आणि रजनीकांत रडला - धूम ३

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
22 Dec 2013 - 10:57 pm

१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल.

डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला. अशी वदंता आहे की यानंतर किरण रावने आमीर खानला आणि ऐश्वर्या रायने अमिताभ बच्चनला दूरध्वनीवरुन रुद्ध कंठाने सांगितले "आणि रजनीकांत रडला". पहिली घटना अफवा असु शकेल पण दूसरी घटना मला विचाराल तर अगदी सत्य असण्याची शक्यता आहे. चित्रपट पाहिला असेल तर रजनीकांत ढसाढसा रडला असेल, दाक्षिणात्य चित्रपटनिर्मात्यांनी आपल्या कल्पनादारिद्र्याला शिव्या घातल्या असतील, मिनी रजनीकांत 'अक्षयकुमार' नर्व्हस ब्रेकडाउन ने काळवंडला असेल आणि पहिल्या २ धूमच्या कलाकारांनी तोंडात बोटे घातली असतील.

धूम - ३, धूम सिरीजचा ३ रा चित्रपट. आपल्याकडे सिक्वेल तसे उशिरा सुरु झाले. पण एकदा सुरु झाल्यावर हस्ताच्या नक्षत्रासारखे धो धो बरसायला लागले. नाव वगळता पहिल्या आणी पुढच्या आणि त्या पुढच्या चित्रपटांमध्ये काही साम्य नाही आहे असे वाटेल कदाचित. पण तसे नसते, सगळ्या सिक्वेल्स मध्ये एक समान धाग असतो. म्हणजे असे बघा एक वेडसार वाटणारा, एक मुका (द्यायचा नाही. बोलता न येणारा मुका) आणि उडणार्‍या २०-२५ गाड्या असा समान धागा असेल तर तो 'गोलमाल' सिरीजचा चित्रपट असतो, दगड नायक, कपडे उतरवण्याचा अती सोस असलेली नायिका आणि खून किंवा खूनाचा प्रयत्न असेल तर तो "मर्डर" सिरीजचा चित्रपट असतो, दगडी चेहर्‍याचा नायक, कपडे उतरवण्याचा अती सोस असलेली नायिका आणि भूत असेल तर तो " राज" सिरीजचा चित्रपट असतो (म्हणजे इथे बघा भट्ट कँपचा चित्रपट असेल तर २ गोष्टी कॉमन असतात, तिसर्‍या गोष्टीवर चित्रपटाला कुठल्या कॅटेगरीत ढकलायचा यावर निर्णय होतो.)

तसा चकाचक बाईक्स, कपडे उतरवायला तयार असणार्‍या नायिका (साली ही गोष्ट सगळीकडेच कॉमन झाली आहे), एक चोर आणि दोन दगड पोलिसवाले हा मालमसाला एकत्र केला की धूम तयार होतो. भेळवाला कसा बोला सुकी करु की ओली, फरसाण किती, कांदा किती, मिरचीचा ठेचा घालु का असे विचारतो तसे बहुधा यशराज वाली ४ - ५ टाळकी एकत्र जमतात आणि नायकिणीचे कपडे किती उतरावयाचे, उदय चोप्राला किती बावळट दाखवायचा (अजुन???), बाईक कुठली वापरायची, लोकेशन काय ठेवायचे या गोष्टी ठरवुन टाकतात म्हणजे एक धूमपट तयार होतो. यातल्या "चोर " फॅक्टर वर चित्रपटाचा सेलिब कोशंट (मराठी मराठी?) ठरतो इतकेच. धूम ३ मध्ये बाकी भेळ कशी ठरली आहे हे लक्षात घेउन इथे आवर्जुन आमीर खान या हुकुमी एक्क्याची वर्णी लावण्यात आली आहे.

तर होते असे की जॅकी श्रॉफ हा शिकागो मधल्या एका भारतीय सर्कसचा चालक, मालक, मुख्य जादुगार वगैरे वगैरे असतो, सर्कस नीट चालत नसल्याने आणि कर्ज खुप झाल्याने "बॅंक ऑफ शिकागो" चे काही संचालक सर्कस बघत असता असता असा निर्णय घेऊन टाकतात की आता बास, खुप झाले ५ दिवसात सर्कस खाली करायची आणि चालते व्हायचे. हा धक्का सहन न होउन जॅकी श्रॉफ आत्महत्या करतो आणि त्याचा त्यावेळेस लहान असलेला मुलगा मनोमन बँकेला बरबाद करण्याची प्रतिज्ञा करतो. हाच तो मोठेपणीचा साहिर खान म्हणजे आपला आमीर खान. वडिलांच्या छायेखाली छोट्या मोठ्या जादू, हात्चलाखी आणि कसरती शिकलेला हा साहिर खान 'आली लहर केला कहर' च्या थाटात बॅंक ऑफ शिकागोच्या एका शाखेवर दिवसा ढवळ्या दरोडा घालतो आणि बॅकेच्या तिजोरीतला सगळा पैसा हवेत उधळतो (थोडा स्वतःही लांबवतो). जाताजाता तो डॉनमधल्या प्राणच्या पावलावर पाऊल ठेउन दोन इमारतींमधल्या एका दोरीवर आख्खी मोटारसायकल चालवुन अमेरिकेतल्या पोलिसांना तोंडात बोटे घालायला लावतो. वर स्वत:ची निशाणी म्हणुन एक जोकरचा मुखवटा ठेवतो आणि हिंदीत बॅ़केला बरबाद करण्याची धमकी लिहून ठेवतो. शिकागो मध्ये राहणारा हा चोरटा धमकीच द्यायची आहे आणि तीही सरळ सरळ तर हिंदीत कश्याला देइल? पण तो खुपच देशभक्त चोर असल्याने आणि राष्ट्रभाषेचा त्याला जाज्वल्य का कायसा अभिमान असल्याने तो धमकी हिंदीत देतो. आता शिकागोसारख्या आडबाजुच्या छोट्या अमेरिकन शहरात हिंदी भाषक पोलिस कुठुन मिळणार? मिळालाच तर तो एवढ्या मोठ्या चोराला पकडु शकेल असा हुषार कुठुन असणार? अमेरिकेत हुषार पोलिसांची अशीही थोडी चणचणच आहे म्हणा. म्हणुन मग ते थेट मुंबईहुन जय दिक्षीत (अभिषेक बच्चन) आणि त्याच्या अली (उदय चोप्रा) नावाच्या अती बावळट साथीदाराला पाचारण करण्याचा घाट घालतात.

