भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे.
मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
जय सोनियाजी!
http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to-...
-हुय्या
प्रतिक्रिया
12 Mar 2013 - 8:52 pm | श्रावण मोडक
मिपा (नेहमीप्रमाणे सध्या) गंडतंय हे माहिती आहे. त्यात आयडीही हॅक होऊ लागले आहेत की काय? ;-)
12 Mar 2013 - 9:07 pm | आजानुकर्ण
हुय्या या काल्पनिक आयडीने लेखन केल्यास कसे दिसेल हे पाहण्याचा प्रयत्न होता. आयडी हॅक वगैरे झालेला नाही. ;)
12 Mar 2013 - 9:13 pm | अर्धवटराव
आयला... काय ति डॉकॅलिटी =)) (साभार, अशोक सराफ - गा.त.चां.प.वे.टां.)
अर्धवटराव
12 Mar 2013 - 9:16 pm | विकास
जे झाले ते दुर्दैवी आहे. पण यात सोनीयाजींना गोवणे बरोबर ठरणार नाही. त्यांचा जन्मस्थळ म्हणून इटलिशी संबंध असेल पण त्यांनी बांधिलकी कायम भारताशी दाखवली आहे. क्वात्रोची,हेलीकॉप्टर घोटाळ्यात त्यांचे, गांधी घराण्याचे अथवा कॉग्रेसचे नाव गुंतवणे चुकीचे आहे. त्यांचा काही दोष नाही.
- विकास फत्ते
12 Mar 2013 - 9:27 pm | पिंपातला उंदीर
आमच्या गुजरात मध्ये असे होत नाही काही. ; )
12 Mar 2013 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो.
आम्ही काही काल जन्माला आलेलो नाही. आम्हाला सर्व कळते. अनेक देशी-विदेशी उद्योगपतींना पश्चिम भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानपदी बसवून स्वतःचे हित साधायचे आहे.
ते घडवून आणण्यासाठी परमत्यागी कुटूंबास बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे.
प्रेरणा
15 Mar 2013 - 10:33 am | हुप्प्या
केवळ इटलीतील लोकांनी केले म्हणून सोनियाजींवर आळ आणलात मग पाकिस्तानच्या प्रत्येक दुष्कृत्याचा दोष अडवानींना द्यायचा का? नाही म्हणजे तेही कराचीवाले आहेत म्हणून विचारतो.
--निस्सीम भक्ते
12 Mar 2013 - 9:32 pm | मदनबाण
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
या बाईंच इतक कौतुक वाचुन मला अगदी भडभडुन आलं बघा ! ;) इतक मोठ पद भुषवणार्या बाईंचे कर्तुत्व आणि राजकारणात टिकुन राहण्याचे कसब वाखाणावेच लागेल नाही ? ;)
एक वाचनिय दुवा :--- 'From waitress to world leader'
बाकी इटलीचे ते २ घे परत येणार नाही या बद्धल सरकारला किती काळजी आहे ते येत्या काही दिवसात कळेलच म्हणा !
जाता जाता :--- प्रत्येक डिफेन्स घोटाळा म्हणजे आपली संरक्षण दले प्रत्येक वेळी आधुनिक आणि सुरक्षित शस्त्र सामुग्री पासुन वंचित राहणार !
13 Mar 2013 - 3:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकी जमलंय. पण 'द हिंदू'ची लिंक दिलीत तिथे पितळ उघडं पडलं तुमचं! ही लिंक द्यायला पाहिजे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18924442.cms
15 Mar 2013 - 10:14 am | नितिन थत्ते
प्रयत्न चांगला आहे. पण तुमच्या पोटात ती आग नसल्याने (फायर इन द बेली की काय म्हणतात ते) नीट जमलं नाही. :(
15 Mar 2013 - 10:30 am | हुप्प्या
अहो अनुकर्ण आय मीन आजानुकरण, अजून थोडा प्रयत्न हवा. राजघराण्याविषयी बोलताना शक्यतो मागील लेखाची हुबेहुब नक्कल करीत नाही मी.
पुढील अनुकरणाकरता शुभेच्छा!
लवकरच थोरल्या आऊसाहेबांच्या माहेरातून नवे दुष्कृत्य उघडकीस यावे आणि आपणाला पुन्हा एक संधी मिळो हीच शुभेच्छा!
15 Mar 2013 - 1:52 pm | सुज्ञ माणुस
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे.
जबरी !!
15 Mar 2013 - 7:39 pm | श्रीगुरुजी
खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींना विनाशर्त देशाबाहेर जाऊन देणे, संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण वाचणे, पाकिस्तान भारताच्या हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करत असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या भारताच्या खाजगी दौर्यावर स्वागताच्या पायघड्या घालणे व मेजवानी आयोजित करणे, पाकिस्तान भारतातील अतिरेकी हल्ल्यांना शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत करत असताना कोणतीही ठोस कारवाई न करता शांतता बोलणी करणे, "अरूणाचल प्रदेश हा भाग चीनचा आहे, भारताचा नाही" असे चीनच्या भारतातील राजदूताने भारतात भूमीवर उभे राहून सांगितल्यावर काहीही न करता थंड बसून राहणे, परकीय व्यक्तीच्या हातात सर्वाधिकार देणे ... अशा अनेक लाजिरवाण्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय जगतात भारत एक हास्यास्पद देश (Laughing Stock)बनलेला आहे.
15 Mar 2013 - 8:42 pm | पिंपातला उंदीर
प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा करणार्या एका पक्षाच्या सत्ता काळात पण कमी अधिक फरकाने हे प्रकार घडल्याचे स्मरते
16 Mar 2013 - 12:35 pm | श्री गावसेना प्रमुख
सरळ सरळ बी जे पी च नाव घ्याना काय घाबरताय
16 Mar 2013 - 2:03 pm | बॅटमॅन
सांगा बरं वरीलपैकी कोणती घटना त्या "प्रखर" पक्षाच्या कारकीर्दीत घडली होती????
16 Mar 2013 - 5:04 pm | पिंपातला उंदीर
खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींना विनाशर्त देशाबाहेर जाऊन देणे- तत्कालीन परराष्ट्र मंत्री यानी ४ अतिरेक्याना स्वताहा कन्दाहार विमान अपहरणानंतर नेऊन देशाबाहेर सोडाल होत. असा लाजीर्वाणा डाग फार कमी परराष्ट्रमंत्र्यावर आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण वाचणे,- आम्मच्या कॉलेज ची ट्रिप गेली होती दिल्लीला. संसदेला पण त्यावेळेस विज़िट दिली होती. सुदैवाने तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी त्यादिवशी संसदेला संबोधित करणार होते. पण अती वार्धक्यामुळे वाजपेयना चालता पण येत नवत. त्यांचे काही तत्कालिक सहयोग्यांी त्याना आधार देऊन सभागृहात आणल
. त्यादिवशी ते सभेत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा उल्लेख विस्मरणाने कायम वि.पि.सिन्घ यांच्या संदर्भात करत होतें. २००४ च्या निवडणुकांच्या प्रचारसभेत वाजपेयंच्या विस्मारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कारण प्रत्येक सभेत त्यानी नाव घेण्यात गफ्लती केल्या.
पाकिस्तान भारताच्या हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करत असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या भारताच्या खाजगी दौर्यावर स्वागताच्या पायघड्या घालणे व मेजवानी आयोजित करणे- वाजपेयी सरकारच्या काळात ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले व अनेक भारतीय जवानांचा बळी घेतला त्याला पायघड्या घालून आग्रा इथे शांतिवर्तेसाठी बोलावले. नंतर त्याने सरकारला न विचारता आपल्याच देशात पत्रकरपृिषद घेऊन भारत सरकारवर टीका केली व त्याना तोंडघशी पाडले. आणि हो हुरियत चे सर्व नेते मुशराफ्फ ला भेटले होते सरकारच्या नावावर टिच्छून.
पाकिस्तान भारतातील अतिरेकी हल्ल्यांना शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत करत असताना कोणतीही ठोस कारवाई न करता शांतता बोलणी करणे
- मुशराफ्फ शी कारगिल होऊन गेल्यानंतर पण शांतिवारता का केली त्याचेच उत्तर इथे पण लागू.
"अरूणाचल प्रदेश हा भाग चीनचा आहे, भारताचा नाही" असे चीनच्या भारतातील राजदूताने भारतात भूमीवर उभे राहून सांगितल्यावर काहीही न करता थंड बसून राहणे, परकीय व्यक्तीच्या हातात सर्वाधिकार देणे- वाजपेयी सरकारने तिबेट हा चीन चा अविभाज्य हिस्सा आहे अशी स्पष्ट भूमिका घेऊन भारतात राहून संघर्ष करणार्या हजारो तिबेटी लोकांचा अवसांघात केला होता.
ही यादी अजुन वाढवता येईल. तूर्त सांगायचा मुद्दा हा की आम्ही राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष देशाला विकणारे असा प्रचार चालू आहे (इंतेरनेत आणि फेस्बूक वर तो किती तकलादू आहे हे दिसून येते.)
16 Mar 2013 - 5:06 pm | पिंपातला उंदीर
अशुद्धलेखनासाठी माफी. मराठी टाइपिंग अजुन शिकत आहे.
16 Mar 2013 - 6:33 pm | श्रीगुरुजी
"खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींना विनाशर्त देशाबाहेर जाऊन देणे- तत्कालीन परराष्ट्र मंत्री यानी ४ अतिरेक्याना स्वताहा कन्दाहार विमान अपहरणानंतर नेऊन देशाबाहेर सोडाल होत. असा लाजीर्वाणा डाग फार कमी परराष्ट्रमंत्र्यावर आहे."
याविषयी बरेच लिहिले गेले आहे. तरी परत थोडक्यात लिहितो. १६० निरपराध प्रवाशांचे प्राण वाचविण्याकरिता ही तडजोड करावीच लागली. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी कमांडो कारवाई, युद्ध असा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. ते विमान कंदाहार विमानतळावर सर्व बाजूंनी तालिबानी सैनिकांनी व त्यांच्या रणगाड्यांनी वेढलेले होते व विमानतळावर विमानवेधी तोफा तैनात होत्या. एखाद्या देशाने आपल्या १६० निरपराध नागरिकांचे प्राण वाचावे यासाठी अशीच तडजोड केली असती व त्यात काहीही लाजिरवाणे नाही. महासत्ता असलेल्या प्रत्यक्ष अमेरिकेला सुद्धा १९७८ मध्ये इराणने ओलिस ठेवलेल्या आपल्या ८० नागरिकांना वाचविण्यासाठी मूग गिळून गप्प रहावे लागले होते व त्यांच्या सुटकेसाठी तब्बल २ वर्षे वाट बघावी लागली होती. अगदी अलिकडच्या काळात सुद्धा अशी उदाहरणे घडली आहेत. सोमाली चाचे व्यापारी जहाजांचे वारंवार अपहरण करतात व अनेक देशांनी आपले नागरिक वाचविण्यासाठी त्यांना खंडणी दिली आहे. जेव्हा एखादा देश किंवा महासत्ता अपहरणकर्त्यांच्या मागे ठाम उभी असते, तेव्हा निरपराध नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तडजोड हा एकच पर्याय उरतो व तोच पर्याय भारताला वापरावा लागला. किंबहुना याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे या घटनेत लाजिरवाणे वाटण्यासारखे काहीही नाही.
अर्थात लाजिरवाणे वाटण्यासारख्या अशा काही घटना पूर्वी घडलेल्या आहेत. सप्टेम्बर १९९३ मध्ये (काँग्रेसचे नरसिंहराव पंतप्रधान असताना), काश्मिरमधल्या एका मशिदीत भारतीय लष्कराने मशिदीला सर्व बाजूने वेढा घालून ७-८ अतिरेक्यांना आत कोंडले होते. अतिरेक्यांना पळण्यास कोणतीही संधी नव्हती. मशिदीचा वीजपुरवठा व पाणी तोडलेले होते. तरीसुद्धा डिसेंबर १९९३ मध्ये असलेल्या नियोजित निवडणुकांवर डोळा ठेवून (उ.प्र., राजस्थान, हि.प्र., म.प्र. व दिल्ली या ५ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत्या), नरसिंहराव सरकारने सुरवातीला आतल्या अतिरेक्यांना बिर्याणी, हलवा-पुरी असे अन्न पुरवून नंतर त्यांना सुरक्षित पाकिस्तानला जाऊन देण्यात आलेला. हातात आलेल्या अतिरेक्यांची सरबराई करून त्यांना सुखरूप सोडून देण्याची ही अत्यंत लाजिरवाणी घटना होती व ती नेहमीप्रमाणे काँग्रेस राजवटीतच घडलेली आहे.
"२००४ च्या निवडणुकांच्या प्रचारसभेत वाजपेयंच्या विस्मारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कारण प्रत्येक सभेत त्यानी नाव घेण्यात गफ्लती केल्या."
"प्रत्येक सभेत" ही जरा अतिशयोक्तीच होत नाही का? असो. देशांतर्गत निवडणुकीच्या प्रचारसभेत विस्मरण होणे यापेक्षा आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःच्या भाषणाऐवजी दुसर्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्याचे भाषण वाचणे हे कितीतरी जास्त पटीने लज्जास्पद आहे.
"वाजपेयी सरकारच्या काळात ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले व अनेक भारतीय जवानांचा बळी घेतला त्याला पायघड्या घालून आग्रा इथे शांतिवर्तेसाठी बोलावले. नंतर त्याने सरकारला न विचारता आपल्याच देशात पत्रकरपृिषद घेऊन भारत सरकारवर टीका केली व त्याना तोंडघशी पाडले. आणि हो हुरियत चे सर्व नेते मुशराफ्फ ला भेटले होते सरकारच्या नावावर टिच्छून."
मुशर्रफ्फला २००१ मध्ये आग्र्याला बोलविणे ही चूकच होती. हुरियतला आजतगायत कोणीच पायबंद घालू शकलेले नाही. अगदी काही दिवसांपूर्वी हुरियतचा यासीन मलिक पाकिस्तानमध्ये जाऊन २६/११ च्या प्रमुख सूत्रधाराला (हफीज सईद) भेटून आला व त्याच्याबरोबर एका व्यासपीठावर बसून दोघांनी उपोषणाचे नाटक देखील केले. परंतु भारत याबाबतीत काहीही करू शकलेला नाही.
"पाकिस्तान भारतातील अतिरेकी हल्ल्यांना शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत करत असताना कोणतीही ठोस कारवाई न करता शांतता बोलणी करणे"
वाजपेयींनी २००१ ते २००४ या काळात काही प्रमाणात कारवाई केली होती. या काळात पाकिस्तानचा मुम्बईतील दूतावास बंद केला गेला, दिल्ली दूतावासातील पाकिस्तानी कर्मचार्यांची संख्या निम्म्यावर आणली गेली, पाकिस्तानी विमानांना भारतीय भूप्रदेशावरून उड्डाणास बंदी आणली गेली, व्हिसा खूप कमी पाकिस्तानी नागरिकांना दिला गेला, दिल्ली-लाहोर ही बससेवा बंद केली गेली, पाकिस्तानशी व्यापारावर निर्बंध आणले गेले, शांतता बोलणी बंद केली गेली, दोन्ही देशातले संबंध कमी करण्यात आले असे काही उपाय केले गेले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बांगलादेश व पाकिस्तानच्या सीमेवर काटेरी कुंपण घालण्याचे काम याच काळात सुरू झाले.
"वाजपेयी सरकारने तिबेट हा चीन चा अविभाज्य हिस्सा आहे अशी स्पष्ट भूमिका घेऊन भारतात राहून संघर्ष करणार्या हजारो तिबेटी लोकांचा अवसांघात केला होता."
ही भूमिका नेहरूंनी १९५६ मध्येच घेतली होती व त्यानंतरच्या सर्व सरकारांची हीच भूमिका होती. एखाद्या देशाच्या सरकारने दुसर्या देशाबाबत घेतलेली अधिकृत भूमिका त्या देशाला बदलता येत नाही. त्यामुळे वाजपेयींनी ही भूमिका घेतलेली नसून भारताच्या आधीच्या अधिकृत भूमिकेचा पुनरूच्चार केला. पण त्यामागे एक वेगळी भूमिका होती. सिक्कीम हे एक वेगळे सार्वभौम राष्ट्र १९७५ मध्ये भारतात विलीन झाले. पण चीनने या विलिनीकरणाला कधीही मान्यता दिली नव्हती. पण वाजपेयींनी तिबेटबाबत भारताची जुनीच भूमिका मांडल्यावर चीनने सिक्कीमच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. त्यानंतर चीनने कधीही सिक्कीमबाबत तोंड उघडलेले नाही. वाजपेयींच्या त्या भूमिकेमुळे भारताचा फायदाच झाला आहे.
"ही यादी अजुन वाढवता येईल. तूर्त सांगायचा मुद्दा हा की आम्ही राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष देशाला विकणारे असा प्रचार चालू आहे (इंतेरनेत आणि फेस्बूक वर तो किती तकलादू आहे हे दिसून येते.)"
भाजप हा धुतल्या तांदळासारखा व काँग्रेस कोळशासारखा काळाकुट्ट असे मी म्हटलेले नाही. भाजपच्या तुलनेत काँग्रेसमध्ये वाईट गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत व ते देशाला अत्यंत घातक आहे. देश विकण्याची तुलना केलीच तर भाजप नाक्यावर भाजी विकणारा किरकोळ विक्रेता तर काँग्रेस घाऊक प्रमाणात देशाला विकणारे वॉलमार्टसारखे सुपरमार्केट अशी तुलना करता येईल.
16 Mar 2013 - 8:39 pm | क्लिंटन
मी कोणत्याही पक्षाच्या कळपातला नाही त्यामुळे सर्वच पक्षांच्या (माझ्या मते) चांगल्या गोष्टींचे मी स्वागत करतो आणि (माझ्या मते) चुकीच्या गोष्टींवर टिका करत असतो.
श्रीगुरूजींच्या या प्रतिसादाला +१.
