सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
31 Oct 2013 - 6:16 am
गाभा: 

सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ?
आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?

मुख्य म्हणजे त्या एवढ्याश्या अरूंद भोकातून ही एवढी लांबलचक नाडी घुसवत जाऊन पुन्हा तिकडल्या भोकातून हुबेहुब तीच नाडी उदाहरणार्थ बाहेर काढणे, हा सर्व प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि काढ-घाल करण्याची आणि आपले चोचले पुरवण्याची हाईट " वाटते मला …
तसेच इतर अन्य पदार्थांतही नाडी वापरणे, उदाहरणार्थ परकर, सलवार, पट्या-पट्याची चड्डी, वगैरे तर थोरच.

आणि हो. याशिवाय दुसर्‍याही अनेक नाड्या आहेतच, अगस्त्य नाडि, पराशर नाडि, भृगु नाडि, आणि काय काय... हजारो वर्षांपासून या नाड्या बनवणे, आणि त्यात सगळ्यांचे भूत- भविष्य लिहून ठेवणे, आणि ती व्यक्ति त्या नाडीतच लिहून ठेवलेल्या नेमक्या वेळी समोर आली, की तिला ती वाचून दाखवणे, आणि त्या व्यक्तिने पूर्वजन्मात उदाहरणार्थ काय काय पापे केलीत, हे नेमके सांगून त्यावरील उपाय योजनाही सांगणे ... म्हणजे भारीच. कोणाला सुचलं असेल हे असं …

अर्थात हे सगळं एकाच दिवसात सुरु झालेलं नसावं असा माझा अंदाज … हे सर्व उत्क्रांत होत गेले असेल. या नाड्यांच्या जन्माची , उत्क्रांतिची काही कहाणी असेलच ना...

जाणकार मंडळींच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत …

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

31 Oct 2013 - 7:12 am | चौकटराजा

जीवन त्याना कळले हो
इथे खोंडांबरोबर म्हातारे ही चळले हो !

नाडीत नाडी पायजम्याची नाडी
गाडीत गाडी पराग ची गाडी ..... आगाउपणे जमलेला उखाणा !
" पराग" म्हणजे कोण ? ही चम्मत ग आहे !

चित्रगुप्त's picture

31 Oct 2013 - 5:36 pm | चित्रगुप्त

" पराग" म्हणजे कोण ? ही चम्मत ग आहे !

हा पराग कोण बुवा ? कोण हा पराग? कोण ग बाई हा पराग? अय्या पराग? कोणता?
व्हू ईज धिस परागा? इश्श्श्श, पराग? च्यामायचा, कोन ह्यो पराग?

चौकटराजा's picture

1 Nov 2013 - 5:33 am | चौकटराजा

हा एक राग असून त्यात एकच स्वर लागतो तो म्हणजे पंचम " प". यात आपण दुसर्‍याची रेव्डी उडवायची पण दुसर्‍याने आपली उडवली की दू दू .......असे लिहित सुटायचे अशी ख्यालाची रचना असते.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2013 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा

@हा एक राग असून त्यात एकच स्वर लागतो तो म्हणजे पंचम " प">>> =))

@यात आपण दुसर्‍याची रेव्डी उडवायची पण दुसर्‍याने आपली उडवली की दू दू ..>>> आंssssss :-\
नेमकं उलटं लिहीलत ! :-\

प्रकाश घाटपांडे's picture

31 Oct 2013 - 8:29 am | प्रकाश घाटपांडे
सुहासदवन's picture

31 Oct 2013 - 8:58 am | सुहासदवन

गेल्या काही दिवसात येणारे विषय पाहून लवकरच हे पण वाचायला मिळेल.....

सगळ्यात पहिली गाडी कोणी वापरली असेल?
सगळ्यात पहिली साडी कोणी वापरली असेल?
सगळ्यात पहिली माडी कोणी बांधली असेल?(कोणी "वापरली" असेल?हे आले तरी चालेल)

विजुभाऊ's picture

31 Oct 2013 - 2:37 pm | विजुभाऊ

सुहासवदन अजून एक विषय घ्या
सगळ्यात पहिली ताडी कोणी बनवली असेल?

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2013 - 3:14 pm | संजय क्षीरसागर

सगळ्यात पहिली नाडी कुणी सोडली असेल?

अनिरुद्ध प's picture

31 Oct 2013 - 4:01 pm | अनिरुद्ध प

ईथे आपल्याला 'पूडी' असे अभिप्रेत होते का?

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2013 - 5:49 pm | संजय क्षीरसागर

आणि लेखाचं शीर्षक पाहा

अनिरुद्ध प's picture

31 Oct 2013 - 6:47 pm | अनिरुद्ध प

ठीक आहे,म्हणजे मी पूड्या आपलं पूडी सोडायला,आपलं
पहिली पूडी कोणी सोडली असेल? हे विचारायला मोकळा आहे.

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2013 - 6:56 pm | संजय क्षीरसागर

पहिली उडी कुणी (आणि कशावर) मारली? असा ही एक प्रश्न येऊ शकतो.

पिशी अबोली's picture

31 Oct 2013 - 3:20 pm | पिशी अबोली

डू ते डी अर्थात 'ऊ' ते 'ई' हा प्रवास भाषाशास्त्रीयदृष्ट्या रोचक आहे... ;)

रमेश आठवले's picture

6 Nov 2013 - 11:10 am | रमेश आठवले

+१.

काही दिवसांनी मिपा हे मराठी भाषेतले विकीपीडीया होतय की काय असा वाटायला लागले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2013 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा

वा चकां'चि नाडि पकडणारे लेखन! ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2013 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा............ आता बस करा रे.... :)

-दिलीप बिरुटे

बाबा पाटील's picture

31 Oct 2013 - 7:04 pm | बाबा पाटील

विंग कमांडर(माजी) शशिकांत ओक. दुसरा नाडी विषयी अधिकाराने बोलु शकत नाही.

चित्रगुप्त's picture

31 Oct 2013 - 7:17 pm | चित्रगुप्त

याशिवाय मनगटावर बोटं टेकवून, 'नाडीपरिक्षा' करून वात-पित्त-कफादि दोषांचा मागोवा घेऊन त्यावर औषध, पथ्य वगैरेंचे उपाय सर्वात आधी कोणी शोधून काढले असतील?

तसेच पत्रिकेतील आद्यनाडी, मध्यनाडी वा अन्त्यनाडी पैकी कोणती आहे, हे बघून वधु-वरांची 'एकनाड' तर येत नाहीना, हे सर्वात आधी कोणी बघितले असेल?

मुळात "अमुक एखाद्याला नाडणे" हा शब्दप्रयोग नाडीवरूनच आला असेल काय?

रमेश आठवले's picture

6 Nov 2013 - 10:59 pm | रमेश आठवले

आलेल्या पहिल्या रुग्णाच्या हाताची नाडी सुश्रुत या आयुर्वेदाचार्यांनी तपासली असणार .