✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माहेरचा अव्हेर!

आ
आजानुकर्ण यांनी
Tue, 03/12/2013 - 20:26  ·  लेख
लेख
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे. नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे. मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे. मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे. जय सोनियाजी! http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to-india-for-trial/article4500009.ece?homepage=true -हुय्या
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
45522 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

मिपाम

श्रावण मोडक
Tue, 03/12/2013 - 20:52 नवीन
मिपा (नेहमीप्रमाणे सध्या) गंडतंय हे माहिती आहे. त्यात आयडीही हॅक होऊ लागले आहेत की काय? ;-)
  • Log in or register to post comments

हुय्या

आजानुकर्ण
Tue, 03/12/2013 - 21:07 नवीन
हुय्या या काल्पनिक आयडीने लेखन केल्यास कसे दिसेल हे पाहण्याचा प्रयत्न होता. आयडी हॅक वगैरे झालेला नाही. ;)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

अर्धवटराव
Tue, 03/12/2013 - 21:13 नवीन
आयला... काय ति डॉकॅलिटी =)) (साभार, अशोक सराफ - गा.त.चां.प.वे.टां.) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

दुर्दैवी

विकास
Tue, 03/12/2013 - 21:16 नवीन
जे झाले ते दुर्दैवी आहे. पण यात सोनीयाजींना गोवणे बरोबर ठरणार नाही. त्यांचा जन्मस्थळ म्हणून इटलिशी संबंध असेल पण त्यांनी बांधिलकी कायम भारताशी दाखवली आहे. क्वात्रोची,हेलीकॉप्टर घोटाळ्यात त्यांचे, गांधी घराण्याचे अथवा कॉग्रेसचे नाव गुंतवणे चुकीचे आहे. त्यांचा काही दोष नाही. - विकास फत्ते
  • Log in or register to post comments

आमच्या गुजरात मध्ये असे होत

पिंपातला उंदीर
Tue, 03/12/2013 - 21:27 नवीन
आमच्या गुजरात मध्ये असे होत नाही काही. ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

श्रीरंग_जोशी
Tue, 03/12/2013 - 21:46 नवीन
हेच म्हणतो. आम्ही काही काल जन्माला आलेलो नाही. आम्हाला सर्व कळते. अनेक देशी-विदेशी उद्योगपतींना पश्चिम भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानपदी बसवून स्वतःचे हित साधायचे आहे. ते घडवून आणण्यासाठी परमत्यागी कुटूंबास बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे. प्रेरणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तसे नाही काही..

हुप्प्या
Fri, 03/15/2013 - 10:33 नवीन
केवळ इटलीतील लोकांनी केले म्हणून सोनियाजींवर आळ आणलात मग पाकिस्तानच्या प्रत्येक दुष्कृत्याचा दोष अडवानींना द्यायचा का? नाही म्हणजे तेही कराचीवाले आहेत म्हणून विचारतो. --निस्सीम भक्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

भारताच्या सर्वोच्चपदावर

मदनबाण
Tue, 03/12/2013 - 21:32 नवीन
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. या बाईंच इतक कौतुक वाचुन मला अगदी भडभडुन आलं बघा ! ;) इतक मोठ पद भुषवणार्‍या बाईंचे कर्तुत्व आणि राजकारणात टिकुन राहण्याचे कसब वाखाणावेच लागेल नाही ? ;) एक वाचनिय दुवा :--- 'From waitress to world leader' बाकी इटलीचे ते २ घे परत येणार नाही या बद्धल सरकारला किती काळजी आहे ते येत्या काही दिवसात कळेलच म्हणा ! जाता जाता :--- प्रत्येक डिफेन्स घोटाळा म्हणजे आपली संरक्षण दले प्रत्येक वेळी आधुनिक आणि सुरक्षित शस्त्र सामुग्री पासुन वंचित राहणार !
  • Log in or register to post comments

बाकी जमलंय.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/13/2013 - 03:18 नवीन
बाकी जमलंय. पण 'द हिंदू'ची लिंक दिलीत तिथे पितळ उघडं पडलं तुमचं! ही लिंक द्यायला पाहिजे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18924442.cms
  • Log in or register to post comments

प्रयत्न चांगला आहे. पण

नितिन थत्ते
Fri, 03/15/2013 - 10:14 नवीन
प्रयत्न चांगला आहे. पण तुमच्या पोटात ती आग नसल्याने (फायर इन द बेली की काय म्हणतात ते) नीट जमलं नाही. :(
  • Log in or register to post comments

प्रयत्न चांगला

हुप्प्या
Fri, 03/15/2013 - 10:30 नवीन
अहो अनुकर्ण आय मीन आजानुकरण, अजून थोडा प्रयत्न हवा. राजघराण्याविषयी बोलताना शक्यतो मागील लेखाची हुबेहुब नक्कल करीत नाही मी. पुढील अनुकरणाकरता शुभेच्छा! लवकरच थोरल्या आऊसाहेबांच्या माहेरातून नवे दुष्कृत्य उघडकीस यावे आणि आपणाला पुन्हा एक संधी मिळो हीच शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

जबरी !!

सुज्ञ माणुस
Fri, 03/15/2013 - 13:52 नवीन
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे. जबरी !!
  • Log in or register to post comments

खुनाच्या आरोपाखाली अटकेत

श्रीगुरुजी
Fri, 03/15/2013 - 19:39 नवीन
खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींना विनाशर्त देशाबाहेर जाऊन देणे, संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण वाचणे, पाकिस्तान भारताच्या हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करत असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या भारताच्या खाजगी दौर्‍यावर स्वागताच्या पायघड्या घालणे व मेजवानी आयोजित करणे, पाकिस्तान भारतातील अतिरेकी हल्ल्यांना शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत करत असताना कोणतीही ठोस कारवाई न करता शांतता बोलणी करणे, "अरूणाचल प्रदेश हा भाग चीनचा आहे, भारताचा नाही" असे चीनच्या भारतातील राजदूताने भारतात भूमीवर उभे राहून सांगितल्यावर काहीही न करता थंड बसून राहणे, परकीय व्यक्तीच्या हातात सर्वाधिकार देणे ... अशा अनेक लाजिरवाण्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय जगतात भारत एक हास्यास्पद देश (Laughing Stock)बनलेला आहे.
  • Log in or register to post comments

प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा

पिंपातला उंदीर
Fri, 03/15/2013 - 20:42 नवीन
प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा करणार्‍या एका पक्षाच्या सत्ता काळात पण कमी अधिक फरकाने हे प्रकार घडल्याचे स्मरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सरळ सरळ बी जे पी च नाव घ्याना

श्री गावसेना प्रमुख
Sat, 03/16/2013 - 12:35 नवीन
सरळ सरळ बी जे पी च नाव घ्याना काय घाबरताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सांगा बरं वरीलपैकी कोणती घटना

बॅटमॅन
Sat, 03/16/2013 - 14:03 नवीन
सांगा बरं वरीलपैकी कोणती घटना त्या "प्रखर" पक्षाच्या कारकीर्दीत घडली होती????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

खुनाच्या आरोपाखाली अटकेत

पिंपातला उंदीर
Sat, 03/16/2013 - 17:04 नवीन
खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींना विनाशर्त देशाबाहेर जाऊन देणे- तत्कालीन परराष्ट्र मंत्री यानी ४ अतिरेक्याना स्वताहा कन्दाहार विमान अपहरणानंतर नेऊन देशाबाहेर सोडाल होत. असा लाजीर्वाणा डाग फार कमी परराष्ट्रमंत्र्यावर आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण वाचणे,- आम्मच्या कॉलेज ची ट्रिप गेली होती दिल्लीला. संसदेला पण त्यावेळेस विज़िट दिली होती. सुदैवाने तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी त्यादिवशी संसदेला संबोधित करणार होते. पण अती वार्धक्यामुळे वाजपेयना चालता पण येत नवत. त्यांचे काही तत्कालिक सहयोग्यांी त्याना आधार देऊन सभागृहात आणल . त्यादिवशी ते सभेत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा उल्लेख विस्मरणाने कायम वि.पि.सिन्घ यांच्या संदर्भात करत होतें. २००४ च्या निवडणुकांच्या प्रचारसभेत वाजपेयंच्या विस्मारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कारण प्रत्येक सभेत त्यानी नाव घेण्यात गफ्लती केल्या. पाकिस्तान भारताच्या हद्दीत घुसून भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करत असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या भारताच्या खाजगी दौर्‍यावर स्वागताच्या पायघड्या घालणे व मेजवानी आयोजित करणे- वाजपेयी सरकारच्या काळात ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले व अनेक भारतीय जवानांचा बळी घेतला त्याला पायघड्या घालून आग्रा इथे शांतिवर्तेसाठी बोलावले. नंतर त्याने सरकारला न विचारता आपल्याच देशात पत्रकरपृिषद घेऊन भारत सरकारवर टीका केली व त्याना तोंडघशी पाडले. आणि हो हुरियत चे सर्व नेते मुशराफ्फ ला भेटले होते सरकारच्या नावावर टिच्छून. पाकिस्तान भारतातील अतिरेकी हल्ल्यांना शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत करत असताना कोणतीही ठोस कारवाई न करता शांतता बोलणी करणे - मुशराफ्फ शी कारगिल होऊन गेल्यानंतर पण शांतिवारता का केली त्याचेच उत्तर इथे पण लागू. "अरूणाचल प्रदेश हा भाग चीनचा आहे, भारताचा नाही" असे चीनच्या भारतातील राजदूताने भारतात भूमीवर उभे राहून सांगितल्यावर काहीही न करता थंड बसून राहणे, परकीय व्यक्तीच्या हातात सर्वाधिकार देणे- वाजपेयी सरकारने तिबेट हा चीन चा अविभाज्य हिस्सा आहे अशी स्पष्ट भूमिका घेऊन भारतात राहून संघर्ष करणार्‍या हजारो तिबेटी लोकांचा अवसांघात केला होता. ही यादी अजुन वाढवता येईल. तूर्त सांगायचा मुद्दा हा की आम्ही राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष देशाला विकणारे असा प्रचार चालू आहे (इंतेरनेत आणि फेस्बूक वर तो किती तकलादू आहे हे दिसून येते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अशुद्धलेखनासाठी माफी. मराठी

