गाभा:
मिपा वरील काही धागे म्हणजे त्यातले प्रतिसाद बघताना असा दाट संशय मनात आला की "नो स्मोकिंग" सिनेमा समजलेला प्रेक्षक अस्तित्वात असावा, आणि त्यातही तो मिपावर आहे अशी शंका मनात आली.
एखाद्या धाग्यावर विषयांतर करणे वा झालेल्या विषयांतराला खतपाणी घालणे (वा काडी लावणे ?) हे तत्वात वगैरे फारसे बसत नसल्याने "नो स्मोकिंग" या अचाट सिनेमाबद्दल नवीन धागा काढावा असा विचार मनी आला.
हा चित्रपट मी डीवीडीवर ( अर्थात पायरेटेड : तत्वात बसवून घेतो हो.. पैशांचा प्रश्न आहे ना)अख्खा पाहिला म्हणजे झेलला (आयेशा टकिया करिता ते दिव्य केलं). त्या घटनेला आता काही वर्ष झालीत. तो सिनेमा कळाला नव्हताच त्यामुळे त्यात काय दाखवले हे ब-यापैकी विस्मरणात गेले. पण तरी असा एक अचाट सिनेमा मी पाहिला हे नाही विसरु शकलो !!
प्रतिक्रिया
14 Nov 2013 - 7:32 pm | विद्युत् बालक
का जॉन ने त्यात आयेशा टाकिया पुढे "आत्मसमर्पण " नाही केले का?
---- तुमच्या "किन्की " कथांचा निस्सीम चाहता :P
14 Nov 2013 - 7:36 pm | धन्या
मकच्या त्या कथेच्या प्रकाराला किन्की कथा म्हणतात तर!
14 Nov 2013 - 7:41 pm | जेपी
जॉन ने परेश रावल समोर सर्मपण केलत म्हणुन मक ला कळाल नाय बहुतेक .
पण त्याचा विषयपण किंकीच होता .
14 Nov 2013 - 11:43 pm | अनुप ढेरे
:) हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे, म्हणजे दिग्दर्शकाला जे काही म्हणायचे आहे ते सगळच आणि प्रत्येक अन प्रत्येक रूपक मला समजलं आहे असा दावा मी करत नाही. मला हा सिनेमा का आवडला असं विचार करता खालील मुद्दे सुचले.
१. सिगरेट हे या सिनेमात स्वातंत्र्याचं रूपक आहे. आणि परेश रावल आणि त्याचा कंपू हे स्वातंत्र्याची मुस्कट्दाबी करणार्यांचं रूपक. आता स्वातंतत्र्यासाठी सिगरेट हेच रूपक का घ्यावसं वाटलं असेल? मला वाटतं कि सिगरेट ओढणं हे आजकाल फार बर्याच लोकांसाठी तिरस्करणीय आहे. ( आठवा नुकताच निघालेला फुकाड्यांवरचा धागा आणि त्या धाग्यावर फुकड्यांना घातलेल्या शिव्या ). मला वाटत कि या रूपकातून 'दुसर्याचं स्वातंत्र्य हे कितीही तिरस्करणीय वाटलं तरी ते त्या व्यक्तीसाठी अती महत्वाचं असतं. आणि ते त्याला मिळालं पाहिजे.' असा विचार मांडला आहे. आता या स्वातंत्र्याचा उपभोग घेणं माझ्यासाठी हानिकारक आहे असं दुसर्याकोणी ठरवलं आणि माझ्या कल्याणाची जबाबदारी स्वतःवर (म्हणजे त्या दुसर्या व्यक्तीवर) आहे असं कोणी वागू लागला तर? इथे त्या मानसिकतचे उदाहरण परेश रावल दर्शवतो. त्याचं पात्रं म्हणत 'इस बिमारी का इलाज करने के लिये हमें नियुक्त किया गया है?' मला स्वतःला अशी संस्कारचा मक्ता घेतलेली माणसं आवडत नाहीत. हे एक. आणि मी स्वतः सिगरेट ओढतो. (जॉन अब्राहम इतकी नाही पण ओढतो) हे दुसरं. या कारणांमूळे मला त्या पात्रांशी रिलेट करता आलं लवकर. आवडण्याचं हे एक कारण.
२. पण त्याच वेळेला एखाद्याच्या स्वातंत्राचा इतरांना त्रासपण होउ शकतो हे दाखवलय. जसा के च्या भावाला होतो. पण नीट बघितलं तर के च्या भावाला परेश रावलचा माणूस मारतो. यातून असं सांगायचं आहे बहूदा की मुस्कटदाबीवाले 'तुमच्या स्वातंतत्र्याचा इतरांना बघा कसा त्रास होतोय' अस दाखवून देण्यासाठी तो त्रास मॅन्युफॅक्चर पण करतील.