कंदाहार अपहरण प्रकरण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अत्यंत दु:खद घटना होती.त्या वेळी विमान भारताची हद्द ओलांडून of all the places कंदाहारला गेल्यानंतर आपल्या हातात फारसे करण्यासारखे काही नव्हते.अफगाणिस्तानात तालिबानी राजवट होती आणि तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा होता.तालिबानी राजवटीशी आपले राजनैतिक संबंधही नव्हते.आणि तालिबान आणि विमान अपहरणकर्ते hands in glove होते.तेव्हा तालिबानी राजवटीने विमान सोडवायला मदत केली असती याची शक्यता शून्य. आपल्याला अगदी कमांडो कारवाई करायचीच असती तरी आपली विमाने पाकिस्तानच्या हद्दीवरून पाठवावी लागली असती.त्या परिस्थितीत आपली विमाने अफगाणिस्तानात पोहोचायच्या आधीच पाकिस्तानी हवाईदलाशी मुकाबला करायला लागला असता आणि कदाचित त्यातून परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली असती. तसेच ९/११ पूर्वीच्या जगात पाकिस्तान नक्की काय चीज आहे हे कळले असले तरी त्याविरूध्द काही करायची महासत्तेची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा पाकिस्तान-तालिबान या अभद्र युतीविरूध्द अफगाणिस्तानात जाऊन आपण काही करायची शक्यता अगदी शून्य होती.
बरं त्यावेळी विरोधी पक्षांची भूमिका नक्की काय होती?पंतप्रधान वाजपेयींनी या प्रकरणी सर्वपक्षीय परिषद बोलावली होती त्यानंतर प्रणव मुखर्जींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की सरकारने योग्य तो निर्णय घेतल्यास कॉंग्रेस पक्ष त्याला समर्थन देईल.आता योग्य तो निर्णय नक्की कोणता हे सांगायची तसदी त्यांनी न घेऊन काही झाले तरी विरोधी पक्ष उलट्या बोंबा मारणार याचे स्पष्ट संकेत दिलेच की.म्हणजे जर दहशतवादी सोडले नसते आणि कंदाहारमध्ये प्रवाशांना मारले असते तर दिडशे लोकांचे बळी दिले अशी हाकाटी करायला विरोधी पक्ष मोकळे आणि नाहीतर दहशतवाद्यांना सोडले म्हणून हाकाटी करायलाही मोकळेच.
त्या सर्वपक्षीय परिषदेत सर्व पक्षांनी एकमुखाने सरकारला का सांगितले नाही की काही वाटेल ते झाले तरी दहशतवाद्यांना सोडायचे नाही?सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा जास्त दोष या प्रकरणी आहेच पण सगळा दोष केवळ भाजपवर ढकलायचा प्रयत्न करत असेल तर तो पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आहे हे स्पष्ट आहे.
दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा हिस्सा आहे हे नेहरू,इंदिरा गांधी आणि नरसिंह रावांनीही वेळोवेळी मान्य केले होते.त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ वाजपेयींवर टिका करणे म्हणजे एकतर पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन किंवा अभ्यास वाढवायची गरज असल्याचा सज्जड पुरावाच आहे.
असो.
21 Mar 2013 - 2:05 pm | प्रसाद१९७१
भारताच्या मताला चीन काडीची किम्मत देत नाही. तुम्ही तिबेट चीन चे आहे असे म्हणले काय किंवा चीन चे नाही असे म्हणले काय? विचारतो कोण.
थोड्या वर्षानी मिपा वर अशीच चर्चा "अरुणाचल प्रदेशा" बद्दल होताना दिसेल.
21 Mar 2013 - 8:10 pm | श्रीगुरुजी
"भारताच्या मताला चीन काडीची किम्मत देत नाही. तुम्ही तिबेट चीन चे आहे असे म्हणले काय किंवा चीन चे नाही असे म्हणले काय? विचारतो कोण."
हे बहुतेक बाबतीत खरे असले तरी चीन तिबेटच्या बाबतीत अत्यंत हळवा व सावध आहे. तिबेट हे चीनने लष्करी ताकदीच्या जोरावर बळकावले असल्याने तिबेट प्रश्नावर किंवा तिबेटशी संबंधित कोणत्याही राष्ट्राने शब्द सुद्धा उच्चारू नये याबाबत चीन सावध असतो. संयुक्त राष्ट्रसंघात तिबेट हा शब्दसुद्धा उच्चारला जाऊ नये यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करतो. दलाई लामांना शांततेचे नोबेल पारितोषिक दिल्यावर चीनने नोबेल समिती व स्वीडनविरूद्ध थयथयाट केला होता. क्लिंटन यांनी अमेरिकेत दलाई लामांची भेट घेण्याचे जाहीर केल्यावर चीनने ही भेट होऊ नये यासाठी अमेरिकेवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. भारतात अधूनमधून तिबेटी विद्यार्थी निदर्शने करतात व तशी निदर्शने झाली की चीन लगेच डोळे वटारतो. ऑलिंपिक ज्योत लंडन व इतर काही ठिकाणाहून जात असताना स्थानिक तिबेटींनी निदर्शने केल्यावर चीनने अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून शेवटी बर्याच देशातून ज्योत नेलीच नव्हती किंवा ज्योतीचा मार्गच बदलायला लावला होता. भारतातून ऑलिंपिक ज्योत जात असताना भारताने तिबेटींना कडक इशारा देऊन निदर्शने करण्यापासून रोखले होते.
जगातल्या कोणत्याही देशाने (भारतासहित) तिबेट हा शब्द देखील उच्चारू नये यासाठी चीन कायम प्रयत्नशील असतो.
16 Mar 2013 - 9:27 pm | पिंपातला उंदीर
अशाच प्रतिकूल परिस्थीत इस्राएल ने युगांडा मध्ये जाउन ऑपरेशन एटांबी यशस्वी पार पाडले होते. रशिया मध्ये पण चेचेन दहशतवाद्यानी एक अख्खे नाट्यगृह ओलिस ठेवले होते. पण पुतिन यानी राजकीय आणि हानीची पर्वा न करता कारवाई करून आतँकवाड्याना धडा शिकवला होता. कन्दाहार प्रकरणात पण राजकीय इच्छाशक्तिचा अभाव हे एक मोठे कारण होतेच. त्यामुळे या केस मध्ये पण वाजपेयी सरकारचे वर्तन योग्य होऊच शकत नाही. आणि दस्तुर्खुद्द परराष्ट्रमंत्री दहशतवाद्याना घेऊन जातो ही घटना तर दुर्मिळ आहे. तुम्ही असे अजुन काही उदाहरण देऊ शकाल का? आज त्या सुटलेल्या दहशतवाद्यानी देशात अनेक कारवाया केल्या. मुंबई हल्ल्यात पण त्यांचा प्लॅनिंग मध्ये समावेश होता. देशात एका विमानचे अपहरण होते. मग ते विमान देशात आडवायची संधी असून पण ते आडवल्या जात नाही. मग शात्रभूमीवर ते गेल्यावर शत्रुसमोर गुडघे टेकले जातात हे तत्कालीन सरकारचे अपयश नव्हे का?
२) वाजपेयीच्या उदाहरण देण्यामागे उद्देश वाजपेयी शारीरिक दृष्ट्या किती थकले होते आणि तरी पंतप्रधान पदी चिकटून होते हे दाखवायचा उद्देश होता. कृष्णा यांची पण तीच परिस्थिती झाळी आहे. २००४ सालच्या निवडणुका होईपर्यंत वाजपेयी ना समोर ठेवण्याचा उद्देश त्या निवडणुकीत भाजप ची धुलधाान झालयाने साफ फसला. जाता जाता राजकारणात आलेल्या एका नवीन बाई कडून पराभव झाला हा डाग हक नाक वाजपेयी यांच्या उजळ माथ्यावर लागला.
३) ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले (आजही एक महत्वाचे शिखर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याची जिम्मेदारी पण वाजपेयी सरकारकडेच जाते) आणि अनेक भारतीय जवानचा बळी घेतला त्याला वाजत गाजत भारतात आमंत्रित करून त्याला वैधता प्राप्त करून देणे हे मोठे ब्लंडर नवते का?
४)वाजपेयी सरकारने ज्या कारवाया केल्या त्याना कारवाई म्हणे म्हणजे मनमोहन सरकारने पाकिस्तान चा हॉकी दौरा रद्द केला याला पण कारवाई म्हणावे लागेल. वाजपेयी सरकारने मुशराफ्फ चे उद्दातीकरण केले. या पापाचे भागीदार त्याना व्हावे लागेल.
५) तिबेट हा चीनचा भाग आहे ही आपली भूमिका नेहरू पासून आहे हे मला माहीत आहे. पण प्रत्येक वेळेस नेहरू आणि कॉंग्रेस ला शिव्या घालायच्या आआणी सत्तेत आल्यावर त्यांचीच धोरण पुढे चालवायची हा दुत्ताप्पीपणा नाही का? त्याना तिबेत्विषयक धोरण बदलण्याची नामी संधी होती. त्यानी २००४ मध्ये सत्ता गमावली त्याचबरोबर ती संधी पण गमावली.
सूपरमार्केट आणि किरकोळ विक्रेता ही तुलना पटली नाही. भाजप ला फक़त साडेचार वर्ष सत्ता मिळाली त्या तुलनेने च्ोत्या काळात त्यानी हा चुकांचा डोंगर उभारला. सांगायचा मुद्दा हा की अती कमजोर कारभार, राजकीय इच्छाशक्ती चा अभाव, भ्रष्ट कारभार, कळीच्या मुद्द्यांवरून यु टर्न घेणे यात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात काहीही फरक नाही.
16 Mar 2013 - 10:19 pm | क्लिंटन
बाकी ठिक आहे पण
मला आपलं उगीचच वाटत होतं की फक्त हिंदुत्ववादी मंडळीच उठल्यासुटल्या इस्राएलने युगांडात जाऊन आपले विमान परत कसे आणले याच्या कहाण्या ऐकवत असतात.हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
16 Mar 2013 - 10:28 pm | श्रीगुरुजी
>>> अशाच प्रतिकूल परिस्थीत इस्राएल ने युगांडा मध्ये जाउन ऑपरेशन एटांबी यशस्वी पार पाडले होते.
तुम्हाला समजावून सांगतासांगता आता मी थकलो. ऑपरेशन एंटाबी व कंदाहार यांची तुलना होउच शकत नाही. जरा विचार करा. कंदाहार विमानतळावर मध्यभागी भारतीय विमान उभे आहे. त्यात १६० निरपराध व निशस्त्र प्रवासी आहेत. विमानात सशस्त्र चाचे आहेत. विमान चारी बाजूंनी एके-४७ घेतलेल्या सैनिकांनी व त्यांच्या रणगाड्यांनी वेढलेले आहे. विमानतळावर सर्व बाजूंनी विमानविरोधी तोफा सज्ज आहेत. हे विमान सोडविण्यासाठी कमांडो कारवाई कोठून आणि कशी करणार? तिथे कमांडो पाठविण्यासाठी भारताला दुसरे विमान पाठवावे लागणार. त्या विमानाला पाकिस्तानी भूप्रदेशावरून जाता येणार नाही. त्या विमानात शस्त्रे, बॉम्ब व कमांडो आहेत हे लक्षात आल्यावर इतर कोणताही देश अशा सशस्त्र विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाऊन देणार नाही. अशा परिस्थितीत तिथे पोचणार कसे? आणि तिथे पोचल्यावर विमानाला वेढा घातलेल्या तालिबानी रणगाडे, तोफा व सैनिकांशी कसा सामना देणार? भारताकडे असे कमांडो १९९९ मध्ये नव्हते आणि आजही नाहीत. त्यावेळी कमांडो कारवाई अशक्य होती. हे पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. यापेक्षा जास्त योग्य तर्हेने समजावून सांगणे मला शक्य नाही.
इस्राइलची अजून एक घटना सांगतो. ४-५ वर्षांपूर्वी इस्राइलच्या २ सैनिकांचे लेबाननस्थित हिजबोल्लाच्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते. इस्राइलने ४-५ महिने सतत प्रयत्न करूनसुद्धा आपल्या सैनिकांना सोडविता आले नव्हते. कमांडो कारवाईत नेहमीच यश मिळते असे नाही. त्यात अपयशही येते किंवा यश मिळाले तरी फार मोठी किंमत द्यावी लागते. १९८२ मध्ये पॅनअॅमचे कॅनडाहून भारताला येणारे विमान अतिरेक्यांनी पळवून पाकिस्तानमध्ये उतरविल्यावर पाकिस्तानी कमांडोंनी ४-५ दिवसांनी कारवाई केल्यावर त्यात तब्बल १५० हून अधिक भारतीय प्रवासी मृत्युमुखी पडले होते. इतकी जबर किंमत द्यावी लागली होती.
>>> रशिया मध्ये पण चेचेन दहशतवाद्यानी एक अख्खे नाट्यगृह ओलिस ठेवले होते. पण पुतिन यानी राजकीय आणि हानीची पर्वा न करता कारवाई करून आतँकवाड्याना धडा शिकवला होता.
पुतिन यांना ही कारवाई शक्य झाली कारण ते नाट्यगृह रशियातच होते व तिथे कमांडो पाठविण्यासाठी दुसर्या देशात जाण्याची गरज नव्हती. तसेच तिथल्या अतिरेक्यांना दुसर्या देशाने संरक्षण दिले नव्हते (कंदाहार प्रकरणातल्या चाच्यांना पाकिस्तानने अप्रत्यक्ष व तालिबानने प्रत्यक्ष समर्थन दिले होते). पुतिनना तिथे दुसर्या देशाशी लढायचे नसून स्वतःच्या भूमीवरच कारवाई करायची होती. भारताला कंदाहार विमानतळावर पाऊल ठेवणेच अशक्य होते. कमांडो कारवाई तर खूपच दूरची गोष्ट. या कारवाईची रशियाने जबरदस्त किंमत मोजलेली आहे. नाट्यगृहातल्या अतिरेक्यांना रशियन कमांडोंनी ठार केले पण त्या धुमश्चक्रीत २०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.
>>> कन्दाहार प्रकरणात पण राजकीय इच्छाशक्तिचा अभाव हे एक मोठे कारण होतेच. त्यामुळे या केस मध्ये पण वाजपेयी सरकारचे वर्तन योग्य होऊच शकत नाही.
बरं तुम्हीच सांगा की त्या प्रकरणात कोणते वर्तन योग्य ठरले असते व ते वाजपेयी सरकारने कसे पार पाडले असते. आणि नक्की कोणत्या मार्गाने ते १६० प्रवासी सोडविता आले असते हेही सांगा.
>>> आणि दस्तुर्खुद्द परराष्ट्रमंत्री दहशतवाद्याना घेऊन जातो ही घटना तर दुर्मिळ आहे.
अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारशी भारताचे राजनैतिक संबंध नव्हते. त्यामुळे अतिरेकी व प्रवाशी यांची देवाणघेवाण करताना भारतातर्फे एखादा वरिष्ठ अधिकारी असणे आवश्यक होते. त्यामुळे जसवंतसिंग तिथे गेले. त्यामागे एक दुसरा जास्त महत्त्वाचा उद्देश होता. या निमित्ताने तालिबान सरकारशी भारताचा संवाद सुरू व्हावा ही पण अपेक्षा त्याच्यामागे होती. जसवंत सिंग यांनी लिहिलेल्या "इन द लाईन ऑफ फायर" या पुस्तकात कंदाहारबद्दल एक सविस्तर प्रकरण आहे. ते वाचा. बर्याच गोष्टींचा उलगडा होईल.
>>> आज त्या सुटलेल्या दहशतवाद्यानी देशात अनेक कारवाया केल्या. मुंबई हल्ल्यात पण त्यांचा प्लॅनिंग मध्ये समावेश होता.
अपहरणात सुटलेले अतिरेकी काही अध्यात्म मार्गाला जात नाहीत. ते पूर्वीच्याच कारवाया सुरू ठेवतात. १९९३ मध्ये हातात आलेले अतिरेकी विनाकारण सोडून दिल्यावर त्यांनी सुद्धा कारवाया केल्या असतीलच. १९९३ आणि कंदाहार मधील मुख्य फरक हा आहे की, १९९३ मध्ये अतिरेकी भारतीय भूमीवर अडकले होते व त्यांच्याकडून कोणालाही कोणताही धोका नव्हता, तरीसुद्धा मतांच्या राजकारणासाठी त्यांना सोडून देण्यात आले. पण १९९९ मध्ये हे अतिरेकी भारताबाहेर होते व १६० प्रवाशांचे प्राण धोक्यात होते व भारतापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता.
देशात एका विमानचे अपहरण होते. मग ते विमान देशात आडवायची संधी असून पण ते आडवल्या जात नाही. मग शात्रभूमीवर ते गेल्यावर शत्रुसमोर गुडघे टेकले जातात हे तत्कालीन सरकारचे अपयश नव्हे का?
>>> देशात एका विमानचे अपहरण होते. मग ते विमान देशात आडवायची संधी असून पण ते आडवल्या जात नाही.
ते विमान पळविल्यानंतर अमृतसरला फक्त ४० मिनिटे होते. इतक्या कमी वेळात कोणतीही कारवाई अशक्य होती. अशा कारवाईसाठी किमान २-३ दिवस तरी प्लॅनिंग करण्यात जातात व नंतर १-२ वेळा रंगीत तालीम घेऊन त्यातले धोके कमी करून मग प्रत्यक्ष कारवाई केली जाते. ४० मिनिटात हे शक्यच नव्हते. ४० मिनिटात कमांडो दिल्लीहून अमृतसरला पोचले सुद्धा नसते, मग कारवाई तर लांबच राहिली.
>>> मग शात्रभूमीवर ते गेल्यावर शत्रुसमोर गुडघे टेकले जातात हे तत्कालीन सरकारचे अपयश नव्हे का?