पिंपातला उंदीर
Sat, 03/16/2013 - 17:06 नवीन
अशुद्धलेखनासाठी माफी. मराठी टाइपिंग अजुन शिकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

"खुनाच्या आरोपाखाली अटकेत

श्रीगुरुजी
Sat, 03/16/2013 - 18:33 नवीन
"खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींना विनाशर्त देशाबाहेर जाऊन देणे- तत्कालीन परराष्ट्र मंत्री यानी ४ अतिरेक्याना स्वताहा कन्दाहार विमान अपहरणानंतर नेऊन देशाबाहेर सोडाल होत. असा लाजीर्वाणा डाग फार कमी परराष्ट्रमंत्र्यावर आहे." याविषयी बरेच लिहिले गेले आहे. तरी परत थोडक्यात लिहितो. १६० निरपराध प्रवाशांचे प्राण वाचविण्याकरिता ही तडजोड करावीच लागली. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी कमांडो कारवाई, युद्ध असा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. ते विमान कंदाहार विमानतळावर सर्व बाजूंनी तालिबानी सैनिकांनी व त्यांच्या रणगाड्यांनी वेढलेले होते व विमानतळावर विमानवेधी तोफा तैनात होत्या. एखाद्या देशाने आपल्या १६० निरपराध नागरिकांचे प्राण वाचावे यासाठी अशीच तडजोड केली असती व त्यात काहीही लाजिरवाणे नाही. महासत्ता असलेल्या प्रत्यक्ष अमेरिकेला सुद्धा १९७८ मध्ये इराणने ओलिस ठेवलेल्या आपल्या ८० नागरिकांना वाचविण्यासाठी मूग गिळून गप्प रहावे लागले होते व त्यांच्या सुटकेसाठी तब्बल २ वर्षे वाट बघावी लागली होती. अगदी अलिकडच्या काळात सुद्धा अशी उदाहरणे घडली आहेत. सोमाली चाचे व्यापारी जहाजांचे वारंवार अपहरण करतात व अनेक देशांनी आपले नागरिक वाचविण्यासाठी त्यांना खंडणी दिली आहे. जेव्हा एखादा देश किंवा महासत्ता अपहरणकर्त्यांच्या मागे ठाम उभी असते, तेव्हा निरपराध नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तडजोड हा एकच पर्याय उरतो व तोच पर्याय भारताला वापरावा लागला. किंबहुना याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे या घटनेत लाजिरवाणे वाटण्यासारखे काहीही नाही. अर्थात लाजिरवाणे वाटण्यासारख्या अशा काही घटना पूर्वी घडलेल्या आहेत. सप्टेम्बर १९९३ मध्ये (काँग्रेसचे नरसिंहराव पंतप्रधान असताना), काश्मिरमधल्या एका मशिदीत भारतीय लष्कराने मशिदीला सर्व बाजूने वेढा घालून ७-८ अतिरेक्यांना आत कोंडले होते. अतिरेक्यांना पळण्यास कोणतीही संधी नव्हती. मशिदीचा वीजपुरवठा व पाणी तोडलेले होते. तरीसुद्धा डिसेंबर १९९३ मध्ये असलेल्या नियोजित निवडणुकांवर डोळा ठेवून (उ.प्र., राजस्थान, हि.प्र., म.प्र. व दिल्ली या ५ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत्या), नरसिंहराव सरकारने सुरवातीला आतल्या अतिरेक्यांना बिर्याणी, हलवा-पुरी असे अन्न पुरवून नंतर त्यांना सुरक्षित पाकिस्तानला जाऊन देण्यात आलेला. हातात आलेल्या अतिरेक्यांची सरबराई करून त्यांना सुखरूप सोडून देण्याची ही अत्यंत लाजिरवाणी घटना होती व ती नेहमीप्रमाणे काँग्रेस राजवटीतच घडलेली आहे. "२००४ च्या निवडणुकांच्या प्रचारसभेत वाजपेयंच्या विस्मारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कारण प्रत्येक सभेत त्यानी नाव घेण्यात गफ्लती केल्या." "प्रत्येक सभेत" ही जरा अतिशयोक्तीच होत नाही का? असो. देशांतर्गत निवडणुकीच्या प्रचारसभेत विस्मरण होणे यापेक्षा आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःच्या भाषणाऐवजी दुसर्‍या देशाच्या परराष्ट्रमंत्र्याचे भाषण वाचणे हे कितीतरी जास्त पटीने लज्जास्पद आहे. "वाजपेयी सरकारच्या काळात ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले व अनेक भारतीय जवानांचा बळी घेतला त्याला पायघड्या घालून आग्रा इथे शांतिवर्तेसाठी बोलावले. नंतर त्याने सरकारला न विचारता आपल्याच देशात पत्रकरपृिषद घेऊन भारत सरकारवर टीका केली व त्याना तोंडघशी पाडले. आणि हो हुरियत चे सर्व नेते मुशराफ्फ ला भेटले होते सरकारच्या नावावर टिच्छून." मुशर्रफ्फला २००१ मध्ये आग्र्याला बोलविणे ही चूकच होती. हुरियतला आजतगायत कोणीच पायबंद घालू शकलेले नाही. अगदी काही दिवसांपूर्वी हुरियतचा यासीन मलिक पाकिस्तानमध्ये जाऊन २६/११ च्या प्रमुख सूत्रधाराला (हफीज सईद) भेटून आला व त्याच्याबरोबर एका व्यासपीठावर बसून दोघांनी उपोषणाचे नाटक देखील केले. परंतु भारत याबाबतीत काहीही करू शकलेला नाही. "पाकिस्तान भारतातील अतिरेकी हल्ल्यांना शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत करत असताना कोणतीही ठोस कारवाई न करता शांतता बोलणी करणे" वाजपेयींनी २००१ ते २००४ या काळात काही प्रमाणात कारवाई केली होती. या काळात पाकिस्तानचा मुम्बईतील दूतावास बंद केला गेला, दिल्ली दूतावासातील पाकिस्तानी कर्मचार्‍यांची संख्या निम्म्यावर आणली गेली, पाकिस्तानी विमानांना भारतीय भूप्रदेशावरून उड्डाणास बंदी आणली गेली, व्हिसा खूप कमी पाकिस्तानी नागरिकांना दिला गेला, दिल्ली-लाहोर ही बससेवा बंद केली गेली, पाकिस्तानशी व्यापारावर निर्बंध आणले गेले, शांतता बोलणी बंद केली गेली, दोन्ही देशातले संबंध कमी करण्यात आले असे काही उपाय केले गेले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बांगलादेश व पाकिस्तानच्या सीमेवर काटेरी कुंपण घालण्याचे काम याच काळात सुरू झाले. "वाजपेयी सरकारने तिबेट हा चीन चा अविभाज्य हिस्सा आहे अशी स्पष्ट भूमिका घेऊन भारतात राहून संघर्ष करणार्‍या हजारो तिबेटी लोकांचा अवसांघात केला होता." ही भूमिका नेहरूंनी १९५६ मध्येच घेतली होती व त्यानंतरच्या सर्व सरकारांची हीच भूमिका होती. एखाद्या देशाच्या सरकारने दुसर्‍या देशाबाबत घेतलेली अधिकृत भूमिका त्या देशाला बदलता येत नाही. त्यामुळे वाजपेयींनी ही भूमिका घेतलेली नसून भारताच्या आधीच्या अधिकृत भूमिकेचा पुनरूच्चार केला. पण त्यामागे एक वेगळी भूमिका होती. सिक्कीम हे एक वेगळे सार्वभौम राष्ट्र १९७५ मध्ये भारतात विलीन झाले. पण चीनने या विलिनीकरणाला कधीही मान्यता दिली नव्हती. पण वाजपेयींनी तिबेटबाबत भारताची जुनीच भूमिका मांडल्यावर चीनने सिक्कीमच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. त्यानंतर चीनने कधीही सिक्कीमबाबत तोंड उघडलेले नाही. वाजपेयींच्या त्या भूमिकेमुळे भारताचा फायदाच झाला आहे. "ही यादी अजुन वाढवता येईल. तूर्त सांगायचा मुद्दा हा की आम्ही राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष देशाला विकणारे असा प्रचार चालू आहे (इंतेरनेत आणि फेस्बूक वर तो किती तकलादू आहे हे दिसून येते.)" भाजप हा धुतल्या तांदळासारखा व काँग्रेस कोळशासारखा काळाकुट्ट असे मी म्हटलेले नाही. भाजपच्या तुलनेत काँग्रेसमध्ये वाईट गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत व ते देशाला अत्यंत घातक आहे. देश विकण्याची तुलना केलीच तर भाजप नाक्यावर भाजी विकणारा किरकोळ विक्रेता तर काँग्रेस घाऊक प्रमाणात देशाला विकणारे वॉलमार्टसारखे सुपरमार्केट अशी तुलना करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