शिकागो मध्ये इतका उतमात चालु असताना इतक्या मातब्बर चोराला पकडण्याच्या आधी गंमत म्हणुन अली आणी जय दिक्षीत एका लोकल गुंडाला पकडण्याचा सापळा रचतात. अ‍ॅज युजअल अली संकटात सापडतो आणि हीरो हीरालाल मधल्या "फटा पोस्टर निकला हिरो" म्हणणार्‍या नसीरुद्दीनसारखा पोस्टर फाडुन न येता जय दिक्षीत एक आख्खी वीट सिमेंटची भिंत चिरुन रिक्षासकट अवतरतो. मोठ्या चोराला पकडण्यापुर्वी जय आणि अली चेन्नईतल्या लोकल गुंडावर हात साफ करुन घेतात. या दरम्यान केवळ एक ब्रेक मारल्यासरशी जय अलीच्या मोटारसायकलवरुन दुसर्‍या मजल्यावरच्या गुंडाच्या छाताडात एक फाइट मारुन परत गपगुमान बाइक वर येउन बसतो. एकाच रिफ्लेक्स मध्ये. धन्य तो फाइट मास्टर आणि धन्य धन्य ते यशराज फिल्म्स वाले.

मग जय अली थेट शिकागोत येतात आणि शिकागो पोलिस आणि बँक अधिकार्‍यांना 'ज्या अर्थी हा चोर बॅंक ऑफ शिकागो ला संपवण्याची धमकी देतो आहे त्या अर्थी बँकेने नाडलेला एक ग्राहक असणार' हे शाश्वत सत्य सांगुन त्यांच्या बत्त्या गुल करतात. साक्षात शेरलॉक होम्सला लाजवेल इतका लाजवाब तर्क लढवुन केस सोडवणार्‍या जय दिक्षीतला बघुन आपण योग्य माणसाला बोलावले याची साक्षात बराक ओबामाला देखील खात्री पटली असावी. तर हा जय दिक्षीत तारे तोडतो की हा चोर खुपच बालीश असल्याने असले अतिआत्मविश्वासी चाळे करतो आहे. हे ऐकुन पित्त खवळलेला आमीर एक वेगळीच शक्कल लढवतो आणि त्याला मदत करत असल्याचे भासवुन त्याच्या गोटात प्रवेश मिळवतो. त्याचदरम्यान तो त्याची (म्हणजे बापाची) सर्कसदेखील पुनर्जीवित करतो. त्याच्या सर्कशीत अर्थातच एका नायिकेची गरज असते. ती गरज कॅट्रिना कैफ भागवते. असे म्हणतात की 'सत्यम शिवम सुंदरम' मधला रोल मिळवण्यासाठी झीनत अमान (केवळ) पांढरी साडी नेसुन राज कपूरच्या ऑफिसमध्ये गेली आणि त्याच्याच बाथरुम मध्ये साडीसकट सचैल स्नान करुन त्याच्यासमोर जाउन उभी राहिली. रोल न देण्याइतका राज कपूर येडा नव्हता. कॅट्रिना कैफ ही थोडेफार तसेच करते. स्ट्रीप्टीज डांस करुन दाखवते (कल्पनाशक्तीचे वारु फार उधळु देउ नका. लज्जारक्षणापुरते कपडे अंगावर ठेवते). रोल न देण्याइतका साहिर खानही येडा नसतो. संपुर्ण चित्रपटात कमीत कमी कपड्यात नाचुन, वेळप्रसंगी (किंबहुन वेळ मिळेल तेव्हा) कपडे उतरवुन किंवा मुळातच कमी घालुन कॅट्रिना कैफ चित्रपटातली स्त्री पात्राची गरज पुर्ण करते. चित्रपटात तिचे योगदान हे इतकेच. बाकी तिच्यापेक्षा जास्त मोठा रोल आमीरच्या बाइकला आहे,

तर पुढची चोरी आमीर खान नेमकी त्याच्या सर्कशीच्या ओपनिंग च्या दिवशीच करतो. बॅंकेच्या शाखेचे सगळे नकाशे आणि पासवर्ड्स त्याला जय कडुन आपसूक मिळतात. पण चोरी करुन पळत असताना झालेल्या पाठलागात त्याला गोळी लागते. ती नक्की रजनीकांतची गोळी असणार. कारण हवेत उडणारी, जमिनीवर पळणारी, दोरीवर चालणारी, पाण्यावर बोट होउन पळणारी आणि पाण्यातुन जमिनीवर आणि जमिनीतुन पाण्यावर हे हेलपाटे करता करता बोट ते बाईक असे स्थित्यंतर करणारी अशी ती बी एम डब्ल्युची आमीरने स्वतः विकसित केलेली जादूची मोटारसायकल असतानाही आमीरला गोळी लागते हेच मोठे आश्चर्य. पण ट्विस्ट नं. १ तो साहिर खानच आहे हे अचूक ओळखुन जेव्हा जय आणि अली सर्कशीत पोचतात तेव्हा आमीर खान ला गोळी लागलेलीच नसते. गोली जमीन खा गयी या बाइक निगल गयी? जयचा प्लॅन फिस्कटतो आणि बडे बेइज्जत होके त्याला अपयशी ठरल्याबद्दल बँकेचे अधिकारी केसवरुन डिसमिस करतात. आपल्याला प्रश्न पडतो की भारतीय सरकारच्या सेवेत असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याला नक्की कोणी बोलावलेले असते बॅंकेने की शिकागो पोलिसांनी? (पण हे असले फालतु प्रश्न विचारायचे नाहित. चित्रपट पाहत राहयाचा. पैसे देउन तिकीट काढायचे वर तर्क देखील लढवायचे आणि चित्रपटात तर्काचा अंश शोधायचा हे धेडगुजरी धंदे सांगितलेत कोणी? ) पण तरीही न परतता जुनाट खोकल्यासारखे चिकटुन राहयचे ठरवुन जय अली तिथेच ठिय्या देउन राहतात कारण चोराला न पकडता ते परतले तर तो आख्ख्या भारताच्या आणि भारतीय पोलिसदलाच्या अस्मितेचा गहन प्रश्न नाही का?

