीतगुंजन - २१ -> Locomotive Breath
'इयन अॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच. असं काय वेगळं होतं त्यात?