+१

क्लिंटन
Sat, 03/16/2013 - 20:39 नवीन
मी कोणत्याही पक्षाच्या कळपातला नाही त्यामुळे सर्वच पक्षांच्या (माझ्या मते) चांगल्या गोष्टींचे मी स्वागत करतो आणि (माझ्या मते) चुकीच्या गोष्टींवर टिका करत असतो. श्रीगुरूजींच्या या प्रतिसादाला +१. कंदाहार अपहरण प्रकरण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अत्यंत दु:खद घटना होती.त्या वेळी विमान भारताची हद्द ओलांडून of all the places कंदाहारला गेल्यानंतर आपल्या हातात फारसे करण्यासारखे काही नव्हते.अफगाणिस्तानात तालिबानी राजवट होती आणि तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा होता.तालिबानी राजवटीशी आपले राजनैतिक संबंधही नव्हते.आणि तालिबान आणि विमान अपहरणकर्ते hands in glove होते.तेव्हा तालिबानी राजवटीने विमान सोडवायला मदत केली असती याची शक्यता शून्य. आपल्याला अगदी कमांडो कारवाई करायचीच असती तरी आपली विमाने पाकिस्तानच्या हद्दीवरून पाठवावी लागली असती.त्या परिस्थितीत आपली विमाने अफगाणिस्तानात पोहोचायच्या आधीच पाकिस्तानी हवाईदलाशी मुकाबला करायला लागला असता आणि कदाचित त्यातून परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली असती. तसेच ९/११ पूर्वीच्या जगात पाकिस्तान नक्की काय चीज आहे हे कळले असले तरी त्याविरूध्द काही करायची महासत्तेची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा पाकिस्तान-तालिबान या अभद्र युतीविरूध्द अफगाणिस्तानात जाऊन आपण काही करायची शक्यता अगदी शून्य होती. बरं त्यावेळी विरोधी पक्षांची भूमिका नक्की काय होती?पंतप्रधान वाजपेयींनी या प्रकरणी सर्वपक्षीय परिषद बोलावली होती त्यानंतर प्रणव मुखर्जींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की सरकारने योग्य तो निर्णय घेतल्यास कॉंग्रेस पक्ष त्याला समर्थन देईल.आता योग्य तो निर्णय नक्की कोणता हे सांगायची तसदी त्यांनी न घेऊन काही झाले तरी विरोधी पक्ष उलट्या बोंबा मारणार याचे स्पष्ट संकेत दिलेच की.म्हणजे जर दहशतवादी सोडले नसते आणि कंदाहारमध्ये प्रवाशांना मारले असते तर दिडशे लोकांचे बळी दिले अशी हाकाटी करायला विरोधी पक्ष मोकळे आणि नाहीतर दहशतवाद्यांना सोडले म्हणून हाकाटी करायलाही मोकळेच. त्या सर्वपक्षीय परिषदेत सर्व पक्षांनी एकमुखाने सरकारला का सांगितले नाही की काही वाटेल ते झाले तरी दहशतवाद्यांना सोडायचे नाही?सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा जास्त दोष या प्रकरणी आहेच पण सगळा दोष केवळ भाजपवर ढकलायचा प्रयत्न करत असेल तर तो पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आहे हे स्पष्ट आहे. दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा हिस्सा आहे हे नेहरू,इंदिरा गांधी आणि नरसिंह रावांनीही वेळोवेळी मान्य केले होते.त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ वाजपेयींवर टिका करणे म्हणजे एकतर पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन किंवा अभ्यास वाढवायची गरज असल्याचा सज्जड पुरावाच आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा

प्रसाद१९७१
गुरुवार, 03/21/2013 - 14:05 नवीन
दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा हिस्सा आहे हे नेहरू,इंदिरा गांधी आणि नरसिंह रावांनीही वेळोवेळी मान्य केले होते
भारताच्या मताला चीन काडीची किम्मत देत नाही. तुम्ही तिबेट चीन चे आहे असे म्हणले काय किंवा चीन चे नाही असे म्हणले काय? विचारतो कोण. थोड्या वर्षानी मिपा वर अशीच चर्चा "अरुणाचल प्रदेशा" बद्दल होताना दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

"भारताच्या मताला चीन काडीची

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/21/2013 - 20:10 नवीन
"भारताच्या मताला चीन काडीची किम्मत देत नाही. तुम्ही तिबेट चीन चे आहे असे म्हणले काय किंवा चीन चे नाही असे म्हणले काय? विचारतो कोण." हे बहुतेक बाबतीत खरे असले तरी चीन तिबेटच्या बाबतीत अत्यंत हळवा व सावध आहे. तिबेट हे चीनने लष्करी ताकदीच्या जोरावर बळकावले असल्याने तिबेट प्रश्नावर किंवा तिबेटशी संबंधित कोणत्याही राष्ट्राने शब्द सुद्धा उच्चारू नये याबाबत चीन सावध असतो. संयुक्त राष्ट्रसंघात तिबेट हा शब्दसुद्धा उच्चारला जाऊ नये यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करतो. दलाई लामांना शांततेचे नोबेल पारितोषिक दिल्यावर चीनने नोबेल समिती व स्वीडनविरूद्ध थयथयाट केला होता. क्लिंटन यांनी अमेरिकेत दलाई लामांची भेट घेण्याचे जाहीर केल्यावर चीनने ही भेट होऊ नये यासाठी अमेरिकेवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. भारतात अधूनमधून तिबेटी विद्यार्थी निदर्शने करतात व तशी निदर्शने झाली की चीन लगेच डोळे वटारतो. ऑलिंपिक ज्योत लंडन व इतर काही ठिकाणाहून जात असताना स्थानिक तिबेटींनी निदर्शने केल्यावर चीनने अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून शेवटी बर्‍याच देशातून ज्योत नेलीच नव्हती किंवा ज्योतीचा मार्गच बदलायला लावला होता. भारतातून ऑलिंपिक ज्योत जात असताना भारताने तिबेटींना कडक इशारा देऊन निदर्शने करण्यापासून रोखले होते. जगातल्या कोणत्याही देशाने (भारतासहित) तिबेट हा शब्द देखील उच्चारू नये यासाठी चीन कायम प्रयत्नशील असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अशाच प्रतिकूल परिस्थीत