तर आता आमीर खान चोर असतो हे आपल्याला आधीपासुनच माहिती असते. आता ते जय दिक्षीतलाही समजते. पण तरीही बुलेट गेली कुठे हे रहस्य राहतेच. त्याचे गुपित खुपच प्रेडिक्ट्बल आहे. मल्लिका शेरावतचे देहप्रदर्शन, सिमेंट मध्ये पाय रोवुन ऑफचा बॉल टोलवण्याचा प्रयत्न करणार्‍या सदगोपन रमेशचे भाग्य, मनमोहसिंगांची कुठल्याही विषयावरची प्रतिक्रिया आणि सकाळचे राष्ट्रवादीच्या कुठल्याही घोटाळ्यांवरचे मौन इतकेच प्रेडिक्टेबल असलेले असुन देखील ते गुपित इथे सांगणे अप्रस्तुत ठरेल. प्रेक्षकांना ते असेही मध्यंतरानंतर लगेच कळतेच. पुढची एकमेव महत्वाची घटना म्हणजे बँक ऑफ शिकागोची तिसरी ब्रांच फोडुन "फायनल नेल इन द कॉफीन" का काय ते करुन बँकेला कायमचे टाळे लावण्याचा प्रयत्न आमीर खान करतो. अजुन एक ब्रांच फोडली म्हणजे बँक बुडाली हे काही मला न झेपणारे प्रकरण आहे. इथे विमा वगैरे काही प्रकार आहे याची बहुधा यशराज फिल्म्सला जाणीव नसावी.

पुढे काय होते म्हणजे कॅट्रिना कैफ नक्की कोण असते, बुलेट कुठे गेली, आमीर त्याच्या प्लॅन मध्ये यशस्वी होत्यो की नाही, जय आणि अली चोराला पकडु शकतात की नाही हे चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल. अर्थात हे सगळे वाचुन तुम्ही चित्रपट पाहिलात तर.

चित्रपट पहावा का? तर जरुर पहावा. चकाचक बाइक्स, धूमची चिरपरिचित धून, चिकणी चमेली (आपली कॅट्रिना) आणि तिचे (न घातलेले किंवा घालुन काढलेले) कपडे, अलीचा वेडसरपणा (हे बाकी झ्याक जमले आहे. नॅचरल अ‍ॅक्टिंग यु सी), शिकागो (अजुन पाहिले नसेल तर), भक्कम तांत्रिक बाजु, उत्कृष्ट स्टंट्स, उत्तम छायाचित्रण या सगळ्यासाठी अवश्य पहावा. व्वॉव आमीर असे चित्कारायला आवडत असेल तर नक्की पहावा. आमीर परफेक्शनिस्ट आहे आणि उच्चकोटीचा अभिनेता आहे हे मत असेल तर जरुर पहावा. आपले मत कायम होइल. हर्ष, खेद, संताप, स्नेह, प्रेम, विषाद वगैरे सग्गळे सग्गळे तो त्याच्या सामवेदी (म्हणजे फक्त तीन स्वरांच्या) स्केलवर दाखवू पाहतो ( वाक्य श्रेय: ररा) असे मत असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. तुमचे मत अजुन ठाम होइल. (दोन्हीबाजुनी ढोल वाजवल्यासारखे वाटते आहे ना. पणा तसेच आहे ते). तार्किकतेच्या सगळ्या कसोट्या बाजुला ठेउन ३ तासाची निर्बुद्ध करमणूक हवी असेल तर नक्की पहावा (एरवी मास्क न घालता चोरी करणारा चोर एवढ्या मोठ्या बॅकेच्या कुठल्याच सिक्युरिटी क्यामेर्‍यात कसा कैद होत नाही, त्याला बघितलेले डझन भर लोक असतानाही त्याचा माग शिकागो पोलिसांना कसा लागत नाही, शिकागो पोलिसखाते इतके निर्बुद्ध आहे का की त्यांना अली सारखा निर्बुद्ध पोलिसवाला आयात करावा लागतो हे आणि असले इतर अनेक तार्किक प्रश्न तुम्हे चैन से जीने नही देंगे).

अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार. आमीरच्या आले मना लुटले एका बँकेला अशी परिस्थेती आहे. इतके सिक्युरिटी क्यामेरे, पासवर्ड्स, सुरक्षारक्षक, सुरक्षा यंत्रणा हे भेदुन आमीर पाहिजे तेव्हा रॉबरी करतो हे बघितल्यावर चित्रपटात जादूगर दाखवलेला आमीर खान कुठल्याही क्षणी " मै जादूगर है मेरा नाम गोगा. मुझ जैसा नही कोई होगा" असे कोकलत गाणे गाणार असे वाटत राहते. आमीरचा गजनी क्रिस्तोफर नोलानच्या मेमेंटोवर बेतलेला होता तर धूम ३ बर्‍यापैकी द प्रेस्टिज वरुन चोरलेला आहे. आमीर आता नोलानच्या द डार्क नाइट आणि इंसेप्शनला कधी मूठमाती देतो याची उत्कंठा आहे.

धूम ३ चा मराठी रिमेक कधी येतो याचीही उत्कंठा आहे. कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. प्रश्न इतकाच आहे की. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. मकरंदला पकडण्यासाठी वेगळे पोलिस मागवण्यापेक्षा बँकेतले एकाहुन एक खत्रुड कर्मचारीच त्याच्या मागे सोडता येतील. अर्थात ते तब्येतीत त्यांना झेपेल तेवढाच पाठलाग करतील त्यामुळे चोर कधी पकडला जाइल की नाही कोणास ठाउक.

मकरंद अनासपुरेचा सुपर इनोदी धूम मराठी रिलीज होइपर्यंत आमीरचा धूम बघायला हरकत नाही. आये थे थ्रिलर देखने जा रहे हे कॉमेडी लेके अशी अवस्था झाली तर मला बोल लावु नका आणि थेटरात जाउन बघायची अगदी मस्ती असेलच तर स्वतःच्या घाम गाळुन कमावलेल्या पैशांवर थोडे उपकार करा आणि मॉर्निंग शो ला जा. स्वस्तात काम होइल.

कलाबालकथाऔषधोपचारमौजमजाचित्रपटसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखअनुभवमतशिफारससल्लामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

विद्युत् बालक's picture

22 Dec 2013 - 11:05 pm | विद्युत् बालक

मला आजकाल हिंदी पिच्चर पाहणाऱ्या लोकांची प्रचंड कीव येते !

मंदार दिलीप जोशी's picture

24 Dec 2013 - 3:49 pm | मंदार दिलीप जोशी

अनुमोदन

मस्त परिक्षण :D

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2013 - 12:13 am | हतोळकरांचा प्रसाद

+१. फक्त मराठी अभिमान आहे म्हणून नाही तर खरच कीव करण्यासारखे सिनेमे असतात आजकाल. बाकी लोकांची मनोरंजन पातळी इतकी खाली (म्हणजे स्केलवर म्हणायचे आहे मला :)) आणून ठेवण्याचे कर्तब ह्या सिनेमावाल्यांना जमले आहे बुवा!!