३. आता कोणी म्हणेल की हे असं घडूच कसं श़कत? म्हणजे रणवीर शोरीच बोट परत जोडलं जाण, के च चेक बूक परेश रावलकडे असणं, त्याचे सिगरेट्चे प्रयोग त्या विडीओ कॅसेट मध्ये असणं, परेश रावलची लोकं एवढा वॉच ठेऊ शकणं वगैरे... मला वाटत की याचा विचार करायची गरजच नाहीये. कसं घडल असेल यापेक्षा गोष्टीत काय सांगायचय दिग्दर्शकाला हे महत्वाचं. सुपरमॅन बघताना आपण हा विचार नाही करत कि माणूस खरच ऊडू शकतो का? आपण काही गोष्टी अध्यारूत धरतो आणि त्याच्या पुढची गोष्ट पहातो. तेच इथे पण लागू आहे असं मला वाटतं.
४. सिनेमातलं संगीत खूप आवडलं. सगळी गाणी सिगरेट आणि धूर या बद्दल आहेत. चाली खास. आणि गाण्यांचं चित्रिकरण उच्चं ! एकदम मिसळून गेलीयेत गाणी सिनेमात.
५. शेवटी शेवटी काय होतय हे काही मला समजलं नाही. बाथ टब, तो एक रुपया वगैरे. पण तो जेल मधला आंघोळीचा सीन हा शिंड्लरर्स लिस्ट या सिनेमावरून घेतला होता. बहुदा नाझी विचारसरणीच द्योतक म्हणून शिंडलर्स लिस्ट चा वापर. रशिया मधले सीन हे कम्युनिस्ट राजवटीचे , आणि पर्यायाने मुस्कटदाबीचे द्योतक वाटलं.
थोडक्यात, मला हा सिनेमा बघण्याचा अनुभव खूप आवडला. एकदा तरी बघावा असा नक्की.
शेवटी: मला असं फणस सोलल्यासारखं पिच्चर सोलायला आवडत नाही.(*) पण आधीही एकानी 'रसग्रहण लिहा' असं सांगितलं होतं आणि आत्ता धागा निघालाच आहे म्हणून हा प्रतिसाद.
* - साभार पु,ल,
15 Nov 2013 - 12:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आत्तापर्यंत हा सिनेमा का (म्हणे) एवढा चांगला हे माहित नव्हतं म्हणून पहाणं टाळत होते. आता चित्रपट जरूर बघेन.
मी सिग्रेट ओढत नाही, उलट मला सिग्रेटच्या धुराचा अलर्जीक त्रासही होतो. पण त्याचा चित्रपटाशी फार संबंध नसावा हे या प्रतिसादातूनच दिसतंय. स्वतःच्या धर्म, संस्कृती, परंपरा वगैरेंपायी इतरांच्या स्वातंत्र्यावर बिनधास्त घाला घालणारे आणि वर पुन्हा "आपण किती धुवट" असा आव आणणारे लोक मायदेशात आणि सध्या वास्तव्य असणाऱ्या देशातही चिकार आहेत. त्यामुळे चित्रपटाबद्दल आपुलकी निर्माण होणं सहजशक्य आहे.
त्यातून जॉन अब्राहम आहे म्हटल्यावर काय वेगळं कारण हवं? ;-)
15 Nov 2013 - 11:27 am | मराठी कथालेखक
हे वाचल्यानंतर पुन्हा एकदा सिनेमा बघावासा वाटतोय.
15 Nov 2013 - 11:50 am | संचित
छान. हे वाचुन अस वाटत, तो चित्रपट तुम्ही दिग्दर्शित केल असता तर याहुन उत्तम झाला असता.
15 Nov 2013 - 11:57 am | गवि
असा अर्थ आहे होय.. फक्त एकच शंका येते..
असं असेल तर मग जॉन अब्राहमकडूनच एक भरपूर लाखाचा चेक का घेतो परेश रावल ? जर परेश रावल मॉरल पोलीस किंवा नियुक्त अधिकारी अशा तर्हेने काम करत असेल तर मोबदला / फी/ डिपॉझिट किंवा तत्सम कोणतीही अधिकृत रक्कम त्याने का मागावी ?
15 Nov 2013 - 1:31 pm | अनुप ढेरे
परेश रावल स्वतःची फी फक्त १रू. आहे असं सांगतो. बाकी labour + material सारखं. आणि ती तो शेवटी मागतो सुद्धा.
14 Nov 2013 - 11:49 pm | अग्निकोल्हा
सिगारेट सुटावी म्हणून जॉन वर ब्लेक जादूटोना नकळत केला जातो... व् त्यात तो कसा फसत जातो याचे प्रेक्षकाच्या डोक्याचा भुगा करणारे चित्रण आहे.