हे अपयश नाही. भारताकडे दुसरा पर्यायच नव्हता. ते ३ अतिरेकी सोडल्यानंतर सुद्धा जर चाच्यांनी प्रवाशांना सोडण्यास नकार दिला असता तर भारत काहीही करू शकला नसता. एकदा ते विमान कंदाहारला पोचल्यावर भारताला काहीही करणे अशक्य होते.
>>> ३) ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले (आजही एक महत्वाचे शिखर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याची जिम्मेदारी पण वाजपेयी सरकारकडेच जाते) आणि अनेक भारतीय जवानचा बळी घेतला त्याला वाजत गाजत भारतात आमंत्रित करून त्याला वैधता प्राप्त करून देणे हे मोठे ब्लंडर नवते का?
मुशर्रफला २००१ मध्ये भारतात बोलविणे ही चूकच होती.
>>> ४)वाजपेयी सरकारने ज्या कारवाया केल्या त्याना कारवाई म्हणे म्हणजे मनमोहन सरकारने पाकिस्तान चा हॉकी दौरा रद्द केला याला पण कारवाई म्हणावे लागेल. वाजपेयी सरकारने मुशराफ्फ चे उद्दातीकरण केले. या पापाचे भागीदार त्याना व्हावे लागेल.
वाजपेयींनी मुशर्रफला भारतात बोलविले नसते तर काय तो आयुष्यभर खाली मान घालून वावरला असता का? त्याला बोलावून त्याचे उदात्तीकरण केले असे म्हणणे चुकीचे आहे. हॉकी संघाचा दौरा रद्द करणे आणि दोन देशांमधील व्यापारी व इतर संबंध कमी करणे या दोन गोष्टींची तुलना होऊ शकते का?
>>> ५) तिबेट हा चीनचा भाग आहे ही आपली भूमिका नेहरू पासून आहे हे मला माहीत आहे. पण प्रत्येक वेळेस नेहरू आणि कॉंग्रेस ला शिव्या घालायच्या आआणी सत्तेत आल्यावर त्यांचीच धोरण पुढे चालवायची हा दुत्ताप्पीपणा नाही का? त्याना तिबेत्विषयक धोरण बदलण्याची नामी संधी होती. त्यानी २००४ मध्ये सत्ता गमावली त्याचबरोबर ती संधी पण गमावली.
तुमचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास तोकडा दिसतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाची अधिकृत भूमिका सरकार बदलले की बदलत नसते. नेहरूंनी तिबेट हा चीनचा भाग आहे अशी मान्यता दिली ती भारत देश या नात्याने दिली. ही भूमिका काँग्रेस सरकारचा प्रमुख या नात्याने नव्हती. एकदा ही भूमिका घेतल्यावर व अनेक वर्षे या भूमिकेला दुजोरा दिल्यावर केवळ सरकार बदलले म्हणून भूमिका बदलता येत नाही. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर काही वर्षांनंतर पाकिस्तानने त्या देशाला मान्यता दिली. आता अचानक झरदारी किंवा राजा अश्रफ आम्ही बांगला देशाची मान्यता रद्द करत आहोत अशी भूमिका घेऊच शकत नाहीत. त्यामुळे वाजपेयी ही भूमिका घेऊच शकत नव्हते.
>>> सूपरमार्केट आणि किरकोळ विक्रेता ही तुलना पटली नाही. भाजप ला फक़त साडेचार वर्ष सत्ता मिळाली त्या तुलनेने च्ोत्या काळात त्यानी हा चुकांचा डोंगर उभारला.
हे वाक्य अत्यंत हास्यास्पद आहे. चुकांचा डोंगर (खरं तर महापर्वत) ही काँग्रेसची निर्मिती आहे. नुसतं भ्रष्टाचाराचं उदाहरण घेतलं तर २००४ ते २०१३ या काळात १९४७ ते २००३ या काळापेक्षा कितीतरी अधिक पटीने भ्रष्टाचार झाला. जातीय दंगली, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, विषमता, देशाची दुर्बलता इ. बाबतीत काँग्रेस भाजपच्या कैक योजने पुढे आहे.
>>> सांगायचा मुद्दा हा की अती कमजोर कारभार, राजकीय इच्छाशक्ती चा अभाव, भ्रष्ट कारभार, कळीच्या मुद्द्यांवरून यु टर्न घेणे यात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात काहीही फरक नाही.
खूप मोठा फरक आहे. या गोष्टी काँग्रेसमध्ये भाजपच्या तुलनेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून तर मी किरकोळ भाजी विक्रेता व सुपरमार्केट यांची तुलना केली.
17 Mar 2013 - 12:10 am | मन१
इन द लाईन ऑफ फायर हे जसवंत सिंग ह्यांचं नसून मुशर्रफ ह्यांचं (आत्म)चरित्र आहे. जसवंत सिंगांचं आहे the audacity of opinion .
.
बाकी चालु द्य.
17 Mar 2013 - 8:12 am | पिंपातला उंदीर
तुम्ही इतर देशांनी केलेल्या यशस्वी ऑपरेशन्स ला सोडून त्याना आलेल्या अपयशाला धरून बसला आहात. वाजपेयी सरकारने पण हीच चुक केली आणि जनमानसात त्यांची प्रतिमा खालवली. कन्दाहार प्रकरणानंतर भारताची सॉफ्ट स्टेट म्हणून प्रतिमा बनली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बनला. जासवन्त सिंग तालिबान शी चर्चा करायला गेले होते हे म्हणे म्हणजे समर्थन करायचच आहे तर रेटून करूयात या धर्तीवर वाटते. आणि देशाची परराष्ट्र धोरण बदलतात. सातत्य हे राष्टरहीत्ाच्या वर नसते.देशन्चि परराष्ट्र धोरण बदल्याची मी तुम्हाला अनेक उदाहर्न देऊ शकतो. आणि कंप्यूटर आणला म्हणून राजीव गांधीना शिव्या घाल्याच्या आणि स्वताहा सत्तेत आले की तेच धोरण पुढे आणायचे. आर्थिक सुधारणा केल्या म्हणून मनमोहन सिंग याना बोल लावायचा आणि स्वताहा सत्तेत आले की त्याच सुधारणा पुढे ढकलायच्या. राम मंदिर बांधत नाहीत म्हणून सरकारला बोल लावायचा आणि स्वताहा सत्तेत आले की राम मंदिर मुद्द्यावर काखा वर करायच्या. मग स्वतहाचे काही करायचेच नाही तर मग विरोधी पक्ष सत्तेत येऊन उपयोग काय? बाकी वाजपेयी सरकारच्या काळात संसदेवर हलला करण्यापर्यंत आतँकवाड्यांची मजल गेली होती. त्याविरोधात वाजपेयी सरकारने काय कठोर पावल उचली हे पण जाणून घ्यायला आवडेल. १९९८-ते २००४ हा भारताच्या दृष्टीने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड वाईट काळ होता. कन्दाहार, संसदेवर हलला, गोधरा हत्याकांड, करगिल, गुजरात दंगल आणि कित्येक उदाहरण. आणि ते पण आधुनिक 'लोहपुरूष' गृहमंत्री असताना.
17 Mar 2013 - 12:34 pm | श्रीगुरुजी
>>> वाजपेयी सरकारने पण हीच चुक केली आणि जनमानसात त्यांची प्रतिमा खालवली.
बर. आपण असं गृहित धरूया की वाजपेयींनी चूक केली. आता तुम्हीच सांगा की वाजपेयी सरकारने नक्की कोणती कारवाई करायला पाहिजे होती आणि ती कारवाई नक्की कशी पार पाडता आली असती.
>>> कन्दाहार प्रकरणानंतर भारताची सॉफ्ट स्टेट म्हणून प्रतिमा बनली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बनला.
जसं काही कंदाहार प्रकरणापूर्वी भारताचा महासत्ता म्हणून जगभर दरारा होता आणि भारताला सगळे देश घाबरत होते. आणि हो १९९३ मध्ये मशिदीतल्या अतिरेक्यांना हलवा-पुरी, चिकन-बिर्याणी खाऊ घालून मानाची वस्त्रे देऊन सुखरूप पाकिस्तानला पोचते केल्यावर भारताचा दरारा तर अखिल ब्रह्मांडात पसरला होता आणि कंदाहार प्रकरणामुळे भारतासारख्या ढाण्या वाघाची एकदम शेळी झाली ना.
>>> जासवन्त सिंग तालिबान शी चर्चा करायला गेले होते हे म्हणे म्हणजे समर्थन करायचच आहे तर रेटून करूयात या धर्तीवर वाटते. आणि देशाची परराष्ट्र धोरण बदलतात.
देशाची परराष्ट्र धोरणे बदलतात. सर्वच देशांची बदलू शकतात. पण एखाद्या नवीन राष्ट्राला "राष्ट्र" अशी अधिकृत मान्यता दिल्यावर काही वर्षांनी आम्ही तुमची "राष्ट्र" म्हणून मान्यता काढून घेत आहोत असे कधीच करता येत नाही. जरा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास वाढवा. तुम्हाला सध्या त्यातले फारसे कळत नाही असे दिसत आहे.
आणि "तिबेट" हा चीनचा भाग आहे हे सांगितल्यावर तुम्ही फक्त वाजपेयींना दूषणे देत आहात. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरणसिंग, राजीव गांधी, नरसिंहराव, देवेगौडा, गुजराल व मनमोहन सिंग या सर्व पंतप्रधानांनी सुद्धा या भूमिकेला आजतगायत विरोध केलेला नाही. मग त्यांना का दूषणे देत नाही?
>>> बाकी वाजपेयी सरकारच्या काळात संसदेवर हलला करण्यापर्यंत आतँकवाड्यांची मजल गेली होती. त्याविरोधात वाजपेयी सरकारने काय कठोर पावल उचली हे पण जाणून घ्यायला आवडेल.
वाजपेयी सरकारने अतिरेक्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी 'पोटा' हा कडक कायदा आणला होता. या कायद्यान्वये अनेक अतिरेक्यांना शिक्षा झालेली आहे (उदा. अफझल गुरू). तो कायदा मनमोह्न सिंग पंतप्रधान पदावर आल्यावर मुस्लिमांच्या दबावाने रद्द केला गेला. १९९५ साली 'पोटा'चाच पूर्वीचा अवतार असलेला 'टाडा' हा कायदा असाच रद्द केला गेला होता.
'पोटा' या कायद्यासाठी अडवाणी अतिशय आग्रही होते. हा कायदा आणताना भाजपला राज्यसभेत बहुमत नसल्याने अडवाणींनी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावून कायदा मंजूर करून आपली इच्छाशक्ती दाखवून दिली होती. तसेच या काळात १५-२० देशांशी गुन्हेगार हस्तांतरण करार केले गेले. त्यामुळे दुबईतून व इतर काही देशातून अनेक गुन्हेगारांना भारतात आणता आले. बांगला व पाकिस्तानच्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम याच काळात सुरू झाले होते.
>>> १९९८-ते २००४ हा भारताच्या दृष्टीने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड वाईट काळ होता.
आणि १९४७-१९९७ व नंतर २००५-२०१३ हा काय अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता का? १९८०-१९९५ या काळात शीख अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तुम्हाला माहित नसेलच. आणि १९८९ पासून इस्लामी अतिरेक्यांनी केलेले असंख्य अतिरेकी हल्ले तुम्ही सोयिस्कररित्या विसरला असालच.
>>> कन्दाहार, संसदेवर हलला, गोधरा हत्याकांड, करगिल, गुजरात दंगल आणि कित्येक उदाहरण. आणि ते पण आधुनिक 'लोहपुरूष' गृहमंत्री असताना.
उरलेल्या काळातील यादी पण द्या आणि मग स्वतःच तुलना करा. त्या काळातील अशा घटनांची यादी करताना थकून जाल, पण ही काळी यादी संपणार नाही.
गोध्रा हत्याकांडातील गुन्हेगारांना शिक्षा झाली, गुजरात दंगलीतल्या गुन्हेगारांना सुद्धा शिक्षा झाली. पण १९८४ मधील ३००० शिखांच्या हत्याकांडातील गुन्हेगार अजून मौजमजा करत मोकळे फिरत आहेत. जगदीश टायटलर, ललित माखन, हरकिशनलाल भगत, सज्जनकुमार, धरमदास शास्त्री, कमलनाथ इ. ना केंद्रात मंत्रीपदे दिली गेली. त्यातले काही जण अजूनही मंत्रीमंडळात आहेत (कमलनाथ). १९७९ साली इंडियन एअरलाईन्सचे विमान पळवून इंदिरा गांधींच्या सुटकेची मागणी करणार्या बिहारमधील पांडे बंधूंना १९८० साली बिहारमध्ये मंत्री केले गेले होते. त्यांच्यावर दाखल झालेला खटला काढून टाकला.
याउलट समझोता एक्स्प्रेस, मालेगाव बॉम्बस्फोट इ. प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा देणे लांबच राहिले, उलट त्या प्रकरणातील गुन्हेगारांऐवजी कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग व इतर ९ निर्दोष नागरिकांना ५ वर्षे आरोपपत्र दाखल न करता तुरूंगात डांबून ठेवले आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचाच हा प्रकार आहे.
२ खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या इटलीच्या नौसैनिकांना तुरूंगात ठेवण्याऐवजी सरकारी विश्रामगृहात ठेवून व त्यांना हॉटेलचे जेवण पुरवुन एखाद्या पाहुण्यासारखी त्यांची बडदास्त ठेवली गेली (काही झालं तरी ते माहेरचे पाहुणे होते). ख्रिस्तमस साजरा करायला त्यांना मोकळे सोडले गेले. नंतर मतदान भारतात करणे शक्य असताना सुद्धा त्यांना विनाशर्त इटलीला जाऊन देण्यात आले व ते कायमचे पसार झाले. इतकी नाचक्की इतर कोणत्याही देशाची झाली नसेल. भारताच्या मूर्खपणाला सगळे जग हसत असेल. एकीकडे २ खुनांच्या आरोपातील आरोपींचे सर्व लाड पुरविले जात असताना विनाआरोपत्र डांबून ठेवलेल्या साध्वी प्रज्ञासिंगला वडीलांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी काही तासांसाठी सुद्धा जामीन दिला गेला नाही. तिला कर्करोगावरील उपचारांसाठी सुद्धा जामीन दिला जात नाही.
17 Mar 2013 - 12:46 pm | पिंपातला उंदीर
कॉंग्रेस च्या काळात झालेल्या चुका दाखवून वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या चुका कशा समर्थनीय होऊ शकतात? वाजपेयी यानी अनेक वेळा अंतर्गत आणि परराष्ट्रीय आघाडीवर अपयश पत्करले हे मान्य करण्यात अडचण का आहे?? एका विशिष्ट विचारसरणीचा चष्मा डोळ्यावर चढवल्यावर असे होत असावे. कॉंग्रेस च्या काळात अनेक चुका घडल्याच त्या मान्य आेतच. पण त्यामुळे वाजपेयी सरकारने केलेल्या चुका कशा क्षम्य होऊ शकतात? देशातल्या जनतेने पण त्या चुकामुळेच वाजपेयना घरचा रस्ता दाखवला. २००९ पण तेच झाले . कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगण्याचा अजुन एक प्रयत्न करतो आणि रजा घेतो.
17 Mar 2013 - 1:21 pm | श्रीगुरुजी
>>> कॉंग्रेस च्या काळात झालेल्या चुका दाखवून वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या चुका कशा समर्थनीय होऊ शकतात?
तुम्ही फक्त १९९८-२००४ या काळात झालेल्या घटनांचेच दाखले देत आहात. कॉंग्रेसच्या काळात झालेल्या घटनांबद्दल तुम्ही आतापर्यंत एक चकार शब्दही काढलेला नाही. वाजपेयींच्या काळातल्या ज्या घटना तुम्ही चुका म्हणून दाखवित आहात (उदा. कंदाहार प्रकरण, तिबेट इ.) या प्रत्यक्षात चुका नाहीत. परंतु 'नावडतीचे मीठ अळणी' या न्यायाने त्या काळातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला चुकीचीच वाटत आहे.
>>> वाजपेयी यानी अनेक वेळा अंतर्गत आणि परराष्ट्रीय आघाडीवर अपयश पत्करले हे मान्य करण्यात अडचण का आहे??
"अनेक वेळा" ही प्रचंड अतिशयोक्ती आहे. पाकिस्तानच्या बाबतीत वाजपेयींचे धोरण काहिसे गोंधळलेले होते हे मान्य आहे. पण भारताच्या इतिहासात आजतगायत होऊन गेलेल्या सर्वच पंतप्रधानांचे धोरण हे असेच गोंधळलेले होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वाजपेयींनी त्यांच्यापेक्षा काही वेगळे केलेले नाही. पण तरीसुद्धा फक्त वाजपेयींच्या काळातच पाकिस्तानवर काही क्षेत्रात निर्बंध आणण्याचा प्रयत्न झाला होता व इतरांच्या काळात असे प्रयत्न अजिबात झाले नव्हते हे नमूद करावेसे वाटते.
>>> एका विशिष्ट विचारसरणीचा चष्मा डोळ्यावर चढवल्यावर असे होत असावे.
एका विशिष्ट विचारसरणीला आंधळा विरोध केल्यावरही असेच होते. अशा लोकांसाठी मी "निधर्मांध" हा शब्द वापरतो.
>>> देशातल्या जनतेने पण त्या चुकामुळेच वाजपेयना घरचा रस्ता दाखवला. २००९ पण तेच झाले .
२००४ व २००९ मध्ये भाजप व काँग्रेस या दोघांचाही पराभव झाला होता. पण काँग्रेसने भाजपपेक्षा थोडे जास्त गुण मिळविले व इतर सर्व पक्ष भाजपविरूद्ध ठाम उभे राहिल्याने बहुमत न मिळतासुद्धा काँग्रेसला सरकार स्थापन करता आले होते. या दोन्ही निवडणुकातील भाजपच्या पराभवाचा आणि भाजपच्या १९९८-२००४ या काळातील कामगिरीचा फारसा संबंध नाही. भाजपने या निवडणुकीत आपले अनेक सहकारी पक्ष गमावले व ते काँग्रेसने मिळविले (उदा. द्रमुक) हे भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण आहे.