धन्या's picture

22 Dec 2013 - 11:14 pm | धन्या

भन्नाट परिक्षण !!!

तिकिटासाठी असलेली गर्दी आणि तिकिटाचे मुल्य दोनशे रुपये असल्याचे पाहून परत आलो ते उत्तम झाले म्हणायचे. कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.

विद्युत् बालक's picture

22 Dec 2013 - 11:30 pm | विद्युत् बालक

कुठल्यातरी ब्रॉडबँडवाल्या मित्राच्या कृपेने पाहीन कधीतरी.
हेच म्हणतो , कशाला थेटरात जायचे आजकाल कोणत्याही पिक्चर ची DVD प्रिंट हि एका आठवड्यात येते . मारायची डाउनलोड आणि पहायचे घरी मोठ्या स्क्रीन वर दहा रुपयाच्या इंस्तट पॉपकॉर्न बरोबर ! साला मक्स मधील तिकिटाचे २००-३०० आणि सामोसा कोक वैगैरे ह्यांचे १०० असे ५०० रुपये तरी वाचतील.

हतोळकरांचा प्रसाद's picture

26 Dec 2013 - 12:20 am | हतोळकरांचा प्रसाद

एक तर्क…. सिनेमागृहात सिनेमाला गेलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त लोक हे सिनेमा बघायाला जाण्यापेक्षा कोणालातरी सिनेमा दाखवायला गेलेले असतात. :)

काळा पहाड's picture

23 Dec 2013 - 12:29 am | काळा पहाड

तिकिटाचे मुल्य दोनशे रुपये

यवढ्या सौस्तात? वडगाव बुद्रुक च्या थेटर मधले रेट सांगताय की काय?

वडगाव बुद्रुक च्या थेटर मधले रेट सांगताय की काय?

हो. फनटाईम.

आदूबाळ's picture

23 Dec 2013 - 2:55 am | आदूबाळ

फनटाईमच्या (मोडक्या) खुर्च्यात ढेकणं आहेत राव... थेट अप्सरा टॉकीजमधून आयात केली असावीत.

आनंदी गोपाळ's picture

26 Dec 2013 - 8:16 pm | आनंदी गोपाळ

मोडकी नसलेली खुर्ची पाहून बसावे ;)

सौंदाळा's picture

23 Dec 2013 - 11:13 am | सौंदाळा

सहमत.
चित्रपट थेटरात जाऊन पाहणे म्हणजे निर्मात्याचे काळे पैसे पांढरे करुन देणे असे माझे मत आहे.

ग्रेटथिन्कर's picture

22 Dec 2013 - 11:22 pm | ग्रेटथिन्कर

निर्बुद्ध लेख

ट्रोलिंगची हद्द झाली राव. :)

खटपट्या's picture

22 Dec 2013 - 11:30 pm | खटपट्या

अहो साहेब आता यामध्ये निर्बुद्ध काय आहे ? तुम्ही चित्रपट पहिला आहे का ?

विद्युत् बालक's picture

22 Dec 2013 - 11:35 pm | विद्युत् बालक

त्यांच्या मते भारताची घटना सोडून सगळेच लेखन हे निर्बुद्ध आहे !
टोयलेट पेपर व कोणतेही लेखन हे ते समान मानतात

पण चुकून इथे पडला असावा!

सुहास..'s picture

23 Dec 2013 - 1:49 pm | सुहास..

निर्बुद्ध लेख >>>

यांना आपलं म्हणा रे !!

आपला प्रतिसाद प्रिज्युडाईस न ठेवता, लेखाला द्या ;)

राजेश घासकडवी's picture

22 Dec 2013 - 11:31 pm | राजेश घासकडवी

(दोन्हीबाजुनी ढोल वाजवल्यासारखे वाटते आहे ना. पणा तसेच आहे ते)

वगैरे वाक्यं छानच. मराठी रीमेकची कल्पनादेखील आवडली.

आणि पुढचा सगळा भाग विषेश आवडला!

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Dec 2013 - 11:40 pm | लॉरी टांगटूंगकर

__/\__ उत्तम चीरफाड केलेली आहे.

प्रवासाचे योग दिसत असल्याने हा शिनेमा लवकरच बघायला मिळेल. कंड़क्ट्र्रची जय हो!
अवांतर-मिपाचं गमभन ओपेरावर पण गंडतय.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Dec 2013 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

बेफाम! =))

हुप्प्या's picture

22 Dec 2013 - 11:47 pm | हुप्प्या

इंग्रजीत मॅड नामक एक विनोदी मासिक असायचे (अजूनही असते पण दर्जा घसरला आहे). त्यात अशीच शेलके चित्रपट घेऊन त्यांची टिंगलटवाळी केली जाते.
ती सचित्र असते आणि त्यामुळे जास्त मजा येते. ( बालिवूडकरता असे काही बनेल अशी आशा आहे. कारण त्याकरता भरपूर ऐवज आहे.)
तुमचे परीक्षण वाचून असेच वाटले. अती हाईपचा फुगा असा टाचणी लावून फोडल्याबद्दल आभार!

बाळकराम's picture

22 Dec 2013 - 11:52 pm | बाळकराम

साष्टांग नमस्कार घ्यावा!

किसन शिंदे's picture

22 Dec 2013 - 11:55 pm | किसन शिंदे

एकदम जबराट परिक्षण!! फक्त आणि फक्त आमीरसाठी हा सिनेमा पाहायला जाणार होतो, पण आता ते ही करणार नाही. बाकी व्हॉट्सअपच्या कृपेने सगळीच्या सगळी स्टोरी आधीच कळालेली आहे. :)

पुढे काय होते म्हणजे कॅट्रिना कैफ नक्की कोण असते

कळालं कळालं!!(इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली) :D

इथे जय दिक्षीतची आधीच्या दोन चित्रपटातली युक्ती आठवली

चुक्या किसना तू.. खरं सांगायचं तर ती कोणीच नसते.. :))

मुक्त विहारि's picture

23 Dec 2013 - 12:08 am | मुक्त विहारि

काय बोलणार?

जावूदे मी आपला परत एकदा "प्रेस्टिज" बघतो...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2013 - 1:05 am | निनाद मुक्काम प...