पिंपातला उंदीर
Sat, 03/16/2013 - 21:27 नवीन
अशाच प्रतिकूल परिस्थीत इस्राएल ने युगांडा मध्ये जाउन ऑपरेशन एटांबी यशस्वी पार पाडले होते. रशिया मध्ये पण चेचेन दहशतवाद्यानी एक अख्खे नाट्यगृह ओलिस ठेवले होते. पण पुतिन यानी राजकीय आणि हानीची पर्वा न करता कारवाई करून आतँकवाड्याना धडा शिकवला होता. कन्दाहार प्रकरणात पण राजकीय इच्छाशक्तिचा अभाव हे एक मोठे कारण होतेच. त्यामुळे या केस मध्ये पण वाजपेयी सरकारचे वर्तन योग्य होऊच शकत नाही. आणि दस्तुर्खुद्द परराष्ट्रमंत्री दहशतवाद्याना घेऊन जातो ही घटना तर दुर्मिळ आहे. तुम्ही असे अजुन काही उदाहरण देऊ शकाल का? आज त्या सुटलेल्या दहशतवाद्यानी देशात अनेक कारवाया केल्या. मुंबई हल्ल्यात पण त्यांचा प्लॅनिंग मध्ये समावेश होता. देशात एका विमानचे अपहरण होते. मग ते विमान देशात आडवायची संधी असून पण ते आडवल्या जात नाही. मग शात्रभूमीवर ते गेल्यावर शत्रुसमोर गुडघे टेकले जातात हे तत्कालीन सरकारचे अपयश नव्हे का? २) वाजपेयीच्या उदाहरण देण्यामागे उद्देश वाजपेयी शारीरिक दृष्ट्या किती थकले होते आणि तरी पंतप्रधान पदी चिकटून होते हे दाखवायचा उद्देश होता. कृष्णा यांची पण तीच परिस्थिती झाळी आहे. २००४ सालच्या निवडणुका होईपर्यंत वाजपेयी ना समोर ठेवण्याचा उद्देश त्या निवडणुकीत भाजप ची धुलधाान झालयाने साफ फसला. जाता जाता राजकारणात आलेल्या एका नवीन बाई कडून पराभव झाला हा डाग हक नाक वाजपेयी यांच्या उजळ माथ्यावर लागला. ३) ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले (आजही एक महत्वाचे शिखर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याची जिम्मेदारी पण वाजपेयी सरकारकडेच जाते) आणि अनेक भारतीय जवानचा बळी घेतला त्याला वाजत गाजत भारतात आमंत्रित करून त्याला वैधता प्राप्त करून देणे हे मोठे ब्लंडर नवते का? ४)वाजपेयी सरकारने ज्या कारवाया केल्या त्याना कारवाई म्हणे म्हणजे मनमोहन सरकारने पाकिस्तान चा हॉकी दौरा रद्द केला याला पण कारवाई म्हणावे लागेल. वाजपेयी सरकारने मुशराफ्फ चे उद्दातीकरण केले. या पापाचे भागीदार त्याना व्हावे लागेल. ५) तिबेट हा चीनचा भाग आहे ही आपली भूमिका नेहरू पासून आहे हे मला माहीत आहे. पण प्रत्येक वेळेस नेहरू आणि कॉंग्रेस ला शिव्या घालायच्या आआणी सत्तेत आल्यावर त्यांचीच धोरण पुढे चालवायची हा दुत्ताप्पीपणा नाही का? त्याना तिबेत्विषयक धोरण बदलण्याची नामी संधी होती. त्यानी २००४ मध्ये सत्ता गमावली त्याचबरोबर ती संधी पण गमावली. सूपरमार्केट आणि किरकोळ विक्रेता ही तुलना पटली नाही. भाजप ला फक़त साडेचार वर्ष सत्ता मिळाली त्या तुलनेने च्ोत्या काळात त्यानी हा चुकांचा डोंगर उभारला. सांगायचा मुद्दा हा की अती कमजोर कारभार, राजकीय इच्छाशक्ती चा अभाव, भ्रष्ट कारभार, कळीच्या मुद्द्यांवरून यु टर्न घेणे यात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात काहीही फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद

क्लिंटन
Sat, 03/16/2013 - 22:19 नवीन
बाकी ठिक आहे पण
अशाच प्रतिकूल परिस्थीत इस्राएल ने युगांडा मध्ये जाउन ऑपरेशन एटांबी यशस्वी पार पाडले होते.
मला आपलं उगीचच वाटत होतं की फक्त हिंदुत्ववादी मंडळीच उठल्यासुटल्या इस्राएलने युगांडात जाऊन आपले विमान परत कसे आणले याच्या कहाण्या ऐकवत असतात.हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