>>> कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगण्याचा अजुन एक प्रयत्न करतो आणि रजा घेतो.
हे विधान चुकीचे आहे. भाजप काँग्रेसपेक्षा तुलनेने कमी वाईट आहे.
23 Mar 2013 - 10:12 pm | बंडा मामा
कंदाहार प्रकरणातील ढिसाळ हाताळणी ही प्रत्यक्ष चुक नाही म्हणजे काय?
वाईटपणा मोजण्यासाठी तुम्ही कुठली फुटपट्टी वापरता ह्यावर हे ठरते. मला सगळे पक्ष एकाच माळेचे मणी वाटतात.
24 Mar 2013 - 12:28 pm | श्रीगुरुजी
>>> कंदाहार प्रकरणातील ढिसाळ हाताळणी ही प्रत्यक्ष चुक नाही म्हणजे काय?
कंदाहार प्रकरणात नक्की कोठे ढिसाळ हाताळणी झाली?
24 Mar 2013 - 6:22 pm | बंडा मामा
कंदाहार प्रकरणात भारत मुत्सद्देगिरीत कमी पडला हे तुम्ही ही मान्य केलेले आहे. ढिसाळ्पणाचा खुलासा दुसर्या एका प्रतिसादात दिला आहे.
24 Mar 2013 - 8:31 pm | श्रीगुरुजी
"कंदाहार प्रकरणात भारत मुत्सद्देगिरीत कमी पडला हे तुम्ही ही मान्य केलेले आहे. "
हे मी कोणत्या प्रतिसादात मान्य केले?
24 Mar 2013 - 8:36 pm | बंडा मामा
अहो असे काय करता इथे तुम्हीच म्हणाला आहेत की;
http://www.misalpav.com/comment/471399#comment-471399
23 Mar 2013 - 11:11 pm | बंडा मामा
आणि कारगील प्रकरणतील खलनायक मुशरर्फ साठी घातलेल्या पायघड्या, मेजवान्या इ.इ.?
24 Mar 2013 - 12:35 pm | श्रीगुरुजी
>>> आणि कारगील प्रकरणतील खलनायक मुशरर्फ साठी घातलेल्या पायघड्या, मेजवान्या इ.इ.?
कोणत्याही देशाच्या प्रमुखाच्या "अधिकृत" भेटीच्या वेळी अशी सरबराई केलीच जाते. प्रत्येक देशच दुसर्या देशाच्या प्रमुखाच्या "अधिकृत" भेटीत अशी सरबराई करतोच. तसा आंतरराष्ट्रीय मानदंड आहे. दुसर्या देशाच्या प्रमुखाच्या "अधिकृत" भेटीच्या वेळी व दुसर्या देशाच्या प्रमुखाच्या मृत्युनंतर काही आंतरराष्ट्रीय मानदंड पाळावेच लागतात. हिटलरसारखाच दुसरा क्रूर हुकुमशहा असलेला धर्मांध अयातुल्ला खोमेनी १९८६ मध्ये वारल्यावर भारतात ३ दिवस सरकारी दुखवटा पाळला होता हा त्याच मानदंडानुसार.
मुशर्रफची ती "अधिकृत" भेट होती. पण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा पंतप्रधान राजा अश्रफ अजमेरच्या खासगी भेटीवर आला होता. ही "अधिकृत" भेट नव्हती. पण तरीसुद्धा सलमान खुर्शिदने त्याचे विमानतळावर जाऊन पायघड्या घालून स्वागत केले व त्याच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. मुख्य म्हणजे केवळ काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने २ भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला होता व हैद्राबाद बॉम्बस्फोट देखील घडवून आणले होते. तरीसुद्धा राजा अश्रफची सरबराई ठेवली गेली. याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
24 Mar 2013 - 6:12 pm | बंडा मामा
ही भेट "अधिकृत" कुणी केली? काय गरज होती? भारताशी कुटील युद्ध खेळणार्या, लोकशाही धुडकावुन हुकशहा बनलेल्या अध्यक्षाला मान्यताच द्यायला नको होती. निदान सो कॉल्ड खंबीर आणि जाज्वल्य राष्ट्रप्रेमी पक्षाची सत्ता असताना? इथे बरे मानदंड आडवे येतात.
आपल्या नरेंद्र मोदिंना गुजरात राजयाचे मुख्यमंत्री असुनही अमेरिकेने अधिकृत भेट सोडाच साधा विजिटर विसा पण दिला नाही. त्यांना कसे जमते हे? मोदी आपले अधक्ष नसले तरी मुख्यमंत्री हे अतिशय मोठे पद भुषवतात तसेच त्यांनी अमेरिकेशी युद्ध काय कधी चकार शब्दही काढलेला नाही. तरीही त्यांना फाट्यावर मारलेच ना?
राजा खुर्शिद खाजगी भेटीवर असला तरी तो त्यांचा पंतप्रधान आहे. तोही लोकशाहीने निवडून आलेल्या पक्षाचा. हुकुमशहा नव्हे. त्याचे स्वागत करायचेही काही आंतरर्ष्ट्रीय संकेत नसतील कशावरुन?
24 Mar 2013 - 6:22 pm | श्री गावसेना प्रमुख
बंडा मामा
24 Mar 2013 - 7:51 pm | अर्धवटराव
24 Mar 2013 - 8:14 pm | बंडा मामा
तुम्ही दिलेले एकही कारण मुशर्र्फला पायघड्या घायण्यासाठी पुरेसे वाटत नाही. मुशर्र्फला बोलावणे ही चूक होती हे अगदी श्रीगुरुजींनीही मान्य केले आहे. मुशर्र्फ सारख्या लष्करी हुकुमशहाला असल्या चुचकारण्याने सुधरवण्याचा प्रयत्न करणे हाच तो श्रीगुरुजी इतरत्र म्हणतात तो भाबडा गैरसमज आहे. मुत्सेद्देगिरी वगैरे काही नाही. शेवटी व्हायचे तेच झाले. मुशर्र्फ मस्त ताज महालवर पोझ घेऊन फोटो सेशन करुन निघुन गेला आणि आम्ही भाबडे जैसे थे.
24 Mar 2013 - 9:51 pm | अर्धवटराव
अहो त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करायला हि काय गांधिगिरी आहे काय? म्हणजे शांतीचे पाठ देऊन त्याचं हृदय परिवर्तन करायचा वाजपेयींचा प्रयत्न होता असं म्हणायचं आहे कि काय तुम्हाला? किंवा त्याला बाबा बेटा करुन जेऊ खाऊ घातलं कि तो भारत द्वेष विसरेल असा वाजपेयींचा होरा होता, असा दावा आहे तुमचा?? वाजपेयी हिंदी - पाकि भाई भाई म्हणणारे स्वप्नरंजाळु नक्कीच नव्हते, किंवा मुशर्रफचा वाल्याचा वाल्मिकी करायचा देखील वाजपेयींचा प्रयत्न नव्हता. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी आणि टीमचे कॅल्क्युलेशन्स चुकले... पण त्यांचा आशावाद भाबडा वगैरे नव्हता... वाजपेयी किंवा आडवाणि किंचीत देखील भाबडे नाहित हो.
अर्धवटराव
24 Mar 2013 - 10:16 pm | बंडा मामा
वाजपेयी नाहीत हो..जे लोक जे वाजपेयींच्या चुकींना मुत्सद्दीपणा समजतात त्यांना मी भाबडे म्हणालो.
24 Mar 2013 - 8:50 pm | निनाद मुक्काम प...
फार योग्य गोष्ट बोललात
काहीतरी ठोकताळे नक्कीच बांधले असतील वाजपेयी सरकारने
पण तुम्ही म्हणतात ते दुर्दैवाने फसले ,पण दुर्दैवाने हे त्यांचे पहिले अपयश नव्हते ,
चुकीचे परराष्ट्र निर्णय घेणे हेच त्यांच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्टे आहेत.
24 Mar 2013 - 9:58 pm | अर्धवटराव
>>चुकीचे परराष्ट्र निर्णय घेणे हेच त्यांच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्टे आहेत. ?
कुठले चुकीचे निर्णय? उदाहरणे देता येईल का? कुठले निर्णय चुकले, त्याने भारताचे काय काय नुकसान झाले ? गोधरा काण्ड, इंडीया शायनींग, मुशर्रफ भेट, करुणानिधीशी घरोबा न करणे, हे काहि चुकीचे निर्णय एन. डी. ए. च्या खात्यात जमा केले जातात... परराष्ट्र नितींसंबंधात मी काहि विषेश निगेटीव्ह ऐकलं नाहि.
अर्धवटराव
24 Mar 2013 - 10:02 pm | पिंपातला उंदीर
मुशराफ्फ भेट अपयशी परराष्ट्र धोरणात येत नाही? तुमचे परराष्ट्र धोरणाचे निकष एकदा कळले की आम्हा पामरणा प्रतिसाद द्यायला सोपे जाईल
25 Mar 2013 - 12:50 am | अर्धवटराव
इथे बाय अॅण्ड लार्ज फेल्युअर बद्दल बोलणं सुरु आहे.
अर्धवटराव
24 Mar 2013 - 10:03 pm | अर्धवटराव
किंबहुना वाजपेयींच्या काळात चिनशी व्यावहारीक संबंधात सुधारणाच झाल्या असा सुर ऐकु येतो.
अर्धवटराव
24 Mar 2013 - 8:35 pm | श्रीगुरुजी
"ही भेट "अधिकृत" कुणी केली? काय गरज होती? "
मुशर्रफला आग्र्याला बोलाविणे ही चूकच होती. हे मी पूर्वीही लिहिले आहे.
"आपल्या नरेंद्र मोदिंना गुजरात राजयाचे मुख्यमंत्री असुनही अमेरिकेने अधिकृत भेट सोडाच साधा विजिटर विसा पण दिला नाही. त्यांना कसे जमते हे?"
अमेरिका महाशक्ती आहे. अमेरिका कोणत्याही देशात घुसून आपल्याला हवे तेच करते. अमेरिका पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारते, इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेनला पकडते, पनामात घुसून पनामाचा अध्यक्ष असलेल्या जनरल नोरिएगाला आपल्या देशात पकडून आणून खटला चालवून शिक्षा देते . . . भारत व अमेरिकेची बरोबरी होऊच शकत नाही.
"राजा खुर्शिद खाजगी भेटीवर असला तरी तो त्यांचा पंतप्रधान आहे. तोही लोकशाहीने निवडून आलेल्या पक्षाचा. हुकुमशहा नव्हे. त्याचे स्वागत करायचेही काही आंतरर्ष्ट्रीय संकेत नसतील कशावरुन? "
तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत भेटीचा राग आलेला आहे, पण राजा अश्रफची खाजगी/अनधिकृत भेटीवर केलेली सरबराई मात्र अजिबात खुपलेली नाही.
24 Mar 2013 - 8:40 pm | बंडा मामा
नाही. जो न्याय तुम्ही खुर्शिद भेटीला लावावात तोच मुशर्र्फ भेटीलाही लावावा इतकेच माझे म्हणणे आहे. मूळ मुद्दा भाजपानेही काँग्रेससारख्याच चुका केल्या आहेत का हा होता. ज्यातील भाजपाच्या चुका तेवढ्या अमान्य केल्याने उपचर्चा सुरू झाली.
24 Mar 2013 - 9:05 pm | निनाद मुक्काम प...
राजा परवेझ ह्यांची भेट खाजगी होती , ती पाकिस्तानी सरकार तर्फे काश्मीर व इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी झाली नव्हती ,जशी रेहमान ह्यांची होती ,तेथे त्यांनी मुक्ताफळे उधळली होती.
भारतातून नुकतेच गुलझार सुद्धा तेथे जाऊन आले , माझ्या मते मनमोहन सिंग ह्यांना त्यांच्या गावी भेट देण्यासाठी रेहेमान ह्यांनी आमंत्रण दिले होते ,
भारत पाकिस्तान ह्यांच्यात वाद होत राहतात पण त्याच दरम्यान पाकिस्तानी सरकारने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताला अफगाणिस्तानात व्यापार करण्यासाठी पाकिस्तानी मार्ग मोकळा दिला आहे ,
ह्यावर त्यांच्या कट्टर पंथीयांनी गदारोळ माजवला होता.
तुर्कमेनिस्तान मधून येणारा नैसर्गिक वायू भारतात येण्यासाठी पाकिस्तान च्या ह्याच सरकारने भारताला मार्ग दिला आहे ,
पंजाबी वंशांच्या बहुसंख्य पाकिस्तानी लष्करात शरीफ हा त्यांच्या जवळचा मानला जातो , मुशरफ वर विश्वास टाकता येत नाही तर इम्रान खान लबाड कोल्हा आहे ,
अश्यावेळी भष्टाचारी राजा परवेझ व झरदारी ह्यांची पी पी पी चे सरकार भारताच्या दृष्टीने कमी त्रासदायक आहे.
तेव्हा दगडापेक्षा वीट मऊ ह्या नात्याने त्यांच्या खाजगी भेटीचे उगाच राजकारण करू नये ,
आपले अडवाणी व सिंग हे भाजपचे मोठे नेते अश्याच खाजगी भेटीवर पाकिस्तानात गेले होते , तेव्हा पाकिस्तान पेक्षा भारतात त्यांच्याविषयी शिमगा झाला होता.
17 Mar 2013 - 8:30 am | क्लिंटन
मानले तुम्हाला श्रीगुरूजी.झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार?
17 Mar 2013 - 10:48 am | विश्वनाथ मेहेंदळे
+ २^१०००००
17 Mar 2013 - 1:08 pm | मैत्र
इतकं खुलं सोंग तरी घेऊ नये.. किंवा मुद्देसूद प्रतिवाद करावा..
असो.. पण हे नेहमीचंच आहे. श्रीगुरुजी तुम्ही पूर्वीचे प्रतिसाद वाचले असते तर इतके उत्तम मुद्दे मांडण्याचे कष्टही घेतले नसते.
असो पण त्यामुळे चांगली चर्चा झाली. तुमच्या उत्तम माहितीबद्दल धन्यवाद..
17 Mar 2013 - 2:42 pm | sagarparadkar
श्रीगुरुजींची जिद्द आणि मुद्देसूद प्रतिवाद करण्याचे कौशल्य मानले __/\__
24 Mar 2013 - 6:25 pm | बंडा मामा
श्रीगुरुजी मुद्देसुद प्रतिसाद देतात ह्यात काही वादच नाही. पण भाजपाच्या बाबतीत त्यांनीही थोडे झोपेचे सोंग घेतले आहे असे तुम्हाला वाटत नाही काय?
17 Mar 2013 - 3:01 pm | मोदक
सहमत!!
या कारवाईची रशियाने जबरदस्त किंमत मोजलेली आहे. नाट्यगृहातल्या अतिरेक्यांना रशियन कमांडोंनी ठार केले पण त्या धुमश्चक्रीत २०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.
अशी किंमत मोजण्यासाठी आपण तयार आहोत का..? मॉस्को मधली घटना असो वा बेसलान मधील ही घटना..
Beslan school siege took place in early September 2004 lasted three days and involved the capture of over 1,100 people as hostages (including 777 children) ending with the death of over 380 people (including 156 children)
It was claimed by the locals that over 200 of those killed were found with burns, and 100 or more of them were burned alive. The last reported fatality was 33-year-old librarian Yelena Avdonina, who succumbed to her wounds on 8 December 2006. (विकीच्या सहाय्याने!)
17 Mar 2013 - 4:46 pm | श्रावण मोडक
किंमत मोजणे वगैरे मला कळत नाही. अशा घटनांमध्ये आपला हेतू, उद्देश काय असतो हे आधी पाहिले पाहिजे. शत्रूला संपवणे हा असतो की 'आपल्यांना' वाचवणे हा असतो? मला वाटतं, हेतू पहिला असेल तर किंमत मोजण्याचा मुद्दा येतो. आणि किंमत मोजल्यानंतर ती किंमत आहे हे स्वीकारून पुढे जाण्याची तयारी हा भाग येतो. आपल्या हेतूंचीच पंचाईत असते. पहिला हेतू वरकरणी गर्जनांसाठी असतो. आतमध्ये पोटात गोळा आलेला असतो किंमत मोजावी लागणार म्हणून. किंमत मोजण्याची तयारी नसतेच. किंमत का मोजली हे विचारायची मात्र तयारी असतेच म्हणा.
कंदाहारनंतर अपहरण वगैरे झालेले आठवत नाही. नाही तर, त्या काळात 'अपहरणकर्त्यांशी चर्चा नाही', असे राष्ट्रीय धोरण ठरवण्याच्या वगैरे गोष्टी झालेल्या आठवतात (गुगलवर कळेलच म्हणा...). तेव्हाच्या एकमेकांच्या भूमिका पाहिल्या पाहिजेत. पण नको... तसं केलं तर, गावाकडच्या भाषेतला, 'शेपूट तुटक्या माकडांचा मेळावा' आणखी जास्त दिसायचा.
तर, एकूण वर्तुळ-कोन सिद्धांताचे काही प्रयोग सुरू आहेत इथे. ते तसेच चालू ठेवले जावेत, यासाठी(ही) ही काडी टाकली आहे. त्यामुळे मोदक यांच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद दिला असला तरी तो केवळ एक मुद्दा पकडण्यासाठी.