ह्या विषयावर आधी सुद्धा लिहिले होते ,आता परत एकदा लिहितो.
चेपू वर धूम ३ पाहून किती म्हणजे किती म्हणजे निराशा झाली अश्या धाटणी चे प्रतिसाद वाचले तेव्हा मिपा वर अश्या धाटणीचा लेख येणार ह्याची कल्पना होती.
लेखाच्या मजकुराची सहमत.

पण ह्या सिनेमा बनवताना यश राज ने अक्कल गहाण टाकून सिनेमा का बनवला ह्याचे उत्तर सोपे आहे
अक्कल गहाण टाकून तो पाहणारे भारतीय वंशांचे दीड शहाणे जगभरात पसरले आहेत.
यश राज चे आधीचे सिनेमे पाहता गेलाबाजार जब तक हे जान
पाहता परत खिशात पैसा जास्त खुळखुळत आहे किंवा
एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात
अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात.
सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते.
आमिर आहे म्हणून पहिला नाहीतर .. असे म्हणणाऱ्या लोकांचा उतावीळपणा पाहून गंमत वाटते.

ह्या लोकांनी शुक्रवार ते रविवार कळ सोसली असती तर सदर सिनेमे घरच्या घरी काही महिन्याने पाहायचा का नाही ह्याचे उत्तर मिळाले असते.
पण ह्या लोकांमुळे पहिल्या ३ दिवसात सिनेमा १०० कोटी कमवत असेल तर आपल्या सिनेमाचा अश्या लोकांच्या शिव्या शापाच्या किंवा उपहास पूर्ण शैलीत पंचनामा झाल्यामुळे यश राज अजून खुश होऊन पुढच्या वेळी असाच सिनेमा बनवणार , त्याची जाहिरात करणार व
परत आमचे उत्साही समीक्षक पहिल्या तीन दिवसात हा सिनेमा पाहून तो किती भिकार आहे हे खरडायला घेणार.

जर ३ जानेवारी पर्यंत थांबला असता तर मराठी विरंगुळा
पहिला असता आणि तो विरंगुळा आवडला नसता तरी पैसे शेवटी मराठी माणसाच्या खिशात गेले हे समाधान लाभले असते.

किसन शिंदे's picture

23 Dec 2013 - 1:17 am | किसन शिंदे

एवढे प्रमोशन केले आहे तर पाहूया तरी एकदा, असे दर वेळेला म्हणून काही दर्दी लोक नेहमी पहिल्या आठवड्यात
अधाश्यासारखे सिनेमे पाहून घेतात.
सिनेमा पाहून बाहेर आपल्यावर त्यांना लगेच चेपू किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट वर भिकार सिनेमा हा कसा भिकार आहे हे सांगण्याची हुक्की येते.

+ प्रचंड ११११११११११

माझ्या बघण्यात असे काही नग आहेत की जे सिनेमा रिलीज झाल्या झाल्या शुक्रवार किंवा शनिवार फार उत्साहाने पाहायला जातात आणि रविवारी सकाळी चेपूवर सिनेमा अतिशय वाईट असल्याचे किंवा 'हे भगवान मी कशाला बघितला हा सिनेमा' स्टेटस असते(याच नगांचे). हे सगळं पाह्यलं की खुप हसायला येतं.

मला एक प्रश्न नेहमी पडतो की चेपुवर असे स्टेटस टाकून त्यांना आपल्या बाकीच्या मित्रांचे पैसे वाचवायचे असतात कि तुमच्याही आधी आम्ही सिनेमा पाहून आलोय याचा टेंभा मिरवायचा असतो. :D

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2013 - 10:27 am | llपुण्याचे पेशवेll

अहो ते हलाहल कोणत्यातरी शंकराने प्यायले नाही तर आमच्यासारखे पामर वाचणार कसे हो त्यातून?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2013 - 1:45 am | निनाद मुक्काम प...

शिनेमा पाहून घ्यायचा , तो पहिला हे जगाला सांगायचे
व उच्चभ्रू आव आणत आज पूर्वी सारखे शिनेमे बनत नाहीं ,
किंवा पूर्वीचे बॉलीवूड आता राहिले नाहीं असे म्हणत उसासे टाकायचे

प्यारे१'s picture

23 Dec 2013 - 2:19 am | प्यारे१

भन्नाट रे मृत्यो!
सालं काढलीस. (आमीर खान बद्दल हाईप जास्त असते कधी कधी.)

पाषाणभेद's picture

23 Dec 2013 - 4:19 am | पाषाणभेद

औषधोपचार टॅग कशासाठी ठेवलात? हा असला चित्रपट पाहून औषधोपचारासाठी दुसरा धागा हवा ना!

हुप्प्या's picture

23 Dec 2013 - 4:28 am | हुप्प्या

http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges...

धूम तृतीयमधील शिकागो पोलिसांच्या अब्रूचे खोबरे केलेले पाहून खोब्रागडे प्रकरणात तडजोड करण्याची ओबामानी तयारी दाखवली आहे!!!
आणि ही संबंधित बातमी
http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/nation-ready-for-uday-chopra...

उदय चोप्राला निवृत्तिचा पुनर्विचार कराल का असा प्रश्न विचारल्यामुळे पत्रकाराला उदय चोप्रा फॅन्सची जोरदार मारहाण !!!

जेपी's picture

23 Dec 2013 - 6:57 am | जेपी

जबर परीक्षण .

कोणाच्या लज्जारक्षणापुरते? तिच्या की बघणाऱ्यांच्या?

नंदन's picture

23 Dec 2013 - 9:01 am | नंदन

अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.

नेमकं!

धूम ३ चा मराठी रिमेक कधी येतो याचीही उत्कंठा आहे. कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल. प्रश्न इतकाच आहे की. वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. मकरंदला पकडण्यासाठी वेगळे पोलिस मागवण्यापेक्षा बँकेतले एकाहुन एक खत्रुड कर्मचारीच त्याच्या मागे सोडता येतील. अर्थात ते तब्येतीत त्यांना झेपेल तेवढाच पाठलाग करतील त्यामुळे चोर कधी पकडला जाइल की नाही कोणास ठाउक.

=))
अगागागा, बँकेचंच 'डिपॉझिट जप्त' केलंत की राव!

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

24 Dec 2013 - 5:34 pm | नॉन रेसिडेन्षिय...

हा हा हा अगदि बरोबर बोलतायेत !
अहो त्यान्चे खाते असनार त्या शाखेत्!स्वअनुभव!