>>> अशाच प्रतिकूल परिस्थीत

श्रीगुरुजी
Sat, 03/16/2013 - 22:28 नवीन
>>> अशाच प्रतिकूल परिस्थीत इस्राएल ने युगांडा मध्ये जाउन ऑपरेशन एटांबी यशस्वी पार पाडले होते. तुम्हाला समजावून सांगतासांगता आता मी थकलो. ऑपरेशन एंटाबी व कंदाहार यांची तुलना होउच शकत नाही. जरा विचार करा. कंदाहार विमानतळावर मध्यभागी भारतीय विमान उभे आहे. त्यात १६० निरपराध व निशस्त्र प्रवासी आहेत. विमानात सशस्त्र चाचे आहेत. विमान चारी बाजूंनी एके-४७ घेतलेल्या सैनिकांनी व त्यांच्या रणगाड्यांनी वेढलेले आहे. विमानतळावर सर्व बाजूंनी विमानविरोधी तोफा सज्ज आहेत. हे विमान सोडविण्यासाठी कमांडो कारवाई कोठून आणि कशी करणार? तिथे कमांडो पाठविण्यासाठी भारताला दुसरे विमान पाठवावे लागणार. त्या विमानाला पाकिस्तानी भूप्रदेशावरून जाता येणार नाही. त्या विमानात शस्त्रे, बॉम्ब व कमांडो आहेत हे लक्षात आल्यावर इतर कोणताही देश अशा सशस्त्र विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाऊन देणार नाही. अशा परिस्थितीत तिथे पोचणार कसे? आणि तिथे पोचल्यावर विमानाला वेढा घातलेल्या तालिबानी रणगाडे, तोफा व सैनिकांशी कसा सामना देणार? भारताकडे असे कमांडो १९९९ मध्ये नव्हते आणि आजही नाहीत. त्यावेळी कमांडो कारवाई अशक्य होती. हे पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. यापेक्षा जास्त योग्य तर्‍हेने समजावून सांगणे मला शक्य नाही. इस्राइलची अजून एक घटना सांगतो. ४-५ वर्षांपूर्वी इस्राइलच्या २ सैनिकांचे लेबाननस्थित हिजबोल्लाच्या अतिरेक्यांनी अपहरण केले होते. इस्राइलने ४-५ महिने सतत प्रयत्न करूनसुद्धा आपल्या सैनिकांना सोडविता आले नव्हते. कमांडो कारवाईत नेहमीच यश मिळते असे नाही. त्यात अपयशही येते किंवा यश मिळाले तरी फार मोठी किंमत द्यावी लागते. १९८२ मध्ये पॅनअ‍ॅमचे कॅनडाहून भारताला येणारे विमान अतिरेक्यांनी पळवून पाकिस्तानमध्ये उतरविल्यावर पाकिस्तानी कमांडोंनी ४-५ दिवसांनी कारवाई केल्यावर त्यात तब्बल १५० हून अधिक भारतीय प्रवासी मृत्युमुखी पडले होते. इतकी जबर किंमत द्यावी लागली होती. >>> रशिया मध्ये पण चेचेन दहशतवाद्यानी एक अख्खे नाट्यगृह ओलिस ठेवले होते. पण पुतिन यानी राजकीय आणि हानीची पर्वा न करता कारवाई करून आतँकवाड्याना धडा शिकवला होता. पुतिन यांना ही कारवाई शक्य झाली कारण ते नाट्यगृह रशियातच होते व तिथे कमांडो पाठविण्यासाठी दुसर्‍या देशात जाण्याची गरज नव्हती. तसेच तिथल्या अतिरेक्यांना दुसर्‍या देशाने संरक्षण दिले नव्हते (कंदाहार प्रकरणातल्या चाच्यांना पाकिस्तानने अप्रत्यक्ष व तालिबानने प्रत्यक्ष समर्थन दिले होते). पुतिनना तिथे दुसर्‍या देशाशी लढायचे नसून स्वतःच्या भूमीवरच कारवाई करायची होती. भारताला कंदाहार विमानतळावर पाऊल ठेवणेच अशक्य होते. कमांडो कारवाई तर खूपच दूरची गोष्ट. या कारवाईची रशियाने जबरदस्त किंमत मोजलेली आहे. नाट्यगृहातल्या अतिरेक्यांना रशियन कमांडोंनी ठार केले पण त्या धुमश्चक्रीत २०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. >>> कन्दाहार प्रकरणात पण राजकीय इच्छाशक्तिचा अभाव हे एक मोठे कारण होतेच. त्यामुळे या केस मध्ये पण वाजपेयी सरकारचे वर्तन योग्य होऊच शकत नाही. बरं तुम्हीच सांगा की त्या प्रकरणात कोणते वर्तन योग्य ठरले असते व ते वाजपेयी सरकारने कसे पार पाडले असते. आणि नक्की कोणत्या मार्गाने ते १६० प्रवासी सोडविता आले असते हेही सांगा. >>> आणि दस्तुर्खुद्द परराष्ट्रमंत्री दहशतवाद्याना घेऊन जातो ही घटना तर दुर्मिळ आहे. अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारशी भारताचे राजनैतिक संबंध नव्हते. त्यामुळे अतिरेकी व प्रवाशी यांची देवाणघेवाण करताना भारतातर्फे एखादा वरिष्ठ अधिकारी असणे आवश्यक होते. त्यामुळे जसवंतसिंग तिथे गेले. त्यामागे एक दुसरा जास्त महत्त्वाचा उद्देश होता. या निमित्ताने तालिबान सरकारशी भारताचा संवाद सुरू व्हावा ही पण अपेक्षा त्याच्यामागे होती. जसवंत सिंग यांनी लिहिलेल्या "इन द लाईन ऑफ फायर" या पुस्तकात कंदाहारबद्दल एक सविस्तर प्रकरण आहे. ते वाचा. बर्‍याच गोष्टींचा उलगडा होईल. >>> आज त्या सुटलेल्या दहशतवाद्यानी देशात अनेक कारवाया केल्या. मुंबई हल्ल्यात पण त्यांचा प्लॅनिंग मध्ये समावेश होता. अपहरणात सुटलेले अतिरेकी काही अध्यात्म मार्गाला जात नाहीत. ते पूर्वीच्याच कारवाया सुरू ठेवतात. १९९३ मध्ये हातात आलेले अतिरेकी विनाकारण सोडून दिल्यावर त्यांनी सुद्धा कारवाया केल्या असतीलच. १९९३ आणि कंदाहार मधील मुख्य फरक हा आहे की, १९९३ मध्ये अतिरेकी भारतीय भूमीवर अडकले होते व त्यांच्याकडून कोणालाही कोणताही धोका नव्हता, तरीसुद्धा मतांच्या राजकारणासाठी त्यांना सोडून देण्यात आले. पण १९९९ मध्ये हे अतिरेकी भारताबाहेर होते व १६० प्रवाशांचे प्राण धोक्यात होते व भारतापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. देशात एका विमानचे अपहरण होते. मग ते विमान देशात आडवायची संधी असून पण ते आडवल्या जात नाही. मग शात्रभूमीवर ते गेल्यावर शत्रुसमोर गुडघे टेकले जातात हे तत्कालीन सरकारचे अपयश नव्हे का? >>> देशात एका विमानचे अपहरण होते. मग ते विमान देशात आडवायची संधी असून पण ते आडवल्या जात नाही. ते विमान पळविल्यानंतर अमृतसरला फक्त ४० मिनिटे होते. इतक्या कमी वेळात कोणतीही कारवाई अशक्य होती. अशा कारवाईसाठी किमान २-३ दिवस तरी प्लॅनिंग करण्यात जातात व नंतर १-२ वेळा रंगीत तालीम घेऊन त्यातले धोके कमी करून मग प्रत्यक्ष कारवाई केली जाते. ४० मिनिटात हे शक्यच नव्हते. ४० मिनिटात कमांडो दिल्लीहून अमृतसरला पोचले सुद्धा नसते, मग कारवाई तर लांबच राहिली. >>> मग शात्रभूमीवर ते गेल्यावर शत्रुसमोर गुडघे टेकले जातात हे तत्कालीन सरकारचे अपयश नव्हे का? हे अपयश नाही. भारताकडे दुसरा पर्यायच नव्हता. ते ३ अतिरेकी सोडल्यानंतर सुद्धा जर चाच्यांनी प्रवाशांना सोडण्यास नकार दिला असता तर भारत काहीही करू शकला नसता. एकदा ते विमान कंदाहारला पोचल्यावर भारताला काहीही करणे अशक्य होते. >>> ३) ज्या मुशराफ्फ ने कारगिल घडवले (आजही एक महत्वाचे शिखर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याची जिम्मेदारी पण वाजपेयी सरकारकडेच जाते) आणि अनेक भारतीय जवानचा बळी घेतला त्याला वाजत गाजत भारतात आमंत्रित करून त्याला वैधता प्राप्त करून देणे हे मोठे ब्लंडर नवते का? मुशर्रफला २००१ मध्ये भारतात बोलविणे ही चूकच होती. >>> ४)वाजपेयी सरकारने ज्या कारवाया केल्या त्याना कारवाई म्हणे म्हणजे मनमोहन सरकारने पाकिस्तान चा हॉकी दौरा रद्द केला याला पण कारवाई म्हणावे लागेल. वाजपेयी सरकारने मुशराफ्फ चे उद्दातीकरण केले. या पापाचे भागीदार त्याना व्हावे लागेल. वाजपेयींनी मुशर्रफला भारतात बोलविले नसते तर काय तो आयुष्यभर खाली मान घालून वावरला असता का? त्याला बोलावून त्याचे उदात्तीकरण केले असे म्हणणे चुकीचे आहे. हॉकी संघाचा दौरा रद्द करणे आणि दोन देशांमधील व्यापारी व इतर संबंध कमी करणे या दोन गोष्टींची तुलना होऊ शकते का? >>> ५) तिबेट हा चीनचा भाग आहे ही आपली भूमिका नेहरू पासून आहे हे मला माहीत आहे. पण प्रत्येक वेळेस नेहरू आणि कॉंग्रेस ला शिव्या घालायच्या आआणी सत्तेत आल्यावर त्यांचीच धोरण पुढे चालवायची हा दुत्ताप्पीपणा नाही का? त्याना तिबेत्विषयक धोरण बदलण्याची नामी संधी होती. त्यानी २००४ मध्ये सत्ता गमावली त्याचबरोबर ती संधी पण गमावली. तुमचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास तोकडा दिसतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाची अधिकृत भूमिका सरकार बदलले की बदलत नसते. नेहरूंनी तिबेट हा चीनचा भाग आहे अशी मान्यता दिली ती भारत देश या नात्याने दिली. ही भूमिका काँग्रेस सरकारचा प्रमुख या नात्याने नव्हती. एकदा ही भूमिका घेतल्यावर व अनेक वर्षे या भूमिकेला दुजोरा दिल्यावर केवळ सरकार बदलले म्हणून भूमिका बदलता येत नाही. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर काही वर्षांनंतर पाकिस्तानने त्या देशाला मान्यता दिली. आता अचानक झरदारी किंवा राजा अश्रफ आम्ही बांगला देशाची मान्यता रद्द करत आहोत अशी भूमिका घेऊच शकत नाहीत. त्यामुळे वाजपेयी ही भूमिका घेऊच शकत नव्हते. >>> सूपरमार्केट आणि किरकोळ विक्रेता ही तुलना पटली नाही. भाजप ला फक़त साडेचार वर्ष सत्ता मिळाली त्या तुलनेने च्ोत्या काळात त्यानी हा चुकांचा डोंगर उभारला. हे वाक्य अत्यंत हास्यास्पद आहे. चुकांचा डोंगर (खरं तर महापर्वत) ही काँग्रेसची निर्मिती आहे. नुसतं भ्रष्टाचाराचं उदाहरण घेतलं तर २००४ ते २०१३ या काळात १९४७ ते २००३ या काळापेक्षा कितीतरी अधिक पटीने भ्रष्टाचार झाला. जातीय दंगली, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, विषमता, देशाची दुर्बलता इ. बाबतीत काँग्रेस भाजपच्या कैक योजने पुढे आहे. >>> सांगायचा मुद्दा हा की अती कमजोर कारभार, राजकीय इच्छाशक्ती चा अभाव, भ्रष्ट कारभार, कळीच्या मुद्द्यांवरून यु टर्न घेणे यात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात काहीही फरक नाही. खूप मोठा फरक आहे. या गोष्टी काँग्रेसमध्ये भाजपच्या तुलनेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून तर मी किरकोळ भाजी विक्रेता व सुपरमार्केट यांची तुलना केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

दुरुस्ती...