17 Mar 2013 - 10:35 pm | निनाद मुक्काम प...
वाजपेयी सरकार कंदहार प्रकरणी सर्वच आघाडीवर अपयशी ठरले ,
विमान भारतातून दुबई मध्ये असेपर्यंत करण्यासारखे खूप होते. मात्र ते अफगाणिस्तान मध्ये जाऊ दिले येथेच अर्धी लढाई हरली ,
दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा कि दोन्ही प्रकरणात अपहरणकर्त्याने विमाने अनुक्रमे युगांडा व अफगाण येथे का नेली ,
ह्याचे सरळ उत्तर असे आहे , की ह्या देशातील राज्यकर्ते अपहरणकर्त्याने सोयीचे होते ,
हे सांगण्याचा उद्देश एवढाच की दोन्ही वेळेला परिस्थिती समान होती.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे अफगाण वरून भारतात येतांना मध्ये पाक लागते पण आपल्या विमानांना रशिया किंवा इराण हे दोन पर्याय उपलब्ध होते ,
रशियात पुतीन ह्यांनी दहशतवाद्यांच्या पुढे नामायचे नाही हे ठरवले व सरळ कारवाई केली ह्यात सारे दहशतवादी मेले मात्र ह्या कारवाईत सामान्य निर्दोष नागरिक सुद्धा मारल्या गेले ,मात्र पुतीन ह्यांना एक पक्की खात्री होती की एकदा दहशतवाद्यांच्या पुढे लोटांगण घातले की प्रत्येकवेळी खावे लागेल ,
आपण शाळेत एक गाणे शिकलो होतो
विजयी विश्व ,तिरंगा प्यारा , झंडा उंचा रहे हमारा
ह्यात एक ओळ अशी होती
शान न इसकी जाने पाये , चाहे जान भलेही जाये.
पण भारतात स्वातंत्र्य पूर्व काळात देशासाठी सामान्य जनता जीवावर उदार झाली कारण त्याकाळी तसे नेते होते.
आताचे नेते विरोधी बाकावर बसून शेरो शायरी ,कविता करतात , पल्लेदार भाषणे ठोकतात. मात्र सत्ता हातात आली की
काटेरी मुकुट सांभाळता येत नाही ,
त्यापेक्षा कम्युनिस्ट परवडले ,
आपल्या तत्वांना चिटकून असतात , त्यासाठी वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडतात.
म्युनिक मध्ये आपले खेळाडू सोडवताना झालेल्या चकमकीत त्यांचे सारे खेळाडू मारल्या गेले , म्हणून काही त्याच्या सरकारला
लोकांनी राजीनामा द्यायला लावला नाही ,उलट त्याच्या सरकारने न भूतो न भविष्यती असा सूड ,उगवला.
सध्या स्वराज बाई विरोधी बाकावरून हेच करत आहेत ,
पण त्यांच्या भाषणामुळे सरकारचे काडीचे सुद्धा नुकसान होत नाही , त्यांना करायचे तेच ते करतात.
23 Mar 2013 - 9:48 pm | बंडा मामा
अहो दुबईपर्यंतही जायची गरज नाहित. विमान आपल्या हद्दीत पंजाबात उतरले होते, तेव्हा तर सुवर्णसंधी होती. तिथे जो गोंधळ घालण्यात आला त्यातच पूर्ण लढाई हरली.
24 Mar 2013 - 12:47 pm | श्रीगुरुजी
विमान पळविल्यानंतर काही वेळातच अमृतसरला उतरविले होते व ते तिथे फक्त ४०-४५ मिनिटे होते. त्यानंतर लगेच ते दुबईला नेण्यात आले. फक्त ४०-४५ मिनिटे मिळाली आणि ते सुद्धा विमान पळविल्याचे समजल्यानंतर काही योजना आखण्याच्या आतच आणि लष्कर किंवा कमांडो अशा कोणाशीही विचारविनिमय करून योजना ठरविण्याच्या आतच. इतक्या कमी वेळात तिथे काय करता आले असते? अमृतसरला नक्की काय गोंधळ घालण्यात आला?
२६/११/२००८ ला संध्याकाळी ८ च्या सुमारास मुम्बईवर हल्ला झाल्यावर दिल्लीहून मुम्बईला कमांडो पोचायला १४ तास लागले होते. हे लक्षात घेता १९९९ मध्ये दिल्लीहून कमांडो पोचायलाच किमान २-३ तास तरी लागले असते.
24 Mar 2013 - 5:54 pm | बंडा मामा
हे वाचा:
At Amritsar, Captain Sharan requested refuelling the aircraft. However, the Crisis Management Group in Delhi directed Amritsar Airport authorities to ensure that the plane was immobilised, which armed personnel of the Punjab police were already in position to try to do. They did not receive approval from New Delhi. Eventually, a fuel tanker was dispatched and instructed to block the approach of the aircraft. As the tanker sped towards the aircraft, air traffic control radioed the pilot to slow down, and the tanker immediately came to a stop. This sudden stop aroused the hijackers' suspicion and they forced the aircraft to take off immediately, without clearance from air traffic control. The aircraft missed the tanker by only a few feet.
अतिरेक्यांनी हायजॅक केलेले विमान कुठल्याही देशाने आपल्या हद्दीत असताना आधी जॅम केले असते. इथे दिल्लीने केलेला सावळा गोंधळ पाहा. अर्थात वरती क्लिंट्न म्ह्णतात तसे झोपेचे सोंग घेतले असेल तर ह्यातही काहीच ढिसाळ्पणा दिसणार नाही. हेच काँग्रेस सरकारने केले असते तर ते सरकार किती षंढ आहे वगैरे लेख आले असते. म्हणूनच मी म्हणतो कोणत्याही एका पक्षाची तळी उचलण्यात काहीच अर्थ नाही.
24 Mar 2013 - 6:34 pm | प्रदीप
त्यावेळी सावळा गोंध़ळ झाला हे कबूल आहे. पण असाच व बहुधा ह्याहीपे़क्षा गोंधळ २६/११ च्या वेळेस झाला.
मला वाटते, इतके होऊनही उद्या पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली, तर असाच गोधळ भारतात अनुभवावयास मिळेल. हे आपक्ले स्थायी वैशिष्ट्य आहे, त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी फारसा संबंध नाही.
बाकी चालू दे.
24 Mar 2013 - 6:58 pm | बंडा मामा
धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे. कुठल्याही एका पक्षाची तळी उचलण्यात काहीच हशील नाही.
पण श्रीगुरुजी, क्लिंटन वगैरेना कंदाहार प्रकरणातला तेवढाच गलथानपणा मान्य नाही कारण ते प्रकरण भाजपाने हाताळले.
श्रीगुरुजी एका ठिकाणी म्हणतात मुशर्र्फना बोलावणे ही चूक होती, नंतर म्हणतात अधिकृत भेट होती, मानदंड होते वगैरे. कारण पुन्हा भाजपाचे सरकार होते.
24 Mar 2013 - 8:08 pm | क्लिंटन
१. वर लिहिलेल्या या
प्रतिसादात लिहिलेले एक वाक्य परत एकदा उधृत करतो: "सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा जास्त दोष या प्रकरणी आहेच पण सगळा दोष केवळ भाजपवर ढकलायचा प्रयत्न करत असेल तर तो पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आहे हे स्पष्ट आहे."
२. मागे राजीव गांधींवर मिसळपाववर चर्चा झाली होती त्या चर्चेत माझ्या एका प्रतिसादात कंदाहार प्रकरणाचा एका वाक्यात उल्लेख आहे.पण त्याविषयी मला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट आहे.
३. २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर विकास यांचा लोकशाही-२००९ हा लेख आला होता.त्यात मी एक प्रतिसाद लिहिला होता.तो काही कारणाने सध्या दिसत नाही (कोणी तो प्रतिसाद उडविला की काय याची कल्पना नाही) पण मी तोच प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर लिहिला आहे.
तेव्हा भाजपचे सरकार होते या कारणावरून गलथानपणा मान्य नसल्याच्या मुद्द्याला फारसा अर्थ नाही हे कळेलच.
माझा मुद्दा एकच की एखाद्या घटनेवर/व्यक्तीवर मते बनविताना एखाद्या पक्षाचे सरकार होते/अमुक एका अडनावाचा नेता आहे/ अमुक एका संस्थेचा सदस्य असलेला तो नेता आहे इत्यादी गोष्टी बाजूला ठेऊन मते बनवावित.यातून होते असे की मी विविध प्रतिसादांमधून भाजपच्या अनेक, काँग्रेसच्या अनेक (आणि कम्युनिस्टांच्या जवळपास सगळ्या) गोष्टींवर टिका करतो आणि त्याचबरोबर माझ्या मते ज्या चांगल्या गोष्टी भाजपने केल्या (पोखरण चाचण्या,भारतात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर भर देणे इत्यादी) आणि काँग्रेस पक्षाच्या काही धोरणांचे (१९९१ चे आर्थिक धोरण,नरसिंह रावांनी इतर काही केलेल्या चांगल्या गोष्टी,राजीव गांधींचे संगणिकीकरणाला चालना द्यायचे धोरण) समर्थन करतो. त्यातूनच काही वेळा प्रतिसादांच्या context वरून काहींना मी अगदी कट्टर भाजपवाला किंवा कट्टर काँग्रेसवाला वाटत असेनही पण परिस्थिती तशी नक्कीच नाही. असो.
24 Mar 2013 - 8:24 pm | बंडा मामा
तुम्हाला दोन्ही पक्षांच्या सुधारणा आणि चुका मान्य आहेत ह्या खुलाशा बद्दल धन्यवाद. मुळात ही उपचर्चा त्यावरुनच सुरू झाली होती. अमोल उद्गिरकरांनी तोच मुद्दा मांडला होता. माझेही मत तेच आहे.
24 Mar 2013 - 8:58 pm | पिंपातला उंदीर
खर तर मला क्लिंटन यांच्याबद्दल आणि त्यांच्या संतुलित असणार्या प्रतिसादाबद्दल खूप आदर आहे. पण त्यानी माझे प्रतिसाद वाचून माझयाबद्दल काय पूर्वग्रह करून घेतले ते कळायला काही मार्ग नाही. मला पंतप्रधान करायला पाहिजे आइयी. प्रतिसाद त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. वैचारिक वादविवाद प्रतिवाद त्यांच्याकडून अपेक्षित होते आणि आहेत. बाकी बंडा मामा यांचे आभार
25 Mar 2013 - 12:58 pm | नितिन थत्ते
कंदाहारप्रकरणी भाजपच्या सरकारने परिस्थिती पाहून योग्य तेच निर्णय घेतले असतील असे मलाही व्यक्तिशः वाटते.
24 Mar 2013 - 8:51 pm | श्रीगुरुजी
मुशर्रफला बोलाविणे ही चूकच होती. पण एकदा अधिकृत भेटीसाठी बोलाविल्यावर प्रोटोकॉलप्रमाणे दोन्ही देशांनी वागणे हे बंधनकारक असते.
24 Mar 2013 - 9:06 pm | पिंपातला उंदीर
असे कसे .? अशी बालिश विधान? मुशराफ्फ ने हजारो भारतीय जवानचा बळी घेतला आणि अजुन एक महत्वाचे शिखर वाजपेयी सरकारने गमावले. मूशी मोठा शत्रू का ते राजा बुजगावनं .
24 Mar 2013 - 8:48 pm | श्रीगुरुजी
विमान हायजॅक केल्याचे समजल्यानंतर पुढच्या केवळ तासाभरात घडलेल्या या घटना आहेत. इतक्या कमी वेळात कोणत्याही सुसूत्र व योजनाबद्ध कारवाईची योजना बनविणे व ती कार्यवाहीत आणणे अत्यंत अवघड असते. नक्की काय करावे, कसे करावे, कोणी करावे, त्यात कोणते धोके आहेत इ. विचार करायला या प्रकरणात फारच कमी वेळ मिळाला.
अमृतसरला नक्की काय घडले याविषयी खूप गोंधळ आहे. अनेक वृत्तपत्रातून वेगवेगळ्या कहाण्या छापून आलेल्या आहेत. त्यामुळे तिथे नक्की काय घडले हे सांगता येणे अवघड आहे. मी असेही वाचले होते की त्या ऑईल टँकरमधून कर्मचार्यांच्या वेषातले सैनिक पाठविले होते व त्यांना विमानाच्या जवळ पोचल्यावर विमानाच्या टायरवर गोळ्या घालून टायर फोडण्यास सांगितले होते. पण जसा तो टँकर जवळ येऊ लागला, चाच्यांना संशय आल्याने त्यांनी वैमानिकाला तातडीने उड्डाण करावयास सांगितले व विमान भारतीय हद्दीतून बाहेर पडले.
अमृतसरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर, पंजाबचे पोलिस, टँकरचे कर्मचारी, दिल्लीचे अधिकारी व मंत्री इ. मध्ये इतक्या कमी वेळात समन्वय आणणे व सुसूत्रता आणणे खूप अवघड होते.
24 Mar 2013 - 10:46 pm | पिशी अबोली
याचा संपूर्ण संदर्भ देता का बंडामामा? संदर्भ सोडून दिलेले वाक्य कुठलेही असू शकते. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरविण्यासाठी त्याचा आगापिछा कळला तर बरं होईल..अन्य कुठे दिलेला असेल आधीच तर माफ करा.अजून सगळी चर्चा वाचतेय.
23 Mar 2013 - 7:13 pm | बंडा मामा
अहो श्रीगुरुजी अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले.
23 Mar 2013 - 7:42 pm | चिगो
ह्हांगाशी.. पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची? "बेगर्स आर नॉट चुजर्स" असं काहीतरी म्हण्तात बघा.. आणि विमान हवाई क्षेत्रातून जात असतांना त्या त्या देशाला ते कशाकरीता जात आहे, ह्याची माहिती द्यावी लागत असेल, असे वाटते.. आणि अंतरराष्ट्रीय संबंधांत "खोटे बोलणे" योग्य मानले जात नसावे, असा एक समज आहे ब्वॉ माझा..
23 Mar 2013 - 9:42 pm | बंडा मामा
पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची?
अहो पण तरीही ते हो म्हणतात की नाही हे विचारयच्या भानगडीतच पडले नाहीत.
23 Mar 2013 - 7:56 pm | श्रीगुरुजी
"अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. "
कोणतेही प्रवासी विमान ज्या देशाच्या हवाई हद्दीतून जात असते, त्या देशाच्या संपर्क यंत्रणेबरोबर त्या विमानाचा सतत संपर्क असतो व देशाच्या हद्दीत प्रवेश करताना विमानाने आपली ओळख पटवून द्यायची असते. विमाने रडारवर दिसत असतात व एखाद्या विमानाने आपली ओळख दिली नाही तर संशय येऊन तो देश ते विमान क्षेपणास्त्र डागून पाडू शकतो. हेच जर लष्करी विमान असेल तर इतर कोणताही देश आपल्या हवाई हद्दीतून दुसर्या देशाचे लष्करी विमान जाउ देत नाही. प्रवासी विमानाची व लष्करी विमानाची ओळख वेगवेगळी असल्याने एखाद्या लष्करी विमानाने दुसर्या देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आपण प्रवासी विमान असण्याची बतावणी केली तरी ते जमिनीवरील संपर्क यंत्रणेला लगेच लक्षात येते व अशा परिस्थितीत तो देश त्या विमानावर क्षेपणास्त्र डागू शकतो.
तुमच्या म्हणण्यानुसार भारताने एखाद्या प्रवासी विमानातून कमांडो व शस्त्र पाठवायची होती किंवा एखादे लष्करी विमान हे प्रवासी विमान असल्याची बतावणी करून त्यातून कमांडो व शस्त्र पाठवायची होती. मी वर लिहिल्याप्रमाणे जमिनीवरील संपर्क यंत्रणेला अशी बतावणी करून फसविणे अशक्य आहे.
आणि समजा तसे विमान व कमांडो पाठविले असते, तरी ते कंदाहार मध्ये उतरणार कोठे? कंदाहार विमानतळावर पळविलेले भारताचे विमान तालिबानच्या सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते. विमानतळावर विमानवेधी तोफा आणून ठेवलेल्या होत्या व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तालिबानी सैनिकांनी तिथे कोणतेही विमान उतरू नये यासाठी धावपट्टीवर अडथळे आणून ठेवलेले होते. त्यामुळे बाहेरील कोणतेही विमान तिथे उतरणे अशक्य होते. किंबहुना विमान विमानतळाच्या जवळ आल्यावर त्याला तोफांचा सामना करावा लागला असता व विमान उतरवताच आले नसते. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची कमांडो कारवाई करणे भारताला अशक्य होते.
पाकिस्तानमधली परिस्थिती वेगळी होती. अमेरिकेने ओसामाला पकडताना पाकिस्तानची परवानगी मागण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ओसामाला पाकिस्ताननेच गुपचूप लपवून ठेवले आहे याची अमेरिकेने खात्री करून घेतलेली होती व आपण ओसामाला पकडणार याची बातमी पाकिस्तानला लागली तर काही वेळातच पाकिस्तान त्याला दुसरीकडे हलवेल याची अमेरिकेला खात्री होती. ही मुत्सद्देगिरी नसून अत्यंत सावध व गुप्त लष्करी डावपेच होता.
अमेरिकेने ओसामाला पकडण्यासाठी "स्टील्थ" प्रकारची हेलिकॉप्टर्स वापरली होती. ही हेलिकॉप्टर्स रडारवर सहजासहजी दिसत नाहीत व त्यांचा आवाजही खूप कमी असतो. त्यामुळे पाकिस्तानी रडारयंत्रणेला ही हेलिकॉप्टर्स आपल्या हद्दीत घुसल्याचे समजले नाही. ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेने अफगाणिस्तानमधून अबोटाबादमध्ये (जिथे ओसामाला लपविले होते) पाठविली होती. त्यामुळे पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशाच्या हवाईहद्दीतून जाण्याचा प्रश्नच नव्हता.
या हेलिकॉप्टरविषयी अधिक माहिती खालील ठिकाणी मिळेल.
http://www.nytimes.com/2011/05/06/world/asia/06helicopter.html?_r=0
"मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. "
या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.
23 Mar 2013 - 8:02 pm | श्रीगुरुजी
वरील प्रतिसादात चुकीची लिंक दिली. खालील लिंक पहा.
http://www.nytimes.com/2011/05/06/world/asia/06helicopter.html
23 Mar 2013 - 8:08 pm | वेताळ
नेल्यास त्याचा पत्ता रडार ला लगु शकत नाही.