पिंपातला उंदीर's picture

23 Dec 2013 - 9:07 am | पिंपातला उंदीर

तो " रत्ताळ्या तुझी ब्यांक लुटतोच बघ मी आता" अशी धमकी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वदगाव बुद्रुक शाखेवर लिहुन ठेवतो असे दाखवता येइल.

जबरि. झक्कास : )

फारएन्ड's picture

23 Dec 2013 - 9:27 am | फारएन्ड

धमाल लिहीले आहे! लै हसलो. ती भेळवाल्याकडचे पर्याय व यश-राज कडचे, याची तुलना महान आहे :)

पहिले दोन्ही धूम बर्‍यापैकी बघणेबल होते. हा एवढा वाईट कसा कोणास ठाउक - दिग्दर्शक बदलला म्हणून असावा.

आणि हो, सडगोपन रमेश च्या उदाहरण ही जबरी :)

स्पा's picture

23 Dec 2013 - 10:27 am | स्पा

अगदी एका वाक्यात सांगायचे झाल्यास धूम ३ म्हणजे "आली लहर केला कहर. खर्च तर होणारच. होउ द्यात खर्च" टाईपचा चित्रपट आहे. प्रॉब्लेम इतकाच की लहर यशराजवाले करणार आणी खर्च पब्लिकचा होणार.

=))

प्रचेतस's picture

23 Dec 2013 - 10:42 am | प्रचेतस

क ह र.
काय हाणलंय बे.

पैसा's picture

23 Dec 2013 - 11:00 am | पैसा

मरेपर्यंत हसले! पण तरी "अभिषेक बच्चन" साठी सिनेमा बघणार आहेच्च!! =))

ब़जरबट्टू's picture

23 Dec 2013 - 11:52 am | ब़जरबट्टू

तरीच म्हटंले, तुमच्यासारखे पखें असल्याशिवाय २०० कोटी कमावतात कसे...

"आणी अमिताभ रडला " नावाचे नविन सदर लवकरच येणार्रे बहुदा... :)

फारएन्ड's picture

26 Dec 2013 - 10:59 am | फारएन्ड

आप्पुन भी ज्यु बच्चन फॅन है. यात आमिर अगदी "काय भारी काम करतो" ई असला तरी अभिषेकनेही काही वाईट काम केलेले नाही. अजिबात ऑथर-बॅक्ड रोल नसताना सुद्धा तो सीन मधे चपखल आहे. उलट त्याच्यासारखा स्क्रीन प्रेझेन्स या चित्रपटात दुसर्‍या कोणाचाच नाही. अभिषेक ने पूर्वी अनेक भंपक रोल केलेले आहेत हे खरे आहे. पण तो पूर्वग्रह थोडा बाजूला ठेवून पाहिला तर यातला त्याचा रोल वाईट नाही. आमिर व त्याचे एकत्रित सीन पाहा.

तो रिक्षावाला स्टंट मला चित्रपटात सर्वात आवडलेला सीन आहे. तो मुद्दाम सिंघम-दबंग छाप फायटिंग चे विडंबन म्हणून केलेला आहे. अभिषेक ने धमाल केली आहे त्या सीनमधे.
(ही सर्व पोस्ट अभिषेकच्या फॅन ने लिहील्यासारखी वाटली, तर त्याचे कारण म्हणजे ती तशीच आहे :) )

२००-३०० रु. मधे शिकागो दर्शन + जादुचे प्रयोग + कतरिनाचा डान्स --- असं पॅकेज तुम्हाला कोण देईल? यशराज ने दिले तरी तुम्हाला त्याचं कौतुक नाही?
म्हणुनच मराठी माणुस मागे पडतो (कशात माहित नाही.. असं म्हणायची पद्धत आहे) *cray2* :'( :'-(

मदनबाण's picture

23 Dec 2013 - 11:28 am | मदनबाण

जबराट परिक्षण !

कपडे उतरवण्याचा अती सोस असलेली नायिका
चित्रपटात कमीत कमी कपड्यात नाचुन, वेळप्रसंगी (किंबहुन वेळ मिळेल तेव्हा) कपडे उतरवुन किंवा मुळातच कमी घालुन कॅट्रिना कैफ चित्रपटातली स्त्री पात्राची गरज पुर्ण करते.
हेच तर ! हा नक्की सोस कसा असतो ? तो पूर्ण भागवला कसा जातो ? गरज नक्की कशी पूर्ण केली जाते ? यावर जमेल तसे चिंतन-मनन करण्यासाठीच असे विचित्रपट पाहण्याचे कष्ट कधी कधी माझ्या नेत्रांना मी देतो. ;) माझ्या मते इतका सोस दाखवुन गरज पूर्ण करण्याचे कष्टच तर अशा विचित्रपटात पाहण्या सारखे असतात ! ;)

इशा१२३'s picture

23 Dec 2013 - 11:32 am | इशा१२३

किती तुमची करमणुक झाली आणि उगा नाव ठेवायची....हसुन हसुन दमले..परत ठेटरात जाउन बघू का..

मृत्युन्जय's picture

23 Dec 2013 - 11:35 am | मृत्युन्जय

हसण्यासाठी आणी कमेंट करण्यासाठी थेटरात नक्की जावे. जाताना आपण एक भयंकर विनोदी चित्रपट पहायला लचाललो आहोत हे जरुर ध्यानात ठेवावे म्हणजे झाले :)

प्रमोद्_पुणे's picture

23 Dec 2013 - 11:34 am | प्रमोद्_पुणे

आता तर नक्कीच पहावा लागणार.

आतिवास's picture

23 Dec 2013 - 11:52 am | आतिवास

मजा आली.
चित्रपट पाहण्यापेक्षा अशी परीक्षणं वाचावीत असं वाटायला लावणारी चिरफाड :-)

ब़जरबट्टू's picture

23 Dec 2013 - 11:53 am | ब़जरबट्टू

जबर परीक्षण.. धो धो धुतलाय शिनेमा ला... :))

देशपांडे विनायक's picture

23 Dec 2013 - 12:05 pm | देशपांडे विनायक

I S जोहर नावाचा एक विनोदी नट होता . त्याने ६० वर्षापूर्वी सांगितलेले सिनेरसिकांच्या वयाबद्दलचे मत आजही सिनेक्षेत्रात मान्यता टिकवून आहे . याचा पुरावा मिळाला
भारतीय सिनेरासिकांचे बौद्धिक वय १२वर्षे [अक्षरी : बारा वर्षे] आहे असे त्याचे मत होते
तुमचे तेच मत असेल तर = आणि नसेल तर # खुणा करून प्रतिसाद द्या

लक्ष्या's picture

23 Dec 2013 - 12:24 pm | लक्ष्या

चित्रपट बघण्याचा वेळ आणी पैसा वाचवल्या बद्द्ल धन्यवाद. तुमच्या लेखना वरुन "मालेगाव का धुम-३" होवु शकतो.