15 Nov 2013 - 3:47 am | अगोचर
रोजच्या निकोटीन ची सवय अचानक मोडण्याचा प्रयत्न केला तर जी भितिदायक स्वप्ने (नाइट्मेअर्स) पडु शकतात तसाच जॉन ला आलेला भन्नाट अनुभव त्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न आहे असे वाटले होते.
त्यामुळे फार सुसंगती वगैरे लावण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी टीमला यश मिळुन जॉन भानवर येतो आणी व्यसनमुक्त होतो असे त्यावेळेचे अनुमान होते. आणी एकदा बघायला उत्कंठावर्धक पटकथा आहे असे माझे मत आहे.
मी स्वतः कधीही धूम्रपानाचा अनुभव घेतला नाही, आणि एकदा लागलेले हे व्यसन सोडण्याचा तर मुळिच नाही. सिग्रेट सारखे व्यसन सोड्ण्याचा प्रयत्न करणार्या एका मित्राच्या अनुभवावरुन (त्यानी सांगितलेल्या) आता विषय निघालाच आहे म्हणुन हे लिहित आहे. आधिक जाणकार सांगतिलच .. ह्या बाबतित वैद्याकिय शास्त्राचे (सुबोधकाका वाचताय ना ?) म्हणणे काय ते ही जाणुन घ्यायला आवडेल.
16 Nov 2013 - 2:56 am | आदूबाळ
त्या प्रकाराला "कोल्ड टर्की" म्हणतात. व्यसन जितकं भयानक तितकी कोल्ड टर्की दाहक असं समीकरण असतं. "शांताराम" नावाच्या कादंबरीमध्ये त्याचं भयाण वर्णन आहे. "मटरू की बिजली का मंडोला" मधल्या मंडोलाला गुलाबी म्हैस दिसत असते हा पण त्यातलाच प्रकार.
सिगरेट सोडतानाची कोल्ड टर्की इतकी वाईट असेल असं वाटत नाही. थोडा अस्वस्थपणा वगैरे येत असावा, पण असला अपचनी चित्रपट काढण्याइतकं नसावं.
15 Nov 2013 - 9:46 am | खबो जाप
अश्या नावाचा हिंदी चित्रपट होता हेच माहित नव्हत. मिळाला कि बघेन….
15 Nov 2013 - 11:43 am | मी_आहे_ना
आठवत नाही कधी ट्रेलर इ. बघितलेलं.
15 Nov 2013 - 2:28 pm | अग्निकोल्हा
जर चित्रपटगृह सोडून इतरत्र बघाल तर इतकेच म्हणता येइल की हाय कंबख्त तूने तो पिच नय
15 Nov 2013 - 11:46 am | सुज्ञ माणुस
हम्म मलाही, मला आता प्रतिक्रिया वाचून कळले.
याउपर काल जी गाजावाजा झालेली कसोटी होती, ती पण कोणा वर्सेस होती हे हि मला माहित नव्हते. (अरेरे झालेच विषयांतर!) :)
15 Nov 2013 - 3:15 pm | इरसाल
काय झाले बॉबे डाइंगवाले दिलीपकुमार कडे चादरी, बेड्शीट आणी उशांचे कव्हरच्या जाहिरातीसाठी गळ घालायला गेले.
तो म्हणे चादरी बेड्शीट ठीक आहे उशांच्या कव्हराची मला जम्णार नाय ती नवी हिरवीन आल्याली आहे तिच्याकडे जा, कोण म्हणे तर आयशा टकिया/तकिया तिच्या नावातच तकिया आहे.
12 Sep 2024 - 2:44 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
23 Nov 2013 - 2:03 am | विवेक वाघमारे
हा चित्रपट जॉनच्या २-३ स्वप्नांमध्ये आणि वास्तवामध्ये(?) फिरत राहतो. कोणती कथा वास्तवातली आणि कोणती स्वप्नातली/ भासातली कळत नाही, पण सगळ्या कथा समांतरपणे चालू राहतात आणि त्यांचा काही न काही शेवटहि होतो. खूप वर्षांपूर्वी पाहिलेला हा चित्रपट. आता बारकावे आठवत नाहीत.
12 Sep 2024 - 2:23 am | अमरेंद्र बाहुबली
आज यूट्यूबवर पाहिला. शेवट किचकट आहे. पण सिनेमा मस्त होता. काहीतरी वेगळा. एकदा पाहून सोडाच म्हणतो मी.
12 Sep 2024 - 6:07 am | चौकस२१२
"थँक यु फॉर स्मोकिंग" हा चित्रपट पण पाहण्यासारखा आहे
सिगरेट उद्योगातील एक अधिकारी याच्या जीवनावर
https://www.imdb.com/title/tt0427944/
12 Sep 2024 - 7:45 am | कॉमी
मस्त सिनेमा आहे. स्टीफन किंगच्या quitters. Inc वर आधारीत आहे.