मन१
Sun, 03/17/2013 - 00:10 नवीन
इन द लाईन ऑफ फायर हे जसवंत सिंग ह्यांचं नसून मुशर्रफ ह्यांचं (आत्म)चरित्र आहे. जसवंत सिंगांचं आहे the audacity of opinion . . बाकी चालु द्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही इतर देशांनी केलेल्या

पिंपातला उंदीर
Sun, 03/17/2013 - 08:12 नवीन
तुम्ही इतर देशांनी केलेल्या यशस्वी ऑपरेशन्स ला सोडून त्याना आलेल्या अपयशाला धरून बसला आहात. वाजपेयी सरकारने पण हीच चुक केली आणि जनमानसात त्यांची प्रतिमा खालवली. कन्दाहार प्रकरणानंतर भारताची सॉफ्ट स्टेट म्हणून प्रतिमा बनली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बनला. जासवन्त सिंग तालिबान शी चर्चा करायला गेले होते हे म्हणे म्हणजे समर्थन करायचच आहे तर रेटून करूयात या धर्तीवर वाटते. आणि देशाची परराष्ट्र धोरण बदलतात. सातत्य हे राष्टरहीत्ाच्या वर नसते.देशन्चि परराष्ट्र धोरण बदल्याची मी तुम्हाला अनेक उदाहर्न देऊ शकतो. आणि कंप्यूटर आणला म्हणून राजीव गांधीना शिव्या घाल्याच्या आणि स्वताहा सत्तेत आले की तेच धोरण पुढे आणायचे. आर्थिक सुधारणा केल्या म्हणून मनमोहन सिंग याना बोल लावायचा आणि स्वताहा सत्तेत आले की त्याच सुधारणा पुढे ढकलायच्या. राम मंदिर बांधत नाहीत म्हणून सरकारला बोल लावायचा आणि स्वताहा सत्तेत आले की राम मंदिर मुद्द्यावर काखा वर करायच्या. मग स्वतहाचे काही करायचेच नाही तर मग विरोधी पक्ष सत्तेत येऊन उपयोग काय? बाकी वाजपेयी सरकारच्या काळात संसदेवर हलला करण्यापर्यंत आतँकवाड्यांची मजल गेली होती. त्याविरोधात वाजपेयी सरकारने काय कठोर पावल उचली हे पण जाणून घ्यायला आवडेल. १९९८-ते २००४ हा भारताच्या दृष्टीने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड वाईट काळ होता. कन्दाहार, संसदेवर हलला, गोधरा हत्याकांड, करगिल, गुजरात दंगल आणि कित्येक उदाहरण. आणि ते पण आधुनिक 'लोहपुरूष' गृहमंत्री असताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> वाजपेयी सरकारने पण हीच

श्रीगुरुजी
Sun, 03/17/2013 - 12:34 नवीन
>>> वाजपेयी सरकारने पण हीच चुक केली आणि जनमानसात त्यांची प्रतिमा खालवली. बर. आपण असं गृहित धरूया की वाजपेयींनी चूक केली. आता तुम्हीच सांगा की वाजपेयी सरकारने नक्की कोणती कारवाई करायला पाहिजे होती आणि ती कारवाई नक्की कशी पार पाडता आली असती. >>> कन्दाहार प्रकरणानंतर भारताची सॉफ्ट स्टेट म्हणून प्रतिमा बनली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बनला. जसं काही कंदाहार प्रकरणापूर्वी भारताचा महासत्ता म्हणून जगभर दरारा होता आणि भारताला सगळे देश घाबरत होते. आणि हो १९९३ मध्ये मशिदीतल्या अतिरेक्यांना हलवा-पुरी, चिकन-बिर्याणी खाऊ घालून मानाची वस्त्रे देऊन सुखरूप पाकिस्तानला पोचते केल्यावर भारताचा दरारा तर अखिल ब्रह्मांडात पसरला होता आणि कंदाहार प्रकरणामुळे भारतासारख्या ढाण्या वाघाची एकदम शेळी झाली ना. >>> जासवन्त सिंग तालिबान शी चर्चा करायला गेले होते हे म्हणे म्हणजे समर्थन करायचच आहे तर रेटून करूयात या धर्तीवर वाटते. आणि देशाची परराष्ट्र धोरण बदलतात. देशाची परराष्ट्र धोरणे बदलतात. सर्वच देशांची बदलू शकतात. पण एखाद्या नवीन राष्ट्राला "राष्ट्र" अशी अधिकृत मान्यता दिल्यावर काही वर्षांनी आम्ही तुमची "राष्ट्र" म्हणून मान्यता काढून घेत आहोत असे कधीच करता येत नाही. जरा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास वाढवा. तुम्हाला सध्या त्यातले फारसे कळत नाही असे दिसत आहे. आणि "तिबेट" हा चीनचा भाग आहे हे सांगितल्यावर तुम्ही फक्त वाजपेयींना दूषणे देत आहात. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरणसिंग, राजीव गांधी, नरसिंहराव, देवेगौडा, गुजराल व मनमोहन सिंग या सर्व पंतप्रधानांनी सुद्धा या भूमिकेला आजतगायत विरोध केलेला नाही. मग त्यांना का दूषणे देत नाही? >>> बाकी वाजपेयी सरकारच्या काळात संसदेवर हलला करण्यापर्यंत आतँकवाड्यांची मजल गेली होती. त्याविरोधात वाजपेयी सरकारने काय कठोर पावल उचली हे पण जाणून घ्यायला आवडेल. वाजपेयी सरकारने अतिरेक्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी 'पोटा' हा कडक कायदा आणला होता. या कायद्यान्वये अनेक अतिरेक्यांना शिक्षा झालेली आहे (उदा. अफझल गुरू). तो कायदा मनमोह्न सिंग पंतप्रधान पदावर आल्यावर मुस्लिमांच्या दबावाने रद्द केला गेला. १९९५ साली 'पोटा'चाच पूर्वीचा अवतार असलेला 'टाडा' हा कायदा असाच रद्द केला गेला होता. 'पोटा' या कायद्यासाठी अडवाणी अतिशय आग्रही होते. हा कायदा आणताना भाजपला राज्यसभेत बहुमत नसल्याने अडवाणींनी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावून कायदा मंजूर करून आपली इच्छाशक्ती दाखवून दिली होती. तसेच या काळात १५-२० देशांशी गुन्हेगार हस्तांतरण करार केले गेले. त्यामुळे दुबईतून व इतर काही देशातून अनेक गुन्हेगारांना भारतात आणता आले. बांगला व पाकिस्तानच्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम याच काळात सुरू झाले होते. >>> १९९८-ते २००४ हा भारताच्या दृष्टीने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रचंड वाईट काळ होता. आणि १९४७-१९९७ व नंतर २००५-२०१३ हा काय अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता का? १९८०-१९९५ या काळात शीख अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तुम्हाला माहित नसेलच. आणि १९८९ पासून इस्लामी अतिरेक्यांनी केलेले असंख्य अतिरेकी हल्ले तुम्ही सोयिस्कररित्या विसरला असालच. >>> कन्दाहार, संसदेवर हलला, गोधरा हत्याकांड, करगिल, गुजरात दंगल आणि कित्येक उदाहरण. आणि ते पण आधुनिक 'लोहपुरूष' गृहमंत्री असताना. उरलेल्या काळातील यादी पण द्या आणि मग स्वतःच तुलना करा. त्या काळातील अशा घटनांची यादी करताना थकून जाल, पण ही काळी यादी संपणार नाही. गोध्रा हत्याकांडातील गुन्हेगारांना शिक्षा झाली, गुजरात दंगलीतल्या गुन्हेगारांना सुद्धा शिक्षा झाली. पण १९८४ मधील ३००० शिखांच्या हत्याकांडातील गुन्हेगार अजून मौजमजा करत मोकळे फिरत आहेत. जगदीश टायटलर, ललित माखन, हरकिशनलाल भगत, सज्जनकुमार, धरमदास शास्त्री, कमलनाथ इ. ना केंद्रात मंत्रीपदे दिली गेली. त्यातले काही जण अजूनही मंत्रीमंडळात आहेत (कमलनाथ). १९७९ साली इंडियन एअरलाईन्सचे विमान पळवून इंदिरा गांधींच्या सुटकेची मागणी करणार्‍या बिहारमधील पांडे बंधूंना १९८० साली बिहारमध्ये मंत्री केले गेले होते. त्यांच्यावर दाखल झालेला खटला काढून टाकला. याउलट समझोता एक्स्प्रेस, मालेगाव बॉम्बस्फोट इ. प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा देणे लांबच राहिले, उलट त्या प्रकरणातील गुन्हेगारांऐवजी कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग व इतर ९ निर्दोष नागरिकांना ५ वर्षे आरोपपत्र दाखल न करता तुरूंगात डांबून ठेवले आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचाच हा प्रकार आहे. २ खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या इटलीच्या नौसैनिकांना तुरूंगात ठेवण्याऐवजी सरकारी विश्रामगृहात ठेवून व त्यांना हॉटेलचे जेवण पुरवुन एखाद्या पाहुण्यासारखी त्यांची बडदास्त ठेवली गेली (काही झालं तरी ते माहेरचे पाहुणे होते). ख्रिस्तमस साजरा करायला त्यांना मोकळे सोडले गेले. नंतर मतदान भारतात करणे शक्य असताना सुद्धा त्यांना विनाशर्त इटलीला जाऊन देण्यात आले व ते कायमचे पसार झाले. इतकी नाचक्की इतर कोणत्याही देशाची झाली नसेल. भारताच्या मूर्खपणाला सगळे जग हसत असेल. एकीकडे २ खुनांच्या आरोपातील आरोपींचे सर्व लाड पुरविले जात असताना विनाआरोपत्र डांबून ठेवलेल्या साध्वी प्रज्ञासिंगला वडीलांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी काही तासांसाठी सुद्धा जामीन दिला गेला नाही. तिला कर्करोगावरील उपचारांसाठी सुद्धा जामीन दिला जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