सुहास झेले's picture

23 Dec 2013 - 12:46 pm | सुहास झेले

भन्नाट... होऊ द्या खर्च :)

मंदार कात्रे's picture

23 Dec 2013 - 12:50 pm | मंदार कात्रे

धम्माल परीक्षण!

पब्लिकचे पैसे वाचवल्याबद्दल (आगावू) धन्यवाद!

सुहास..'s picture

23 Dec 2013 - 1:53 pm | सुहास..

एकदम कडक !!

सोमवारची सक्काळ सार्थकी लागली !!

काल-परवा एका मित्राशी बोलत होतो त्याने सांगता सागंता सांगीतले ( जसे मी सांगतो आहे ;) ) की पिच्चर मध्ये अमिर चा डब्बल रोल आहे ते ! तेव्हाच हात जोडले होते , आता तुझे परिक्षण वाचुन ( आधी तर ह ह पु वा , अरे काय ते सिक्वेल चे पंच !! ) तर लांबुनच नमस्कार धुम ला ..एकुण काय तर धुम बघुन धुम ठोकणार :)

प्यारे१'s picture

23 Dec 2013 - 2:02 pm | प्यारे१

ते धूम आहे रे वाश्या.
'धुम' म्हणतो आहेस सारखा त्यामुळं धमुची (धम्या) ची आठौण आली नि ड्वाळे पाणावले की रे!

परिक्षण आवडलं, न पाह्यल्याचं समाधान वाटतंय.

आमीर आहे म्हणल्यावर जरा 'लॉजिक' ची अपेक्षा धरुन होतो...पण .......असो.
अवांतरः तुमचे परिक्षण जर अभिषेक, उदय (आणी एकुणच सगळे) ह्यांना कळलं तर ते गोरक्षणसंस्थेची पेटी घेउन श्लोक म्हणत हिंडतील....

सायली कोठावळे's picture

23 Dec 2013 - 3:07 pm | सायली कोठावळे

मस्त परीक्षण..
पण हे असलेच चित्रपट १०० कोटी २०० कोटी असा गल्ला गोळा करतात. त्यामुळे असल्या गल्लाभरु चित्रपटांना कशीही मरण नाही..

सायली कोठावळे's picture

23 Dec 2013 - 3:10 pm | सायली कोठावळे

मस्त परीक्षण..
पण हे असलेच चित्रपट १०० कोटी २०० कोटी असा गल्ला गोळा करतात. त्यामुळे असल्या गल्लाभरु चित्रपटांना कशीही मरण नाही..

त्यात त्या छोटा बच्चन व चोप्रा कुलवंताचे पाणचट, बाष्कळ आणि फालतु चाळे बघुन डोक्यात तिडीक येते...

अवांतरः र..राजकुमार कसा काय वाचला अश्या चिरफाडीतुन? कोणीतरी त्याची पण पिसे काढा राव.

_मनश्री_'s picture

23 Dec 2013 - 4:20 pm | _मनश्री_

खूप छान
खूप मस्त आहे परीक्षण

मनिष's picture

23 Dec 2013 - 4:40 pm | मनिष

भन्नाट परिक्षण!! :-)

ओबामा खोब्रागडेंवरचे आरोप मागे घेईल म्हणतोय, जर 'धुम' मधून शिकागो पोलीसांची टवाळी काढली तर! :P
http://www.fakingnews.firstpost.com/2013/12/obama-offers-to-drop-charges...

सस्नेह's picture

23 Dec 2013 - 4:54 pm | सस्नेह

धम्माल परीक्षण !

गणपा's picture

23 Dec 2013 - 4:56 pm | गणपा

_/\_
पायलागू म्हाराज.
(रामानंद सागर, चोप्रांच्या )रामायण महाभारतात जसे एका तीरातून अनंत तीर निघायचे तसाच काहीसा प्रत्यय हे वस्त्रहरण वाचताना आलं. एकाच लेखातुन कित्ती कित्ती तो संहार. =))

तिमा's picture

23 Dec 2013 - 7:02 pm | तिमा

नाहीतरी आम्ही असले सिनेमे पैसे खर्च करुन पहायचे कधीच सोडून दिले आहे. पण हे असलं आवडणारी बहुसंख्य प्रजा असेल तर या देशाचे भविष्य फारच उज्वल(नशील) आहे असे वाटते.

amit_m's picture

23 Dec 2013 - 7:28 pm | amit_m

बाकी तिच्यापेक्षा जास्त मोठा रोल आमीरच्या बाइकला आहे,

ह ह पु वा...

लैच जब्रा मापं काढलीत राव.
एकच नंबर.
(तरी म्या म्हणत होतोच आमीर बेटा प्रमोशन का करेना गेलाय? त्याला पण अंदाज आलेला दिसतोय :) अभिशेक न उदयचोप्रा काय बलुत्यावरचे कल्लाकार हैत. वर्षभराच्या ज्वारीवर काम केल्यागत धूम करतेत. )

मी आ.खा. चा पंखा असलो तरी परीक्षणे वाचल्याशिवाय चित्रपट(कोणताही आणि कितीही चांगला असला तरी) पहाण्याचे धाडस करत नाही.
आजच मी हापिसात डालो करून हा चित्रपट पाहिला. आ.खा. चा अभिनय सोडला तर कथा? आणि इतर… बकवास. इतरत्र वाचल्याप्रमाणे, अभिषेक आणि उदय साठी यशराजचा चित्रपट म्हणजे रोजगार हमी योजना.
मिपाकरांनो, पैसे वाचवा. अजिबात बघु नका हा चित्रपट. पाहिजे तर मी तुम्हाला डालो करण्याची लिंक देतो (१८१ MB फक्त).
वरती सांगितल्याप्रमाणे थोडी कळ सोसुन टाईमपास चित्रपट पहायला ते पैसे खर्च करा. किमान तुमचे पैसे मराठी चित्रपटासाठी तरी खर्च होतील. (मराठी चित्रपटासाठी होऊ दे खर्च!)

रमताराम's picture

23 Dec 2013 - 8:41 pm | रमताराम

<<आता बास, खुप झाले ५ दिवसात सर्कस खाली करायची आणि चालते व्हायचे.>> ते ब्यांकवाले त्या सर्कसचं काय करणार याची लै म्हणजे लैच उत्सुकता लागून राहिली आहे. जौ द्या. उत्तर मिळणार कुठून.