24 Mar 2013 - 5:08 am | निनाद मुक्काम प...
भारताला आपले विमान पाकिस्तानच्या हद्दीतून न्यायची काय गरज आहे
अफगाण ला लागून तालिबान चा कट्टर शत्रू व भारताचा परम मित्र रशिया मध्ये विमान नेता आले असते ,
व सुन्नी तालिबानचे विरोधक व भारताचे मित्र इराण हा सुद्धा अजून एक उत्तम पर्याय होता ,
पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे लष्कराच्या हातात आहे , हे एखादा शेंबडा पोरगा देखील सांगेन
वाजपेयी शरीफ ह्यांना मैत्रीची भेट द्यायला आले ,तेव्हा मुशर्रफ त्यांना सलामी द्यायला आला नाही , ह्यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट झाली होती ,
तरी सुद्धा बेसावध पणे मैत्रीचे तुणतुणे गात बसले.
वाजपेयी सरकारची दुसरी मोठी घोडचूक म्हणजे ९८ ला अण्वस्त्र चाचणी करणे ,
ह्या चाचणी मुळे आपली हायड्रोजन बॉंब बनविण्याची शमता सिद्ध झाली ,
जी झाली नसती तरीही काहीही बिघडले नसते.
नरसिंह राव ह्यांनी आपल्या काळात ही चाचणी होऊ दिली नाही ,
कारण भारताने एकजरी चाचणी केली तर पाकिस्तान सुद्धा करेल व पाकिस्तान कडे ही शमत १९८५ साली आली होती.
भारताला हि चाचणी करून काही विशेष उपयोग झाला नाही , चीन ने तर अजिबात आपले धोरण बदलले नाही , मात्र पाकिस्तानने लहेच हि चाचणी केली , हा बॉंब इस्लामिक बॉंब घोषित करून जगातील पहिले व एकुलते एक अण्वस्त्र धारी राष्ट्र घ्षित केले , ह्यामुळे जिहादी कारवायांच्या साठी त्यांना निधी मोठ्या प्रमाणात मिळाला ,
त्यांच्या अण्वस्त्र शमतेवर अधिकृत मोहर लागली , व भारताचा पारंपारिक युद्धाचा
मार्ग कायमचा बंद झाला ,
व ह्यापुढे काहीही झाले तरी भारत पाकिस्तानात सैन्य आणू शकत नाही.
कारण अण्वस्त्र युद्धाचा बागुल बुआ प्रगत राष्ट्रांच्या पुढे आला असता.
ह्या एकमेव निकषावर मुशरफ ने कारगील घडवले , त्याचे भारतीय प्रतिकार शामातेचे अंदाज चुकले मात्र भारतीय सैन्य पाकिस्तानची वेस पार करणार नाही हे मत मात्र खरे ठरले , व आजतागायत त्या ९८ च्या चाचणीमुळे आपले पारंपारिक सैन्य आता लोणच्यासारखे मुरत ठेवायला लागत आहे जो पक्ष चाणक्यांच्या हुशारीचा वारसा सांगतो त्यांनी एकामागोमाग घोडचुका कराव्यात हे पटले नाही ,
मी कोणत्याही पक्षाची भाटगिरी करत नाही , मोदी पंतप्रधान व्हावे असे जरूर वाटते ,
म्हणून काही त्यांच्या पक्षांचे मंगळसूत्र गळ्यात बांधल्यासारखे त्यांच्या प्रत्येक कृतीचे वृथा समर्थन सुद्धा करत नाही ,
24 Mar 2013 - 1:03 pm | श्रीगुरुजी
"भारताला आपले विमान पाकिस्तानच्या हद्दीतून न्यायची काय गरज आहे
अफगाण ला लागून तालिबान चा कट्टर शत्रू व भारताचा परम मित्र रशिया मध्ये विमान नेता आले असते ,
व सुन्नी तालिबानचे विरोधक व भारताचे मित्र इराण हा सुद्धा अजून एक उत्तम पर्याय होता ,"
बापरे! आता मात्र हद्द झाली. तुम्ही हे जे वर लिहिले आहे ते पर्याय भारताने विचारात घेतले नसतील का? का ते फक्त तुम्हालाच सुचलेत व तत्कालीन सरकारला सुचलेच नसणार? आणि पार अगदी कोठूनही विमान नेऊन कमांडो पाठविले तरी ते विमान कंदाहारमध्ये उतरणार कोठे? कंदाहारची धावपट्टी तर बंद होती व विमानतळावर तालिबानी सैनिक होते. मग तिथे कमांडो पोचणार कसे?
"पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे लष्कराच्या हातात आहे , हे एखादा शेंबडा पोरगा देखील सांगेन"
हे काय वाजपेयींना माहित नव्हते का?
"वाजपेयी शरीफ ह्यांना मैत्रीची भेट द्यायला आले ,तेव्हा मुशर्रफ त्यांना सलामी द्यायला आला नाही , ह्यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट झाली होती ,"
हे सुद्धा वाजपेयींना माहित नव्हते का?
"तरी सुद्धा बेसावध पणे मैत्रीचे तुणतुणे गात बसले."
मुशर्रफला २००१ मध्ये आग्र्याला बोलाविणे ही चूकच होती.
"वाजपेयी सरकारची दुसरी मोठी घोडचूक म्हणजे ९८ ला अण्वस्त्र चाचणी करणे ,
ह्या चाचणी मुळे आपली हायड्रोजन बॉंब बनविण्याची शमता सिद्ध झाली ,जी झाली नसती तरीही काहीही बिघडले नसते."
अण्वस्त्र चाचणी करण्याची मागणी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून करत होते. प्रगत देश अधूनमधून चाचणी करून नव्याने डाटा गोळा करत असतात. फ्रान्स, चीन इ. देशांनी एका चाचणीवर समाधान न मानता अनेकवेळा चाचणी केली आहे.
"नरसिंह राव ह्यांनी आपल्या काळात ही चाचणी होऊ दिली नाही ,कारण भारताने एकजरी चाचणी केली तर पाकिस्तान सुद्धा करेल व पाकिस्तान कडे ही शमत १९८५ साली आली होती."
नरसिंहरावांनी जानेवारी १९९६ मध्ये चाचणीची पूर्वतयारी केली होती. पण ऐनवेळी अमेरिकेच्या उपग्रहांमुळे अमेरिकेला सुगावा लागला व त्यामुळे अमेरिकेने दबाव आणून चाचणी रद्द करायला लावली होती.
"भारताला हि चाचणी करून काही विशेष उपयोग झाला नाही , चीन ने तर अजिबात आपले धोरण बदलले नाही , मात्र पाकिस्तानने लहेच हि चाचणी केली , हा बॉंब इस्लामिक बॉंब घोषित करून जगातील पहिले व एकुलते एक अण्वस्त्र धारी राष्ट्र घ्षित केले , ह्यामुळे जिहादी कारवायांच्या साठी त्यांना निधी मोठ्या प्रमाणात मिळाला ,
त्यांच्या अण्वस्त्र शमतेवर अधिकृत मोहर लागली , व भारताचा पारंपारिक युद्धाचा
मार्ग कायमचा बंद झाला ,"
ही अत्यंत अतर्क्य वाक्ये आहेत. पाकिस्तानला जिहादी कारवायांचा निधी अणुचाचणीपूर्वीही मिळत होता. कारगिल युद्ध हे अणुचाचणीनंतरच झाले व त्यात कोणतीही अण्वस्त्रे न वापरता ते पारंपारिक पद्धतीनेच झाले हे आपण विसरलेले दिसता.
"व ह्यापुढे काहीही झाले तरी भारत पाकिस्तानात सैन्य आणू शकत नाही. कारण अण्वस्त्र युद्धाचा बागुल बुआ प्रगत राष्ट्रांच्या पुढे आला असता."
भारत स्वतःहून कधीच दुसर्या देशात सैन्य पाठवित नाही. १९४८ असो वा १९६५ वा १९९९ भारत फक्त स्वत:च्या सीमांचे रक्षण करतो पण दुसर्या देशात सैन्य पाठवित नाही.
"ह्या एकमेव निकषावर मुशरफ ने कारगील घडवले , त्याचे भारतीय प्रतिकार शामातेचे अंदाज चुकले मात्रभारतीय सैन्य पाकिस्तानची वेस पार करणार नाही हे मत मात्र खरे ठरले , व आजतागायत त्या ९८ च्या चाचणीमुळे आपले पारंपारिक सैन्य आता लोणच्यासारखे मुरत ठेवायला लागत आहे"
तुमची नक्की काय अपेक्षा आहे? अजून १-२ युद्धे व्हावीत असे तुम्हाला वाटते का? तुमच्या या वाक्यांचा अर्थच समजत नाही.
24 Mar 2013 - 7:46 pm | निनाद मुक्काम प...
गुरुजी तुम्ही जे पर्याय मी दिले ते सरकारला नक्कीच माहिती होते , पण तुम्ही ह्या सर्व प्रकरणातील मूळ मुद्दा समजून घेत नाही आहेत.
जो मोदक ह्यांनी रशियाचे उदाहरण देऊन मोजक्या शब्दात समर्पक मांडला आहे
अश्या प्रकारच्या अपहरण नाट्यात परिस्थिती बिकट असते , व त्यासाठी कमांडो ह्यांना खास प्रशिक्षण दिले असते.
मूळ मुद्दा असा होता की जगभर अश्या अपहरण कृत्यांत जेव्हा लष्करी कारवाई होते , तेव्हा एकतर ती पूर्ण फसते व ओलिस धरलेले मारले जातात ,उदा म्युनिक ऑलिम्पिक,
तर काही प्रकरणात काही ओलिस धरलेले मारले जातात पण सारे अपहरणकर्ते मारले जातात ,प्रकरण त्वरीत निकालात निघते, उदा रशिया येथे पुतीन ह्यांनी केलेली कारवाई ,पण कधी कधी
कधी कधी सर्व ओलिस ठेवलेले बंधक सुरक्षित ठेवले जाऊन दहशतवादी मारले जातात.
24–25 April 1993: NSG Commandos storm a hijacked Indian Airlines Boeing 737 with 141 passengers on board at Amritsar airport during Operation Ashwamedh. Two hijackers, including their leader, Mohammed Yousuf Shah, are killed and one is disarmed before. No hostages are harmed.
ह्या घटनेवरून स्पष्ट कळून येते आपले कमांडो काय ताकदीचे आहेत , जगात ते चौथ्या क्रमांकात येतात ,
पण कंधार प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा नडला हे अनेकांनी येथे सांगितले आहे ,
व पुरावे सुद्धा दिले आहेत ,
त्यात ही एक भर December 1999: Terrorists hijacked Indian Airlines flight IC814 from Nepal, and landed in Amritsar, Punjab. Within minutes of landing, the Crisis Management Group (CMG), which authorised the use of the NSG, was informed. But the CMG wasted precious hours and by the time the go-ahead was issued, it is too late. On the other hand, the NSG team on alert was elsewhere and no other team was raised during the delay. The hijacked plane took off before the NSG reached Amritsar Airport. The plane landed in Kandahar, Afghanistan where one hostage was killed. Finally, the Indian Government agrees to the terrorists' demands to release three jailed terrorists. The hostages are released and the terrorists escaped to Pakistan.
आणि आता मोदक ह्यांनी मांडलेला मुद्दा परत मांडतो ,
सरकार पुढे लष्करी कारवाई करावी का हा मोठा प्रश्न होता ,
कशी करावी हा नव्हता.
पुतीन ह्यांनी केलेल्या कारवाईत किंवा म्युनिक मधील कारवाईत निरपराध नागरिक
मारल्या गेले म्हणून जनता त्यांच्या विरोधात गेली नाही ,
देशाची इज्जत व जगभरात ह्या संबंधी ह्या देशातून संदेश गेला.
भारतात आपल्या तत्त्वासाठी कम्युनिस्ट पक्षाने नुकतेच सरकारच्या मंत्रीमंडळातून राजीनामे दिले , सत्तेसाठी चिटकून बसले नाही ,वाजपेयी ह्याना संघात देश मोठा मग व्यक्ती नाही हि शिकवण दिली होती. ह्यांचा त्यांना विसर पडला असावा.
बाबरी मशीद च्यावेळी त्यांचा जो अजेंडा होता तो पूर्ण होण्यासाठी होणार्या संभाव्य परिणामाची पर्वा न करता कृती केली गेली ,रथयात्रा निघाल्या , मात्र सत्ता मिळताच मूळ अजेंडा बासनात बांधून आहे ती सत्ता टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड केली.
ह्यापुढे गुरुजी तुम्हाला वाजपेयी सरकारचे काहीच चुकीचे दिसत नसेल तर अश्या आंधळे समर्थनार्थ शायनिंग इंडिया चे पितळ उघडे पडले हे खेदाने म्हणावे लागेल ,
विरोधी बाके बडवून कविता करून ,थोडक्यात नुसती टीका करून देश किंवा राज्य चालवता येत नाही , त्यासाठी मोदी सारखे कर्तुत्व लागते , ज्या प्रगत देशांनी त्याच्यावर बंदी घातली अश्या आमच्या देशाला झकत मोदींना युरोपियन युनियन मध्ये आमंत्रण द्यावे लागले , तेव्हा मोदी म्हणाले , देर आये , दुरुस्त आये ,
खरे तर त्यांनी म्हणायला हवे होते ,
मुझ मे हे दम , मे हु सिंघम
24 Mar 2013 - 9:05 pm | श्रीगुरुजी
"पण कंधार प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा नडला हे अनेकांनी येथे सांगितले आहे ,
व पुरावे सुद्धा दिले आहेत ,"
कंदाहार प्रकरणात हुकुमाचे सर्व पत्ते अतिरेक्यांच्या हातात होते. कंदाहार येथे कारवाईसाठी कमांडो पाठविणे अशक्य होते. अशा वेळी १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा योग्य तोच निर्णय सरकारने घेतला होता.
24 Mar 2013 - 9:09 pm | पिंपातला उंदीर
अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल आणि त्यांच्या ऑपरेशन एटांबी चे गोडवे गात असतात. मग स्वताहाआची सत्ता आल्यावर मात्र धिसाळ धोरण अवलांबायची तर सत्ता का पाहिजे मग?
24 Mar 2013 - 9:15 pm | श्रीगुरुजी
इतक्या वेळा सविस्तर लिहूनसुद्धा यांचा हा प्रतिसाद वाचल्यानंतर मराठीतली, गीता व गोंधळ यांचा संदर्भ असलेली, एक म्हण आठवली.
24 Mar 2013 - 10:07 pm | पिंपातला उंदीर
माझे पण तुमच्या प्रतिसादाबद्दल हेच मत आहे. बाकी २००४ ला लोकानि सत्ते बाहेर हाकलून कौल दिलाच. २००९ तर अजुन्च दुरगती zआलि
24 Mar 2013 - 10:53 pm | मोदक
ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल आपले (आणि इथे वाद घालणार्या सर्वांचे) मत काय..?
December 20, 1978: Devendra Nath Pandey and Bhola Nath Pandey hijacked Indian Airlines flight IC-410. They demanded the immediate release of Indian National Congress party leader Indira Gandhi who was imprisoned at that time on the charges of fraud and misconduct. Later, they were awarded with party tickets for this act by the Indira Gandhi government in 1980 such that Devendra Nath Pandey rose to become a minister in the government of most populous state of India, Uttar Pradesh. This case was also mentioned by Jarnail Singh Bhindrawale to justify his claim regarding the hypocrisy of the Indian government
24 Mar 2013 - 11:18 pm | मोदक
हे आणखी एक उदाहरण...
On Jan 22, 1993, a Patna-Lucknow-Delhi Indian Airlines Flight IC-810 was hijacked by Satish Chandra Pandey shortly after take-off. Pandey demanded immediate construction of Ayodhya Ram Temple, lifting ban on RSS, the Bajrang Dal, and undertaking that the BJP would not be derecognized. He later surrendered at the insistence of senior BJP leader Atal Bihari Vajpayee.
24 Mar 2013 - 9:30 pm | निनाद मुक्काम प...
अहो गुरुजी ह्या आधी १९९३ साली अमृतसर येथे एका विमान अपहरण सफलतेने मोडून काढल्याचे इंग्रजी वृत्त मी दिले होते ते तुम्ही वाचलेले दिसत नाही ,
तुमची रेकोर्ड अजूनही कंधार मध्ये अडकली आहे , तुमच्यापुढे हात टेकले.
ह्यापुढे ह्या विषयावर बंडूमामा ह्यांनी व इतरांनी फारसे लिहू नये अशी मी त्यांना विनंती करतो.
विरोधी बाकावर बसून सभात्याग करणे एवढेच तत्परतेने व सुनियोजित रित्या ह्यांना जमते ,
29 Mar 2013 - 11:06 pm | विकास
आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचून मला माझी भुमिका बदलायला हवी का असे वाटले. ;)
'भारताचा पाकवर लष्करी, राजनैतिक विजय'
आधी वाटले असे अडवाणीजी अथवा स्वराजबाई म्हणत असतील. पण वाचले तर काय, भलतेच! "लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळविला आहे , असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केले आहे. "
असो.
23 Mar 2013 - 9:45 pm | बंडा मामा
प्रवासी विमानाच्या आत काय आहे हे संपर्क यंत्रणेला कसे काय कळू शकते?
तसे असेल तर विमान नेण्याचा मुद्दा चर्चेत येण्याचेच कारण नाही.
23 Mar 2013 - 10:17 pm | बंडा मामा
कंदाहर मधे कारवाई करायला विमान न्यायला हवे होते असे माझे म्हणणे नाही. (वर लिहिल्याप्रमाणे हे आपल्या हद्दीतच करणे शक्य होते) पण असे न्यायचेच असते तर हवाई हद्द क्रॉस करणे हे कारण मामुली आहे. कमांडो भरलेले एयर इंडीयाचे एखादे नियमीत प्रवासी विमान कुठल्याही हद्दीतुन नेणे शक्य होते. युरोपला जाणारी सर्व विमाने पाकिस्तान वरुन जातात. हा खूप कॉमन रुट आहे. भारताने त्याकाळात हवाई वाहतुन बंद केल्याचे ऐकिवात नाही.