कॉंग्रेस च्या काळात झालेल्या

पिंपातला उंदीर
Sun, 03/17/2013 - 12:46 नवीन
कॉंग्रेस च्या काळात झालेल्या चुका दाखवून वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या चुका कशा समर्थनीय होऊ शकतात? वाजपेयी यानी अनेक वेळा अंतर्गत आणि परराष्ट्रीय आघाडीवर अपयश पत्करले हे मान्य करण्यात अडचण का आहे?? एका विशिष्ट विचारसरणीचा चष्मा डोळ्यावर चढवल्यावर असे होत असावे. कॉंग्रेस च्या काळात अनेक चुका घडल्याच त्या मान्य आेतच. पण त्यामुळे वाजपेयी सरकारने केलेल्या चुका कशा क्षम्य होऊ शकतात? देशातल्या जनतेने पण त्या चुकामुळेच वाजपेयना घरचा रस्ता दाखवला. २००९ पण तेच झाले . कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगण्याचा अजुन एक प्रयत्न करतो आणि रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> कॉंग्रेस च्या काळात

श्रीगुरुजी
Sun, 03/17/2013 - 13:21 नवीन
>>> कॉंग्रेस च्या काळात झालेल्या चुका दाखवून वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या चुका कशा समर्थनीय होऊ शकतात? तुम्ही फक्त १९९८-२००४ या काळात झालेल्या घटनांचेच दाखले देत आहात. कॉंग्रेसच्या काळात झालेल्या घटनांबद्दल तुम्ही आतापर्यंत एक चकार शब्दही काढलेला नाही. वाजपेयींच्या काळातल्या ज्या घटना तुम्ही चुका म्हणून दाखवित आहात (उदा. कंदाहार प्रकरण, तिबेट इ.) या प्रत्यक्षात चुका नाहीत. परंतु 'नावडतीचे मीठ अळणी' या न्यायाने त्या काळातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला चुकीचीच वाटत आहे. >>> वाजपेयी यानी अनेक वेळा अंतर्गत आणि परराष्ट्रीय आघाडीवर अपयश पत्करले हे मान्य करण्यात अडचण का आहे?? "अनेक वेळा" ही प्रचंड अतिशयोक्ती आहे. पाकिस्तानच्या बाबतीत वाजपेयींचे धोरण काहिसे गोंधळलेले होते हे मान्य आहे. पण भारताच्या इतिहासात आजतगायत होऊन गेलेल्या सर्वच पंतप्रधानांचे धोरण हे असेच गोंधळलेले होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वाजपेयींनी त्यांच्यापेक्षा काही वेगळे केलेले नाही. पण तरीसुद्धा फक्त वाजपेयींच्या काळातच पाकिस्तानवर काही क्षेत्रात निर्बंध आणण्याचा प्रयत्न झाला होता व इतरांच्या काळात असे प्रयत्न अजिबात झाले नव्हते हे नमूद करावेसे वाटते. >>> एका विशिष्ट विचारसरणीचा चष्मा डोळ्यावर चढवल्यावर असे होत असावे. एका विशिष्ट विचारसरणीला आंधळा विरोध केल्यावरही असेच होते. अशा लोकांसाठी मी "निधर्मांध" हा शब्द वापरतो. >>> देशातल्या जनतेने पण त्या चुकामुळेच वाजपेयना घरचा रस्ता दाखवला. २००९ पण तेच झाले . २००४ व २००९ मध्ये भाजप व काँग्रेस या दोघांचाही पराभव झाला होता. पण काँग्रेसने भाजपपेक्षा थोडे जास्त गुण मिळविले व इतर सर्व पक्ष भाजपविरूद्ध ठाम उभे राहिल्याने बहुमत न मिळतासुद्धा काँग्रेसला सरकार स्थापन करता आले होते. या दोन्ही निवडणुकातील भाजपच्या पराभवाचा आणि भाजपच्या १९९८-२००४ या काळातील कामगिरीचा फारसा संबंध नाही. भाजपने या निवडणुकीत आपले अनेक सहकारी पक्ष गमावले व ते काँग्रेसने मिळविले (उदा. द्रमुक) हे भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. >>> कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगण्याचा अजुन एक प्रयत्न करतो आणि रजा घेतो. हे विधान चुकीचे आहे. भाजप काँग्रेसपेक्षा तुलनेने कमी वाईट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

वाजपेयींच्या काळातल्या ज्या

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 22:12 नवीन
वाजपेयींच्या काळातल्या ज्या घटना तुम्ही चुका म्हणून दाखवित आहात (उदा. कंदाहार प्रकरण, तिबेट इ.) या प्रत्यक्षात चुका नाहीत.
कंदाहार प्रकरणातील ढिसाळ हाताळणी ही प्रत्यक्ष चुक नाही म्हणजे काय?
हे विधान चुकीचे आहे. भाजप काँग्रेसपेक्षा तुलनेने कमी वाईट आहे.
वाईटपणा मोजण्यासाठी तुम्ही कुठली फुटपट्टी वापरता ह्यावर हे ठरते. मला सगळे पक्ष एकाच माळेचे मणी वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> कंदाहार प्रकरणातील ढिसाळ

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 12:28 नवीन
>>> कंदाहार प्रकरणातील ढिसाळ हाताळणी ही प्रत्यक्ष चुक नाही म्हणजे काय? कंदाहार प्रकरणात नक्की कोठे ढिसाळ हाताळणी झाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

कंदाहार प्रकरणात भारत

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 18:22 नवीन
कंदाहार प्रकरणात भारत मुत्सद्देगिरीत कमी पडला हे तुम्ही ही मान्य केलेले आहे. ढिसाळ्पणाचा खुलासा दुसर्‍या एका प्रतिसादात दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"कंदाहार प्रकरणात भारत

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 20:31 नवीन
"कंदाहार प्रकरणात भारत मुत्सद्देगिरीत कमी पडला हे तुम्ही ही मान्य केलेले आहे. " हे मी कोणत्या प्रतिसादात मान्य केले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

अहो असे काय करता इथे तुम्हीच

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 20:36 नवीन
अहो असे काय करता इथे तुम्हीच म्हणाला आहेत की; http://www.misalpav.com/comment/471399#comment-471399
"मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्या घटना तुम्ही चुका म्हणून

बंडा मामा
Sat, 03/23/2013 - 23:11 नवीन
ज्या घटना तुम्ही चुका म्हणून दाखवित आहात (उदा. कंदाहार प्रकरण, तिबेट इ.) या प्रत्यक्षात चुका नाहीत.
आणि कारगील प्रकरणतील खलनायक मुशरर्फ साठी घातलेल्या पायघड्या, मेजवान्या इ.इ.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> आणि कारगील प्रकरणतील

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 12:35 नवीन
>>> आणि कारगील प्रकरणतील खलनायक मुशरर्फ साठी घातलेल्या पायघड्या, मेजवान्या इ.इ.? कोणत्याही देशाच्या प्रमुखाच्या "अधिकृत" भेटीच्या वेळी अशी सरबराई केलीच जाते. प्रत्येक देशच दुसर्‍या देशाच्या प्रमुखाच्या "अधिकृत" भेटीत अशी सरबराई करतोच. तसा आंतरराष्ट्रीय मानदंड आहे. दुसर्‍या देशाच्या प्रमुखाच्या "अधिकृत" भेटीच्या वेळी व दुसर्‍या देशाच्या प्रमुखाच्या मृत्युनंतर काही आंतरराष्ट्रीय मानदंड पाळावेच लागतात. हिटलरसारखाच दुसरा क्रूर हुकुमशहा असलेला धर्मांध अयातुल्ला खोमेनी १९८६ मध्ये वारल्यावर भारतात ३ दिवस सरकारी दुखवटा पाळला होता हा त्याच मानदंडानुसार. मुशर्रफची ती "अधिकृत" भेट होती. पण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा पंतप्रधान राजा अश्रफ अजमेरच्या खासगी भेटीवर आला होता. ही "अधिकृत" भेट नव्हती. पण तरीसुद्धा सलमान खुर्शिदने त्याचे विमानतळावर जाऊन पायघड्या घालून स्वागत केले व त्याच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. मुख्य म्हणजे केवळ काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने २ भारतीय सैनिकांचा शिरच्छेद केला होता व हैद्राबाद बॉम्बस्फोट देखील घडवून आणले होते. तरीसुद्धा राजा अश्रफची सरबराई ठेवली गेली. याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

ही भेट "अधिकृत" कुणी केली?

