तुमको देखा तो ये खयाल आया …
एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे. असा नायक साकारला होता फारुख शेख नी.