24 Mar 2013 - 5:36 am | निनाद मुक्काम प...
गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या लोकांना एकच प्रश्न विचारतो
समजा ताज मधील अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार न करता सुसूत्र व नियोजन बध्दरीत्या जर किमान २०० लोकांना हॉटेल च्या एका मोठ्या हॉल मध्ये बंदी बनवले असते , व आझाद काश्मीर साठी हे अपहरण रचले असून आम्हाला आता पकडलेला आमचा साथीदार कसाब, येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कराची मधून त्यांना बाहेर घडणाऱ्या घडामोडींची कल्पना होती ,
व अफजल गुरु व तिसरा अजून एक साथीदार सोडून द्या व आम्हाला हि जाऊ द्या
अशी मागणी केली असती ,तर २०० निर्दोष लोकांसाठी आपल्या सरकारने तसे करावे का
आणि समजा तसे केले तर ह्या लोकांनी नुकतेच बाहेर मारलेल्या निर्दोष लोकांचे काय
असा प्रश्न उपस्थित होणार नाही का
ती निर्भया स्वतःची इज्जत वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंज देत वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळते, आणि आम्ही हीच इज्जत अफगाण मध्ये सोडून येतो.
24 Mar 2013 - 1:17 pm | श्रीगुरुजी
"तर २०० निर्दोष लोकांसाठी आपल्या सरकारने तसे करावे का"
हा हायपोथेटिकल प्रश्न आहे. तरी माझ्या अल्पमतीनुसार याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
वरील काल्पनिक प्रसंगात अतिरेकी हे भारतातच आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करायला भारताला पूर्ण मुभा आहे. भारत आपल्या कोणत्याही कानाकोपर्यातून कितीही कमांडो मुम्बईला आणू शकतो, पाहिजे ती शस्त्रे आणू शकतो व सुटकेची कोणतीही योजना आखायला भारताकडे भरपूर वेळ आहे, साधने आहेत, मनुष्यबळ आहे व स्वातंत्र्य पण आहे. त्यामुळे भारत प्रथम कारवाईचीच योजना आखणार. त्यात कमीतकमी त्रुटी राहण्याच्या दृष्टीने व कमीतकमी मनुष्यहानी होण्याच्या दृष्टीने योजना आखणार. वरील प्रसंगात भारत असेच करेल.
कोणताही देश अतिरेक्यांच्या अटी केव्हा मान्य करतो, जेव्हा नागरिकांना सोडविण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट झाली असेल तेव्हाच. नागरिकांना सोडविण्याची थोडीफार शक्यता असेल तर कोणताही देश सर्वात आधी त्या सर्व शक्यता पडताळून पाहतो.
जेव्हा नागरिकांना सोडविण्याच्या इतर सर्व शक्यता संपतात तेव्हा कोणत्याही देशापुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात - नागरिकांच्या प्राणांची पर्वा न करता अतिरेक्यांच्या मागण्या मान्य न करणे किंवा अतिरेक्यांच्या कमीतकमी मागण्या मान्य करून नागरिकांचे प्राण सोडविणे. कोणताही देश नागरिकांचे प्राण वाचविण्याला अधिक प्राधान्य देतो व भारताने तेच केले. सुरवातीला अतिरेक्यांनी भारतीय तुरूंगातील ४० अतिरेक्यांना सोडण्याची व २० कोटी डॉलर्स इतक्या खंडणीची मागणी केली होती. बर्याच वाटाघाटीनंतर शेवटी भारताने ३ अतिरेकी सोडले व त्या बदल्यात १६० नागरिकांचे प्राण वाचविले.
मागील वर्षी ओरिसातल्या एका जिल्हाधिकार्याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर ओरिसा सरकारने त्याच्या सुटकेच्या बदल्यात नक्षलवाद्यांना तुरूंगातून सोडले होते हे लक्षात घेतले पाहिजे.
24 Mar 2013 - 10:26 pm | मैत्र
श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या शांत प्रतिसादांचे कौतुक वाटते आहे..
निर्भया आणि कंदाहार याचा काय संबंध.. तुलना करण्यासाठी पण नाही..
"इज्जत वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंज देत वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळते," हाही एक बळंच मुद्दा..
शायनिंग इंडिया हाही असंबंद्ध मुद्दा.. कविता / विरोधी पक्षाची बाके बडवणे.. काहिच्या काही विधाने..
मागे एक धागा होता.. भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण .. त्यात अतिशय उत्तम मुद्देसूद चर्चा झाली होती आणि मिपावरच्या धुरंधरानी अप्रतिम माहीती मांडली होती..
शिवाय मागे क्लिंटन व इतर काहींनी २००४ च्या पराभवाची उत्तम मीमांसा केली होती.. ती पहावी..
कंदाहार या मुद्द्यावर राहून चर्चा व्हावी.. मुळात त्याचा या धाग्याशी थेट संबंध नव्हताच.. पण असो..
१६० जणांचा जीव वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे.. रुपेन कट्याल याला अतिरेक्यांनी ठार मारले.. त्या जागी तुमची जवळची व्यक्ती किंवा स्वत: असा विचार करा..
समजा कमांडो कारवाई फसली असती आणि बहुसंख्य प्रवासी मारले गेले असते.. किंवा अतिरेक्यांनी कमांडो कारवाई होते आहे लक्षात येताच कंदाहारमध्ये आय सी ८१४ बाँबने उडवून दिले असते तरी बोलणार्यांनी वाजपेयी सरकारलाच बोल लावला असता.. राजकारणात समोरच्याला चूक ठरवायचे असले की हवा फिरेल तसा मुद्दा मांडता येतो...
जसवंतसिंग कंदाहारला जाण्यापूर्वी प्रमुख पक्षांशी बोलले होते असं अंधुकसं आठवतंय.. चूक असल्यास सांगावे..
हे असले मुत्सद्दीपणाचे तारे तोडलेले पाहिले की नेहमी त्या काश्मीरच्या मंत्र्याच्या मुलीसाठी सोडलेले अतिरेकी आठवतात.. तिथे ती एक मुलगी होती.. http://en.wikipedia.org/wiki/1989_kidnapping_of_Rubaiya_Sayeed
आजवर हे कधीच चूक समजले गेले नाही ?
आय सी ८१४ तर पूर्ण विमान आणि १६० प्रवासी होते... त्या ४५ मिनिटात निर्णय झाला नाही किंवा टँकर मधून हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्यावर काय योग्य उपाय होता -- सर्व वाटाघाटी बंद करून विमान उडवून द्या आणि आमची सर्व माणसे मारा असा निरोप द्यायचा?
unclassified जेवढी माहिती मीडियातून येते त्याच्या आधारावर इतक्या वर्षांनी आपण एखाद्या critical situation ला इतकं काळ्यापांढर्या स्वरुपात कसं पाहू शकतो.. इथे तर फक्त करड्याच्याच छटा दिसत असताना..
वाजपेयी / बीजेपी वादी किंवा विरोधी हे चष्मे बाजुला ठेवल्याशिवाय मधल्या छटा मनातही येणार नाहीत..
गेल्या काहि दिवसातले निनाद जर्मनी यांचे प्रतिसाद पाहून आयडी हायजॅक झाल्यासारखे वाटते आहे..
24 Mar 2013 - 10:42 pm | पिंपातला उंदीर
श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या शांत प्रतिसादांचे कौतुक वाटते आहे..
बाकी लोकाणी काय अशांत प्रतिसाद दिले ते कळले तर फार बरे होईल. का ते तुम्हाला रुचातील असे प्रतिसाद देत आहेत म्हणून असे म्हणट आहात?
मागे एक धागा होता.. भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण .. त्यात अतिशय उत्तम मुद्देसूद चर्चा झाली होती आणि मिपावरच्या धुरंधरानी अप्रतिम माहीती मांडली होती..
शिवाय मागे क्लिंटन व इतर काहींनी २००४ च्या पराभवाची उत्तम मीमांसा केली होती.. ती पहावी..
यावर वेगवेगळी मत असु शकतात. काही लोकाणा चंद्रशेखर हे खूप चांगले पंतप्रधान वाटतात. आता बोला.
कंदाहार या मुद्द्यावर राहून चर्चा व्हावी.. मुळात त्याचा या धाग्याशी थेट संबंध नव्हताच.. पण असो..
तो मुद्दा तुम्ही ज्याना शानतीपूर्ण प्रतिसादाचे प्रमाणपत्र दिले त्यानी सुरू केला आहे. नीट धागा वाचले तर कळेल.
समजा कमांडो कारवाई फसली असती आणि बहुसंख्य प्रवासी मारले गेले असते.. किंवा अतिरेक्यांनी कमांडो कारवाई होते आहे लक्षात येताच कंदाहारमध्ये आय सी ८१४ बाँबने उडवून दिले असते तरी बोलणार्यांनी वाजपेयी सरकारलाच बोल लावला असता.. राजकारणात समोरच्याला चूक ठरवायचे असले की हवा फिरेल तसा मुद्दा मांडता येतो...
जसवंतसिंग कंदाहारला जाण्यापूर्वी प्रमुख पक्षांशी बोलले होते असं अंधुकसं आठवतंय.. चूक असल्यास सांगावे..
हे असले मुत्सद्दीपणाचे तारे तोडलेले पाहिले की नेहमी त्या काश्मीरच्या मंत्र्याच्या मुलीसाठी सोडलेले अतिरेकी आठवतात.. तिथे ती एक मुलगी होती.. हत्तप://एन.विकिपेडिया.ऑर्ग/विकी/1989_किडनॅपिंग_ऑफ_रुबैईया_सेयिड
आजवर हे कधीच चूक समजले गेले नाही ?
आय सी ८१४ तर पूर्ण विमान आणि १६० प्रवासी होते... त्या ४५ मिनिटात निर्णय झाला नाही किंवा टँकर मधून हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्यावर काय योग्य उपाय होता -- सर्व वाटाघाटी बंद करून विमान उडवून द्या आणि आमची सर्व माणसे मारा असा निरोप द्यायचा?
हे असले घाबरत विचार कट्टर राष्ट्रवादी पक्ष करणार असतील तर मग कॉंग्रेस ला नेभलत पणा वरुन का शिव्या घाळयच्या
गेल्या काहि दिवसातले निनाद जर्मनी यांचे प्रतिसाद पाहून आयडी हायजॅक झाल्यासारखे वाटते आहे..
पुन्हा तेच. तुम्हाला असे का वाटत आहे? तुम्हाला आवडतात ते मत ते मांडत नाही आहेत म्हणून.
24 Mar 2013 - 10:49 pm | मैत्र
तुमच्या एकावर वैयक्तिक रोख नव्हता..
पण माझ्या एकाही वाक्याचे उत्तर न देता ज्या उद्धटपणे लिहिले आहे त्यातच सर्व आले..
"मला असं वाटतं किंवा माझं हे मत आहे" - इतक्या बिनबुडाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नसते.. जरा सभ्यपणे आणि मुद्द्याला उत्तर द्या.. प्रत्येक ओळीवर असंबद्ध प्रतिसाद देऊन ते भाजप वगैरेवर ढकलू नका..
थोडे संयमित आणि तर्कशुद्ध प्रतिसाद अपेक्षित आहेत.. बळंचे केलेले बालिश आरोप आणि संदर्भहीन वाक्ये नाहीत..
24 Mar 2013 - 8:57 pm | श्रीगुरुजी
""मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. "
या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे."
मी वरील वाक्य एक सर्वसाधारण मत म्हणून समजलो होतो. बंडा मामांनी ते फक्त कंदाहार प्रकरणासंबंधात लिहिले होते हे माझ्या लक्षात आले नव्हते. हे लक्षात न आल्यामुळेच मी सहमत झालो होतो. भारत सरकार सर्वसाधारणपणे मुत्सद्देगिरीत नेहमीच कमी पडते. १९४७ पासून २०१३ पर्यंत हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मी सहमत झालो होतो.
भारताचे विमान पळविणे ही चक्क गुंडगिरी होती व या प्रकरणात सर्व हुकुमाचे पत्ते हे अतिरेक्यांच्या हातात होते. त्यामुळे कंदाहार प्रकरणात मुत्सद्देगिरीला वावच नव्हता व मुत्सद्देगिरीत भारत कमी पडण्याची शक्यताच उद्भवत नव्हती.
24 Mar 2013 - 10:22 pm | बंडा मामा
माझ्या प्रतिसादात ते वाक्य माझे सर्वसाधारण मत म्हणून दिले असे म्हणण्यास काहीही जागा नाही. मी ते कंदाहार प्रकरणाच्या संदर्भात लिहिले होते हे स्पष्ट आहे. पण ते असो.
एकदा का विमान पळवले की हुकमाचे पत्ते अतिरेक्यांकडेच असतात पण म्हणून आपण काय खेळ सोडूनच द्यायचा नसतो. अमृतसरला ४० मिनिटे विमान होते तो वेळ विमान इममोबिलाइज करण्यास पुरेसा होता असे तिथल्याच सुरक्षा रक्षकांनी म्हंटले आहे. एकदा का विमान जॅम केले कमांडो वगैरे आणायला चिक्कर वेळ मिळाला असता. पण आपण तेवढेही करू शकलो नाहीत ही नामुष्की आहे. तुम्हाला पटो न पटो.
21 Mar 2013 - 2:13 pm | प्रसाद१९७१
१६० भारतीयांची जर एव्हडी काळजी होती तर १६० खासदारांना कंदहार ला पाठवुन विमानप्रवाश्यांऐवजी ओलिस ठेवायचे.
तालीबान्यांनी इतक्या नीच आणि भ्रष्ट खासदारांना ओलिस म्हणुन ठेवुन घेतले नसते ही गोष्ट वेगळी.
16 Mar 2013 - 12:05 pm | श्रीगुरुजी
>>> प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा करणार्या एका पक्षाच्या सत्ता काळात पण कमी अधिक फरकाने हे प्रकार घडल्याचे स्मरते
या सर्व घटना २००५ ते २०१३ या कालावधीत घडलेल्या आहेत.
16 Mar 2013 - 12:41 pm | सचिन
पण आता सर्वश्री मनमोहनसिंगांनी इटलीला खडसावले आहे ना! एकदम सज्जड दम !!
आता काय बी टेन्शान नाय !!
16 Mar 2013 - 6:45 pm | वेताळ
जर मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना चांगला मोबदला मिळणार असेल तर उत्तम.
17 Mar 2013 - 10:48 am | विश्वनाथ मेहेंदळे
आता राजरोज गुन्हे करून भरपाई देऊन सुटणे हळूहळू समाजमान्य होते आहे तर !!! हेच विधान दिल्लीच्या पिडीतेला लावले तर चालेल का तुम्हाला ?
भारताच्या हद्दीत दोन कोळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले गेले. गैरसमजातून हल्ला केले हे मान्य केले तरी पूर्ण शिक्षा माफ तर होताच कामा नये. सौम्य करावी एकवेळ पण आर्थिक मोबदला घेऊन सोडणे म्हणजे न्यायाचा बाजार मांडणे आहे असे मला तरी वाटते.
17 Mar 2013 - 1:08 pm | मदनबाण
भारताच्या हद्दीत दोन कोळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले गेले. गैरसमजातून हल्ला केले हे मान्य केले तरी पूर्ण शिक्षा माफ तर होताच कामा नये. सौम्य करावी एकवेळ पण आर्थिक मोबदला घेऊन सोडणे म्हणजे न्यायाचा बाजार मांडणे आहे असे मला तरी वाटते.
अगदी सहमत !
आता एक प्रश्न मला विचारावासा वाटतो...
इटलीच्या हद्दीत २ कोळ्यांवर हल्ला करुन,त्यांना ठार मारल्यावर हिंदुस्थानच्या नौसैनिकांना इटलीने अशाच पद्धतीने हिंदुस्थानात परत जाउ दिले असते का ? (या प्रश्नावर विचार करा आणि बघा काय उत्तर तुमच्या मनात येते.)
17 Mar 2013 - 4:16 pm | वेताळ
केरळ मधील मृत मच्छीमार जे ह्या सैनिकांच्या हल्ल्यात मरण पावले ते काही सधन घरातील नव्हते. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियाची होणारी परवड त्या इटलीच्या सैनिकाना शिक्षा झालेवर कमी होणार असेल तर ठिक आहे. परंतु न्याय मिळाला तरी त्याचा काहीएक फायदा त्यांना होईल असे वाटत नाही.
मागील महिन्यात १० पंजाबी युवकानी दुबई मध्ये एका पाकिस्तानी युवकाची हत्या केली. तेथिल प्रचलित कायद्या प्रमाणे त्याना मृत्युदंडाची शिक्षा झाली. परंतु शरियत कायद्यानुसार त्याच्या वतीने एका पंजाबी उद्योगपतीने काही करोड रुपये ब्लडमनी मोजुन त्याना भारतात परत आणले.त्या युवकानी जाणिवपुर्वक त्याची हत्या केली होती.
इथे जाणिवपुर्वक हत्या केली असे म्हणता येणार नाही. मग त्या कुटुंबियाचा फायदा कशात आहे तो निर्णय घेतला तर काय हरकत आहे?
17 Mar 2013 - 6:30 pm | श्री गावसेना प्रमुख
मग उद्या ईटलीतले बाकी चे नागरीक जे की इथे टुरीष्ट व्हिसा घेउन आलेत त्यांनी बंदुका घेउन वाट्टेल तितके मुडदे पाडावे
मग ईटलीने पैश्याने भरपाइ करावी ,कशी मस्त आयडीया आहे ना
गरीब घरातल्या मानसांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती.
17 Mar 2013 - 6:38 pm | वेताळ
बंदुक घेवुन आपण कोण कोणत्या देशात प्रवेश करु शकतो ह्याची माहिती दिलीत तर बरे होईल.