<<तो साहिर खानच आहे हे अचूक ओळखुन जेव्हा जय आणि अली सर्कशीत पोचतात तेव्हा आमीर खान ला गोळी लागलेलीच नसते.>> हॅ हॅ हॅ. 'परवरिश'मधला इनोदी खन्नाच डिट्टो. थतं बी त्यो अंडरवर्ल्डवालाच अस्तुय न्हवं का. आनि अबिषेक बाबाचा बापुसच त्येला गोळी हाण्तूय न्हवं. बापाच्या पावलावर पाऊल म्हनावं का ह्ये?

<<कुठल्याही रोलमध्ये एकाच पट्टीत, भाषेत आणि ढंगात बोलणारा मकरंद अनासपुरे अमीरची भूमिका करु शकेल. >> ह्ये बाकी बरुबर बोल्ला तुमी. मक्या हा आमीरचा पर्फेक्टं डमी हाय. दोगंबी यकाच पट्टीत, भाषंत आणि ल्हेज्यात बोल्तात. त्यो आमीर 'मंगल पांडे' असूं द्या का फुणसूक वँग-डू, यकाच आवाजात बोल्तंय. आनि अभिनय म्हन्त्याल तर अबिषेक आनि त्येची काम्पिटिसन असतीया 'कोनाचं थोबाड जास्ती इस्तरीवालं हाय' आशी. पन आमीर जिकतूय, त्येच्या भिवया तरी वर जात्यात आदूनमदून.

<<वडगाव बुद्रुक शाखेला लुटल्यावर त्याला आमीरच्या त्या तसल्या मोटारसायकलवरुन पळुन जाण्यासाठी लागणार्‍या पेट्रोल इतके तरी पैसे मिळतील की नाही कुणास ठाउक. >> पैशाचं सोडा ओ. त्ये गावत्याल यखांद्या टायंबाला. पर आमच्या शिंवगड रोडावर पाच-धा च्या स्पीडनं जानं मुश्किल थितं त्येची बाईक काय कामाची. चालत गेला तरी लवकर पोचल यवडी गर्दी शिंच्या त्या ब्यांकेजवळ. स्क्रिप्ट चेंज करावं लागंल थोडंसंक. त्यो डायरेक हेलिकॅप्टरने बिल्डिंगवर उतरतो असं दाकवावं लागंल, आनि ब्यांक लुटून उडताना त्येचं हेलिकॅप्टर इजंच्या तारात आडकून खाली पडतं नि अबिषेक त्येला थितं पकडतो असा येन्ड करावा लागंल.

रमताराम's picture

23 Dec 2013 - 8:42 pm | रमताराम

कापी-पेस्ट केल्यालं सम्दं कस्काय गायबलं, पुन्यांदा. याडमिन दादा/ताई कायतरी बगा हो.

दिवटा कारटा's picture

24 Dec 2013 - 9:02 am | दिवटा कारटा

"धन्य तो फाइट मास्टर आणि धन्य धन्य ते यशराज फिल्म्स वाले."

आपण केलेली चिरफाड आवडली.

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2013 - 2:21 pm | नगरीनिरंजन

लै भारी रिव्ह्यू!
हा पिच्चर टीव्हीवर आला तरी पाहीन की नाही शंकाच आहे.
आमिर खानच्या अकलेची झाकली मूठ उघडली हे मात्र ब्येस झालं.

मेघवेडा's picture

24 Dec 2013 - 3:32 pm | मेघवेडा

तंतोतंत!

रमताराम's picture

25 Dec 2013 - 12:15 pm | रमताराम

आमिर खानच्या अकलेची झाकली मूठ उघडली हे मात्र ब्येस झालं. >> कसं बोललात.

मी अलका ला पाहिला. स्टॉल ला बसून :)

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 3:21 pm | दिपक.कुवेत

बेक्कार हसतोय. पण तरी केवळ टिपी साठि हा चित्रपट पहाणार. बाकि गाणि तरी श्रवणीय आहेत का?

खटपट्या's picture

24 Dec 2013 - 11:16 pm | खटपट्या

कतरिना कैफ ने नृत्यामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. कतरिना कैफ चे फैन असाल तर जरूर बघा

चित्रगुप्त's picture

24 Dec 2013 - 6:22 pm | चित्रगुप्त

कुणाच्या तरी आग्रहास्तव त्यांच्याबरोबर हा सिणिमा बघायला निघण्यापूर्वीच नेमके हे वाचले. आता प्रश्न पडलाय, टु शी ऑर नॉट टु शी.

रमताराम's picture

25 Dec 2013 - 12:15 pm | रमताराम

टु शी ऑर नॉट टु शी.>> ह्या: ह्या: ह्या:

बबन ताम्बे's picture

24 Dec 2013 - 7:05 pm | बबन ताम्बे

सॉल्लिड ! हसुन हसुन मुर्कुन्डी वळ्ली .

करवीर निवासी's picture

24 Dec 2013 - 7:31 pm | करवीर निवासी

हे असले परीक्षण रेडीफ वर वाचायची सवय होती.
असो मी नविन आहे.....

विकास's picture

24 Dec 2013 - 8:32 pm | विकास

परीक्षण आले तेंव्हाच वाचले... खूप मस्त आहे. चित्रपट पहावा का? तर जरुर पहावा. हे वाक्य वाचून स्फूर्ती घेतली आणि पाहून टाकला एकदाचा! :)

असे सिनेमे वास्तवीक ग्रूप मधे कॉमेंट्स करत बघण्यात मज्जा येते. चक्क बॉस्टनच्या बाजूच्या केंब्रिजमधील थिएटर देसी लोकांनी (हाऊसफूल्ल नाही तरी देखील) भरलेले होते. बहुतेकांना मनोमनी खात्री (होपफुली) असावी की उगाच आलो आहोत, हे त्यांच्या जोरात हसण्यावरून समजत होते. पण काही पब्लीक मात्र काही वेळेस शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना बघून अंमळ काळजी वाटली! ;)

बाब्बौ! हे असलं पहायला कोण जाणार? अगदी हामिर्खान असला म्हणून काय झालं!
परिक्षण जमलय.

सखी's picture

26 Dec 2013 - 9:38 pm | सखी

वाटच बघत होते कधी येतय यावर परीक्षण (तुमचे नाहीतर फारएन्ड यांच्याकडुन), मस्त शालजोडीतले दिलेत. बेकार ह्सतेय.