माहेरचा अव्हेर!
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.