17 Mar 2013 - 6:40 pm | श्री गावसेना प्रमुख
भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात म्हणुन म्हटले वेताळ राव्,तुम्ही का मानगुटीवर बसताय
17 Mar 2013 - 6:44 pm | वेताळ
मुळात हि घटना घडली आहे ते ठिकाण भर समुद्रात आहे.त्यामुळे तिथे भारताची हद्द होती का ? कि ती हद्दी बाहेर झाली ह्याचा निकाल लागला नाही आहे.त्यामुळे तिथे कोणते नियम लागु होतात हे आपण सर्वसामान्य लोक सांगु शकत नाही.आयुष्यात सगळेच निर्णय भावनेच्या भरात घेवुन चालत नाहीत. थोडा व्यावहारिक विचार केला तर बरे असते.
17 Mar 2013 - 6:49 pm | श्री गावसेना प्रमुख
वेताळ राव ते ठिकाण भारतीय हद्दीत येतय हे भारत सरकारने ठामपणे सांगीतलय.तरीही तुम्हाला शंका असल्यास आपण प्रत्यक्ष घटनास्थळावर जाउन येउ
17 Mar 2013 - 6:52 pm | वेताळ
येताना मला पण एक बंदुक पाहिजे ती पण आणु.
तसे आपण दाऊद पाकिस्तानात असल्याचे ठाम पणे सांगत असतोच कि......
17 Mar 2013 - 6:52 pm | वेताळ
येताना मला पण एक बंदुक पाहिजे ती पण तुमच्या ओळखीने आणु.
तसे आपण दाऊद पाकिस्तानात असल्याचे ठाम पणे सांगत असतोच कि......
16 Mar 2013 - 10:03 pm | चिरोटा
इटलीऐवजी फ्रान्स्,जर्मनी असते तर एवढा गोंधळ झाला नसता एवढे नक्की. घटना घडल्यापासून केरळ काँग्रेसनेते,केंद्रातील काँग्रेस नेत्यांत "आम्ही त्यातले नाही आहोत' दाखवण्याची स्पर्धा चालु आहे.तोंड बंद ठेवले तर विरोधी पक्ष/जनता ह्या घटनेचा सोनिया-इटली असा संबंध लावणार. हे टाळण्यासाठी स्पर्धेत मनमोहनही उतरले आहेत्.सैनिक परतले नाहीत तर 'गंभीर परिणाम' होतील असेही ते म्हणाले आहेत.आपलल्या राजदूतांना बॅगा भरायचे संकेत दोन्ही देशांनी दिले आहेत.सैनिक परतण्याची शक्यता अतिशय कमी वाटते.
आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा नेहमी विदूषक का होतो हे कोडे नेहमीच पड्त आलेय.
16 Mar 2013 - 10:41 pm | अन्या दातार
अमोल उद्गिरकरना पंतप्रधानपदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. त्यांच्या प्रतिसादावरुन त्यांना सर्वच्या सर्व गोष्टीतली जाण आहे असे माझे मत बनले आहे.
17 Mar 2013 - 8:31 am | क्लिंटन
दे टाळी.अगदी मनातले बोललास बघ.
17 Mar 2013 - 2:30 pm | sagarparadkar
आजपर्यंत "सोनियापादत्राणतलवसुंधराविहारधन्य" असे सुमार संपादक महिती होते ...
हे अमोलरत्न बहुतेक त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता स्वतःच्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करत असावे ... कारण आता युवराजांचे आणि त्यांच्या पुढील पिढीचे गोडवे गाण्यासाठी सुमार संपादकांची लेखणी पुरेशी नसणार ...
सकलतरतमविचारकर्त्यांचा बुद्धिभेद करायला आता ताज्या दमाचा गडी हवा ना ....
18 Mar 2013 - 3:04 am | बॅटमॅन
या समासप्रचुरताविलासास येक खल्लास दाद दिल्या गेली आहे.
(समासप्रेमी) बॅटमॅन.
22 Mar 2013 - 6:11 pm | आजानुकर्ण
अमोल उद्गिरकर पंतप्रधान होत असल्यास श्रीगुरुजींना किमान नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष किंवा पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी (ब्रजेश मिश्र यांच्याप्रमाणे) करण्यास माझा पाठिंबा आहे.
- लिंकन
24 Mar 2013 - 7:31 am | सूर्याजीपंत
अगदी अगदी.... चर्चा वाचून मनसोक्त करमणूक झालेली आहे.. विशेषत: विमान अपहरणाच्या वेळेला काय रणनीती ठरवायला पाहिजे होती आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय करायला पाहिजे तो भाग. खासकरून कोणत विमान कसा न्यायला पाहिजे, आत काय ठेवायला पाहिजे, बाहेर काय सांगायला पाहिजे... हसून हसून पुरेवाट झाली...शाळेत असतानाच्या चर्चा आठवल्या.......
बाकी श्रीगुरुजींना +1
17 Mar 2013 - 9:36 am | नितिन थत्ते
कंदाहार प्रकरणी तत्कालीन सरकारने जो निर्णय घेतला तो ग्राउंड रिअॅलिटी* पाहून सर्व शक्यता विचारात घेऊन मगच घेतला असावा. तो त्या परिस्थितीत योग्यच असणार. तसेच संसद हल्ल्यानंतर आर या पार लडाईची घोषणा करून नंतर ती केली नाही हा ही सूज्ञपणाचाच निर्णय होता.
*ग्राउंड रिअॅलिटी तशी आहे असे उघडपणे आजवरच्या कुठल्याही राजकीय नेतृत्वाने सांगितले नाही. त्या ऐवजी बोटचेपेपणाचा/कणाहीनतेचा आरोप स्वतःवर घेतला ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
17 Mar 2013 - 9:51 am | मदनबाण
ऑगस्टा प्रकरण दाबण्यासाठी काही नेते मंडळींनी खेळलेली ही कुटील निती आहे,अशी कॉन्स्पिरसी थेअरी आहे.
(कुटिन पत्ते)
17 Mar 2013 - 1:20 pm | प्रदीप
ह्या इटली प्रकरणाचे नक्की पुढे काय होते आहे?
सुरूवातीपासूनच भारताबाहेरील माध्यमांनी ह्या प्रकरणाची अजिबात दखल घेतली गेलेली नाही. भारतीय नेतृत्वाच्या 'कणखरपणा'ची जगात काय किंमत आहे, हे ह्यावरून सूचित व्हावे!
आणि आतातर भारतीय माध्यमेही ह्याबद्दल काही लिहीतांना दिसत नाहीत. मी फक्त एकदोन इंडिश आणि दोन- तीन मराठी वर्तमानपत्रांच्या संस्थळांपुरते बोलतो, आणि हेही इथे नमूद करतो की हीच वर्तमानपत्रे 'मनमोहनांनी ठणकावले आहे' वगैरे थाटाच्या बातम्या गेल्या आठवड्यातच देत होती. अर्थातच भारतात आता दर बारा तासांना नवे स्कँडल मिळत असल्याने, ह्या प्रकरणाच्या तीव्रतेची धार माध्यमात, व बहुधा जनसामान्यांतही कमी झाली असावी.
17 Mar 2013 - 8:52 pm | विकास
कधीकाळी काश्मीर युनोत नेले आता हे इटालीयन नौसैनिक पण तसेच आंतर्राष्ट्रीय लवादात जाणार...
Our decision based on your court ruling: Rome
17 Mar 2013 - 1:49 pm | तिमा
कुठल्याच राजकारण्याला आपल्या देशाच्या इभ्रतीची पर्वा नाहीये आणि इथे देशप्रेमी सदस्यांची वादावादी चालू आहे हे पाहून आश्चर्य वाटले.
या प्रकरणाचे पुढे काहीही होणार नाही. त्याचे आणखी एक 'भिजत घोंगडे' होईल. जनताही विसरुन जाईल. फक्त निवडणुकीच्या काळात ही 'कढी' परत गॅसवर चढवली जाईल.
आता आख्खा युरोपियन महासंघ इटलीच्या सहाय्याला धावून आलाय. तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्यांमधे?
17 Mar 2013 - 2:21 pm | चिरोटा
आंतरराष्ट्रीय जगतात भारताचे राजदूत्,दुतावासातले अधिकारी हा चेष्टेचा विषय असतो असे वाचले होते.मंत्रीगण बाजुला ठेवा, ते येतात,जातात्.वर्षानुवर्षे नोकरी करूनसुद्धा ह्या अधिकार्यांचा अनेक प्रकरणांत पोपट होतो.ह्या लोकांची वक्तव्ये म्हणजे ambiguity चा उत्तम नमुना असतो.
17 Mar 2013 - 2:44 pm | दादा कोंडके
आधिच इटलीत भारतीय इल्लीगल एमिग्रंट्स अगणित आहेत. या प्रकरणानंतर इटलीवर सूड घ्यायचा म्हणून आपले मुत्सद्दी राजकारणी इथल्या परिस्थितीमुळे अजुन जास्त लोकांना तिकडे घुसायला उद्युक्त करतील. ;)
17 Mar 2013 - 8:29 pm | श्रीगुरुजी
>>> आता आख्खा युरोपियन महासंघ इटलीच्या सहाय्याला धावून आलाय. तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्यांमधे?
हे अजून वाचलेले नाही. पण आख्खा युरोपियन महासंघ भारताशी व्यापार बंद करणे शक्य नाही. भारतावर केवळ शाब्दिक दबाव आणण्यासाठी असे केले असावे. शेवटी देशाचे व्यावसायिक व आर्थिक हितसंबंध हे कोणत्याही नीतिमत्ता किंवा तत्वापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. भारतासारखे प्रचंड लोकसंख्या असणारे वाढते मार्केट कोणताही शहाणा देश दूर ठेवणार नाही. त्यामुळे या फुसक्या धमकीत काहीही अर्थ नाही.
17 Mar 2013 - 10:30 pm | चिरोटा
संऱक्षण क्षेत्रातील काही तज्ञांनी भारताला इटलीशी संबंध तोडणे परवडणारे नाही असा सूर लावला आहे.भारताला संरक्षण सामग्री पुरवण्यात इटली आघाडीवर आहे. DRDO,HAL,NAL,भारतिय नौदल अशा अनेक संस्थांना इटालियन कंपन्या संऱक्षण सामुग्री पुरवतात्.संबंध तोडले तर भारतापेक्षा इटलीचे आर्थिक नुकसान जास्त आहे असे वाटते.म्हणूनच चर्चा करून 'common solution' काढण्यासाठी इटली,युरोप संघ भारताला विनंती करतोय.
21 Mar 2013 - 2:49 am | हुप्प्या
भारताच्या नव्या मदर तेरेसा वेळ आल्यास झाशीची राणी बनू शकतात हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले.
भारताच्या अनभिषिक्त, साध्वी सम्राज्ञीने इटलीवर कडाडून टीका केली आहे. इतकी कडक टीका की तमाम इटलीवासी लोकांना दिवसा तारे दिसू लागले म्हणे!
ह्या महात्यागी, पराक्रमी, परमबुद्धीवान पुरंध्रीने माहेरचे आहेत म्हणून इटलीची गय केलेली नाही त्यामुळे राजघराण्यावर दात विचकणार्यांचे दात घशात गेल्याची चर्चा देशभर सुरु आहे म्हणे!
हे वाचा आणि रोमांकित व्हा! असा नेता आपल्या सर्वोच्चपदावर आहे त्याकरता सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार माना!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/italian-marines-row-sonia-gandh...
21 Mar 2013 - 2:50 am | हुप्प्या
http://www.loksatta.com/desh-videsh-news/italian-marines-row-sonia-gandh...
21 Mar 2013 - 10:25 am | इरसाल
फक्त पक्षाच्या सभेतच ठणकावले आहे.
21 Mar 2013 - 11:21 am | चिरोटा
काय त्रास आहे रा॑व? सोनिया गांधींनी हे इटलीमध्ये जावून सांगायचे की काय ? आम्ही वाट बघतोय कोणीतरी 'पेटून' उठेल- पिझा खावू नका म्हणून सांगेल,फियाट कंपनीत जावून राडा करायची भाषा करेल.
21 Mar 2013 - 12:06 pm | नितिन थत्ते
मी तर सचिन तेंडुलकरची फेरारीच जाळावी म्हणतो.
21 Mar 2013 - 12:26 pm | llपुण्याचे पेशवेll
पण आता तर ती त्याने विकूनही टाकली म्हणे.
21 Mar 2013 - 12:09 pm | श्रीगुरुजी
"थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!", "मनमोहन सिंगांनी पाकला ठणकावून सांगितले" . . . अशी वाक्ये वाचली हसू आवरत नाही. असे म्हणणे म्हणजे "मांजरीने डरकाळी फोडली" किंवा "सशाने फुत्कार टाकले" असे वाचण्यासारखे आहे.
21 Mar 2013 - 12:25 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
म्हणून अखिल भारतीय संतप्त तरुण संघटनेच्या वतीने श्रीगुरुजी यांना त्या खलाशांना घेऊन येण्यासाठी इटलीस पाठवण्याचे ठरले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत.
सर्व संतप्त तरुणांनी वर्गणी म्हणून एक एक सुतळी बॉम्ब श्रीगुरुजी यांच्याकडे जमा करावा. (त्या बॉम्बवर जय श्रीगुरुजी असे लिहिलेले असावे).
धन्यवाद.
22 Mar 2013 - 8:05 am | धमाल मुलगा
चचाजान, कम से कम अपनी उमर का तो लिहाज़ किया होता। आपजैसे बुजु़र्ग से ये उम्मीद़ ना थी। इसतरह की बात करना तो निहायत ही बेहयां और नामकुल इन्सानों की फि़तरत होती है जो कब से देखी भी गये है। जनाब-ए-आला आप कब से इस नियत पे उतर आये?
-(शरमिंदा) मिर्झा धमालुद्दिन बेग
21 Mar 2013 - 12:42 pm | खबो जाप
च्यामारी ज्या ज्या घटनांच्या मध्ये इटली चा सम्बंध येतो तिथे सरकार माती का तेच काळात नाही.
माझे असे स्पष्ट मत आहे कि भारताने इटली ला १५ दिवसाची मुदत दिली पाहिजे आणि जर १५ दिवसत ते दोघे परत आले नाहीत तर भारतीय सागरी हद्द इटलीच्या सगळ्या जहाजांना ( सैनिकी किव्हा गैर सैनिकी) निषिद्ध म्हणून घोषित करु असा दम द्यावा आणि तरी पण कोणते जहाज आलेच तर ते देशाला धोका समजून बुडवू असा दम द्यावा.
तेव्हडा फुकाचा दम तर देवून बघू शकतोच.
21 Mar 2013 - 1:13 pm | नितिन थत्ते
>>च्यामारी ज्या ज्या घटनांच्या मध्ये इटली चा सम्बंध येतो तिथे सरकार माती का तेच काळात नाही.
च्यामारी आम्ही तर ऐकलं की पाकिस्तानचा संबंध येतो तिथे पण सरकार माती खातं. श्रीलंकेचा संबंध येतो तिथे पण सरकार माती खातं.....................................
21 Mar 2013 - 2:11 pm | बॅटमॅन
+१.
सगळीकडे माती खाणार्या सरकारला योग्य ती जीवनसत्वे मिळत नसल्याचेच हे लक्षण आहे.
21 Mar 2013 - 2:56 pm | इरसाल
22 Mar 2013 - 9:14 am | नाखु
आणि चपखल प्रतिसादाबद्दल आप्ल्याला दंडवत...
22 Mar 2013 - 3:52 am | निनाद मुक्काम प...
आखिर ,तुम्हे आना हे जरा देर लगेगी.
हे नगमा व संजय वर चित्रित झालेल्या गाण्याचे शब्द आजच्या घडीला खरे ठरले.
येणार नाही म्हणणारे इटालियन मरीन आता भारतात परत येत आहेत,
व आर्थर रोड जामिनावर सुटलेल्या संजय दत्त ला म्हणत होता.
आखिर ,तुम्हे आना हे जरा देर लगेगी.
22 Mar 2013 - 4:06 am | अर्धवटराव
हेच अपेक्षीत होतं. सोनीया गांधींनी अदरवाईज कडाडुन वगैरे स्टेटमेण्ट दिलं नसतं.
अर्धवटराव
22 Mar 2013 - 5:25 am | आजानुकर्ण
नेटाने पाठपुरावा करुन इटालियन मरीन परत आणण्याचे काम करणाऱ्या थोरल्या आऊसाहेबांचे आणि मनमोहन सिंग यांचे अभिनंदन करवत नाही. नक्कीच यात काहीतरी काळेबेरे आहे. हा मोठाच अपेक्षाभंग आहे. राहूल गांधी यांना पुढच्या निवडणुकीत मार्ग सुकर करण्यासाठी इटालियन सरकारशी शय्यासोबत करून भारत सरकार आणि आऊसाहेब यांनी कॉन्स्पिरसी करुन काँग्रेस आणि राजपुत्र यांची प्रतिमा उजळ करण्यासाठी हा मोठा कट रचला असावा असे वाटते.
- श्रीशिक्षक
22 Mar 2013 - 7:43 am | विकास
आता हेलीकॉप्टरचे लफडे पण असेच सोडवा म्हणजे झाले. या सगळ्या गोंधळात त्याकडे जनतेचे आणि सरकारचे दुर्लक्षच झाले आहे म्हणा....
22 Mar 2013 - 6:13 pm | आजानुकर्ण
कधीकाळी काश्मीर युनोत नेले आता हे बोफोर्स आणि हेलिकॉप्टर पण तसेच आंतर्राष्ट्रीय लवादात जाणार...
-झकास
23 Mar 2013 - 10:01 am | झकासराव
कर्णा, मला का हाक मारलीस???
बाकी चालु द्या.
24 Mar 2013 - 6:31 pm | बंडा मामा
हेलीकॉप्ट्रचे लफडे सोडवायला युपीए नक्कीच धावपळ करणार कारण ही ड्झनभर हेलीकॉप्टरे वाजपेयींच्या कार्यकाळात घेतली होती. आता बोला!
22 Mar 2013 - 12:16 pm | श्रीगुरुजी
"नक्कीच यात काहीतरी काळेबेरे आहे. "
नक्कीच. यात जे काळंबेरं आहे ते काही काळातच स्पष्ट होईल. ईटली इतक्या सहजासहजी आपले नौसैनिक परत पाठवेल असं वाटत नाही.