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 18:12 नवीन
ही भेट "अधिकृत" कुणी केली? काय गरज होती? भारताशी कुटील युद्ध खेळणार्‍या, लोकशाही धुडकावुन हुकशहा बनलेल्या अध्यक्षाला मान्यताच द्यायला नको होती. निदान सो कॉल्ड खंबीर आणि जाज्वल्य राष्ट्रप्रेमी पक्षाची सत्ता असताना? इथे बरे मानदंड आडवे येतात. आपल्या नरेंद्र मोदिंना गुजरात राजयाचे मुख्यमंत्री असुनही अमेरिकेने अधिकृत भेट सोडाच साधा विजिटर विसा पण दिला नाही. त्यांना कसे जमते हे? मोदी आपले अधक्ष नसले तरी मुख्यमंत्री हे अतिशय मोठे पद भुषवतात तसेच त्यांनी अमेरिकेशी युद्ध काय कधी चकार शब्दही काढलेला नाही. तरीही त्यांना फाट्यावर मारलेच ना? राजा खुर्शिद खाजगी भेटीवर असला तरी तो त्यांचा पंतप्रधान आहे. तोही लोकशाहीने निवडून आलेल्या पक्षाचा. हुकुमशहा नव्हे. त्याचे स्वागत करायचेही काही आंतरर्ष्ट्रीय संकेत नसतील कशावरुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बंडा मामा

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/24/2013 - 18:22 नवीन
बंडा मामा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

काय गरज होती...

अर्धवटराव
Sun, 03/24/2013 - 19:51 नवीन
वाजयेयीसारखा मुत्सद्दी उगाच हवा-पाण्याच्या गप्पा मारायला बोलावणार नाहि... खासकरुन कारगिलच्या पार्श्वभुमीवर. अणुस्फोटाम्नंतर भारतावर लादलेले आर्थीक निर्बंध, कारगिल आणि एकुणच भारत-पाक संबंधी क्लिंटनची फसलेली मुत्सद्देगिरी, पाकिस्तानात लोकनिर्वाचीत सरकारचे पुढील दशकभराकरता ड्ब्यात जाणे, मुशर्र्फचे आसन बळकट होताना स्पष्ट दिसणे, या सर्व घ्टकांवर आग्रा घेटीकडे बघायला हवे. बस डिप्लॉमसी फसल्यानंतर वाजपेयीने हा नवी विटी नवा डाव टाकला.... दुर्दैवाने तो फसला.... इव्हन मुशर्रफ्ला आणि आणि वॉशिंग्टन डी सी ला याची चुटपुट लागुन राहिली. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

पटले नाही

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 20:14 नवीन
तुम्ही दिलेले एकही कारण मुशर्र्फला पायघड्या घायण्यासाठी पुरेसे वाटत नाही. मुशर्र्फला बोलावणे ही चूक होती हे अगदी श्रीगुरुजींनीही मान्य केले आहे. मुशर्र्फ सारख्या लष्करी हुकुमशहाला असल्या चुचकारण्याने सुधरवण्याचा प्रयत्न करणे हाच तो श्रीगुरुजी इतरत्र म्हणतात तो भाबडा गैरसमज आहे. मुत्सेद्देगिरी वगैरे काही नाही. शेवटी व्हायचे तेच झाले. मुशर्र्फ मस्त ताज महालवर पोझ घेऊन फोटो सेशन करुन निघुन गेला आणि आम्ही भाबडे जैसे थे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सुधरवण्याचा प्रयत्न ??

अर्धवटराव
Sun, 03/24/2013 - 21:51 नवीन
अहो त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करायला हि काय गांधिगिरी आहे काय? म्हणजे शांतीचे पाठ देऊन त्याचं हृदय परिवर्तन करायचा वाजपेयींचा प्रयत्न होता असं म्हणायचं आहे कि काय तुम्हाला? किंवा त्याला बाबा बेटा करुन जेऊ खाऊ घातलं कि तो भारत द्वेष विसरेल असा वाजपेयींचा होरा होता, असा दावा आहे तुमचा?? वाजपेयी हिंदी - पाकि भाई भाई म्हणणारे स्वप्नरंजाळु नक्कीच नव्हते, किंवा मुशर्रफचा वाल्याचा वाल्मिकी करायचा देखील वाजपेयींचा प्रयत्न नव्हता. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी आणि टीमचे कॅल्क्युलेशन्स चुकले... पण त्यांचा आशावाद भाबडा वगैरे नव्हता... वाजपेयी किंवा आडवाणि किंचीत देखील भाबडे नाहित हो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

वाजपेयी किंवा आडवाणि किंचीत

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 22:16 नवीन
वाजपेयी किंवा आडवाणि किंचीत देखील भाबडे नाहित हो.
वाजपेयी नाहीत हो..जे लोक जे वाजपेयींच्या चुकींना मुत्सद्दीपणा समजतात त्यांना मी भाबडे म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

फार योग्य गोष्ट बोललात

निनाद मुक्काम …
Sun, 03/24/2013 - 20:50 नवीन
फार योग्य गोष्ट बोललात काहीतरी ठोकताळे नक्कीच बांधले असतील वाजपेयी सरकारने पण तुम्ही म्हणतात ते दुर्दैवाने फसले ,पण दुर्दैवाने हे त्यांचे पहिले अपयश नव्हते , चुकीचे परराष्ट्र निर्णय घेणे हेच त्यांच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्टे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जैसे कि?

अर्धवटराव
Sun, 03/24/2013 - 21:58 नवीन
>>चुकीचे परराष्ट्र निर्णय घेणे हेच त्यांच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्टे आहेत. ? कुठले चुकीचे निर्णय? उदाहरणे देता येईल का? कुठले निर्णय चुकले, त्याने भारताचे काय काय नुकसान झाले ? गोधरा काण्ड, इंडीया शायनींग, मुशर्रफ भेट, करुणानिधीशी घरोबा न करणे, हे काहि चुकीचे निर्णय एन. डी. ए. च्या खात्यात जमा केले जातात... परराष्ट्र नितींसंबंधात मी काहि विषेश निगेटीव्ह ऐकलं नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मुशराफ्फ भेट अपयशी परराष्ट्र

पिंपातला उंदीर
Sun, 03/24/2013 - 22:02 नवीन
मुशराफ्फ भेट अपयशी परराष्ट्र धोरणात येत नाही? तुमचे परराष्ट्र धोरणाचे निकष एकदा कळले की आम्हा पामरणा प्रतिसाद द्यायला सोपे जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

थोडं नीट वाचा हो

अर्धवटराव
Mon, 03/25/2013 - 00:50 नवीन
इथे बाय अ‍ॅण्ड लार्ज फेल्युअर बद्दल बोलणं सुरु आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

टाचण

अर्धवटराव
Sun, 03/24/2013 - 22:03 नवीन
किंबहुना वाजपेयींच्या काळात चिनशी व्यावहारीक संबंधात सुधारणाच झाल्या असा सुर ऐकु येतो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

"ही भेट "अधिकृत" कुणी केली?

श्रीगुरुजी
Sun, 03/24/2013 - 20:35 नवीन
"ही भेट "अधिकृत" कुणी केली? काय गरज होती? " मुशर्रफला आग्र्याला बोलाविणे ही चूकच होती. हे मी पूर्वीही लिहिले आहे. "आपल्या नरेंद्र मोदिंना गुजरात राजयाचे मुख्यमंत्री असुनही अमेरिकेने अधिकृत भेट सोडाच साधा विजिटर विसा पण दिला नाही. त्यांना कसे जमते हे?" अमेरिका महाशक्ती आहे. अमेरिका कोणत्याही देशात घुसून आपल्याला हवे तेच करते. अमेरिका पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारते, इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेनला पकडते, पनामात घुसून पनामाचा अध्यक्ष असलेल्या जनरल नोरिएगाला आपल्या देशात पकडून आणून खटला चालवून शिक्षा देते . . . भारत व अमेरिकेची बरोबरी होऊच शकत नाही. "राजा खुर्शिद खाजगी भेटीवर असला तरी तो त्यांचा पंतप्रधान आहे. तोही लोकशाहीने निवडून आलेल्या पक्षाचा. हुकुमशहा नव्हे. त्याचे स्वागत करायचेही काही आंतरर्ष्ट्रीय संकेत नसतील कशावरुन? " तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत भेटीचा राग आलेला आहे, पण राजा अश्रफची खाजगी/अनधिकृत भेटीवर केलेली सरबराई मात्र अजिबात खुपलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत

बंडा मामा
Sun, 03/24/2013 - 20:40 नवीन
तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत भेटीचा राग आलेला आहे, पण राजा अश्रफची खाजगी/अनधिकृत भेटीवर केलेली सरबराई मात्र अजिबात खुपलेली नाही.
नाही. जो न्याय तुम्ही खुर्शिद भेटीला लावावात तोच मुशर्र्फ भेटीलाही लावावा इतकेच माझे म्हणणे आहे. मूळ मुद्दा भाजपानेही काँग्रेससारख्याच चुका केल्या आहेत का हा होता. ज्यातील भाजपाच्या चुका तेवढ्या अमान्य केल्याने उपचर्चा सुरू झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा